Jwar Bhakri.आपल्या महाराष्ट्रात ज्वारीचे पीक हे मोठ्या प्रमाणावर घेतले जाते, त्यामुळे उत्पादनही मोठया प्रमाणात होते. दुष्काळी भागात हे पीक मुख्य आहे.
सोलापूर, बार्शी, उस्मानाबाद, लातूर, अहमदनगर आणि बीड जिल्हा या भागात प्रामुख्याने हे पीक घेतले जाते.
- Jwar Bhakri – Importance of Jwar
- Jwar Bhakri – Daily Eating Benifits.
- Jwar- Recepies of Jwar
- Jwar Bhakri
- इतर आरोग्य फायदे:
- ज्वारीच्या भाकरीबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न:
- 1. एका ज्वारीच्या भाकरीमध्ये किती कॅलरीज असतात?
- 2. ज्वारीची भाकरी वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे का?
- 3. मधुमेहींसाठी ज्वारीची भाकरी चांगली आहे का?
- 4. ज्वारीची भाकरी रोज खाऊ शकतो का?
- 5. ज्वारी आणि गव्हाची पोळी यापैकी कोणती अधिक आरोग्यदायी आहे?
- 6. ज्वारीची भाकरी पचनासाठी चांगली असते का?
- 7. ज्वारीची भाकरी खाल्ल्याने पोटाची चरबी कमी होते का?
- 8. वजन कमी करण्यासाठी दिवसातून किती ज्वारीच्या भाकऱ्या खाव्यात?
- निष्कर्ष:

Jwar Bhakri – Importance of Jwar
जाणून घेऊया ज्वारीचे महत्व :
- ज्वारी हे पावसावर अवलंबून असणारे पीक आहे.त्यामुळे कमी पाण्यातही ज्वारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते.
- ज्वारीची भाकरी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे, ग्रामीण भागातील लोकांच्या आहारात या भाकरीचा दररोज समावेश असतो.
- हि भाकरी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.’Jwar Bhakri importance’
Jwar Bhakri – Daily Eating Benifits.
रोजच्या आहारात ज्वारी खाण्याचे फायदे :
- ज्वारीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, यामुळेच आपली पचनक्रिया सुधारते आणि पोटाचा त्रास कमी होतो.
- ज्वारीतील कोलेस्ट्रॉल कमी करण्याच्या गुणधर्मामुळे आपले हृदय निरोगी राहण्यास मदत होते.
- ज्वारीची भाकरी खाल्ल्याने आपल पोट जास्त भरलेले राहत, त्यामुळे आपण बाहेरच खाण टाळतो याचाच परिणाम आपले वजन नियंत्रणात राहते.
- ज्यांना चपाती पचत नाही किंवा ती खाल्याने पोट जड वाटते, त्यांच्यासाठी ज्वारी हा एक उत्तम पर्याय आहे.
- ज्वारीमध्ये असणारे पोषक घटक आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.
Jwar- Recepies of Jwar
ज्वारीपासून बनविले जाणारे पदार्थ :
- ज्वारीची भाकरी, ज्वारीच अंबिल, ज्वारीची लापशी हे काही पारंपरिक पदार्थ ज्वारीपासून बनविले जातात.
- ज्वारीचा उपमा, धिरडे हे पदार्थ आपण नाश्त्यासाठी खाऊ शकतो.
- ज्वारीपासून बनविलेले लाडू, थालीपीठ, कुकीज असे अनेक पदार्थ बनविले जातात.
Jwar Bhakri
ज्वारीची भाकरी खाण्याचे फायदे :
- Jwar Bhakri पचनासाठी खूप हलकी असते, त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना खाण्यासाठी उपयोगाची असते. .
- हि भाकरी खाल्ल्याने जास्त वेळ पोट भरल्यासारखे वाटते, त्यामुळे भूक कमी लागते.
- ज्वारीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे आपल्या रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते.
- तिच्यामध्ये असणाऱ्या कॅल्शियम आणि लोहामुळे आपली हाडे मजबूत होतात.
- ज्यांना ग्लूटेनची अॅलर्जी आहे, त्यांच्यासाठी ज्वारीची भाकरी उत्तम पर्याय आहे.
ज्वारीची भाकरी बनविण्याची पद्धत :
भाकरी बनविण्यासाठी लागणारे साहित्य :
- ज्वारीचे पीठ
- गरम पाणी/थंड पाणी
- चिमूटभर मीठ
भाकरी बनविण्याची कृती :
- ज्वारीच्या पिठात मीठ घालून गरम पाण्याने मळून घ्या किंवा थंड पाणी वापरून सुद्धा तुम्ही पीठ मळून घेऊ शकता.
- थंड पाणी घालून पीठ मळले असेल तर भाकरी हाताने ठापून घ्या, जर गरम पाणी घालून पीठ मळले असेल तर तुम्ही भाकरी लाटण्याने लाटून शकता .
- गरम तव्यावर दोन्ही बाजूंनी भाकरी भाजून घ्या.
ज्वारीची भाकरी खालील पदार्थांसोबत खूप चविष्ट लागते:
- पिठलं
- झुणका
- ठेचा
- भाजी (वांगी, भेंडी)
- लोणी किंवा तूप
ज्वारीच्या भाकरीतून मिळणाऱ्या कॅलरी :
- ज्वारीच्या भाकरीतून मिळणाऱ्या कॅलरीज या भाकरी बनविण्यासाठी आपण किती प्रमाणात पीठ वापरतो यावर अवलंबून असतात.
- जर आपण 50-60 ग्रॅम पीठ घेऊन भाकरी बनवत असेल तर आपल्याला या भाकरीपासून 120 ते 150 कॅलरीज मिळतात
- तुम्ही जर जास्त पीठ वापरून साधारण 100ग्रॅम एवढं पीठ घेऊन भाकरी बनवली तर 330 ते 350 एवढ्या कॅलरीज आपल्याला मिळतात.
ज्वारीची भाकरी आपल्याला फक्त कॅलरीज देत नसून कॅलरीज बरोबर फायबर, प्रोटीन, आयर्ण, मॅग्नेशियम पण देते.
यावरूनच असे लक्षात येते की ज्वारी हे एक सुपरफूड आहे. दररोज एक ज्वारीची भाकरी खाल्ल्याने आपला अनेक आजारांपासून बचाव होऊ शकतो.
इतर आरोग्य फायदे:
1. रक्तातील साखर नियंत्रित करते
ज्वारीमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स (Glycemic Index) कमी असतो. यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही. मधुमेह (Diabetes) असलेल्या लोकांसाठी ज्वारीचे सेवन करणे खूप उपयुक्त आहे.
2. वजन कमी करण्यास मदत
3. हाडांसाठी मजबूत
ज्वारीमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियमसारखी खनिजे भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे हाडे मजबूत होतात आणि ऑस्टिओपोरोसिससारख्या (Osteoporosis) आजारांचा धोका कमी होतो. मॅग्नेशियम शरीरात कॅल्शियमचे योग्य शोषण होण्यास मदत करते. ज्वारीतील पोषक घटक हाडे ठिसूळ होण्यापासून वाचवतात.वाढत्या वयात हाडांचे आरोग्य टिकवण्यासाठी ज्वारीचा आहारात समावेश करणे फायदेशीर ठरते.
4. हृदयाच्या आरोग्यासाठी
ज्वारीमध्ये असलेले फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स (Antioxidants) खराब कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करण्यास मदत करतात, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.ज्वारीमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसारखे खनिज घटक असतात, जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
ज्वारीच्या भाकरीबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न:
1. एका ज्वारीच्या भाकरीमध्ये किती कॅलरीज असतात?
साधारणपणे मध्यम आकाराच्या (50-60 ग्रॅम पीठ) एका ज्वारीच्या भाकरीमध्ये 120 ते 170 कॅलरीज असू शकतात. भाकरीचा आकार आणि जाडी यानुसार कॅलरीज बदलू शकतात.
2. ज्वारीची भाकरी वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे का?
होय. ज्वारीमध्ये भरपूर फायबर असल्यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते, भूक कमी लागते आणि वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
3. मधुमेहींसाठी ज्वारीची भाकरी चांगली आहे का?
होय. ज्वारीचा ग्लायसेमिक इंडेक्स तुलनेने कमी असल्यामुळे रक्तातील साखर अचानक वाढण्याची शक्यता कमी असते.
4. ज्वारीची भाकरी रोज खाऊ शकतो का?
होय. संतुलित आहाराचा भाग म्हणून ज्वारीची भाकरी नियमित खाल्ल्यास शरीराला फायबर, प्रथिने आणि अनेक पोषक घटक मिळतात.
5. ज्वारी आणि गव्हाची पोळी यापैकी कोणती अधिक आरोग्यदायी आहे?
दोन्हींचे फायदे आहेत. मात्र ज्वारीमध्ये अधिक फायबर आणि काही महत्त्वाची खनिजे असल्यामुळे वजन नियंत्रण आणि पचनासाठी ती अधिक फायदेशीर मानली जाते.
6. ज्वारीची भाकरी पचनासाठी चांगली असते का?
होय. ज्वारीतील फायबर पचनक्रिया सुधारण्यास मदत करते आणि बद्धकोष्ठतेची समस्या कमी करू शकते.
7. ज्वारीची भाकरी खाल्ल्याने पोटाची चरबी कमी होते का?
फक्त ज्वारीची भाकरी खाल्ल्याने पोटाची चरबी कमी होत नाही. मात्र संतुलित आहार आणि नियमित व्यायामासोबत ज्वारीचा समावेश केल्यास वजन कमी करण्यास मदत होऊ शकते.
8. वजन कमी करण्यासाठी दिवसातून किती ज्वारीच्या भाकऱ्या खाव्यात?
हे व्यक्तीचे वय, वजन, शारीरिक हालचाल आणि एकूण आहारावर अवलंबून असते. सामान्यतः 1 ते 2 मध्यम आकाराच्या भाकऱ्या संतुलित आहाराचा भाग म्हणून खाल्ल्या जाऊ शकतात.
निष्कर्ष:
ज्वारी हे एक अत्यंत पौष्टिक आणि आरोग्यदायी धान्य आहे. त्यामध्ये फायबर, प्रथिने, लोह, मॅग्नेशियम आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आढळतात. ज्वारीची भाकरी पचन सुधारण्यास, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास आणि दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटण्यास मदत करते. त्यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी तसेच वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी ज्वारी हा उत्तम आहार पर्याय मानला जातो.
नियमित आहारात ज्वारीचा समावेश केल्यास हृदयाचे आरोग्य सुधारण्यास, पचनसंस्था निरोगी ठेवण्यास आणि शरीराला आवश्यक पोषण मिळवून देण्यास मदत होते. त्यामुळे निरोगी जीवनशैलीसाठी ज्वारीची भाकरी हा एक उत्तम आणि पारंपरिक पर्याय ठरू शकतो.
तुम्ही ज्वारीची भाकरी नियमित खाता का? ज्वारीबद्दलचा तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. हा लेख उपयुक्त वाटला असेल तर मित्र आणि कुटुंबीयांसोबत शेअर करायला विसरू नका! अशाच आरोग्यविषयक उपयुक्त माहितीसाठी RealInfoWorld.in ला नियमित भेट द्या.








