बुद्धिमत्ता वाढवणारा खेळ: बुद्धिबळाचे 10 मोठे फायदे! History of chess.

History of chess – आपल्या बुद्धिमतेचा कस लावणारा आणि संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध असणारा खेळ म्हणजे बुद्धिबळ. एका विशिष्ट प्रकारची रणनीती, स्वतःवर असणारा संयम, बुद्धीची एकाग्रता आणि तल्लभ अशी विचारशक्ती या सगळ्यांचा उत्कृष्ट संगम आपल्याला या बुद्धिबळाच्या खेळामध्ये पाहायला मिळतो. हा खेळ दोन व्यक्तिमध्ये खेळला जातो. दूरदृष्टीच्या आधारावर समोरच्या खेळाडूला मात देणे हे या खेळाचे वैशिष्ट्य आहे.

History of chess

History of chess:

बुद्धिबळ खेळण्यासाठी सुरुवात किंवा बुद्धिबळाच्या History of chess शोधाचा दावा जरी अनेक देश करत असले तरी त्याची सुरवात ही भारतातूनच झाली असे मानले जाते. प्राचीन भारतात सहाव्या शतकामध्ये “चतुरंग” या नावाचा एक खेळ खेळला जात असे. हाच खेळ एकप्रकारे बुद्धिबळाचा पाया ठरला. चतुरंग या खेळामध्ये सैन्याचे चार भाग – पायदळ, घोडदळ, हत्ती आणि रथ यांचा समावेश केला जात असे. पूर्वीच्या काळी फक्त भारतातच सैन्यामध्ये घोडे, उंट आणि हत्ती हे प्राणी वापरले जात असत.

हा खेळ नंतर जेव्हा पर्शिया (इराण) येथे पोहचला तेव्हा या खेळाला “शतरंज” या नावाने ओळखले जायचे. पुढे अरब देशांनी या खेळाचा स्वीकार केला आणि संपूर्ण मध्यपूर्वेत या खेळाचा प्रसार झाला. अरब देशातील व्यापारी आणि प्रवासी यांच्यामुळे पुढे जाऊन हा खेळ युरोपमध्ये पोहचला. पुढे जाऊन चीनमध्ये हा खेळ “शिआंकी” या नावाने ओळखला जाऊ लागला 

युरोपमध्ये या खेळाच्या नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आणि त्यातूनच आधुनिक बुद्धिबळाचा (History of chess ) जन्म झाला. पंधराव्या शतकात राणी आणि उंट यांच्या चालीमध्ये बदल केल्यामुळे हा खेळ अधिकच जलद झाला. पहिली आधुनिक बुद्धिबळ स्पर्धा 1851 साली घेण्यात आली.

आजच्या काळात बुद्धिबळ हा आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जाणारा एक प्रतिष्टीत खेळ आहे.FIDE ही संस्था या खेळाचे नियम बनवते. भारताचे या खेळामध्ये खूप मोठे योगदान आहे. विश्वनाथन आनंद यांनी भारताला जागतिक बुद्धिबळामध्ये एक प्रकारची विशेष ओळख मिळवून दिली.

आधुनिक बुद्धिबळ हा जगभर खेळला जाणारा अत्यंत लोकप्रिय असा बुद्धीला चालना देणारा खेळ बनला आहे. ऑनलाईन स्पर्धा, संगणक, तंत्रज्ञान, डिजिटल प्लॅटफॉर्म यामुळे या खेळाबद्दल आवड आणि या खेळाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे.

बुद्धिबळाचे प्राथमिक नियम:

बुद्धिबळ खेळताना वापरला जाणारा चौरंग म्हणजेच चेस बोर्ड सगळयांनी पाहिलेलाच आहे. हा खेळ जिंकण्यासाठी आपल्या प्रतिस्पर्ध्याला “चेकमेट” देणे हे या खेळाचे मुख्य उद्दिष्ट असते.

History of chess
Chess board setup
  •  बुद्धिबळाच्या पटाची रचना 8*8 अशी असते. या रचनेमध्ये 64 पांढऱ्या आणि काळ्या चौकटींचा समावेश असतो.
  •  या खेळामध्ये पांढरे आणि काळे अशा दोन रंगाचे मोहरे वापरले जातात. प्रत्येक खेळाडूंकडे 16 मोहरे असतात ज्यामध्ये 1राजा, 1राणी, 2 हत्ती, 2उंट, 2 घोडे आणि 8 प्यादे यांचा समावेश असतो.
  •  या खेळाची चाल खेळण्यासाठी होणारी सुरुवात ही पांढऱ्या मोहऱ्यांकडून होते. त्यानंतर दोन्ही खेळाडू आलटून-पालटून एक-एक चाल खेळतात.
  •  या खेळामध्ये मोहऱ्यांच्या चाली या ठरलेल्या असतात.
  •  जेव्हा राजावर थेट हल्ला होतो तेव्हा त्याला “चेक” म्हणतात आणि ज्यावेळी राजा कोणत्याही प्रकारे वाचू शकणार नसतो तेव्हा “चेकमेट” होऊन खेळ संपवला जातो 
  •  राजा आणि हत्ती या दोघांची मिळून एक विशेष चाल असते त्याला कास्टलिंग म्हणतात. या चालीचा महत्वाचा उद्देश राजाला सुरक्षित ठेवणे हा असतो.
  •  कोणताही खेळाडू जिंकत नसेल किंवा एकसारखीच परिस्थिती सतत निर्माण होत असेल तर खेळ “ड्रॉ” घोषित केला जातो.
  •  जेव्हा स्पर्धा असते तेव्हा प्रत्येक खेळाडूला ठराविक वेळ दिला जातो. वेळ संपल्यावर तो खेळाडू पराभूत मानला जाऊ शकतो.

बुद्धिबळाचे सांस्कृतिक महत्व:

भारतामधील “चतुरंग” या खेळातुन बुद्धिबळाचा निर्माण झाल्यामुळे हा खेळ भारतीय संस्कृती आणि युद्धनीतिशी जोडलेला मानला जातो. पूर्वीच्या काळी राजे-महाराजे आणि त्यांचे सेनापती युद्धाचे योग्य नियोजन, रणनीती आणि निर्णयक्षमता वाढवण्यासाठी हा खेळ खेळत असत. 

बुद्धिबळ खेळण्याचे फायदे:

A closeup of a table with people playing chess on a tournament

बुद्धिबळ खेळणे फक्त मनोरंजनापुरते मर्यादित नाही. हा खेळ आपल्या मेंदूला सतत विचार करण्यास प्रवृत्त करत असतो त्यामुळे एकाग्रता वाढते. या खेळाचा थेट परिणाम हा आपल्या मानसिक, शैक्षणिक आणि व्यक्तिमत्व विकासावर होतो.

  • समस्या सोडवण्याची क्षमता विकसित होते.
  • एकाग्रता वाढते.
  • पूर्वनियोजन आणि निर्णय क्षमता सुधारते.
  • संयम आणि आत्मविश्वास वाढतो.

अनेक देशांमध्ये शाळेच्या अभ्यासक्रमातही बुद्धिबळाचा समावेश करण्यात आला आहे.

बुद्धिबळाचा भारतीय गौरव :

बुद्धिबळाचा उगम (History of chess ) हा प्राचीन भारतात झाल्यामुळे या खेळाला भारतीय संस्कृतीत एक वेगळेच महत्व आहे. आधुनिक काळातही भारताने या खेळाच्या क्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे. विश्वनाथन आनंद यांनी जागतिक स्तरावर अनेक विजेतेपद जिंकून भारताला अभिमानास्पद स्थान मिळवून दिले आहे. त्यांच्या या यशामुळेच बुद्धिबळाची लोकप्रियता वाढली व या खेळाची आवड असणाऱ्या खेळाडूंना एक प्रकारची प्रेरणा मिळाली.

R Praggnanandha, D Gukesh आणि Koneru Humpy यांसारखे आंतरराष्ट्रीय दर्जाचे अनेक ग्रँडमास्टर्स जागतिय स्तरावर उत्तम कामगिरी करत आहेत. या युवा खेळाडूंनी जगभरात भारताची बुद्धिमत्ता आणि कौशल्य सिद्ध केले आहेत.

या खेळाला शाळा, महाविद्यालये आणि वेगवेगळ्या संस्थानमधून प्रोत्साहन दिले जात असल्यामुळे या खेळाच्या बाबतीत आपल्या देशाचे भविष्य हे उज्ज्वल मानले जाते. त्यामुळे हा खेळ फक्त एक खेळ न राहता भारताच्या सांस्कृतिक आणि बौद्धिक गौरवाचे प्रतिक बनत आहे.(History of chess )

1. बुद्धिबळ खेळल्याने बुद्धिमत्ता वाढते का?

होय. बुद्धिबळामुळे तर्कशक्ती, निर्णयक्षमता, समस्या सोडवण्याची क्षमता आणि एकाग्रता सुधारण्यास मदत होते.

2. मुलांसाठी बुद्धिबळ का महत्त्वाचे आहे?

बुद्धिबळ मुलांची स्मरणशक्ती, गणिती विचारशक्ती, संयम आणि नियोजन कौशल्य विकसित करते.

3. बुद्धिबळ खेळायला कोणत्या वयापासून सुरुवात करता येते?

साधारणपणे 5 ते 6 वर्षांच्या वयापासून मुलांना बुद्धिबळ शिकवता येते. मात्र कोणत्याही वयात हा खेळ शिकता येतो.

4. बुद्धिबळामुळे अभ्यासात फायदा होतो का?

होय. एकाग्रता आणि विश्लेषण क्षमता वाढल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीत सकारात्मक सुधारणा दिसून येऊ शकते.

5. बुद्धिबळ खेळल्याने स्मरणशक्ती सुधारते का?

होय. विविध चाली, रणनीती आणि पॅटर्न लक्षात ठेवावे लागल्यामुळे स्मरणशक्ती मजबूत होते.

6. बुद्धिबळ मानसिक तणाव कमी करण्यास मदत करते का?

होय. योग्य प्रमाणात खेळल्यास मन शांत राहते, लक्ष केंद्रित होते आणि मानसिक तणाव कमी होण्यास मदत मिळते.

7. ऑनलाइन बुद्धिबळ शिकणे शक्य आहे का?

होय. आज अनेक वेबसाइट्स आणि मोबाईल अॅप्सद्वारे ऑनलाइन बुद्धिबळ सहज शिकता येते.

8. बुद्धिबळ खेळण्यासाठी महागडी साधने आवश्यक असतात का?

नाही. साधा बुद्धिबळ संच किंवा मोफत ऑनलाइन प्लॅटफॉर्म वापरूनही हा खेळ शिकता आणि खेळता येतो.

9. बुद्धिबळामुळे करिअरच्या संधी मिळू शकतात का?

होय. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होऊन खेळाडू म्हणून करिअर घडवता येते.

10. रोज किती वेळ बुद्धिबळ खेळावे?

दररोज 30 मिनिटे ते 1 तास नियमित सराव केल्यास कौशल्य आणि विचारशक्ती विकसित होण्यास मदत होते.

निष्कर्ष :

यावरूनच लक्षात येते की, बुद्धिबळ हा एक खेळ नसून संयम,कला, विज्ञान,रणनीती आणि निर्णयक्षमता यांचा सुंदर संगम आहे. हा खेळ अत्यंत प्रतिष्ठतेने खेळला जातो. या खेळामुळे मानसिक विकास, एकाग्रता आणि विचारशक्ती वाढण्यास मदत होते. आजच्या डिजिटल युगात बुद्धिबळ अतिशय लोकप्रिय होत असून सर्वच वयोगटातील लोकांसाठी एक प्रेरणादायी खेळ म्हणून त्याचे महत्व वाढत आहे. (History of chess )

तुम्ही बुद्धिबळ खेळता का?

बुद्धिबळामुळे तुमच्या आयुष्यात किंवा अभ्यासात कोणता फायदा झाला, हे कमेंटमध्ये नक्की सांगा!

जर तुम्हाला तुमची एकाग्रता, स्मरणशक्ती आणि निर्णयक्षमता वाढवायची असेल, तर आजपासूनच बुद्धिबळ खेळण्यास सुरुवात करा.

हा लेख तुमच्या मित्रांना, विद्यार्थ्यांना, पालकांना आणि शिक्षकांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही बुद्धिबळाचे हे आश्चर्यकारक फायदे समजू शकतील.

शिक्षण, करिअर, व्यक्तिमत्त्व विकास आणि ज्ञानवर्धक विषयांवरील असेच माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी RealInfoWorld.in ला नियमित भेट द्या.

Related Posts

High Income Digital Skills in Marathi: घरबसल्या कमाईसाठी 9 सर्वाधिक मागणीची डिजिटल कौशल्ये

High Income Digital Skills in Marathi- Digital Marketing, SEO, Coding, Graphic Design, Freelancing, Video Editing आणि इतर कौशल्यांद्वारे घरबसल्या करिअर व ऑनलाइन कमाईची संधी मिळवा. आजच्या डिजिटल युगात फक्त पदवी…

महाराष्ट्र पोलीस दलातील पदांचा क्रम: कॉन्स्टेबलपासून DGP पर्यंत संपूर्ण माहिती

महाराष्ट्र पोलीस दलातील पदांचा क्रम – महाराष्ट्र पोलीस दलातील सर्व पदांची माहिती जाणून घ्या. कॉन्स्टेबल, PSI, API, PI, ACP, SP, DIG, IG, ADG आणि DGP पर्यंतचा पदांचा क्रम, जबाबदाऱ्या, प्रमोशन…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

High Income Digital Skills in Marathi: घरबसल्या कमाईसाठी 9 सर्वाधिक मागणीची डिजिटल कौशल्ये

High Income Digital Skills in Marathi: घरबसल्या कमाईसाठी 9 सर्वाधिक मागणीची डिजिटल कौशल्ये

पैशाच्या मागे धावू नका, पैसा तुमच्याकडे आकर्षित करा! – पैसा आकर्षित करण्याचे नियम

पैशाच्या मागे धावू नका, पैसा तुमच्याकडे आकर्षित करा! – पैसा आकर्षित करण्याचे नियम

महाराष्ट्र भारताला काय देतो? अर्थव्यवस्था, शेती, उद्योग, संस्कृती आणि विकासातील महाराष्ट्राचे अतुलनीय योगदान

महाराष्ट्र भारताला काय देतो? अर्थव्यवस्था, शेती, उद्योग, संस्कृती आणि विकासातील महाराष्ट्राचे अतुलनीय योगदान

महाराष्ट्र पोलीस दलातील पदांचा क्रम: कॉन्स्टेबलपासून DGP पर्यंत संपूर्ण माहिती

महाराष्ट्र पोलीस दलातील पदांचा क्रम: कॉन्स्टेबलपासून DGP पर्यंत संपूर्ण माहिती

ऑनलाइन कमाईसाठी वेबसाइट्स – डिजिटल प्रॉडक्ट, ई-बुक, ऑनलाइन कोर्स आणि सेवांमधून पैसे कसे कमवायचे?

ऑनलाइन कमाईसाठी वेबसाइट्स – डिजिटल प्रॉडक्ट, ई-बुक, ऑनलाइन कोर्स आणि सेवांमधून पैसे कसे कमवायचे?

महाराष्ट्रातील रिअल इस्टेट क्षेत्र गुंतवणुकीचे ट्रेंड : गुंतवणूकदारांसाठी संधी, जोखीम आणि महत्त्वाच्या टिप्स

महाराष्ट्रातील रिअल इस्टेट क्षेत्र गुंतवणुकीचे ट्रेंड : गुंतवणूकदारांसाठी संधी, जोखीम आणि महत्त्वाच्या टिप्स