Tourist season आजच्या स्पर्धात्मक पर्यटन बाजारात फक्त रिसॉर्ट असणे पुरेसे नाही, तर उत्कृष्ट experience देणे गरजेचे आहे.
पर्यटन हा भारतातील एक अतिशय वेगाने वाढणारा उद्योग आहे. विशेषतः उन्हाळ्याच्या सुट्यामध्ये , सण-उत्सवाच्या काळात आणि विकेंडला रिसॉर्ट्समध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होते. अशा वेळी रिसॉर्ट मालकांनी योग्य तयारी केली नाही, तर व्यवसायावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. उलट, योग्य नियोजन आणि व्यवस्थापन केल्यास हा काळ मोठ्या नफ्याचा ठरू शकतो. असचं काहीसं व्यवस्थापन आपण पाहणार आहोत.
- 1. पूर्व नियोजन (Pre-Planning for Tourist Season)
- 2. रिसॉर्ट देखभाल आणि सुधारणा (Maintenance & Upgradation)
- 3. पर्यटकांची सेवा व त्यांचा अनुभव (services and experience.)
- 4. ऑनलाइन बुकिंग सेवा मजबूत करा(Strengthen online booking services.)
- 5. डायनॅमिक प्राइसिंग(Dynamic pricing)
- 6. सुरक्षा आणि आरोग्य सुविधा(Safety and health facilities.)
- 7. खाद्यपदार्थ आणि मेन्यू व्यवस्थापन (Food and menu management.)
- 8.अॅक्टिव्हिटीज आणि मनोरंजन (Activities and entertainment.)
- 9.स्थानिक पर्यटनाशी जोडणी (Connection to local tourism.)
- 10. स्टाफ मॅनेजमेंट (Staff Management in tourist season.)
- 11. आपत्कालीन परिस्थितीसाठी तयारी (Emergency preparedness in tourist season.)
- 12. पर्यावरण पूरक उपाय (Environmental complementary measures.)
- 13. मार्केटिंग आणि प्रमोशन (Marketting and promotions)
- 14. ग्राहकांची निष्ठा (Customer loyaltty)
- FAQ – Tourist Season Resort Business Tips

1. पूर्व नियोजन (Pre-Planning for Tourist Season)
Tourist season सुरू होण्यापूर्वीच सर्व तयारी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
- मागच्या वर्षी किती लोक रिसॉर्टला आले हे एकदा तपासून पहा व त्यानुसार या वर्षीच्या बुकिंगचा अंदाज घ्या.
- सर्व रूम्स एकदा चेक करून घ्या त्यामध्ये काही चेंज करायचे असतील तर अगोदरच करून घ्यावे.
- तुमच्या रिसॉर्टला ऐनवेळी गर्दी होण्याचे चान्सेस असतील तर त्यानुसार अतिरिक्त स्टाफची सोय करून ठेवा, जेणेकरून नंतर तुमची धावपळ होणार नाही.
- अशा प्रकारे पूर्व नियोजन केल्याने ऐनवेळी होणारी गडबड टाळता येते आणि पर्यटकांना उत्तम अशी सेवा देता येते.
2. रिसॉर्ट देखभाल आणि सुधारणा (Maintenance & Upgradation)
पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी रिसॉर्टचा लूक आणि त्यामध्ये असणाऱ्या सोयी सुविधा अत्यंत महत्त्वाच्या असतात.
- रूम्सची साफसफाई आणि रिपेअरिंग व्यवस्थित झालीय का हे तपासून पहाणे.
- ठिकठिकाणी वेगवेगळ्या पेंटिंग आणि सजावट करावी ते एक प्रकारचे आकर्षण असते.
- स्विमिंग पूल, गार्डन आणि ओपन एरिया व्यवस्थित ठेवावा , कारण या सर्व गोष्टी पर्यटकाच्या प्रथमदर्शनी पाहण्यात येतात.
- लाईटिंग आणि साऊंड सिस्टम व्यवस्थित असावी.
- सुंदर आणि स्वच्छ रिसॉर्ट पाहून गपर्यटक पुन्हा तुमच्याच रिसॉर्टला येण्याची शक्यता वाढते.
3. पर्यटकांची सेवा व त्यांचा अनुभव (services and experience.)
आजच्या काळात ग्राहक फक्त रूम बुक करत नाही, तर तो अनुभव खरेदी करतो.
- पर्यटकांशी नम्रपणे वागणे , जलद सेवा,
- 24×7 हेल्पडेस्क उपलब्ध ठेवणे फायदेशीर ठरते.
- पर्यटकांचा फीडबॅक घ्या आणि त्यावर काम करा म्हणजे तुम्हालाही काय सुधारणा करायच्या आहेत हे लक्षात येईल.
- पर्यटक तुमच्या रिसॉर्टमधून समाधानी होऊन जात असेल तर तो इतरांनाही तुमचा रिसॉर्टला जाण्याबद्दल सुचवेल.
4. ऑनलाइन बुकिंग सेवा मजबूत करा(Strengthen online booking services.)
आजकाल बहुतेक बुकिंग ह्या ऑनलाइन होत असतात.
- म्हणूनच तुमची वेबसाइट कायम अपडेट ठेवा.
- सोशल मीडियावर सक्रिय रहा (Facebook, Instagram)
- Google Reviews वर लक्ष ठेवावे
- OTA प्लॅटफॉर्म वापरा (जसे Booking, MakeMyTrip)
- चांगले फोटो, व्हिडिओ आणि ग्राहकांच्या रिव्ह्यूमुळे बुकिंग वाढते.
5. डायनॅमिक प्राइसिंग(Dynamic pricing)
पर्यटन हंगामात योग्य दर ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
- पीक सीझनमध्ये दर वाढवणे कारण या काळात लोक फिरण्यासाठी तयार असतात.
- ऑफ-पीक वेळेत ऑफर्स द्या जेणेकरून तुमचं रिसॉर्ट हे कायम चालू राहील.
- लाँग स्टे करणाऱ्यासाठी डिस्काउंट देणे हे देखील फायदेशीर ठरू शकते.
6. सुरक्षा आणि आरोग्य सुविधा(Safety and health facilities.)
ग्राहकांच्या सुरक्षितेला प्राधान्य असायला हवं .
- यासाठी ठिकठिकाणी CCTV कॅमेरे बसवणे आवश्यक आहे.
- फायर सेफ्टी सिस्टीम तपासा.
- फर्स्ट एड किट प्रत्येक रूममध्ये उपलब्ध ठेवावे.
- हायजिन आणि सॅनिटेशनवर लक्ष द्यावे.
- विशेषतः कुटुंबासोबत येणाऱ्या पर्यटकांसाठी हे खूप महत्त्वाचे असते.
7. खाद्यपदार्थ आणि मेन्यू व्यवस्थापन (Food and menu management.)
खाद्यपदार्थ हा रिसॉर्टचा महत्त्वाचा भाग आहे याच्या व्यवस्थापनाचा चांगला फायदा रिसॉर्ट मालकाला नक्कीच होतो.
- जेवणासाठी लोकल आणि स्पेशल डिशेस ठेवा जेणेकरून त्याची चव पर्यटकांना अनुभवता येईल.
- वेगवेगळ्या प्रकारचे मेन्यू ठरविणे (Veg, Non-Veg, Kids menu)
- हायजिनिक किचन मेंटेन करा.
- चांगले जेवण हा ग्राहकाच्या अनुभवाचा मुख्य भाग असतो.
8.अॅक्टिव्हिटीज आणि मनोरंजन (Activities and entertainment.)
पर्यटकांना फक्त राहण्याची सुविधा नाही, तर मनोरंजनही हवे असते.
- Indoor Games (Carrom, Chess, Table Tennis)
- Outdoor Activities (Trekking, Cycling, Bonfire)
- Live Music किंवा DJ Night
- अॅक्टिव्हिटीजमुळे ग्राहक जास्त वेळ रिसॉर्टमध्ये घालवतो.
9.स्थानिक पर्यटनाशी जोडणी (Connection to local tourism.)
तुमचा रिसॉर्ट आसपासच्या पर्यटन स्थळांची जोडलेले असल्यास त्याचा फायदा होतो.
- पर्यटकांची गैरसोय होऊ नये यासाठी लोकल गाईडची व्यवस्था करणे.
- टूर पॅकेज ऑफर करा व त्यासोबतच ट्रान्सपोर्ट सुविधा द्या
- यामुळे ग्राहकांना संपूर्ण अनुभव मिळतो.
10. स्टाफ मॅनेजमेंट (Staff Management in tourist season.)
चांगला स्टाफ असणे म्हणजेच यशस्वी रिसॉर्ट असणे .
- स्टाफला ट्रेनिंग आणि मोटिवेशन द्या जेणेकरून त्यांना कामं करण्यास उत्साह येईल.
- स्टाफचं शिफ्ट मॅनेजमेंट केल्याने एकाच व्यक्तीवर त्याचा भर येणार नाही.
- स्टाफची संख्या योग्य ठेवल्यास स्टाफची घाईगडबड होणार नाही.
- स्टाफ आनंदी असेल तर ग्राहकही आनंदी राहतो.
11. आपत्कालीन परिस्थितीसाठी तयारी (Emergency preparedness in tourist season.)
कधीही काहीही होऊ शकते, त्यामुळे आपत्कालीन तयारी गरजेची आहे.
- लाईट गेल्यास जनरेटर तयार ठेवणे.
- पाण्याचा प्रॉब्लेम असल्यास पर्यायी उपाय करणे.
- मेडिकल इमर्जन्सीसाठी डॉक्टर संपर्कात ठेवणे.
- ही तयारी तुमचा व्यवसाय टिकवण्यासाठी महत्त्वाची आहे.
12. पर्यावरण पूरक उपाय (Environmental complementary measures.)
आजकाल पर्यटन पर्यावरण पूरक रिसॉर्ट्सला प्राधान्य देतात.
- प्लास्टिकचा वापर कमी करणे.
- सोलर एनर्जी वापरणे
- वॉटर रीसायकलिंग करणे
- यामुळे तुमच्या ब्रँडची व्हॅल्यू वाढण्यास मदत होईल
13. मार्केटिंग आणि प्रमोशन (Marketting and promotions)
पर्यटन हंगामात योग्य मार्केटिंग केल्यास बुकिंग वाढते.
- डिस्काउंट ऑफर्स चालवा
- फॅमिली पॅकेजेस द्या
- कॉर्पोरेट बुकिंगसाठी ऑफर्स ठेवा
- मार्केटिंगमुळे तुमचा रिसॉर्ट अधिक लोकांपर्यंत पोहोचतो.
14. ग्राहकांची निष्ठा (Customer loyaltty)
जुने ग्राहक परत आणणे हे नवीन ग्राहक मिळवण्यापेक्षा सोपे असते.
- लॉयल्टी प्रोग्राम सुरू करा.
- रिपीट होणाऱ्या कस्टमरला डिस्काउंट द्या.
- पर्सनलाइज्ड ऑफर्स ठेवा.
- यामुळे दीर्घकालीन व्यवसाय वाढतो.
FAQ – Tourist Season Resort Business Tips
1. Tourist season साठी रिसॉर्ट मालकांनी कधी तयारी सुरू करावी?
Tourist season सुरू होण्याच्या किमान 1–2 महिने आधीच तयारी सुरू करावी, जेणेकरून बुकिंग, स्टाफ आणि देखभाल व्यवस्थित करता येईल.
2. रिसॉर्ट व्यवसायात सर्वात महत्त्वाचा भाग कोणता आहे?
ग्राहकांचा अनुभव (Customer Experience) हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. चांगली सेवा मिळाल्यास ग्राहक पुन्हा येतात आणि इतरांनाही recommend करतात.
3. ऑनलाइन बुकिंग का महत्त्वाचे आहे?
आजकाल बहुतेक पर्यटक ऑनलाइन बुकिंग करतात. त्यामुळे वेबसाइट, सोशल मीडिया आणि OTA platforms (Booking, MakeMyTrip) वर उपस्थिती असणे आवश्यक आहे.
4. डायनॅमिक प्राइसिंग म्हणजे काय?
डायनॅमिक प्राइसिंग म्हणजे मागणी (demand) नुसार दर बदलणे. पीक सीझनमध्ये दर वाढवणे आणि ऑफ-सीझनमध्ये ऑफर्स देणे.
5. रिसॉर्ट व्यवसायात मार्केटिंग का गरजेचे आहे?
मार्केटिंगमुळे रिसॉर्ट जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आणि बुकिंग वाढण्यास मदत होते.
निष्कर्ष
Tourist season ही रिसॉर्ट मालकांसाठी एक सुवर्णसंधीच असते . पण या संधीचा पूर्ण फायदा घ्यायचा असेल, तर योग्य नियोजन, उत्तम सेवा, आणि स्मार्ट मार्केटिंग आवश्यक आहे. ग्राहकांना फक्त राहण्याची सुविधा न देता, एक अविस्मरणीय अनुभव देण्यावर भर दिला पाहिजे.
योग्य तयारी केल्यास तुमचा रिसॉर्ट फक्त हंगामी व्यवसाय न राहता, एक ब्रँड बनू शकतो. त्यामुळे वर दिलेल्या सर्व मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करा आणि तुमचा व्यवसाय पुढच्या स्तरावर घ्या.
तुम्हाला रिसॉर्ट व्यवसाय वाढवण्यासाठी अजून टिप्स हव्या असतील तर comment करा किंवा आमचा ब्लॉग follow करा.








