शाळेच्या बसेस पिवळ्याच रंगाच्या असण्या मागचं नेमकं कारण काय असावं?

शाळेच्या बसेस पिवळ्याच रंगाच्या असण्या मागचं नेमकं कारण काय असावं?

आपण दररोज बघतो शाळांच्या बसेस ह्या पिवळ्या रंगांच्याच असतात.रस्त्याने कुठेही पिवळ्या रंगाची गाडी किंवा बस दिसली की आपल्याला लगेच लक्षात येते की ही शाळेचीच बस आहे.

परंतु तुम्ही कधी विचार केलाय का की हाच रंग का? परंतु यामागे एक महत्वाचे कारणही आहे, तर चला पाहूया ते कारण काय आहे.

लक्ष वेधून घेणारा रंग:

पिवळा रंग हा आकर्षित आहे. जास्त करून ‘क्रोम – येलो ‘हा शेड शाळेच्या बसेससाठी वापरला जातो. तो सकाळी धुक्यात,पावसात आणि तिन्ही सांजेला बाकीच्या रंगापेक्षा अधिक उठून दिसतो.

सुरक्षितता:

आजच्या काळात विद्यार्त्यांची सुरक्षितता खूप महत्वाची आहे. पिवळ्या रंगाची बस म्हटली की ती शाळेचीच आहे हे सहजपणे ओळखले जाते. त्याचाच परिणाम असा होतो की बाकीचे वाहnचालक आपला वेग कमी करतात किंवा सुरक्षित अंतर ठेवतात.

परंपरा:

असा इतिहास सांगतो की शाळेच्या बसेसना पिवळा रंग देण्याची परंपरा ही 1939 साली अमेरिकेमध्ये सुरु पहिल्यांदाच करण्यात आली. त्यावेळी एक शैक्षणिक परिषद केली होती त्यामध्ये असा निर्णय घेण्यात आला की शाळेच्या वाहतूकसाठी जी काही वाहने वापरली जातील त्यांचा रंग हा पिवळा असावा. त्यानंतरच हा रंग सर्वात उपयोगी आणि सोपा मार्ग म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वीकारला गेला.

स्पष्टपणा:

पिवळ्या रंगावर काळ्या रंगाची अक्षरे ही अतिशय स्पष्ट दिसतात. या कारणामुळेच बसवर लिहलेला ‘School Bus ‘ हा शब्द दुरूनही वाचला जातो. परिणामी लोक समजून जातात की आपल्याला पुढे जे वाहन आहे ते शाळेच्या मुलांचं आहे.

परिणाम:

हा रंग आनंद, चेतना, उत्साह व सकारात्मकतेचा प्रतीक मानला जातो. लहान मुलांना हा रंग आकर्षित करतो. त्यामुळं या रंगाच्या बसकडे बघून त्यांना जी भीती वाटते ती नाहीशी होऊन आपलेपणाची एक भावना निर्माण होते.

यावरून हे लक्षात येते की शाळेच्या बसेसचा रंग पिवळा असण्यामागे वैज्ञानिक, सुरक्षितता आणि मानसिक विचार आहे. त्यामुळेच तो इतक्या वर्षांपासुन टिकून आहे.

Related Posts

मुंबई-पुणे प्रवासाच्या वेळेत 30 मिनिटांची बचत-“Missing link” मुळे मिळणार वेगवान प्रवासाचा अनुभव. Mumbai-pune “Missing link”

Mumbai-pune “Missing link”.मोठमोठे पूल आणि बोगदे यांना एकत्र करून तयार झालेला Mumbai-pune “Missing link” हा 19.8 किमी लांबीच्या घाट असणाऱ्या प्रवासाला एक पर्याय म्हणून चालू करण्यात आला आहे. या घाटाला…

इतिहासाकडून भविष्याकडे : टाटा ‘Sierra’ चा आधुनिक अवतार. Tata Sierra.

Tata Sierra-भारताच्या इतिहासात SUV सेगमेंटमध्ये सुवर्णाक्षरांनी नोंदवले गेलेले नाव म्हणजेच “TATA Sierra.” या मॉडेलची आठवण एक आयकॉनिक म्हणवली जाते. परंतु Sierra आता परत नवीन एन्ट्री घेत आहे. काय आहे Tata…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

भारतामध्ये झपाट्याने वाढणारे व्यवसाय – भविष्यातील मोठी संधी. New buisness startup ideas in India.

भारतामध्ये झपाट्याने वाढणारे व्यवसाय – भविष्यातील मोठी संधी. New buisness startup ideas in India.

अष्टविनायक दर्शन शास्त्रशुद्ध पद्धतीने कसे करावे? Ashtvinayak Darshn.

अष्टविनायक दर्शन शास्त्रशुद्ध पद्धतीने कसे करावे? Ashtvinayak Darshn.

बुद्धिबळाचा मोहक इतिहास – प्राचीन चतुरंग ते आधुनिक बुद्धिबळ. History of chess.

बुद्धिबळाचा मोहक इतिहास – प्राचीन चतुरंग ते आधुनिक बुद्धिबळ. History of chess.

विविधतेने नटलेल्या भारताबद्दलची 8 मनोरंजक तथ्य – त्यामध्ये महाराष्ट्रातील एक ! Interesting facts in India.

विविधतेने नटलेल्या भारताबद्दलची 8 मनोरंजक तथ्य – त्यामध्ये महाराष्ट्रातील एक ! Interesting facts in India.

इथे आपण थ्रीलसाठी जातो, जीव गमावण्यासाठी नाही! Adventure activities in India.

इथे आपण थ्रीलसाठी जातो, जीव गमावण्यासाठी नाही! Adventure activities in India.

AI तुमची नोकरी घेणार नाही, पण AI शिकलेली व्यक्ती नक्कीच पुढे जाईल.. 10 प्रमुख AI स्टार्टअप्स. AI startups in india.

AI तुमची नोकरी घेणार नाही, पण AI शिकलेली व्यक्ती नक्कीच पुढे जाईल.. 10 प्रमुख AI स्टार्टअप्स. AI startups in india.