ज्वारीचे महत्व,ज्वारी पासून बनणारे पदार्थ, आणि ज्वारीचे फायदे.Jwar Bhakri.

Jwar Bhakri.आपल्या महाराष्ट्रात ज्वारीचे पीक हे मोठ्या प्रमाणावर घेतले जाते, त्यामुळे उत्पादनही मोठया प्रमाणात होते. दुष्काळी भागात हे पीक मुख्य आहे. 

सोलापूर, बार्शी, उस्मानाबाद, लातूर, अहमदनगर आणि बीड जिल्हा या भागात प्रामुख्याने हे पीक घेतले जाते.

Table of Contents

Jwar Bhakri
Jwar Bhakri.

Jwar Bhakri – Importance of Jwar

👉 जाणून घेऊया ज्वारीचे महत्व :

  • ज्वारी हे पावसावर अवलंबून असणारे पीक आहे.त्यामुळे कमी पाण्यातही ज्वारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. 
  • ज्वारीची भाकरी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे, ग्रामीण भागातील लोकांच्या आहारात या भाकरीचा दररोज समावेश असतो.
  • हि भाकरी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.’Jwar Bhakri importance’

Jwar Bhakri – Daily Eating Benifits.

👉 रोजच्या आहारात ज्वारी खाण्याचे फायदे :

  • ज्वारीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, यामुळेच आपली पचनक्रिया सुधारते आणि पोटाचा त्रास कमी होतो.
  • ज्वारीतील कोलेस्ट्रॉल कमी करण्याच्या गुणधर्मामुळे आपले हृदय निरोगी राहण्यास मदत होते.
  • ज्वारीची भाकरी खाल्ल्याने आपल पोट जास्त भरलेले राहत, त्यामुळे आपण बाहेरच खाण टाळतो याचाच परिणाम आपले वजन नियंत्रणात राहते.
  • ज्यांना  चपाती पचत नाही किंवा ती खाल्याने पोट जड वाटते, त्यांच्यासाठी ज्वारी हा एक उत्तम पर्याय आहे.
  • ज्वारीमध्ये असणारे पोषक घटक आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.

Jwar- Recepies of Jwar

👉 ज्वारीपासून बनविले जाणारे पदार्थ :

  • ज्वारीची भाकरी, ज्वारीच अंबिल, ज्वारीची लापशी हे काही पारंपरिक पदार्थ ज्वारीपासून बनविले जातात.
  • ज्वारीचा उपमा, धिरडे हे पदार्थ आपण नाश्त्यासाठी खाऊ शकतो.
  • ज्वारीपासून बनविलेले लाडू, थालीपीठ, कुकीज असे अनेक पदार्थ बनविले जातात.

jwar Bhakri

👉 ज्वारीची भाकरी खाण्याचे फायदे :

  • ज्वारीची भाकरी पचनासाठी खूप हलकी  असते, त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना  खाण्यासाठी उपयोगाची असते. .
  • हि भाकरी   खाल्ल्याने जास्त वेळ पोट भरल्यासारखे वाटते, त्यामुळे भूक कमी लागते.
  • ज्वारीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे आपल्या रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते.
  • तिच्यामध्ये असणाऱ्या कॅल्शियम आणि लोहामुळे आपली  हाडे मजबूत होतात.
  • ज्यांना ग्लूटेनची अ‍ॅलर्जी आहे, त्यांच्यासाठी ज्वारीची भाकरी उत्तम पर्याय आहे.

 ज्वारीची भाकरी बनविण्याची पद्धत :

भाकरी बनविण्यासाठी लागणारे साहित्य :

  • ज्वारीचे पीठ
  • गरम पाणी/थंड पाणी 
  • चिमूटभर मीठ

भाकरी बनविण्याची कृती :

  1. ज्वारीच्या पिठात मीठ घालून गरम पाण्याने मळून घ्या किंवा थंड पाणी वापरून सुद्धा तुम्ही पीठ मळून घेऊ शकता.
  2. थंड पाणी घालून पीठ मळले असेल तर भाकरी हाताने ठापून घ्या, जर गरम पाणी घालून पीठ मळले असेल तर तुम्ही भाकरी  लाटण्याने लाटून शकता .
  3. गरम तव्यावर दोन्ही बाजूंनी भाकरी  भाजून घ्या.

ज्वारीची भाकरी खालील पदार्थांसोबत खूप चविष्ट लागते:

  • पिठलं
  • झुणका
  • ठेचा
  • भाजी (वांगी, भेंडी)
  • लोणी किंवा तूप

 ज्वारीच्या भाकरीतून मिळणाऱ्या कॅलरी :

  • ज्वारीच्या भाकरीतून मिळणाऱ्या कॅलरीज या भाकरी बनविण्यासाठी आपण किती प्रमाणात पीठ वापरतो यावर अवलंबून असतात.
  • जर आपण 50-60 ग्रॅम पीठ घेऊन भाकरी बनवत असेल तर आपल्याला या भाकरीपासून 120 ते 150 कॅलरीज मिळतात 
  • तुम्ही जर जास्त पीठ वापरून साधारण 100ग्रॅम एवढं पीठ घेऊन भाकरी बनवली तर  330 ते 350 एवढ्या कॅलरीज आपल्याला  मिळतात.

ज्वारीची भाकरी आपल्याला फक्त कॅलरीज देत नसून कॅलरीज बरोबर फायबर, प्रोटीन, आयर्ण, मॅग्नेशियम पण देते.

यावरूनच असे लक्षात येते की ज्वारी हे एक सुपरफूड आहे. दररोज एक ज्वारीची भाकरी खाल्ल्याने आपला अनेक आजारांपासून बचाव होऊ शकतो.

Related Posts

केळी किंवा केळी मिल्कशेक: तुमच्या पोटासाठी आणि पचनासाठी काय चांगले आहे?Banana.

Banana. केळी हे जगातील सर्वात महत्वाच्या फळापैकी एक फळ आहे. केळीची लागवड ही सहसा उष्ण प्रदेशात केली जात असली तरी तिच्या चवीसाठी, पौष्टिक गुणधर्मासाठी आणि वर्षभर उपलब्ध असणार फळ म्हणून…

वजन कमी करण्याचे वास्तव नक्की काय आहे?How to lose weight fast?

How to lose weight fast? वजन कमी करण्याच्या सल्ल्यांचा बाजार जितका चांगला वाटतो तितकाच तो गोंधळात टाकणाराही आहे.वास्तविकता अशी आहे की निरोगी वजन कमी करणे हे वैज्ञानिक समज, सातत्य आणि…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

पर्यटन काळात रिसॉर्ट मालकांनी कोणत्या पद्धतीने तयार राहावे? Tourist season business tips for resort owners.

पर्यटन काळात रिसॉर्ट मालकांनी कोणत्या पद्धतीने तयार राहावे? Tourist season business tips for resort owners.

अलिबागचा पांढरा कांदा – कोकणातील एक अनमोल शेती वारसा. Alibag white onion.

अलिबागचा पांढरा कांदा – कोकणातील एक अनमोल शेती वारसा. Alibag white onion.

पुणे रिअल इस्टेट मार्केट मध्ये नवा इतिहास:२६0 कोटी रुपयांचा विक्रमी ऑफिस भाडे करार!Pune Real Estate.

पुणे रिअल इस्टेट मार्केट मध्ये नवा इतिहास:२६0 कोटी रुपयांचा विक्रमी ऑफिस भाडे करार!Pune Real Estate.

ज्वारीचे महत्व,ज्वारी पासून बनणारे पदार्थ, आणि ज्वारीचे फायदे.Jwar Bhakri.

ज्वारीचे महत्व,ज्वारी पासून बनणारे पदार्थ, आणि ज्वारीचे फायदे.Jwar Bhakri.

कर्करोगासारख्या आजारावर उपयुक्त ते चमकदार त्वचेसाठी प्रभावी असं फळ…..Papaya Benefits In Marathi.

कर्करोगासारख्या आजारावर उपयुक्त ते चमकदार त्वचेसाठी प्रभावी असं फळ…..Papaya Benefits In Marathi.

केळी किंवा केळी मिल्कशेक: तुमच्या पोटासाठी आणि पचनासाठी काय चांगले आहे?Banana.

केळी किंवा केळी मिल्कशेक: तुमच्या पोटासाठी आणि पचनासाठी काय चांगले आहे?Banana.
0

Subtotal