Sarkari Yojna 2026-भारत सरकार प्रत्येक वर्षी नागरिकांच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक विकासासाठी विविध कल्याणकारी योजना राबवत असते. Sarkari Yojna 2026 मध्येही शेतकरी, महिला, विद्यार्थी, बेरोजगार युवक, ज्येष्ठ नागरिक आणि उद्योजक यांच्यासाठी अनेक महत्त्वाच्या योजना सुरू आहेत. या योजनांमुळे आर्थिक मदत, आरोग्य सुरक्षा, रोजगार, गृहनिर्माण आणि सामाजिक संरक्षण मिळते.
आज आपण Sarkari Yojna 2026 मधील सर्वाधिक लाभदायक आणि लोकप्रिय अशा 10 सरकारी योजनांची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्य या योजनांसाठी पात्र असाल, तर या माहितीचा नक्की फायदा होऊ शकतो.
Table Of Contents
- Sarkari Yojna 2026:
- 1. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-KISAN)
- 2. आयुष्मान भारत योजना
- 3. प्रधानमंत्री आवास योजना 2.0
- 4. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना
- 5. प्रधानमंत्री मुद्रा योजना
- 6. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना
- 7. लखपती दीदी योजना
- 8. अटल पेन्शन योजना
- 9. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना (PMKVY)
- 10. सुकन्या समृद्धी योजना
- वाचकांच्या मनातील प्रश्न(FAQ)
- निष्कर्ष:

Sarkari Yojna 2026:
1. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-KISAN)
भारत हा एक कृषिप्रधान देश आहे त्यामुळे देशातील मोठ्या प्रमाणातील लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे. यामुळेच भारत सरकारने ही योजना सुरु केली. शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेली PM-KISAN योजना देशातील सर्वाधिक यशस्वी योजनांपैकी एक आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी ₹6,000 ची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम प्रत्येकी ₹2,000 च्या तीन हप्त्यांमध्ये थेट बँक खात्यात जमा केली जाते.
या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे बियाणे, खते, कीटकनाशके यासारखे खर्च भागविण्यासाठी आर्थिक स्वरूपात मदत करणे.
या Sarkari Yojna 2026 साठी लागणारा खर्च हा केंद्र सरकार उचलते. राज्य सरकारची भूमिका फक्त जे शेतकरी या योजनेस पात्र आहेत त्यांची पडताळणी करणे. यामध्ये स्वतःच्या नावावर शेतजमीन असणारे शेतकरी, जमीनीची नोंद राज्य सरकारकडे असणे, आधार क्रमांक आणि बँक खाते जोडलेले असणे गरजेचे असते.
2. आयुष्मान भारत योजना
गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आयुष्मान भारत योजना सुरू करण्यात आली. या योजनेत पात्र कुटुंबांना दरवर्षी ₹5 लाखांपर्यंत कॅशलेस उपचार सुविधा मिळते.
2024 पासून 70 वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना आयुष्मान भारत योजनेत समाविष्ट करण्यात आले असून Sarkari Yojna 2026 मध्येही हा लाभ सुरू आहे. त्यामुळे लाखो ज्येष्ठ नागरिकांना ₹5 लाखांपर्यंतचे मोफत आरोग्य संरक्षण मिळत आहे. जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर तुमचे आयुष्मान कार्ड त्वरित तयार करून घ्या आणि गरज पडल्यास या योजनेचा लाभ घ्या. ही योजना केवळ आरोग्यसेवा देत नाही तर कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षिततेलाही बळकटी देते.
3. प्रधानमंत्री आवास योजना 2.0
“सर्वांसाठी घर” हे उद्दिष्ट ठेवून सुरू झालेली ही Sarkari Yojna 2026 मध्येही सुरू आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना घर बांधण्यासाठी किंवा खरेदीसाठी आर्थिक मदत दिली जाते.
या योजनेचे दोन भाग आहेत:
1. PMAY-Urban (PMAY-U 2.0)- शहरी भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, निम्न उत्पन्न आणि मध्यमवर्गीय कुटुंबासाठी या प्रकाराचा उपयोग होतो.
2. PMAY- Gramin (PMAY-G)- ग्रामीण भागातील लोकांनसाठी या प्रकाराचा उपयोग होतो.
या योजनेचे वैशिष्टय म्हणजे घराची मालकी ही महिला सदस्यांच्या नावे ठेवण्यासाठी प्राधान्य दिले जाते. DBT द्वारे थेट खात्यामध्ये पैसे जमा केले जातात. घरासोबत वीज, पाणी, शौचालय, गॅस कनेक्शन या मूलभूत सुविधा देखील मिळतात.
प्रधानमंत्री आवास योजना ही भारतातील लाखो कुटुंबांसाठी घराचे स्वप्न पूर्ण करणारी महत्त्वाकांक्षी योजना आहे. ग्रामीण असो किंवा शहरी भाग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि मध्यमवर्गीय नागरिकांना सुरक्षित, सन्मानजनक आणि पक्के घर उपलब्ध करून देण्याचे काम ही योजना करत आहे. जर तुमच्याकडे स्वतःचे घर नसेल आणि तुम्ही पात्रता निकष पूर्ण करत असाल, तर Sarkari Yojna 2026 मध्ये या योजनेसाठी अर्ज करून सरकारी मदतीचा लाभ घेऊ शकता. घर हे केवळ निवारा नसून कुटुंबाच्या सुरक्षित भविष्याचा मजबूत पाया असतो.
4. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना
वाढत्या वीज बिलांमुळे अनेक कुटुंबांचे मासिक बजेट बिघडते. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून केंद्र सरकारने पीएम सूर्य घर मोफत वीज योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत नागरिकांना घराच्या छतावर सौरऊर्जा (Solar Rooftop) प्रणाली बसवण्यासाठी अनुदान दिले जाते. यामुळे घरगुती वीज बिल मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते आणि काही प्रकरणांमध्ये दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज मिळण्याचा लाभ होऊ शकतो.

वाढत्या वीज बिलाचा आकडा कमी करण्यासाठी घरांच्या छतावर सौर पॅनल बसवून विजेचा खर्च कमी करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. पात्र लाभार्थ्यांना सौर प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात अनुदान दिले जाते.या योजनेचा मुख्य उद्दिष्ट म्हणजे घरगुती वीज खर्च कमी करणे हा आहे.
महाराष्ट्रात हजारो नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. काही प्रकरणांमध्ये केंद्र अनुदानासोबत राज्यस्तरीय अतिरिक्त लाभ देखील उपलब्ध असू शकतात. अर्ज करण्यापूर्वी स्थानिक महावितरण (MSEDCL) कार्यालयात माहिती घेणे उपयुक्त ठरते.
5. प्रधानमंत्री मुद्रा योजना
स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या युवकांसाठी मुद्रा योजना अत्यंत उपयुक्त आहे. या योजनेत तारणाशिवाय कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
प्रधानमंत्री मुद्रा योजना (Pradhan Mantri Mudra Yojana) ही केंद्र सरकारने 2015 मध्ये सुरू केलेली योजना आहे. या योजनेचा उद्देश लघु आणि सूक्ष्म उद्योगांना आर्थिक मदत करणे हा आहे. महिला उद्योजक या योजनेचा लाभ घेऊन आपल्या व्यवसायासाठी कर्ज मिळवू शकतात.
महिला सशक्तीकरण, रोजगार निर्मिती आणि देशाच्या आर्थिक विकासात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी मुद्रा योजना अत्यंत उपयुक्त ठरत आहे. त्यामुळे ज्या महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा आहे किंवा व्यवसायाचा विस्तार करायचा आहे, त्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचा गंभीरपणे विचार करावा. योग्य नियोजन, मेहनत आणि आर्थिक शिस्त यांच्या साहाय्याने मुद्रा लोन हे महिलांच्या उद्योजकीय स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवणारे प्रभावी साधन ठरू शकते.
6. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना
भारतामध्ये अनेक परंपरागत कारागीर आणि हस्तकला यावसायिक पिढ्यानंपिढ्या आपला व्यवसाय करत आहेत याच व्यावसायिकांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. सुतार, लोहार, शिंपी, सोनार, कुंभार यांना प्रशिक्षण आणि आर्थिक मदत दिली जाते. ही योजना 17 सप्टेंबर 2023 साली सुरु करण्यात आली. ही Sarkari Yojna 2026 मध्येही योजना सुरु असून अनेक पात्र लोक या योजनेचा फायदा घेत आहेत.
ही Sarkari Yojna 2026 मध्ये सरकारकडून देशभरातील कारागिरांपर्यंत योजना पोहोचवण्यासाठी विशेष मोहीम राबवली आहे. CSC केंद्रांमार्फत नोंदणी, डिजिटल व्यवहार प्रोत्साहन आणि विपणन सहाय्य अधिक मजबूत करण्यात आले आहे. अनेक राज्यांमध्ये प्रशिक्षण कार्यक्रमांचा विस्तार करण्यात आला आहे.
7. लखपती दीदी योजना
ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी सुरू करण्यात आलेली ही योजना स्वयं-सहाय्यता गटांशी जोडलेल्या महिलांसाठी विशेष फायदेशीर आहे. प्रशिक्षण, आर्थिक मदत, व्यवसाय, बाजारपेठ उपलब्धता करून देत ही योजना महिलांना स्वावलंबी बनवत आहे.
Sarkari Yojna 2026 पर्यंत केंद्र सरकारने 3 कोटी लखपती दीदी निर्माण करण्याचे उद्दिष्ट वेळेपूर्वी गाठल्याची माहिती देण्यात आली आहे. आता 2029 पर्यंत 6 कोटी लखपती दीदी तयार करण्याचे नवीन लक्ष्य ठेवण्यात आले आहे. तसेच SHE-Marts द्वारे महिला उद्योजकांना मोठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्रातही “उमेद” अभियांनांतर्गत लाखो महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून व्यवसाय सुरु करून आर्थिक स्वावलंबन मिळवले आहे.
8. अटल पेन्शन योजना
असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी (शेतकरी, छोटे व्यवसायिक, चालक मजूर आणि स्वयंरोजगार करणारे नागरिक)निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षितता देणारी ही महत्त्वाची योजना आहे. अटल पेन्शन योजनेत निवडलेल्या योजनेनुसार ₹1,000, ₹2,000, ₹3,000, ₹4,000 किंवा ₹5,000 मासिक पेन्शन मिळू शकते.
म्हातारपणात आर्थिक सुरक्षितता देणेहे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. पेन्शनची रक्कम तुम्ही निवडलेल्या योजनेवर आणि भरलेल्या हप्त्यांवर अवलंबून असते.
ही Sarkari Yojna 2026 एप्रिल पर्यंत अटल पेन्शन योजनेत 9 कोटींपेक्षा जास्त सदस्य नोंदवले गेले आहेत. केंद्र सरकारने ही योजना आर्थिक वर्ष 2030-31 पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
9. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना (PMKVY)
प्रधानमंत्री कौशल विकास योजना (PMKVY) ही भारत सरकारची कौशल्य विकास योजना आहे. 2015 मध्ये कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय (MSDE) यांनी ही योजना सुरू केली. या योजनेचा मुख्य उद्देश युवकांना उद्योगानुसार कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम बनवणे हा आहे. युवकांना रोजगारक्षम बनवण्यासाठी आणि आधुनिक कौशल्ये शिकवण्यासाठी PMKVY योजना राबवली जाते.
या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे तरुणांना मोफतनवीन कौशल्य (skill) शिकवणे त्याचबरोबर रोजगाराच्या संधी वाढवणे, आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देणे हे होय.
10. सुकन्या समृद्धी योजना
सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana – SSY) ही भारत सरकारची मुलींसाठी विशेष बचत योजना आहे. मुलीच्या शिक्षणासाठी आणि भविष्यातील आर्थिक गरजांसाठी दीर्घकालीन बचत करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानाचा एक भाग आहे.

मुलींच्या शिक्षण आणि भविष्यासाठी बचत करण्याची ही एक लोकप्रिय योजना आहे. या योजनेत आकर्षक व्याजदर आणि कर सवलती मिळतात. या योजनेत पालक नियमित गुंतवणूक करू शकतात आणि मुलगी मोठी झाल्यावर शिक्षण किंवा लग्न यासाठी हा निधी वापरू शकतात.
यासाठी खाते उघडल्यानंतर 15 वर्षे पैसे जमा करावे लागतात. मुलगी 18 वर्षानंतर शिक्षणासाठी पैसे काढू शकते. सरकारची हमी, 8.2% व्याजदर आणि करसवलतीमुळे ही योजना पालकांमध्ये लोकप्रिय आहे.
वाचकांच्या मनातील प्रश्न(FAQ)
1. Sarkari Yojna 2026 मध्ये सर्वात लोकप्रिय सरकारी योजना कोणती आहे?
PM-KISAN, आयुष्मान भारत आणि प्रधानमंत्री आवास योजना या सर्वाधिक लोकप्रिय योजना आहेत.
2. PM-KISAN अंतर्गत किती आर्थिक मदत मिळते?
दरवर्षी ₹6,000 तीन हप्त्यांमध्ये दिले जातात.
3. आयुष्मान भारत योजनेत किती विमा मिळतो?
पात्र कुटुंबांना ₹5 लाखांपर्यंत वार्षिक आरोग्य संरक्षण मिळते.
4. मुद्रा योजनेत किती कर्ज मिळू शकते?
₹50,000 पासून ₹20 लाखांपर्यंत कर्ज मिळू शकते.
5. महिलांसाठी कोणती योजना सर्वात उपयुक्त आहे?
लखपती दीदी योजना, मुद्रा योजना आणि सुकन्या समृद्धी योजना महिलांसाठी विशेष उपयुक्त आहेत.
6. सरकारी योजनांसाठी अर्ज कुठे करावा?
अधिकृत सरकारी पोर्टल किंवा जवळच्या CSC केंद्रामध्ये अर्ज करता येतो.7. PM सूर्य घर योजनेत किती अनुदान मिळते?
सौर पॅनलच्या क्षमतेनुसार केंद्र सरकारकडून अनुदान दिले जाते.
8. प्रधानमंत्री आवास योजनेसाठी कोण पात्र आहे?
ज्यांच्याकडे स्वतःचे पक्के घर नाही आणि योजनेच्या उत्पन्न निकषात बसतात ते पात्र असू शकतात.
9. विश्वकर्मा योजनेत किती कर्ज मिळते?
प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने कमी व्याजदरात कर्ज सुविधा उपलब्ध आहे.
10. सुकन्या समृद्धी योजनेत खाते कोण उघडू शकते?
10 वर्षांखालील मुलीच्या नावाने पालक खाते उघडू शकतात.
11. सरकारी योजनांची पात्रता कशी तपासावी?
अधिकृत पोर्टल किंवा CSC केंद्रात माहिती मिळू शकते.
12. सरकारी योजनेचा लाभ मिळण्यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे का?
बहुतेक योजनांमध्ये आधार क्रमांक आवश्यक असतो.
निष्कर्ष:
Sarkari Yojna 2026 मध्ये केंद्र सरकारच्या विविध योजनांमुळे देशातील कोट्यवधी नागरिकांना आर्थिक, सामाजिक आणि आरोग्यविषयक सुरक्षा मिळत आहे. शेतकरी, महिला, विद्यार्थी, उद्योजक आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी या योजना मोठा आधार ठरत आहेत. योग्य माहिती आणि वेळेवर अर्ज करून प्रत्येक पात्र व्यक्ती या योजनांचा लाभ घेऊ शकते. त्यामुळे आपल्या पात्रतेनुसार योजना निवडून त्याचा लाभ घेणे हे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकते.








