लाल भोपळा – निरोगी आयुष्याचा सोपा मार्ग

आरोग्याचा खजिना :

भारतामध्ये स्वयंपाकात लाल भोपळा हा खूप महत्वाचा भाजीपाला आहे. त्याची चव,पौष्टिकपणा,

आणि औषधी गुणधर्म यामुळे तो शहरी आणि ग्रामीण या दोन्ही भागात मोठ्या प्रमाणात वापरला जातो.

लाल भोपळ्याचा उपयोग:

शिजवून केलेली लाल भोपळ्याची भाजी ही अतिशय चवदार लागते. भोपळ्याचा हलवा, लाडू, गोड असे घारगे आणि तिखट पुरी याकरिता भोपळ्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. उकडलेला लाल भोपळा हलक्या मसाल्यासोबत खाल्यास तो पचणास हलका जातो आणि अशा पद्धतीनेच आपण त्याचा सॅलड व सूप साठीही उपयोग करू शकतो. लाल भोपळ्याची भाजी ही उपवासाची भाजी म्हणूनही खाल्ली जाते. काही ठिकाणी भोपळ्याचे लोणचे बनवून ते खूप काळ वापरले जाते.

पौष्टिक घटक:

लाल भोपळ्यामध्ये अनेक जीवनसत्वे व खनिजे असतात. कॅलरी, कार्बोहायद्रेट, प्रथिने, तंतुमय पदार्थ, व्हिटॅमिन अ, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, मॅग्नेशियम इत्यादी घटक हे यामध्ये असतात.

आरोग्यदायी फायदे: 

यात मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन अ असल्यामुळे आपल्या डोळ्याच्या आरोग्यासाठी हे उपयुक्त आहेत. यात असणाऱ्या फायबरमुळे पचन शक्ती सुधारते. अँटीओक्सीडंट्समुळे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते. हा भोपळा आपल्या हृदयासाठी सुद्धा चांगला आहे कारण त्यातील पोटॅशियम आपला रक्तदाब नियंत्रित ठेवतो. त्याचबरोबर कमी कॅलरी व तंतुमय पदार्थामुळे वजनही नियंत्रणात राहते.

त्याची प्रत व चव कशी ओळखावी: 

हा भोपळा खरेदी करताना तो लाल किंवा गडद नारंगी रंगाचा घ्यावा. त्यावर नैसर्गिक चमक असावी. भोपळा घेताना तो हाताने दाबून पाहावा तो घट्ट व टणक असावा. त्याचा देठ सुकलेला असावा. त्याच वजन हे त्याच्या आकाराच्या तुलनेत जास्त हवे. भोपळ्यावर हलक्या हाताने हलकेच टॅप करून पहावे जर खोल पोकळ असा आवाज आल्यास तो चांगला पिकलेला असतो.

यावरून लाल भोपळा हा चवीष्ट, पौष्टिक, निरोगी आरोग्यास उपयुक्त असा आहे. आपल्या रोजच्या आहारात त्याचा उपयोग केल्यास आपले संपूर्ण कुटुंब हे निरोगी राहते.

Related Posts

आंब्याच्या झाडांवरील प्रामुख्याने पडणारे रोग कोणते आणि त्यावरील उपाय काय आहेत…Mango diseases and their management.

Mango diseases and their management – आंबा हा भारतातील अत्यंत महत्त्वाचा आणि लोकप्रिय फळांपैकी  एक आहे. परंतु या फळझाडाची योग्य काळजी न घेतली गेली नाही तर वेगवेगळ्या  रोगांमुळे आंब्याच्या उत्पादनात…

तुम्ही भेसळयुक्त दूध पीत आहात का? घरीच तपासून पहा.Adulterated milk

Adulterated milk-दूध हे पोषणाचा एक महत्त्वाचा स्रोत मानले जाते, विशेषतः लहान मुले आणि वृद्धांसाठी दूध मोठ्या प्रमाणात एक पोषण म्हणून दिले जाते. आजकाल मोठ्या प्रमाणात नफा मिळावा म्हणून बाजारात भेसळ…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

भारतामध्ये झपाट्याने वाढणारे व्यवसाय – भविष्यातील मोठी संधी. New buisness startup ideas in India.

भारतामध्ये झपाट्याने वाढणारे व्यवसाय – भविष्यातील मोठी संधी. New buisness startup ideas in India.

अष्टविनायक दर्शन शास्त्रशुद्ध पद्धतीने कसे करावे? Ashtvinayak Darshn.

अष्टविनायक दर्शन शास्त्रशुद्ध पद्धतीने कसे करावे? Ashtvinayak Darshn.

बुद्धिबळाचा मोहक इतिहास – प्राचीन चतुरंग ते आधुनिक बुद्धिबळ. History of chess.

बुद्धिबळाचा मोहक इतिहास – प्राचीन चतुरंग ते आधुनिक बुद्धिबळ. History of chess.

विविधतेने नटलेल्या भारताबद्दलची 8 मनोरंजक तथ्य – त्यामध्ये महाराष्ट्रातील एक ! Interesting facts in India.

विविधतेने नटलेल्या भारताबद्दलची 8 मनोरंजक तथ्य – त्यामध्ये महाराष्ट्रातील एक ! Interesting facts in India.

इथे आपण थ्रीलसाठी जातो, जीव गमावण्यासाठी नाही! Adventure activities in India.

इथे आपण थ्रीलसाठी जातो, जीव गमावण्यासाठी नाही! Adventure activities in India.

AI तुमची नोकरी घेणार नाही, पण AI शिकलेली व्यक्ती नक्कीच पुढे जाईल.. 10 प्रमुख AI स्टार्टअप्स. AI startups in india.

AI तुमची नोकरी घेणार नाही, पण AI शिकलेली व्यक्ती नक्कीच पुढे जाईल.. 10 प्रमुख AI स्टार्टअप्स. AI startups in india.