Papaya Benefits In Marathi.चमकदार त्वचेसाठी तर सगळीच फळ आपण खाऊ शकतो पण असं म्हणतात पपई अतिशय प्रभावी आहे. परंतु हीच पपई कर्करोगरसारख्या आजारावर देखील तितकीच प्रभावी आहे. चला तर मग पाहूया पपईचा प्रभावी गुणधर्म.
पपई हे एक अतिशय चविष्ट आणि भरपूर पोषणमूल्यांनी समृद्ध असं फळ आहेत. आपल्या देशामध्ये पपई सहजपणे उपलब्ध होते. हे फळ फक्त चावीसाठी नाही तर आरोग्यासाठीही तेवढंच फायदेशीर आहे.पपईमध्ये जिवसत्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात, जे की आपल्या शरीराच्या विविध क्रियेसाठी गरजेचे असतात.

त्वचेसाठी असणारे पपईचे फायदे :
- पपईमध्ये पपेन (papain) नावाचा एन्झाइम असतो, हा एन्झाइम आपल्या त्वचेवरील मृत पेशी काढून त्वचा उजळ बनवतो.
- पपईतील अँटीबॅक्टरियल गुणधर्म आपल्या चेहऱ्यावरील मुरूम (acne) कमी करण्यास मदत करतात.
- A, C आणि E व्हिटॅमिन हे पपईमध्ये बऱ्याच प्रमाणात असत, त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि फाईन लाईन्स कमी होण्यास मदत होते.
- पपई हि आपल्या शरीराला हायड्रेट ठेवते, त्यामुळे कोरड्या त्वचेसाठी तिचा नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणूनही उपयोग होतो.
- आपण पपईचा वापर हा खाण्यासाठी तर करतोच, परंतु पिकलेल्या पपईचा गर 10-15 मिनिटे चेहऱ्यावर लावून नंतर धुतल्यास त्याचा योग्य तो परिणाम आपण आपल्या चेहऱ्यावर पाहू शकतो.
कॅन्सर प्रतिबंधासाठी प्रभावी पपई :
Papaya: Effective for Cancer Preventation.
- पपईमध्ये लायकोपीन (Lycopene) आणि व्हिटॅमिन C हे अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीरातील फ्री रेडिकल्स कमी करतात.
- पपई आपल्या शरीरातील इम्युनिटी वाढवून कॅन्सरचा धोका कमी करण्यास मदत करते.
- शरीरातील सूज कमी करणे हे कॅन्सर साठी प्रतिबंधन आहे आणि पपईमध्ये दाह कमी करणारे गुणधर्म असतात.
वैज्ञानिक दृष्टिकोन :
कॅन्सर हा सहसा पेशिंच्या अनियंत्रित वाढीमुळे होतो. पपईमध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स आपल्या शरीरातील पेशींना नुकसान पोहचू देत नाहीत.रोजच्या वापरातील पपईच्या याच कारणामुळे कॅन्सर होण्याची शक्यता कमी होते.
# पपई हि कॅन्सर पूर्णपणे बरा करते असं नाही. हा फक्त आरोग्यदायी आहाराचा एक भाग आहे. आरोग्यदायी आहाराबरोबरच कॅन्सरसारख्या आजारासाठी वैद्यकीय उपचार हि तितकेच गरजेचे आहेत .
पपईच्या पानापासून होणारे फायदे :
पपईच्या पानांचा वापर करण्याबरोबरच घ्यावयाची काळजी :
- पपईच्या पानांचा रस हा आपल्या शरीरातील प्लेटलेट्स वाढवण्यासाठी मदत करतो, त्यामुळे तो डेंग्यू बरा करण्यासाठी उपयोगी ठरतो.
- पपईमध्ये असलेले एन्झाइमआपल्या शरीरातील पचनक्रिया सुधारतात त्यामुळेच आपल्या शरीरातील गॅस आणि अपचन कमी होते.
- पपई रक्त शुद्ध करण्यास मदत करते त्यामुळेच आपली त्वचा निरोगी राहते.
- पपईच्या पानांचा वापर केस गळती कमी करण्याबरोबरच केसातील कोंडा कमी करण्यासाठी केला जातो.
- पपईची पाने रक्तातील साखर कमी करण्यास उपयोगी ठरतात.
- पपईच्या पानांचा रस खूप कडू असतो त्यामुळे तो प्रमाणातच घ्यावा.
- गर्भवती महिलानी याचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
पपईची पाने आरोग्यासाठी फायदेशीर असली तरी ती योग्य प्रमाणात घेणे महत्वाचे आहेत.
पपई पासून मिळणारे पोषणमूल्य :
Nutritional Value Of Papaya.
कॅलरीज, कार्बोहायड्रेट्स, प्रथीने, फॅट, फायबर अशी बरीच पोषणमूल्ये पपई पासून मिळतात.
जीवनसत्वे :
व्हिटॅमिन C, A, E, K, Folate व्हिटॅमिन B9,B1,B3,B6 इत्यादी जीवनसत्वे आपल्याला पपई खाल्ल्याने मिळते.
खनिजे :minerals
पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, आयर्न. ही खनिजे आपल्याला पपईपासून भेटतात.
पपई पासून बनवल्या जाणाऱ्या हेल्दी रेसिपी :
1.पपई स्मूदी (Papaya Smudi): ही स्मूदी बनविण्यासाठी 1 वाटी पिकलेली पपई, दूध 1 वाटी , मध 1 चमचा, तुम्हाला हवा असल्यास बर्फ हे सगळं साहित्य मिक्सरमध्ये ब्लेड करून घ्यावं.
या स्मूदी मुळे वजन कमी होण्यास सुरुवात होते.
2.पपई सलाड(Papaya salad): कच्ची किसलेली 1वाटी पपई, गाजर अर्धी वाटी, लिंबाचा रस, चवीपूरत मीठ आणि थोडी साखर वापरून आपण पपईच सलाड बनवू शकतो.
हे सलाड पचनासाठी एकदम हलके असते.
3.कच्चा पपईची भाजी(Raw Papaya vegetable): 2वाटी कच्ची चिरलेली पपई, कांदा, टोमॅटो, हळद, तिखट, मीठ, तेल, मोहरी, जिरे.
रोजच्या जेवणासाठी एक आरोग्यदायी पर्याय.
4.पपई आईस्क्रीम(Papaya Icecream): पपईचा पल्प, क्रीम आणि साखर वापरून आपण एक नवीन फ्लेवरच आईस्क्रीम बनवू शकतो.
मुलांसाठी ही एक खास ट्रीट ठरू शकते.
5.पपई ज्युस(Papaya Juice): पपईचा ज्युस हा आपल्या शरीराला ऊर्जा देणार ड्रिंक आहे.
6.पपईचा हलवा(Papaya Halwa):आपण बाकीचे हलवे ज्या पद्धतीने करतो त्याच पद्धतीने हा हलवा केला जातो. सणासुदीला ही एक वेगळी आणि परफेक्ट डिश म्हणून खाण्यात येईल.
यावरूनच तुम्हाला लक्षात येईल की रोजच्या आहारात पपई हि आपल्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्यासाठी पपईचा नियमित आहारात समावेश केल्याने आपली त्वचा सुधारते त्याचबरोबर कॅन्सरचा धोकाही काहीशा प्रमाणात कमी होण्यास मदत होते.








