Mumbai-pune “Missing link”.मोठमोठे पूल आणि बोगदे यांना एकत्र करून तयार झालेला Mumbai-pune “Missing link” हा 19.8 किमी लांबीच्या घाट असणाऱ्या प्रवासाला एक पर्याय म्हणून चालू करण्यात आला आहे. या घाटाला मोठमोठी वळणे आणि तीव्र चढउतारामुळे होणाऱ्या अपघाताचा आणि प्रचंड वाहतूक कोंडीचा इतिहास आहे.
1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिन या दिवशीपासून पुणे ते मुंबई असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आता दोन पर्याय उपलब्ध असतील. त्यामध्ये पश्चिम घाटातून जाणारा निसर्गरम्य रस्ता किंवा डोंगर आणि दऱ्यांमधून 10 मिनिटांपेक्षाही कमी वेळेत पोहचणारा रस्ता अशा दोन मार्गांचा समावेश असेल.
शुक्रवारी 1मे या दिवशी Mumbai-pune “Missing link” चे उदघाट्न झाले. यामुळे आता पुणे आणि मुंबई या दोन शहरातील प्रवासाचा वेळ 6 किमी कमी झाला असून 30 मिनिटे एवढा वेळही वाचत आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 1 मे रोजी दुपारी 12:30 च्या दरम्यान या प्रकल्पाचे उदघाट्न केले. या जगातील सर्वात रुंद बोगदा असणाऱ्या मार्गाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद व्हावी यासाठी सुद्धा प्रयत्न केला जात आहे. हा प्रकल्प म्हणजे अभियांत्रिकी (Engineer) क्षेत्रातील एक अद्भुत नमुना आहे, ज्यामुळे आपला प्रवास हा अधिक सुरक्षित आणि वेगवान होण्यास मदत होईल.

Mumbai-pune “Missing link”
अभियांत्रिकी (Engineer) क्षेत्रातील एक अद्भुत नमुना:
1.प्रवाशांसाठी सुरक्षित असा प्रवास:
पुणे-मुंबई-पुणे असा प्रवास करणारे प्रवासी एकतर सहा पदरी 94 किमी लांबीचा दृतगती मार्ग वापरतात किंवा जुना मुंबई-पुणे मार्ग जो 111 किमी लांबीचा शीळ फाटा ते देहू रोड असा चार पदरी मार्ग वापरतात.
हे दोन्ही मार्ग खालापूर टोल प्लाझा जवळ एकत्र येतात, ज्यामुळे खंडाळा एक्सिटपर्यंत वाहतूक कोंडी होते. याचे कारण म्हणजे एकदमच 10 लेनची वाहतूक दृतगती मार्गाच्या सहा लेनवर एकत्र येते. त्याचबरोबर हा रस्ता घाटातून जातो आणि पावसाळ्यात या मार्गांवर bhusklan भुस्खलन होण्याची शक्यता असते, ज्यामुळे वाहतूक कोंडी वाढते.
या घाटामधून होणाऱ्या वाहतुकीसाठी Mumbai-pune “Missing link” हा एक कायमस्वरूपी पर्याय आता तयार झाला आहे. यामुळे अपघातचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल त्याचबरोबर दोन मोठ्या शहरामधील प्रवास अधिक वेगवान होण्यास मदत होईल.
घाट मार्गावर अवजड वाहने आणि लोणावळ्याकडे जाणारी पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर दिसून यायची. अलीकडेच, फेब्रुवारी महिन्यात 21,000 किलो चा गॅस टँकर उलटल्यामुळे हा मार्गे जवळजवळ 32 तासांसाठी विस्कळीत झाला होता. परंतु आता या घाट मार्गाला सुमारे 13.3 किमी लांबीचा एक पर्याय “Missing Link” च्या रूपात प्राप्त झाला आहे जिथे तुम्ही 100 किमी वेगाने ड्राइव्ह करू शकता.
2.Missing Link मध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश आहे?
या Mumbai-pune “Missing link” साठी सुमारे 6,695 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला असून यामध्ये दोन बोगदे आणि दोन उड्डाणपुल आहेत ज्यापैकी एक हा पूर्णपणे केबल-स्टेड ब्रिज आहे. मुंबईकडून येताना Missing link हा प्रकल्प खोपोलीपासून सुरु होतो ज्याची सुरुवात एका उड्डाणपूलाने होते. त्यानंतर 1.6 किमी लांब असणारा बोगदा लागतो आणि हाच बोगदा काही मीटर पुढे येणाऱ्या बोगद्याची फक्त एक झलक आहे.
यानंतर लोणावळ्यामध्ये पर्यटकांसाठी प्रसिद्ध असणारा टायगर पॉईंटवर 125 मीटर उंचीवर एक छोटा परंतु प्रभावी असा पूल आहे. 183 मीटर उंच असा हा केबल-स्टेड ब्रिज भारतातील सर्वात उंच पूल म्हणून घोषित केला गेला आहे.
पावसाळ्यात पडणार धुक, जोरदार पावसासह वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग हा पूल सहन करू शकेल अशी त्याची रचना करण्यात आली आहे.
Mumbai-pune “Missing link” चा शेवटचा टप्पा हा 8.9 किमी लांब आणि 22.3 मीटर रुंद असा बोगदा आहे. याचा बोगद्याच्या वैशिष्ट्यामुळे जगातील सर्वात रुंद बोगदा म्हणून जागतिक विक्रम मिळू शकतो, जो लोणावळा तलावाखालून 180 मीटर जातो.
डोंगराच्या मधोमध असणाऱ्या बोगद्यानपर्यंत जाण्यासाठी तीव्र उतारानवर तात्पुरते बोगदे किंवा रस्ते खोदावे लागतात. हा Missing link बनवताना engineers ने नवीन ऑस्ट्रीयन बोगदा पद्धतीचा वापर करून सह्याद्रीच्या कठीण अशा बेसोल्ट खडकातून बोगदा तयार केला आहे.
3.दीर्घकाळापासून सुरु असणारे काम:
Missing link च्या कामाला सुरुवात ही 2018 पासून झाली, यासाठीची जी रचना आणि साहित्य लागणार होते त्याची चाचणी कोपनहेगन आणि लंडन मधील प्रतिकृतीच्या सहाय्याने करणे गरजेचे होते.
परंतु त्याही अगोदर Missing link ची निर्मिती होण्यासाठी बराच काळ लागला होता. मुंबई-पुणे जो आताचा दृतगती मार्ग आहे तो होण्याच्याही अगोदर, 1995 मध्ये, सार्वजनिक अभियांत्रिकी सेवा कंपनी (RITES) ने घाट विभागाला अशा पर्यायाची आवश्यकता आहे हे ओळखले होते. हे काम नंतर बाजूला ठेवण्यात आले असले तरी, वारंवार होणाऱ्या अपघातामुळे आणि वाहतूक कोंडीमुळे या मार्गाची गरज कालांतराने वाढतच गेली.
महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या मंजुरीने Mumbai-pune “Missing link” च्या कामाला पुन्हा गती मिळाली. गरजेच्या त्या परवानग्या मिळाल्यानंतर बांधकाम सुरु झाले, परंतु covid -19 मुळे या कामात परत एकदा अडथळा आला. नंतर 2021 मध्ये या कामाला परत सुरुवात झाली पण त्यामध्ये 2022 ची काम पूर्ण होण्याची मूळ अंतिम तारीख होती ती उलटून गेली होती.
खरी आव्हाने समोर आली ती चार महिन्यांच्या पावसाळ्यादरम्यान. या प्रकल्पाचे सल्लागार आणि लुई बर्जर इंटरनॅशनल च्या एका अधिकाऱ्याने सांगितले की “वाऱ्याचा प्रचंड वेग आणि वाऱ्यापासून तयार होणारे भोवरे ही चिंतेची बाब आहे.” वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी चार टॉवर क्रेन बसविण्यात आले होते जे वेगाची मर्यादा गाठल्यानंतर मोठा आवाज करतात अशा परिस्थितीत काम चालू ठेवणे सुरक्षित नाही.
यानंतरही पश्चिम आशियातील सुरु झालेल्या युद्धामुळे शेवटच्या क्षणी साहित्याचा तुटवडा निर्माण झाला परंतु या आव्हानांना न जुमानता, हा प्रकल्प पूर्ण झाला आणि 1मे 2026 महाराष्ट्र दिन या दिवशी या प्रकल्पाचे उदघाटन करण्यात आले.







