Adventure Activities in India: इथे आपण थ्रीलसाठी जातो, जीव गमावण्यासाठी नाही!

Adventure activities – या लेखामध्ये नमूद केलेली काही उदाहरणे Adventure Activities दरम्यान घडू शकणाऱ्या अपघातांचे स्वरूप समजावून सांगण्यासाठी दिली आहेत. कोणत्याही घटनेची माहिती संबंधित अधिकृत अहवाल आणि स्थानिक प्रशासनाच्या तपासावर आधारित असू शकते.

आजच्या काळात पर्यटनाला खूप महत्व आलेले आहे. सुट्ट्या असल्या की लोक फिरण्यासाठी देशात विविध ठिकाणी जाण्यास उत्सुक असतात. यामध्ये तरुणांपासून ते संपूर्ण कुटुंब यांचा समावेश असतो. डोंगरभागात ट्रेकिंग करणे, नद्यामध्ये राफ्टिंग, पॅराग्लायडींग, स्कुबा डायविंग, जंगल सफारी असे अनेक पर्याय पर्यटनसाठी गेल्यानंतर उपलब्ध असतात. या सगळ्या गोष्टी एक वेगळाच उत्साह आपल्यामध्ये तयार करतात आणि त्या Adventure activities करण्यास आपण उत्साही असतो. काही लोक सोशल मीडियावरती पोस्ट करण्यासाठी आणि त्यातून येणार इनकम वाढवण्यासाठी अशा गोष्टीचा अनुभव घेत असतात.

परंतु, मागच्या काही वर्षांमध्ये भारतात अशा ऍक्टिव्हिटीमुळे घडणाऱ्या अपघातांचे प्रमाण वाढलेले आहे त्यामुळे एक प्रश्न पडतो की आपण हा थरार अनुभवण्यासाठी जातो की आपला जीव गमावण्यासाठी?

असे थरार करण्यामागे थोडाफार धोका किंवा नैसर्गिक कारणे असतात परंतु त्यापेक्षा जास्त तर मानवी निष्काळजीपणामुळे असे अपघात जास्त घडताना दिसत आहेत. यामध्ये खराब उपकरणे, गंजलेल्या दोऱ्या, अनुभव नसलेला स्टाफ, नियम न पाळणे, अतिप्रमाणात होणारी गर्दी आणि नावापुरत होणार audit या गोष्टींचा समावेश देखील असतोच.

Table Of Contents
  1. Adventure activities in India:
Adventure activities

Adventure activities in India:

आपण अशाच मागील काळात आत्ताच घडलेले अपघात, त्याची कारणे, ते टाळता आले असते का? पर्यटकांनी कोणती काळजी घेतली पाहिजे या गोष्टी पाहुयात.

मध्य प्रदेशातील नर्मदा नदी सगळ्यांना माहीत आहे या नदीवर पर्यटणासाठी आलेले लोक हे बोटिंग करण्यासाठी आणि सुंदर दृश्यांचा आनंद घेण्यासाठी बोट राईड करतात. परंतु काही दिवसापूर्वी इथे घडलेल्या दुर्घटनेने संपूर्ण देश हदरून गेला. पर्यटकांनी भरलेली बोट उलटली आणि अनेक लोक पाण्यात पडले. या दुर्घटनेत काही लोकांना वाचवण्यात यश आले तर काहीना आपला जीव गमवावा लागला.

या दुर्घटनेमागे overcrowding हे मुख्य कारण होत कारण, बोटीच्या क्षमतेपेक्षा जास्त लोक बसवले गेले होते. त्याचबरोबर अनेक प्रवाशांना लाईफ जॅकेट घातले नव्हते तर काहीना दिले गेले नव्हते.

जर नियमांच पालन झालं असत, overcrowding टाळले गेले असते आणि safety drill व्यवस्थित केली असती तर अनेकांचे जीव वाचू शकले असते आणि हा अपघात नक्कीच टाळता आला असता.

2.धरमशाला पॅराग्लायडींग घटना:

हिमाचल प्रदेश या ठिकाणी असणारे धरमशाला आणि बिर-बिलिंग ही ठिकाणे पॅराग्लायडींग साठी भारतातच नव्हे तर पूर्ण जगात प्रसिद्ध आहेत. इथे दरवर्षी अनेक पर्यटक flying experience घेण्यासाठी येतात.

परंतु काही दिवसांपूर्वी एका पर्यटकाने त्याच्या राईडला सुरुवात केली. त्यावेळी सगळं काही ठीक वाटत होत पण, टेक ऑफ नंतर काही मिनिटातच glider च नियंत्रण सुटलं आणि pilot त्यावर आपल नियंत्रण ठेऊ शकला नाही. यामुळे glider वेगाने खाली कोसळला आणि एक गंभीर दुर्घटना त्या ठिकाणी घडली.

या दुर्घटनेचा तपास करताना काही गंभीर गोष्टीं समोर आल्यावर त्यामध्ये राईडसाठी वापरलेल्या ropes ह्या झीजलेल्या होत्या, काही harness आणि safety clips खूप जुन्या होत्या, हवामानदेखील चांगले नव्हते.

3.गोवा river rafting दुर्घटना :

आता गोवा हे फक्त बीचसाठी प्रसिद्ध राहिलेले नाही कारण गोव्यामध्ये सुद्धा water sport आणि river rafting सारखे Adventure activities केले जात आहेत. अशाच एका गोवा river rafting adventure मध्ये राफ्ट मध्ये बसलेले पर्यटक नदीच्या प्रवाहात अडकले राफ्ट अचानक एका खडकावर आदळली आणि पलटी झाली यामध्ये अनेक पर्यटक पाण्यात वाहून गेले.

प्रोफेशनल ट्रेनिंगचा अभाव, सेफ्टी इन्स्ट्रकशन न देणे, खराब क्वालिटीची उपकरणे अशा गोष्टी या घटनेला जबाबदार होत्या.

अशा अनेक घटना दरवर्षी कोणत्याणकोणत्या ठिकाणी घडलेल्या दिसून येतात. यामध्ये adventure activities मध्ये वाढलेला निष्काळजीपणा दिसून येतो. Adventure tourism झपाट्याने वाढत असले तरी त्यामध्ये असणारे regulation विकसित होताना दिसत नाही.

1. जुने झालेली खराब साधने (Outdated equipment ):

अनेक कंपन्या आपला खर्च कमी करण्यासाठी आउटडेटेड equipment वापरतात. त्यामध्ये rope, harness, helmet, carabiner, life jacket, rafting gear यांचा समावेश असतो. ही उपकरणे वेळोवेळी बदलण्याची आवश्यकता असते. मात्र अनेक ठिकाणी या वस्तू वर्षानुवर्षे वापरल्या जातात आणि अशा जुन्या वस्तू या मोठमोठ्या दुर्घटनाचे कारण बनतात.

2. वापरलेल्या साधनांचा परत वापर करणे (Second-hand product ):

अनेक Adventure activities operator हे अनेकदा परदेशाततुन किंवा इतर कंपन्याकडून कमी किमतीत second-hand product खरेदी करतात. मात्र अशा वस्तूंचा वापर अगोदर किती झाला आहे, त्याची आताची कंडिशन काय आहे याचा विचार करत नाहीत. ते ऑपरेटर अनेकदा त्यांचा नफा महत्वाचा मानतात पर्यटकांच्या सेफ्टी पेक्षाही जास्त…

3.कौशल्यपूर्ण प्रशिक्षणाची कमतरता (lack of professional training ):

पर्यटनस्थळी Adventure activities करण्याकरिता प्रोफेशनल ट्रेनिंग स्टाफ असणे खूप गरजेचे आहे. परंतु बऱ्याच ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर ट्रेनरचा अभाव दिसून येतो. कमी खर्चासाठी अनुभव नसलेल्या स्टाफला कामावर ठेवणे खूप धोकादायक ठरू शकते. असा स्टाफ गरजेच्या ठिकाणी पॅनिक होतो आणि योग्य तो निर्णय घेण्यासाठी लागणारी निर्णयक्षमता कमी पडते. अनुभवी आणि certified professional trainer नसतील तर आपल्याला हवे असलेले थरारक अनुभव काही क्षणातच मोठ्या दुर्घटनेत रूपांतरीत होऊ शकतात.

4.मोठ्या प्रमाणातील गर्दी (Overcrowding):

Overcrowding म्हणजे एखाद्या Adventure activities मध्ये क्षमतेपेक्षाही जास्त लोकांना सहभागी करून घेणे. अशी गर्दी अनेक ठिकाणी पाहायला मिळते. प्रत्येकाला समोर दिसणारी ऍक्टिव्हिटी ही करायचीच असते त्यामुळे एक पर्यटक म्हणून सुद्धा आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो याचाच परिणाम आपल्याला boting, river rafting अशा ठिकाणी होणाऱ्या दुर्घटनामध्ये दिसून येतो.

5.नियमांचे पालन न करणे (Rules ignored ):

Weather warning असूनही राईड्स चालू ठेवणे, हेल्मेट आणि लाईफ जॅकेट्स न घालणे weight लिमिट न पाळणे, मद्यपान केलेल्या पर्यटकांना परवानगी देणे अशा अनेक गोष्टींचा समावेश यामध्ये होतो. अशा Adventure activities सुरक्षितपणे करण्यासाठी दिलेल्या गाईडलाईन आणि महत्वाचे नियम पाळणे operator बरोबरच पर्यटकांनी पाळणे देखील तितकेच महत्वाचे आहे.

6. पडताळणी (Verification ):

कोणतीही राईड करण्यापूर्वी त्याच्या सेफ्टी संबंधित असलेल्या माहितीची पडताळणी करणे आवश्यक आहे. यामध्ये सगळे equipment सुरक्षित आहेत का हे तपासले जाते. या क्रियेमध्ये फक्त फॉर्मॅलिटी न करता योग्य ती पडताळणी करणे गरजेचे असते.

7. Audit फक्त कागदावर नसावे.

अनेक कंपन्या safety standard पाळत असल्याचा दावा करतात, पण प्रत्यक्षात मात्र हे फक्त कागदावरच असते. काही ठिकाणी इन्स्पेकशन फक्त कागदापुरतेच केले जाते. वस्तूंची खरी स्थिती तपासली जात नाही. काही वेळा audit करणाऱ्या संस्था फक्त कागदपत्रे पाहून approval देतात हे अतिशय चुकीचे आहे. Audit प्रक्रिया ही प्रामाणिकपणे झाली पाहिजे.

8. हवामानातील अचानक बदल (Sudden Weather Changes)

Adventure Activities मध्ये हवामान हा सर्वात महत्त्वाचा घटक असतो. पर्वतीय भागात, समुद्रात किंवा नदी परिसरात हवामान काही मिनिटांत बदलू शकते. जोरदार वारा, पाऊस, धुके किंवा वीजांचा कडकडाट यामुळे अपघाताचा धोका वाढतो.

9. आपत्कालीन बचाव यंत्रणेचा अभाव (Lack of Emergency Response System)

अनेक ठिकाणी दुर्घटना घडल्यानंतर त्वरित मदत उपलब्ध होत नाही. Rescue Team, First Aid Kit, Ambulance किंवा Emergency Contact System नसल्यामुळे परिस्थिती गंभीर बनू शकते.

10. सोशल मीडियासाठी धोकादायक स्टंट (Risky Social Media Trends)

आज अनेक पर्यटक Instagram Reels किंवा YouTube Shorts साठी धोकादायक ठिकाणी फोटो आणि व्हिडिओ शूट करतात. यामुळे दरवर्षी अनेक अपघात घडत आहेत. Safety पेक्षा Content ला प्राधान्य देणे धोकादायक ठरू शकते.

या दुर्घटना टाळण्यासाठी पर्यटकांनी कोणती काळजी घ्यावी?

1.फिरायला जाण्यासाठी स्वस्त पॅकेज निवडू नका. Certified ऑपरेटर्स निवडणे महत्वाचे.

2.Adventure activities करताना त्यासाठी असणारे equipment स्वतः तपासा.

3.जर safety briefing दिले जात नसेल तर तो रेड फ्लॅग समजा.

4.जर हवामान चांगले नसेल तर स्वतःच्या सेफ्टीसाठी राईड करणे टाळावे.

5.गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.

6.परफेक्ट रील्स साठी किंवा फोटोसाठी नको त्या ठिकाणी जाण्याची रिस्क घेऊ नका.

7. Adventure Activity सुरू होण्यापूर्वी Emergency Exit Plan आणि Rescue Procedure समजून घ्या.

8. कोणत्याही Activity पूर्वी वैद्यकीय समस्या (Heart Problem, Asthma, High BP) असल्यास आयोजकांना माहिती द्या.

9. Operator कडे वैध परवाना (License) आणि Insurance आहे का ते तपासा.

10. एकटे जाण्याऐवजी मित्र किंवा कुटुंबीयांसोबत Adventure Activities करणे अधिक सुरक्षित असते.

Adventure पर्यटनाचे भविष्य :

आपल्या भारत देशात Adventure activities tourism ची क्षमता खूप जास्त आहे कारण, आपल्या देशात डोंगर, दऱ्या, समुद्र, नद्या, जंगल, हिमालय या सर्व गोष्टी उपलब्ध आहेत.परंतु जर सुरक्षिततेला महत्व दिले गेले नाही तर पर्यटकांचा विश्वास कमी होऊन अशा Adventure activities tourism च भविष्य धोक्यात येईल.

यावरूनच लक्षात येते की, थरारक अनुभव माणसाला उत्साह, अविस्मरणीय असे क्षण देतात. पण हाच थरार सुरक्षिततेसोबत मिळणे महत्वाचे आहे. आज भारतात अशा Adventure activities सोबत दुर्घटनाही समोर येत आहेत आणि त्यामागे अनेक वेळा मानवी निष्काळजीपणा दिसून येतो.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ) 

  1. Adventure Activities करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती?

    Adventure Activities करताना Safety Rules चे पालन करणे आणि प्रमाणित Operator निवडणे सर्वात महत्त्वाचे असते.

  2. Adventure Activities मध्ये अपघात का होतात?

    जुनी उपकरणे, अनुभव नसलेला स्टाफ, Overcrowding, हवामानातील बदल आणि नियमांकडे दुर्लक्ष ही प्रमुख कारणे आहेत.

  3. River Rafting आणि Paragliding सुरक्षित आहेत का?

    होय, योग्य Safety Standards आणि प्रशिक्षित Instructor यांच्या देखरेखीखाली केल्यास या Activities तुलनेने सुरक्षित मानल्या जातात.

  4. Adventure Activity करण्यापूर्वी काय तपासावे?

    Equipment ची स्थिती, Operator चे Certification, Insurance, Safety Briefing आणि हवामानाची माहिती तपासावी.

  5. सोशल मीडियासाठी धोकादायक स्टंट करणे योग्य आहे का?

    नाही. फोटो किंवा व्हिडिओसाठी Safety नियम मोडणे जीवघेणे ठरू शकते.

निष्कर्ष

Adventure activities आपल्या आयुष्यात उत्साह, आत्मविश्वास आणि अविस्मरणीय अनुभव आणतात. मात्र कोणतीही Activity ही सुरक्षिततेपेक्षा मोठी असू शकत नाही. योग्य प्रशिक्षण, प्रमाणित उपकरणे, नियमांचे पालन आणि पर्यटकांची जागरूकता यामुळे बहुतांश अपघात टाळता येऊ शकतात. थराराचा आनंद घ्या, पण Safety ला नेहमीच पहिली प्राधान्य द्या. कारण Adventure चा उद्देश सुंदर आठवणी निर्माण करणे हा आहे, दुःखद घटना नाही.

Adventure आवडत असेल तर हा लेख शेअर करा आणि सुरक्षित पर्यटनाबाबत जागरूकता वाढवण्यास मदत करा. तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा!

Related Posts

महाराष्ट्र भारताला काय देतो? अर्थव्यवस्था, शेती, उद्योग, संस्कृती आणि विकासातील महाराष्ट्राचे अतुलनीय योगदान

महाराष्ट्र भारताला काय देतो? महाराष्ट्र भारताला अर्थव्यवस्था, शेती, उद्योग, संस्कृती, पर्यटन, वारसा, खाद्यसंस्कृती, पायाभूत सुविधा आणि महान विचारवंतांच्या माध्यमातून कसे समृद्ध करतो हे सविस्तर जाणून घ्या. महाराष्ट्र भारताला काय देतो?…

महाराष्ट्रातील ट्रेकिंगसाठी सर्वोत्तम ९ किल्ले | इतिहास, निसर्ग आणि रोमांचाचा अनुभव!

महाराष्ट्रातील ट्रेकिंगसाठी सर्वोत्तम ९ किल्ले: महाराष्ट्रातील ट्रेकिंगसाठी सर्वोत्तम ९ किल्ल्यांची माहिती जाणून घ्या. इतिहास, ट्रेकची कठीणता, लागणारा वेळ, निसर्गरम्य दृश्ये आणि भेट देण्याचा योग्य काळ एका ठिकाणी. महाराष्ट्रात ३५० पेक्षा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

High Income Digital Skills in Marathi: घरबसल्या कमाईसाठी 9 सर्वाधिक मागणीची डिजिटल कौशल्ये

High Income Digital Skills in Marathi: घरबसल्या कमाईसाठी 9 सर्वाधिक मागणीची डिजिटल कौशल्ये

पैशाच्या मागे धावू नका, पैसा तुमच्याकडे आकर्षित करा! – पैसा आकर्षित करण्याचे नियम

पैशाच्या मागे धावू नका, पैसा तुमच्याकडे आकर्षित करा! – पैसा आकर्षित करण्याचे नियम

महाराष्ट्र भारताला काय देतो? अर्थव्यवस्था, शेती, उद्योग, संस्कृती आणि विकासातील महाराष्ट्राचे अतुलनीय योगदान

महाराष्ट्र भारताला काय देतो? अर्थव्यवस्था, शेती, उद्योग, संस्कृती आणि विकासातील महाराष्ट्राचे अतुलनीय योगदान

महाराष्ट्र पोलीस दलातील पदांचा क्रम: कॉन्स्टेबलपासून DGP पर्यंत संपूर्ण माहिती

महाराष्ट्र पोलीस दलातील पदांचा क्रम: कॉन्स्टेबलपासून DGP पर्यंत संपूर्ण माहिती

ऑनलाइन कमाईसाठी वेबसाइट्स – डिजिटल प्रॉडक्ट, ई-बुक, ऑनलाइन कोर्स आणि सेवांमधून पैसे कसे कमवायचे?

ऑनलाइन कमाईसाठी वेबसाइट्स – डिजिटल प्रॉडक्ट, ई-बुक, ऑनलाइन कोर्स आणि सेवांमधून पैसे कसे कमवायचे?

महाराष्ट्रातील रिअल इस्टेट क्षेत्र गुंतवणुकीचे ट्रेंड : गुंतवणूकदारांसाठी संधी, जोखीम आणि महत्त्वाच्या टिप्स

महाराष्ट्रातील रिअल इस्टेट क्षेत्र गुंतवणुकीचे ट्रेंड : गुंतवणूकदारांसाठी संधी, जोखीम आणि महत्त्वाच्या टिप्स