अष्टविनायक दर्शन शास्त्रशुद्ध पद्धतीने कसे करावे? संपूर्ण मार्गदर्शक | Ashtvinayak Darshan

Ashtvinayak Darshn – महाराष्ट्रातील अष्टविनायक ही भगवान गणेशाच्या आठ स्वयंभू आणि जागृत मंदिरांची पवित्र यात्रा मानली जाते. पुणे, रायगड आणि अहमदनगर जिल्ह्यांमध्ये वसलेली ही मंदिरे श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्माचे केंद्र आहेत. दरवर्षी लाखो भाविक अष्टविनायक दर्शनासाठी येतात. प्रत्येक मंदिरामागे एक वेगळी पौराणिक कथा आणि धार्मिक महत्त्व जोडलेले आहे.

अष्टविनायकची यात्रा (Ashtvinayak Darshn) शास्त्रशुद्ध पद्धतीने केली तर ती फलदायी ठरते अशी भाविकांची श्रद्धा आहे. परंपरेनुसार अष्टविनायकची यात्रा मोरगाव पासून सुरु करून मोरगावला समाप्त करणे अशी पद्धत आहे.

Ashtvinayak Darshan: अष्टविनायक दर्शनाचा शास्त्रशुद्ध क्रम

1) मोरेश्वर गणपती मंदिर – मोरगाव

2) सिद्धिविनायक गणपती मंदिर – सिद्धटेक

3) बल्लाळेश्वर गणपती मंदिर – पाली

4) वरदविनायक गणपती मंदिर – महड

5) चिंतामणी गणपती मंदिर – थेऊर

6) गिरीजात्मक गणपती मंदिर – लेण्याद्री

7) विघ्नेश्वर गणपती मंदिर – ओझर

8) महागणपती मंदिर – रांजणगाव

या क्रमानुसार ही यात्रा पूर्ण झाल्यावर पुन्हा मोरगावला दर्शन घेतल्यास अष्टविनायक यात्रा पूर्ण मानली जाते.

अष्टविनायक मंदिरांची माहिती :

1) मोरेश्वर गणपती – मोरगाव 

अष्टविनायक यात्रेतील (Ashtvinayak Darshn) सर्वात पहिले आणि महत्वाचे मंदिर मोरेश्वर गणपती मंदिर. यात्रेची सुरुवात आणि शेवट याच ठिकाणाहून केला जातो. मोरगाव हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्याच्या कऱ्हा नदीकाठी वसलेले तीर्थक्षेत्र आहे.

मोरेश्वर गणपतीला “मयुरेश्वर” या नावाने देखील ओळखले जाते. पुरातन कथेनुसार “सिंधू” नावाच्या राक्षसाने पृथ्वीवर अत्याचार सुरु केले होते. त्यावेळी सर्व देवांनी मिळून गणपतीची आराधना केली. भगवान गणेशाने मोरावर बसून या राक्षसाचा वध केला त्यामुळे त्यांना “मयुरेश्वर” हे नाव देण्यात आले. या गावात मोरांची संख्या जास्त असल्यामुळे “मोरगाव” हे नाव या गावाला पडले असे मानले जाते.

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात भीमा नदीकाठी वसलेले हे धार्मिक ठिकाण अष्टविनायक यात्रेतील (Ashtvinayak Darshn) दुसरे महत्वाचे स्थान मानले जाते. गणेशाचे अत्यंत जागृत सिद्धिपीठ म्हणून या स्थानाची ओळख आहे.

पुरातन कथेनुसार भगवान विष्णूंनी मधू आणि कैटभ या राक्षसांचा वध करण्यासाठी बाप्पाची उपासना केली होती. गणेशाच्या कृपेने भगवान विष्णुना सिद्धी प्राप्त झाली तेव्हापासून या ठिकाणाला “सिद्धटेक” हे नाव पडले. त्याचबरोबर हे स्थान कार्यसिद्धी आणि यशाचे प्रतीक मानले जाते.

3) बल्लाळेश्वर गणपती – पाली 

रायगड जिल्ह्यातील पाली या ठिकाणी वसलेले हे तीर्थक्षेत्र अष्टविनायक यात्रेतील (Ashtvinayak Darshn) तिसरे महत्वाचे स्थान मानले जाते. अष्टविनायक मंदिरातील हे एकमेव मंदिर आहे ज्याला एका भक्ताच्या नावावरून ओळखले जाते. भक्त बल्लाळाच्या भक्तीने प्रसन्न होऊन गणेशाने या ठिकाणी वास्तव्य केले, त्यामुळे या गणपतीला “बल्लाळेश्वर” हे नाव प्राप्त झाले.

बल्लाळ नावाचा एक लहान मुलगा गणेशाचा खूप मोठा भक्त होता. तो आपल्या सवंगड्यासोबत जंगलामध्ये गणेशाची पूजा करायचा म्हणून गावातील लोकांनी आणि त्याच्या वडिलांनी यासाठी त्याला शिक्षा केली. शिक्षा करताना त्याला मारहाण करून झाडाला बांधून ठेवले व गणेशाची मूर्ती फेकून दिली. अत्यंत दुःखी होऊन त्या बालकाने गणेशाला हाक दिली. आपल्या भक्ताच्या आर्त हाकेला साद देत भगवान गणेश तेथे प्रकट झाले व त्याची सुटका करून त्याला आशीर्वाद दिला. या छोट्या भक्ताच्या प्रेमाने प्रसन्न होऊन गणेशाने या ठिकाणी सदैव वास्तव करण्याचे वचन दिले. त्यामुळेच हे मंदिर भक्ती आणि श्रद्धेचे प्रतीक मानले जाते.

4) वरदविनायक – महड 

भक्तांची इच्छा पूर्ण करणारा गणपती म्हणजे “वरदविनायक” अष्टविनायक यात्रेतील (Ashtvinayak Darshn) चौथे महत्वाचे स्थान. हे ठिकाण रायगड जिल्ह्यातील महाड येथे वसलेले आहे. त्यामुळे हे मंदिर नवसाला पावणारे आणि मनोकामना पूर्ण करणारे देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे.

राजा भीम आणि ऋषीं वाचक्णवी यांचा या मंदिराच्या कथेशी संबंध आहे. बाप्पाच्या कृपेने भक्तांना इच्छित वरदान मिळते म्हणून या ठिकाणाला “वरदविनायक” असे नाव मिळाले.

5) चिंतामणी गणपती – थेऊर 

पुणे जिल्ह्यातील थेऊर येथे वसलेले चिंतामणी मंदिर हे अष्टविनायक यात्रेतील (Ashtvinayak Darshn) पाचवे महत्वाचे मंदिर मानले जाते. चिंतामणी म्हणजे चिंता दूर करणारा आणि मनःशांती देणारा बाप्पा.

पुरातन कथेनुसार कपिल मुनी यांच्याकडे “चिंतामणी” नावाचा एक दिव्य मनी होता. या मन्यामुळे इच्छित वस्तू आणि सुख प्राप्त होत असे. गण नावाच्या लोभी राजपूत्राने हा मनी कपिल मुनिंकडून जबरदस्तीने घेतला. दुःखी असलेल्या या मुनींनी गणपतीची आराधना केली. गणेशाने या राजपूत्राचा पराभव करून हा मनी परत मिळवून दिल्यानंतर कपिल मुनींनी तो मनी गणपतीला अर्पण केला. या मन्याच्या नावामुळे येथील गणेशाला “चिंतामणी” असे नाव देण्यात आले.

6) गिरीजात्मक गणपती – लेण्याद्री 

Ashtvinayak darshn

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात लेण्याद्री या ठिकाणी वसलेले हे गिरीजात्मक गणपती मंदिर अष्टविनायक यात्रेतील (Ashtvinayak Darshn) सहावे महत्वाचे मंदिर आहे. डोंगरातील लेण्यांमध्ये वसलेले हे मंदिर अष्टविनायकातील सर्वात वेगळे आणि अद्वितीय मंदिर मानले जाते. “गिरीजात्मक” म्हणजे माता पार्वती (गिरीजा) यांचा पुत्र. त्यामुळे या गणपती मंदिराला विशेष धार्मिक महत्व प्राप्त झाले आहे.

कथेनुसार माता पार्वतीने गणेशाला पुत्ररूपात प्राप्त करण्यासाठी लेण्याद्रीच्या डोंगरात कठीण उपासना केली. अनेक वर्षांच्या उपासनेनंतर बाप्पा पुत्ररूपात प्रकट झाले. असे मानले जाते श्री गणेश बालपणी याच लेण्यांमध्ये राहत असत त्यामुळे या स्थानाला अत्यंत पवित्र मानले जाते.

7) विघ्नहर गणपती मंदिर – ओझर 

पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यात ओझर या ठिकाणी वसलेले हे मंदिर अष्टविनायक यात्रेतील (Ashtvinayak Darshn) सातव्या क्रमांकाचे महत्वाचे मंदिर आहे. “विघ्नहर ” म्हणजे संकटे दूर करणारा. त्यामुळे या ठिकाणाला अडथळे दूर करणारा आणि यश प्राप्त करून देणार पवित्र स्थान मानले जाते.

विघ्नासुर” नावाचा राक्षस लोकांना खूप त्रास देत होता. त्याच्यामुळे देव-ऋषीमुनी त्रस्त झाले होते. तेव्हा गणेशाने विघ्नासुराचा पराभव करून लोकांना त्याच्या त्रासातून मुक्त केले. पराभवानंतर विघ्नासुराने गणपतीची क्षमा मागितली तेव्हा बाप्पाने त्याला क्षमा करून त्याच्याकडून वचन मागितले ज्या ठिकाणी माझी पूजा केली जाईल, तेथे तू कोणतेही विघ्न निर्माण करणार नाहीस. त्यामुळे येथे असण्याऱ्या गणपती मंदिराला “विघ्नेश्वर” असे नाव पडले.

8) महागणपती मंदिर – रांजणगाव 

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात रांजणगाव येथे वसलेले हे मंदिर अष्टविनायक यात्रेतील (Ashtvinayak Darshn) आठवे आणि अंतिम मंदिर “महागणपती” म्हणजे शक्तिशाली, दिव्य स्वरूपातील गणपती.

कथेनुसार त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाने देवांना व पृथ्वीवरील लोकांना त्रास देण्यास सुरुवात केली. त्याचा वध करण्यासाठी भगवान शंकरांनी गणेशाची आराधना केली. गणेशाच्या कृपेने त्रिपुरासुराचा पराभव झाला. असे मानले जाते कि या गणपतीचे मुळ रूप अत्यंत विशाल आणि शक्तिशाली होते म्हणूनच या गणपतीला “महागणपती” असे म्हटले जाते.

अष्टविनायक यात्रा कधी करावी?

तसे पाहिले तर वर्षभर आपण कधीही अष्टविनायकचे दर्शन (Ashtvinayak Darshn) घेऊ शकतो. मात्र काही ठराविक काळ जस कि, भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सव, माघी गणेश जयंती, संकष्टी चतुर्थी तसेच ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा थंड आणि आल्हाददायक कालावधी अष्टविनायक यात्रेसाठी विशेष अनुकूल मानला जातो.

अष्टविनायक यात्रेचे आध्यात्मिक महत्त्व:

ही (Ashtvinayak Darshn) यात्रा फक्त धार्मिक प्रवास नसून आत्मिक शांती आणि श्रद्धेचा अनुभव आहे. या यात्रेतील प्रत्येक मंदिराचे आणि त्या मंदिरातील गणपतीचे एक वेगळेच महत्व आहे. अनेक भाविक गणपती “अथर्वशीर्ष” पठण करत ही यात्रा पूर्ण करतात.

अष्टविनायक दर्शनाविषयी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

1. अष्टविनायक दर्शनाची सुरुवात कुठून करतात?
अष्टविनायक यात्रेची सुरुवात परंपरेनुसार मोरगाव येथील मोरेश्वर गणपती मंदिरातून केली जाते.

2. अष्टविनायक दर्शन पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतात?
सामान्यतः 2 ते 3 दिवसांत अष्टविनायक यात्रा पूर्ण करता येते.

3. अष्टविनायकातील सर्वात पहिले मंदिर कोणते?
मोरगाव येथील मोरेश्वर गणपती हे अष्टविनायक यात्रेतील पहिले मंदिर आहे.

4. अष्टविनायक यात्रेचा शेवट कुठे होतो?
महागणपती रांजणगावचे दर्शन घेतल्यानंतर पुन्हा मोरगावला जाऊन दर्शन घेतल्यावर यात्रा पूर्ण मानली जाते.

5. अष्टविनायक यात्रेसाठी सर्वोत्तम काळ कोणता?
ऑक्टोबर ते फेब्रुवारी तसेच गणेशोत्सव आणि माघी गणेश जयंतीचा काळ यात्रेसाठी उत्तम मानला जातो.

निष्कर्ष :

अष्टविनायकचे दर्शन (Ashtvinayak Darshn) ही एक श्रद्धा, संस्कृती आणि आध्यत्माची परंपरा आहे. योग्य क्रमाने आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने ही यात्रा केल्यास जीवनात सकारात्मकता, समाधान आणि मानसिक शांतता मिळते. मोरगावपासून सुरु होणारा हा प्रवास परत मोरगावात जाऊन पूर्ण करणे हा एक अविस्मरणीय अनुभव ठरतो.

तुम्ही अष्टविनायक दर्शन केले आहे का? तुमचा अनुभव, प्रवासातील आठवणी किंवा उपयुक्त सूचना कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच महाराष्ट्रातील धार्मिक स्थळांबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी आमचे इतर लेखही वाचा.

Related Posts

महाराष्ट्र भारताला काय देतो? अर्थव्यवस्था, शेती, उद्योग, संस्कृती आणि विकासातील महाराष्ट्राचे अतुलनीय योगदान

महाराष्ट्र भारताला काय देतो? महाराष्ट्र भारताला अर्थव्यवस्था, शेती, उद्योग, संस्कृती, पर्यटन, वारसा, खाद्यसंस्कृती, पायाभूत सुविधा आणि महान विचारवंतांच्या माध्यमातून कसे समृद्ध करतो हे सविस्तर जाणून घ्या. महाराष्ट्र भारताला काय देतो?…

महाराष्ट्रातील ट्रेकिंगसाठी सर्वोत्तम ९ किल्ले | इतिहास, निसर्ग आणि रोमांचाचा अनुभव!

महाराष्ट्रातील ट्रेकिंगसाठी सर्वोत्तम ९ किल्ले: महाराष्ट्रातील ट्रेकिंगसाठी सर्वोत्तम ९ किल्ल्यांची माहिती जाणून घ्या. इतिहास, ट्रेकची कठीणता, लागणारा वेळ, निसर्गरम्य दृश्ये आणि भेट देण्याचा योग्य काळ एका ठिकाणी. महाराष्ट्रात ३५० पेक्षा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

High Income Digital Skills in Marathi: घरबसल्या कमाईसाठी 9 सर्वाधिक मागणीची डिजिटल कौशल्ये

High Income Digital Skills in Marathi: घरबसल्या कमाईसाठी 9 सर्वाधिक मागणीची डिजिटल कौशल्ये

पैशाच्या मागे धावू नका, पैसा तुमच्याकडे आकर्षित करा! – पैसा आकर्षित करण्याचे नियम

पैशाच्या मागे धावू नका, पैसा तुमच्याकडे आकर्षित करा! – पैसा आकर्षित करण्याचे नियम

महाराष्ट्र भारताला काय देतो? अर्थव्यवस्था, शेती, उद्योग, संस्कृती आणि विकासातील महाराष्ट्राचे अतुलनीय योगदान

महाराष्ट्र भारताला काय देतो? अर्थव्यवस्था, शेती, उद्योग, संस्कृती आणि विकासातील महाराष्ट्राचे अतुलनीय योगदान

महाराष्ट्र पोलीस दलातील पदांचा क्रम: कॉन्स्टेबलपासून DGP पर्यंत संपूर्ण माहिती

महाराष्ट्र पोलीस दलातील पदांचा क्रम: कॉन्स्टेबलपासून DGP पर्यंत संपूर्ण माहिती

ऑनलाइन कमाईसाठी वेबसाइट्स – डिजिटल प्रॉडक्ट, ई-बुक, ऑनलाइन कोर्स आणि सेवांमधून पैसे कसे कमवायचे?

ऑनलाइन कमाईसाठी वेबसाइट्स – डिजिटल प्रॉडक्ट, ई-बुक, ऑनलाइन कोर्स आणि सेवांमधून पैसे कसे कमवायचे?

महाराष्ट्रातील रिअल इस्टेट क्षेत्र गुंतवणुकीचे ट्रेंड : गुंतवणूकदारांसाठी संधी, जोखीम आणि महत्त्वाच्या टिप्स

महाराष्ट्रातील रिअल इस्टेट क्षेत्र गुंतवणुकीचे ट्रेंड : गुंतवणूकदारांसाठी संधी, जोखीम आणि महत्त्वाच्या टिप्स