Non-Agricultural Land-आज अनेक जण गुंतवणूक, घर बांधकाम किंवा व्यवसायासाठी जमीन खरेदी करतात. मात्र जमिनीचा झोन आणि कायदेशीर दर्जा तपासला नाही तर लाखो रुपयांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे NA Land आणि तिचे विविध प्रकार समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
आजकाल जमीन खरेदी करणं म्हणजे गुंतवणूक येवढाच विषय राहिलेला नाही, तर खरेदी केलेली जमीन म्हणजे आपल्या भविष्याची सुरक्षितता, व्यवसाय आणि आर्थिक वाढ यांचा दुवा बनली आहे. आपण जेव्हा आपल्या आर्थिक विकासासाठी प्लॉट, घर, दुकान जमीन घेतो त्यावेळी अनेक प्रकार आपल्या समोर येतात त्यामध्ये NA Land, NA Residential, NA Commercial, NA Industrial आणि IT/Corporate zone यांचा समावेश असतो.
जर आपल्याला याविषयी सविस्तर माहिती माहित नसेल तर चुकीची जमीन खरेदी करण्याचा धोकादायक प्रकार आपल्यासोबत होतो. म्हणूनच जमीन खरेदी करण्यापूर्वी ती जमीन कोणत्या प्रकारात मोडते हे समजून घेणे अत्यंत महत्वाचे असते. नाहीतर आपण जमीन घर बांधण्यासाठी घेतली असेल आणि ती commercial zone मध्ये जात असेल किंवा गुंतवणूकीसाठी घेतलेल्या जमिनीला NA परवानगी नसेल तर आपल्याला खूप मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते
- Non-Agricultural Land- Use, Advantages And Rules:
- 1. NA (Non-Agricultural Land):
- 2. NA Residential :
- 3. NA Commercial:
- 4. NA Industrial:
- 5. IT/Corporate Zone:
- NA जमीन खरेदीसाठी आवश्यक कागदपत्रे
- NA Conversion प्रक्रिया:
- NA जमीन खरेदी करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी तपासाव्यात?
- Agricultural Land आणि NA Land मधील फरक
- चुकीची जमीन खरेदी कशी त्रासदायक ठरू शकते?
- NA Land विषयी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
- निष्कर्ष:

Non-Agricultural Land- Use, Advantages And Rules:
अशा आर्थिक नुकसानापासून वाचण्यासाठी आपण जमीन खरेदी करताना NA म्हणजे नेमकं काय, त्याचे प्रकार, उपयोग, फायदे, नियम काय आहेत ते पाहूया.
1. NA (Non-Agricultural Land):
या जमिनीच्या प्रकारामध्ये आपण हिचा वापर शेतीव्यतिरिक बाकी कोणत्याही वापरासाठी करू शकतो.
आपल्या देशात बहुतांश जमीन ही सुरुवातीला कृषी म्हणजेच Agriculture म्हणून नोंदवली जाते. परंतु अशी जमीन जर आपल्याला घर, ऑफिस किंवा इतर कोणत्याही कामासाठी वापरायची असेल तर त्या जमिनीचे रूपांतर Non-Agricultural Land मध्ये करावे लागते. जर जमिनीचे NA Conversion झाले नसेल तर त्यावर केलेले कोणत्याही प्रकारचे बांधकाम हे बेकायदेशीर ठरवले जाते.
जमीन NA असेल तरच आपल्याला बँकेकडून होम लोन मिळते त्याचबरोबर महानगरपालिका किंवा नगरपालिका यांच्याकडून बांधकामाची परवानगी मिळते. आता काही महत्वाच्या महाराष्ट्र शासनाच्या बदलानुसार एखाद्या प्रकल्पासाठी महानगरपालिका /PMRDA बांधकामची अगोदरच मंजुरी मिळाली असेल तर जिल्हाधिकाऱ्यांकडून वेगळी NA परवानगी घेण्याची गरज राहिलेली नाही. तसेच नियम वेळोवेळी बदलू शकतात म्हणून “संबंधित प्राधिकरणाकडून अद्ययावत माहिती तपासावी”.
2. NA Residential :
घर, बंगला, फ्लॅट, सोसायटी अशा निवासी प्रकल्पांसाठी सरकारने मंजूर केलेली जमीन म्हणजे NA Residential.
या प्रकारामध्ये आपल्याला घर बांधण्यासाठी कायदेशीर मंजुरी असल्यामुळे भविष्यात अडचणी येत नाहीत. बँक लोन सहज मिळते. पाणी, वीज यासारख्या सुविधा नगरपालिका किंवा ग्रामपंचायतिकडून मिळवणे सोपे जाते. असे प्लॉट जर शहराजवळ असतील तर पुढे त्यांच्या किंमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता जास्त असते.
जेव्हा NA प्लॉट असतो तेव्हा तो निवासी, व्यवसायिक, औद्योगिक अशा अनेक प्रकारात येतो परंतु तोच जर N. A Residential असेल तर फक्त राहण्यासाठी घरे बांधणे यासाठीच त्याचा वापर होऊ शकतो.
3. NA Commercial:
ज्या जागेवर कायदेशीररित्या व्यावसायिक बांधकाम (जसे की, दुकाने, हॉटेल्स, ऑफिस, मॉल ) बांधण्यासाठी परवानगी असते त्या जागेला NA Commercial म्हटले जाते. शेती किंवा राहत्या घराव्यतिरिक्त ही जागा आपण व्यवसायासाठी देखील वापरू शकतो.
NA Commercial जमीन असेल तर आपण व्यावसायिक बांधकाम करून भाडे स्वरूपात आर्थिक उत्पन्न मिळवू शकतो. अशा जमिनीच्या किमती या लवकर वाढतात कारण बहुतेक commercial zone ह्या मुख्य रस्त्याला लागून किंवा शहराच्या मध्यभागी असतात. अशा जमिनीसाठीचे नियम देखील तितकेच कडक असतात.
4. NA Industrial:
महसूल विभागाकडून कारखाने, गोदाम व इतर औद्योगिक कामांसाठी ज्या जमिनीला परवानगी मिळालेली असते त्याला NA Industrial म्हणतात. या जमिनीवर उद्योग उभारणे पूर्णपणे कायदेशीर असते.
अशी जमीन खरेदी करताना पर्यावरण परवानगी, प्रदूषण नियंत्रण नियम पाळणे, रस्ते आणि वाहतुकीची व्यवस्था, वीज अशा गोष्टी विचारात घेणे आवश्यक असते.
5. IT/Corporate Zone:
शहरांमधील अस राखीव क्षेत्र जिथे तंत्रज्ञान (IT कंपन्या ), कॉर्पोरेट ऑफिस, व्यावसायिक संस्था यांचे बांधकाम करण्यास परवानगी असते त्याला IT/corporate zone म्हणतात. यामध्ये IT पार्क, BPO कंपन्या, स्टार्टअप हब, corporate offices, टेक्नॉलॉजी सेंटर यांचा समावेश असतो. या क्षेत्रामध्ये आपल्या व्यवसाय वाढीसाठी पायाभूत सुविधा आणि आर्थिक सवलती उपलब्ध असतात.
NA जमीन खरेदीसाठी आवश्यक कागदपत्रे
- 7/12 उतारा
- फेरफार नोंद
- NA Order
- झोनिंग प्रमाणपत्र
- मंजूर लेआउट प्लॅन
- मालकी हक्काची कागदपत्रे
- कर भरल्याच्या पावत्या
NA Conversion प्रक्रिया:
शेत जमिनीचे रूपांतर Non-Agricultural Land मध्ये करण्यासाठी सरकारी प्रक्रिया पूर्ण करावी लागते.
त्यामध्ये..
- तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज करणे.
- 7/12 उतारा, फेरफार, मालकी पुरावा, नकाशा यासारख्या कागदपत्रांची पडताळणी करताना मालकी हक्काचे पुरावे दयावे लागतात.
- पडताळणी झाल्यानंतर महसूल विभागाचे अधिकारी जागेची प्रत्यक्ष पाहणी करतात.”
- जर सर्व कागदपत्र आणि अटी पूर्ण असतील तर शेतजमीन NA मध्ये रूपांतरीत करण्याचा चा आदेश दिला जातो.
NA जमीन खरेदी करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी तपासाव्यात?
- जमीन खरंच Non-Agricultural Land आहे का हे तपासावे.
- जमिनीचा झोन कोणता आहे ते पाहणे.
- जमिनीवर कोर्ट केस किंवा कोणताही वाद आहे का हे पाहणे.
- महानगरपालिका किंवा टाऊन प्लॅनिंग विकास आराखडा पाहणे.
- महत्वाची गोष्ट म्हणजे येणाऱ्या काळातील सोयी-सुविधा पाहणे महत्वाचे कारण भविष्यातील जमिनीची किंमत याच गोष्टी ठरवतात.
- जमिनीला कायदेशीर रस्ता (Approach Road) आहे का ते तपासावे.
- संबंधित भागातील FSI/FAR किती आहे ते जाणून घ्यावे.
- प्लॉटिंग प्रकल्प असल्यास तो MahaRERA मध्ये नोंदणीकृत आहे का ते तपासावे.
Agricultural Land आणि NA Land मधील फरक
| मुद्दा | Agricultural Land | NA Land |
|---|---|---|
| वापर | शेती | निवासी/व्यावसायिक/औद्योगिक |
| बांधकाम | मर्यादित | कायदेशीर परवानगी |
| बँक कर्ज | मर्यादित | सहज उपलब्ध |
| सुविधा | कमी | अधिक |
| पुनर्विक्री | तुलनेने कठीण | तुलनेने सोपी |
चुकीची जमीन खरेदी कशी त्रासदायक ठरू शकते?
चुकीची जमीन खरेदी झाली तर बांधकाम परवानगी मिळताना अडचणी येतात. बँकेचे लोन नाकारले जाऊ शकते. सरकारी कारवाई होण्याची शक्यता. ती जमीन विकताना येणाऱ्या अडचणी. मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होऊ शकते.
टीप: NA Conversion चे नियम राज्य सरकार, विकास प्राधिकरण किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेनुसार बदलू शकतात. जमीन खरेदी करण्यापूर्वी अधिकृत कागदपत्रे आणि तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
NA Land विषयी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
1. NA Land म्हणजे काय?
NA (Non-Agricultural) Land म्हणजे शेतीव्यतिरिक्त इतर कामांसाठी वापरण्यास मंजुरी मिळालेली जमीन.
2. NA Land वर घर बांधता येते का?
होय. मात्र जमीन NA Residential झोनमध्ये असणे आवश्यक आहे.
3. शेती जमिनीवर थेट घर बांधता येते का?
साधारणपणे नाही. त्यासाठी NA Conversion प्रक्रिया पूर्ण करावी लागते.
4. NA Land साठी बँक कर्ज मिळते का?
होय. वैध NA मंजुरी असलेल्या जमिनीवर बँक कर्ज मिळण्याची शक्यता जास्त असते.
5. NA Residential आणि NA Commercial मध्ये काय फरक आहे?
NA Residential जमीन निवासी वापरासाठी असते, तर NA Commercial जमीन व्यवसायिक वापरासाठी मंजूर असते.
6. NA Conversion साठी कोणती कागदपत्रे लागतात?
7/12 उतारा, फेरफार नोंद, मालकी पुरावा, नकाशा आणि इतर आवश्यक कागदपत्रे लागतात.
7. जमीन कोणत्या झोनमध्ये आहे हे कसे तपासावे?
महानगरपालिका, नगररचना विभाग (Town Planning) किंवा विकास आराखड्यातून झोन तपासता येतो.
8. चुकीची जमीन खरेदी केल्यास काय नुकसान होऊ शकते?
बांधकाम परवानगी न मिळणे, कर्ज नाकारले जाणे, कायदेशीर वाद आणि आर्थिक नुकसान होऊ शकते.
निष्कर्ष:
आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय म्हणजे मालमत्ता खरेदी करणे. कारण यासाठी आपण आपली कमाई लावणार असतो ती योग्य ठिकाणी लागली तरच त्याचा फायदा आपल्याला होतो. त्यामुळे आपण कोणता झोन खरेदी करतोय आणि आपल्याला कशाची गरज आहे हे पाहणे महत्वाचे ठरते.
त्यामुळे कमी किंमत पाहण्यापेक्षा कायदेशीर गोष्टी तपासून पाहणे अत्यंत महत्वाचे असते. त्यासाठी योग्य सल्ला, आर्थिक नियोजन, कागदपत्रांची योग्य पडताळणी आणि गरजेनुसार योग्य जमीन खरेदी करणे महत्वाचे असते.
जमीन खरेदी करण्याचा विचार करत आहात?
जमिनीचा झोन, NA मंजुरी आणि आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केल्याशिवाय कोणताही व्यवहार करू नका. हा लेख उपयुक्त वाटला असेल तर आपल्या मित्र-परिवारासोबत नक्की शेअर करा.









