Bombay Blood Group रक्तगट आपल्या शरीरातील एक महत्वाची ओळख आहे.रक्तगट ही केवळ वैद्यकीय ओळख नसून अनेक वेळा ती जीवन-मरणाचा प्रश्न ठरू शकते.रक्तगट म्हणजे आपल्या शरीरातील लाल पेशिंवर असलेले विशिष्ठ प्रोटीन ज्याच्या आधारे रक्तगटाचे वर्गीकरण केले जाते.

रक्तगट हे प्रामुख्याने दोन प्रणालीवर अवलंबून असतात-
Blood groups mainly dependant on two systems.
1. ABO प्रणाली.
2. Rh फॅक्टर (positive /Negative )
> ABO प्रणाली मध्ये A , B, AB, O हे चार प्रकार येतात.
> Rh फॅक्टर मध्ये Rh positive (+) आणि Rh Negative (-)हे दोन प्रकार असतात.
> या दोन प्रणालिंमुळे एकूण 8 रक्तगट तयार होतात – A+, A-, B+, B-,AB+,AB-,O+,O-.
A, B, AB आणि O हे सर्वसामान्य रक्तगट आपण ऐकलेले असतात. पण तुम्हाला माहित आहे का की या सर्वांपेक्षा वेगळा, अत्यंत दुर्मिळ असा ‘बॉम्बे रक्तगट’ (Bombay Blood Group) अस्तित्वात आहे? भारतात शोध लागलेला हा रक्तगट आजही वैद्यकीय जगात एक मोठे आश्चर्य मानले जाते.
बॉम्बे रक्तगट म्हणजे काय?
What is Bombay Blood Group?
१९५२ साली मुंबई इथे पहिल्यांदाच या रक्तगटाचा शोध लागला, त्यावेळी मुंबईला बोम्बे असे म्हटलेलं जायचे म्हणून याला बॉम्बे रक्तगट असे नाव देण्यात आले आहे. वैद्यकीय भाषेत याला Oh (ओ एच) रक्तगट असेही म्हणतात.या रक्तगटात A, B किंवा O असे कोणतेही अँटिजेन नसतात. विशेष म्हणजे, O रक्तगटापेक्षाही हा वेगळा असतो, त्यामुळे O रक्तगटाचे रक्तही बॉम्बे रक्तगटाच्या रुग्णाला देता येत नाही.
हा रक्तगट किती दुर्मिळ आहे?
How rare is this bombay blood group?
जगात सुमारे १ कोटी लोकांपैकी १ व्यक्ती, भारतात अंदाजे १० लाखांपैकी १ व्यक्ती इतका दुर्मिळ असा हा रक्तगट असल्यामुळे या रक्तगटाचे रक्त मिळणे अत्यंत कठीण असते.
बॉम्बे रक्तगटाची अडचण काय?
What is the problem with Bombay blood group?
बॉम्बे रक्तगट असलेल्या व्यक्तीला फक्त बॉम्बे रक्तगटाचेच रक्त चालते इतर कोणताही रक्तगट दिल्यास त्याचे परिणाम हे गंभीर होऊ शकतात. तपासणीत तो O blood group सारखा दिसतो,तरी प्रत्यक्षात तो पूर्णपणे वेगळा असतो आणि फक्त Bombay Blood Group कडूनच रक्त घेऊ शकतो अशा रक्तगटाच्या व्यक्तीसाठी अपघात किंवा शस्त्रक्रियेच्या वेळी रक्त मिळवणे मोठे आव्हान ठरते.म्हणूनच या रक्तगटाच्या व्यक्तींनी नेहमी ब्लड ग्रुप कार्ड जवळ ठेवणे अत्यंत आवश्यक असते.
हा रक्तगट कसा तयार होतो?
How is this blood type formed?
हा रक्तगट जनुकीय (Genetic) कारणांमुळे तयार होतो.आई-वडिल दोघांकडूनही दुर्मिळ जनुक मिळाल्यासच हा रक्तगट तयार होतो. त्यामुळे एकाच कुटुंबातही तो फारच क्वचित आढळून येतो. दोघांकडेही hh gene असणे आवश्यक असते त्यामुळे म्हणूनच हा रक्तगट दुर्मिळ आणि अत्यंत खास मानला जातो.
रक्तदानाचे महत्त्व:
Importance of blood donation.
रक्तदान म्हणजे एखाद्या व्यक्तीने स्वतःचे रक्त देऊन दुसऱ्याचा जीव वाचवणे. हे एक सामाजिक कर्तव्य नसून माणुसकीची खरी सेवा आहे.ऍक्सिडेंट, शस्त्रक्रिया, डिलिव्हरी अशा परिस्तिथीत अनेक रुग्णांना रक्ताची गरज असते. अशावेळी तुम्ही donate केलेलं ब्लड एखाद्याचा जीव वाचवू शकते.रक्ताचा साठा असणं ही एक गरज आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये याच साठ्याचा उपयोग होऊ शकतो.काही लोकांचं रक्तगट हा खूपच दुर्मिळ असतो, जसे की bombay blood group. अशा लोकांसाठी रक्तदान म्हणजे एक प्रकारचे जीवदानच ठरत.बॉम्बे रक्तगट असलेली व्यक्ती रक्तदान करत असेल, तर ते रक्त अनेकांचे प्राण वाचवू शकते. म्हणूनच: या रक्तगटाच्या लोकांनी रक्तदानासाठी पुढे येणे गरजेचे आहे.विशेषत: रक्तपेढ्यांमध्ये नोंदणी करून आपत्कालीन परिस्थितीत संपर्कात राहावे.
या रक्तगटाशी संबंधित व्यक्तींची यादी उपलब्ध आहे का?
Is there a list of people with this blood group available?
सध्या बॉम्बे रक्तगट (Bombay blood group) शी संबंधित कुठल्याही प्रसिद्ध व्यक्तींची सार्वजनिक यादी उपलब्ध नाही. या रक्तगटाचे प्रमुख कारण म्हणजे तो अत्यंत दुर्मिळ असून व्यक्तींची माहिती बर्याच वेळा गोपनीय ठेवली जाते किंवा वैद्यकीय रजिस्टरमध्ये नोंदवली जाते, परंतु ती सार्वजनिकपणे जाहीर होत नाही.
रक्तदान करणाऱ्या दात्याच्या आरोग्यासाठी होणारे फायदे :
Health benefits of blood donation.
- रक्तदान केल्याने शरीरात नवीन रक्त पेशी तयार होतात.
- आपल्या शरीरातील लोह ( iron ) संतुलित राहते.
- हृदयावीकाराचा धोका कमी होण्यास मदत होते.
- याबरोबरच आपण कोणाच्यातरी जीवनासाठी उपयोगी पडलो याची जाणीव खूप मोठी असते आणि हीच जाणीव आपल्याला एक मानसिक समाधान देऊन जाते.
बॉम्बे रक्तगट हा केवळ दुर्मिळ नाही, तर जीवनासाठी अत्यंत संवेदनशील असा रक्तगट आहे. याबद्दल जनजागृती होणे गरजेचे आहे. योग्य माहिती, वेळेवर रक्तदान आणि सजगता यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात.







