Supar Vasuki Train – भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानली जाणारी भारतीय रेल्वे ही फक्त प्रवासाची सोय नसून हजारो टन माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहचवण्याचं एक मोठं साधन आहे. भारतीय रेल्वेने वेळोवेळी वेगवेगळे रेकॉर्ड करून दाखवले आहेत. त्यापैकीच एक अभिमान वाटावा असा रेकॉर्ड म्हणजे “Supar Vasuki Train” भारतातील सर्वात लांब मालगाडी. भारतीय रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या लांब आकाराची माल गाडी चालवण्यात आली.

Supar Vasuki Train – Indian Railway.
भारताची अभिमानास्पद रेल्वे सफर:
भारतीय रेल्वे ही केवळ देशातील वाहतुकीचा कणा नाही तर जगातील सर्वात मोठ्या रेल्वे जाळयांपैकी एक आहे. याच रेल्वेने 15 ऑगस्ट 2022 रोजी भारताला एक नवीन अभिमानास्पद अशी एक गोष्ट दिली ती म्हणजे ‘सुपर वासुकी’, भारतातील आत्तापर्यंतची सर्वात लांब अशी ट्रेन-Supar Vasuki Train
सुपर वासुकीबद्दल थोडीशी माहिती:
सर्वात लांब मालगाडी ‘ सुपर वासुकी ‘ ही प्रामुख्याने कोळसा वाहतुकीसाठी तयार करण्यात आली होती. दक्षिण – पूर्व मध्य रेल्वे विभागाने या रेल्वेचे संचालन केले. जुन्या कथेतील नागराज वासुकी यांच्या नावावरून या ट्रेनला हे “सुपर वासुकी (Supar Vasuki Train)” नाव देण्यात आलं. कारण नागराज वासूकी सारखं ही ट्रेन पण आकाराने अत्यंत लांब आणि शक्तिशाली आहे.
सुपर वासूकी ट्रेनची लांबी :
लांबी हीच या ट्रेनची खासियत आहे. जवळपास 3.5 किमी लांब असणाऱ्या या ट्रेनमध्ये 295 मालडब्बे आहेत. सामान्य मालगाडीच्या तुलनेत ही मालगाडी अनेक पट मोठी आहे. या ट्रेनची वाहनक्षमता ही 25900 टन कोळसा अशी नमूद करण्यात आली आहे.

सुपर वासूकी ट्रेनची रचना:
या Supar Vasuki Train रचना म्हणजे चार वेगवेगळ्या प्रकारच्या मालगाड्या एकत्र जोडून बनवलेली मालगाडी. या मालगाडीला 6 इंजिन 295 मालडब्बे असून अत्यंत प्रगत अशी ब्रेकिंग प्रणाली आहे.
या ट्रेनमध्ये विशेष असं काय आहे?
ही Supar Vasuki Train केवळ विशेष नसून इतिहास घडवणारी आहे कारण ही सर्वात लांब ट्रेन असण्याबरोबरच आशियातील सर्वात मोठ्या मालगाडयांपैकी एक आहे. तिचा वापर मुख्यथ: कोळसा वाहून नेण्यासाठी केला जातो, जो देशाच्या वीज निर्मिती केंद्रासाठी महत्वाचा आहे. आणि तिची कार्यक्षमता जास्त असल्या कारणाने रेल्वेचा वेळ, ऊर्जा, आणि खर्च याचीही मोठी बचत होते.
सुपर वासूकी आणि भारतीय अर्थव्यवस्था:
आपल्या सगळ्यांना माहिती आहेच रेल्वे वाहतूक ही भारताच्या अर्थव्यवस्थेचा एक महत्वाचा भाग आहे. सुपर वासुकी या ट्रेनमुळे भारतीय व्यवसायिकांना वेळेत कच्चा माल मिळू लागला. जास्त माल एकदाच या गाडीमध्ये बसत असल्यामुळे वाहतूक खर्च देखील कमी झाला. उत्पादन वाढण्यास मदत झाली आणि वीज निर्मिती क्षेत्रात देखील सातत्य राहिले.
सुपर वासूकी आणि आव्हाने:
ट्रेन जितकी मोठी तितकीच ती नियंत्रण करण्यासाठी अवघड. ही मोठी ट्रेन चालवताना योग्य वेळी ब्रेक लागणे आवश्यक होते. या मालगाडीसाठी असणारे ट्रॅक लांब आणि मजबूत असणे गरजेचे होते. रेल्वे सिग्नल सिस्टिम अत्यंत अचूक असणे गरजेचे होते.
भारतासाठी या ट्रेन चे महत्व.
सुपर वासुकीमुळे (Supar Vasuki Train) भारतीय रेल्वे जगातील प्रगत रेल्वे व्यवस्थांमध्ये आपले स्थान मजबूत करू शकली. भारतातील लोकसंख्या बघता वीज निर्मिती मोठ्या प्रमाणात आवश्यक आहे त्यामुळे वीज निर्मितीसाठी आवश्यक असलेला
कोळसा हा झपाट्याने पोहचवला जातो. औद्योगिक उत्पादन क्षमता वाढते. मालवाहतुकीचा वेग आणि क्षमता वाढल्यामुळे भारताच्या गतिशक्ती योजनेला चालना मिळाली आहे. अनेक छोट्या ट्रेन चालवण्याऐवजी एक मोठी ट्रेन चालवल्यामुळे डिझेल आणि वीजेची बचत झाली. मोठ्या प्रमाणात मालवाहतूक करण्याची क्षमता वाढली. कोळसा वेळेत पोहोचल्यामुळे वीज उत्पादन सुरळीत राहिले.
सुपर वासुकी हे नाव का देण्यात आले:
आपल्या हिंदू पुराणानुसार वासुकी हे नाव एका सर्पराजाच होत या राजाच समुद्रमंथनामध्ये विशेष महत्व आहे. हा सर्पराजा त्याच्या सामर्थ्य, लांबी आणि प्रभाव यासाठी ओळखलं जातो. आणि ही ट्रेन ही अशीच लांब आणि प्रभावशाली असल्यामुळे हे नाव या ट्रेनला देण्यात आले.
निष्कर्ष:
यावरून हे लक्ष्यात येते की सुपर वासुकी ही भारतातील मालवाहतूक क्षेत्रातील महत्वाचा टप्पा आहे. हा एक फक्त तांत्रिकदृष्ट्या मोठा प्रयोग नसून यामुळे मोठ्या प्रमाणात होणारी मालवाहतूक अधिक कार्यक्षमपणे, कमी खर्चात, व्यावसायिक दृष्ट्या फायदेशीर पद्धतीने करता येऊ शकते. आणि पुढे जाऊन असे प्रयोग करण्यासाठी ट्रॅक ची संख्या, सिग्नल सिस्टिम मध्ये सुधारणा आणि इतरही इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये गगुंतवणूक करणे ही काळाची गरज आहे. या ट्रेनमुळे भारतीय रेल्वेची कार्यक्षमता वाढली, कोळसा वाहतूक जलद झाली आणि ऊर्जा क्षेत्राला मोठी मदत मिळाली. तसेच कमी खर्चात मोठ्या प्रमाणावर मालवाहतूक करणे शक्य झाले.
सुपर वासुकीने सिद्ध केले की भारत तांत्रिक आणि औद्योगिक क्षेत्रात वेगाने प्रगती करत आहे. भविष्यात अशा आणखी आधुनिक आणि शक्तिशाली ट्रेन भारताच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावतील.
भारतीय रेल्वेचा हा अद्भुत प्रवास प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची गोष्ट आहे.







