Pune Real Estate Market: पुण्यातील भागनिहाय Property Rates आणि Best Areas

Pune Real Estate Market मधील भागनिहाय प्रति चौ.फूट दर, महाग व कमी बजेटचे परिसर, गुंतवणुकीसाठी भाग आणि घर खरेदीपूर्वी तपासायच्या महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या.

Pune real estate market”पुणे तिथे काय उणे” हि म्हण तर सगळ्यांना माहितीच आहे. त्याच पुण्याचा विकास महाराष्ट्रातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक आहे. आयटी कंपन्या, शैक्षणिक संस्था, उद्योग आणि उत्तम जीवनशैली यामुळे देशभरातील अनेक लोक पुण्यात स्थायिक होण्यास प्राधान्य देत आहेत.

पुण्यात घर, फ्लॅट किंवा गुंतवणुकीसाठी मालमत्ता खरेदी करताना सर्वात महत्त्वाच्या प्रश्नांपैकी एक म्हणजे प्रति चौरस फूट दर किती आहे? मात्र केवळ किंमत पाहणे पुरेसे नाही. परिसराची कनेक्टिव्हिटी, रोजगार केंद्रे, मेट्रो, शाळा-रुग्णालये, भाडे मागणी आणि भविष्यातील विकास यांचाही विचार करणे आवश्यक आहे.

पुण्याबरोबरच महाराष्ट्रातील इतर शहरांमध्येही रिअल इस्टेट बाजारात वेगवेगळे बदल दिसून येत आहेत. महाराष्ट्रातील रिअल इस्टेट मार्केट याबद्दल अधिक जाणून घ्या.

या लेखात पुण्यातील विविध भागांतील उपलब्ध अंदाजे property rates, महाग व तुलनेने परवडणारे परिसर, गुंतवणुकीसाठी विचार करता येणारे भाग आणि घर खरेदीपूर्वी तपासायच्या महत्त्वाच्या बाबी समजून घेऊया.

Table Of Contents
  1. Pune real estate market rate:
  2. वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
  3. निष्कर्ष
Pune real estate market

Pune real estate market rate:

खालील दर उपलब्ध market data वर आधारित अंदाजे प्रति चौ.फूट दर आहेत. प्रत्यक्ष किंमत प्रकल्पाचा प्रकार, carpet area, बांधकामाचा दर्जा, floor, amenities, location आणि व्यवहाराच्या वेळेनुसार बदलू शकते. खरेदीपूर्वी स्थानिक बाजारभाव आणि संबंधित प्रकल्पाची अद्ययावत किंमत स्वतंत्रपणे तपासा.

पुण्यातील विविध भागांतील प्रति चौरस फूट दर:

परिसरप्रति चौ. फूट दर (₹)
कल्याणी नगर₹15,183
विमान नगर₹12,114
बाणेर₹11,002
औंध₹10,933
बालेवाडी₹10,288
पाषाण₹10,124
कोथरूड₹10,179
मगरपट्टा सिटी₹9,926
खराडी₹9,552
कर्वे नगर₹9,272
वारजे₹8,050
हडपसर₹7,725
कोंढवा₹7,250
हिंजवडी₹7,207
रावेत₹6,491
ताथवडे₹6,271
वाघोली₹6,135
फुरसुंगी₹5,509
देहू रोड₹4,508
लोणी काळभोर₹4,369
येवलेवाडी₹4,154

या आकडेवारीवरून पुण्यातील property rates मध्ये परिसरानुसार मोठी तफावत दिसते. विमानतळ, IT hubs, प्रमुख रोजगार केंद्रे आणि established residential areas जवळील भागांमध्ये दर तुलनेने जास्त दिसतात, तर शहराच्या बाहेरील किंवा developing corridors मध्ये तुलनेने कमी दर आढळतात. मात्र प्रति चौ.फूट दर हा एकटाच property खरेदीचा निर्णय घेण्यासाठी पुरेसा नाही.

पुण्यातील सर्वात महाग परिसर

High rated Pune real estate market

1. कल्याणी नगर:

कल्याणी नगर हा पुण्यातील उच्चभ्रू आणि प्रीमियम परिसर मानला जातो. येथे उच्च दर्जाचे निवासी प्रकल्प, शॉपिंग मॉल्स, रेस्टॉरंट्स आणि उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी उपलब्ध आहे. इथला प्रति चौ. फूट दर हा अंदाजे  ₹15,183 असून हे ठिकाण विमानतळाजवळ आहे. आयटी आणि व्यावसायिक परिसराशी चांगला  संपर्क या परिसरातून होतो. इथली उच्च दर्जाची जीवनशैली बऱ्याच लोकांना आकर्षित करते. यामुळे गुंतवणूकदार आणि उच्च उत्पन्न गटातील खरेदीदारांचा हा पसंतीचा परिसर आहे.

2. विमान नगर:

विमान नगर हा पुण्यातील अत्यंत विकसित आणि जास्त  मागणी असलेला भाग आहे. प्रति चौ. फूट दर ₹12,114 एवढा असून हे ठिकाण पुणे विमानतळाजवळ आहे.आयटी पार्क आणि व्यावसायिक ठिकाणे देखील इथून जवळ पडतात. मेट्रो आणि रस्त्यांची कनेक्टिव्हिटी चांगली असल्याने लोक या ठिकाणी राहण्यास पसंती देतात. येथील मालमत्तांची किंमत सातत्याने वाढत असल्याचे दिसून येते.

3. बाणेर, औंध आणि बालेवाडी:

पश्चिम पुण्यातील हे तीन भाग आयटी क्षेत्रातील लोकांमध्ये  विशेष लोकप्रिय आहेत. बाणेरमध्ये जागेचा दर हा  ₹11,002 प्रति चौ. फूट  एवढा आहे. तोच औंधमध्ये ₹10,933 प्रति चौ. फूटआणि बालेवाडीमध्ये ₹10,288 प्रति चौ. फूटएवढा आहे. म्हणजे इथला दर थोड्याफार फरकाने सारखाच असल्याचा दिसून येतो.

मुंबई-बंगळुरू महामार्गाजवळ असल्याने या भागांना उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी मिळते. अनेक नवीन प्रकल्प येथे विकसित होत आहेत. त्यामुळे भविष्यात इथली मालमत्ता नक्कीच फायद्याची ट्रस्ट शकते.

आयटी व्यावसायिकांसाठी सर्वोत्तम भाग

Pune real estate market for IT and Corporate.

हिंजवडी हे पुण्याचे सर्वात मोठे आयटी हब आहे. इथला दर हा ₹7,207 प्रति चौ. फूट असून आयटी पार्क, रोजगाराच्या मोठ्या संधी, भाडे उत्पन्नाची चांगली शक्यता असे अनेक फायदे इथल्या मालमत्तेपासून आपल्याला मिळू शकतात.

सध्याच्या घडीला खराडी हा पुण्यातील वेगाने विकसित होणारा आयटी कॉरिडॉर आहे. इथला दर हा ₹9,552 प्रति चौ. फूट असून इथे EON IT Park हे खूप जवळ आहे. सध्या व्यावसायिक इथे ऑफिस, जागा यासाठी मोठी मागणी करत आहेत. गुंतवणुकीसाठी हा परिसर अत्यंत आकर्षक मानला जातो.

मध्यम बजेटमध्ये घर घेण्यासाठी सर्वोत्तम परिसर

Pune real estate market for medium budget.

हडपसर

  • ₹7,725 प्रति चौ. फूट
  • आयटी आणि औद्योगिक क्षेत्राजवळ
  • शाळा, महाविद्यालये, हॉस्पिटल्स उपलब्ध

कोंढवा

  • ₹7,250 प्रति चौ. फूट
  • कुटुंबांसाठी योग्य परिसर
  • अनेक नवीन प्रकल्प

वारजे

  • ₹8,050 प्रति चौ. फूट
  • शहराशी उत्तम संपर्क
  • शांत आणि निवासी वातावरण

हे भाग मध्यम बजेटमध्ये घर खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी उत्तम आहेत.

कमी बजेटमधील घरांचे पर्याय

Affordable Pune real estate market.

रावेत- ₹6,491 प्रति चौ. फूट

 ताथवडे- ₹6,271 प्रति चौ. फूट

वाघोली- ₹6,135 प्रति चौ. फूट

सध्या या भागांमध्ये नवीन टाउनशिप, शैक्षणिक संस्था आणि पायाभूत सुविधांमध्ये मोठी वाढ होत आहे. त्यामुळे भविष्यात इथल्या किंमती वाढण्याची शक्यता आहे.

सर्वात कमी दर असलेले परिसर:

Low rate Pune real estate market.

येवलेवाडी- ₹4,154 प्रति चौ. फूट

लोणी काळभोर- ₹4,369 प्रति चौ. फूट

देहू रोड- ₹4,508 प्रति चौ. फूट

हे भाग बाकीच्यांच्या तुलनेने स्वस्त असून मोठ्या जागेत घर घेऊ किंवा बांधू इच्छिणाऱ्या खरेदीदारांसाठी योग्य पर्याय ठरू शकतात.

गुंतवणुकीसाठी विचार करता येणारे पुण्यातील भाग

एखाद्या भागात भविष्यातील विकासाचा विचार करताना संबंधित विकास आराखडा आणि नियोजन प्राधिकरणाची माहिती तपासणे महत्त्वाचे आहे. पुणे महानगर प्रदेशाशी संबंधित अधिकृत माहिती PMRDA कडून तपासता येते.

जर जागा घेताना  तुमचा उद्देश गुंतवणूक असेल तर पुढील भागांचा विचार करता येईल त्यामध्ये खराडी, हिंजवडी, वाघोली, ताथवडे, रावेत, बाणेर, बालेवाडी या ठिकानांचा समावेश होतो. या भागांमध्ये रोजगाराच्या संधी, पायाभूत सुविधा आणि वाढती लोकसंख्या यामुळे मालमत्तेच्या किंमती वाढण्याची शक्यता जास्त आहे.

पुण्यातील एखादा भाग गुंतवणुकीसाठी निवडण्यापूर्वी rental income, resale demand, location आणि भविष्यातील development यांचा विचार करणे आवश्यक आहे. रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी तपासाव्यात, हेही जाणून घ्या.

कुटुंबासाठी लोकप्रिय निवासी परिसर

कुटुंबासोबत राहण्यासाठी खालील भाग लोकप्रिय आहेत कोथरूड, औंध, बाणेर, कल्याणी नगर, विमान नगर, कर्वे नगर या भागांमध्ये शाळा, हॉस्पिटल्स, बाजारपेठ, उद्याने आणि वाहतूक सुविधा उत्तम आहेत. त्यामुळे तुमचं बजेट इतकं असेल तर हे पर्याय योग्य ठरतील तुमचं स्वतःच घर घेण्यासाठी.

एखाद्या भागात property खरेदी करण्यापूर्वी त्या जमिनीचा वापर कोणत्या प्रकारासाठी मंजूर आहे आणि zoning काय आहे हे तपासणे महत्त्वाचे आहे. यासाठी जमिनीचे प्रकार आणि Zoning याबद्दलची माहिती वाचा.

घर खरेदी करताना लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी:

  • स्वस्त घर मिळत असले तरी परिसरातील सुविधा तपासणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे फक्त दर पाहून घर खरेदी करू नका.
  • मेट्रो, बस, रेल्वे आणि मुख्य रस्त्यांशी संपर्क असणे आवश्यक आहे. त्यासाठी कनेक्टिव्हिटी तपासा.
  • RERA नोंदणीकृत प्रकल्प आणि विश्वासार्ह बिल्डर निवडा.
  • मेट्रो, रिंग रोड, नवीन आयटी पार्क किंवा औद्योगिक प्रकल्प यांचा मालमत्तेच्या किंमतींवर मोठा परिणाम होतो. त्यामुळे भविष्यातील त्या ठिकाणाचा विकास प्रकल्प तपासा.
  • गुंतवणुकीसाठी घर घेत असल्यास भविष्यातील पुनर्विक्री मूल्य आणि भाडे उत्पन्नाचा विचार करा.

पुण्याच्या आसपास plot किंवा जमीन खरेदी करत असल्यास मालकी हक्क आणि जमिनीच्या नोंदी तपासणे आवश्यक आहे. 7/12 उतारा कसा वाचायचा आणि त्यातील माहिती कशी तपासायची, हे आधी समजून घ्या.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

1. पुण्यात घर खरेदी करण्यासाठी कोणता परिसर चांगला आहे?

पुण्यात घर खरेदी करण्यासाठी बाणेर, औंध, कोथरूड, विमान नगर, कर्वे नगर आणि कल्याणी नगर हे लोकप्रिय पर्याय आहेत. मात्र योग्य परिसर निवडताना बजेट, कामाचे ठिकाण, कनेक्टिव्हिटी, शाळा, हॉस्पिटल आणि दैनंदिन गरजा यांचा विचार करणे महत्त्वाचे आहे.

2. पुण्यात रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुकीसाठी कोणते भाग विचारात घ्यावेत?

खराडी, हिंजवडी, वाघोली, ताथवडे, रावेत आणि बालेवाडी यांसारख्या भागांचा गुंतवणुकीसाठी विचार करता येतो. मात्र भविष्यातील किंमतवाढ निश्चित नसल्याने स्थानिक विकासकामे, मागणी, भाडे उत्पन्न आणि पुनर्विक्रीची शक्यता तपासणे आवश्यक आहे.

3. पुण्यातील सर्वात महाग भाग कोणता आहे?

दिलेल्या आकडेवारीनुसार कल्याणी नगर येथे प्रति चौ. फूट दर सर्वाधिक, म्हणजे अंदाजे ₹15,183 आहे. हे दर प्रकल्प, इमारतीचे वय, सुविधा आणि अचूक लोकेशननुसार बदलू शकतात.

4. कमी बजेटमध्ये पुण्यात घर कुठे घेता येऊ शकते?

येवलेवाडी, लोणी काळभोर, देहू रोड आणि फुरसुंगी या भागांमध्ये तुलनेने कमी प्रति चौ. फूट दर दिसतात. मात्र कमी किंमत पाहण्याबरोबरच कनेक्टिव्हिटी, पाणीपुरवठा, वाहतूक आणि भविष्यातील विकास तपासणे आवश्यक आहे.

5. पुण्यात फ्लॅट खरेदी करणे चांगले की प्लॉट?

हा निर्णय तुमच्या उद्दिष्टावर अवलंबून आहे. स्वतः राहण्यासाठी फ्लॅट अधिक सोयीचा ठरू शकतो, तर दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी प्लॉटचा विचार केला जाऊ शकतो. दोन्ही पर्यायांमध्ये लोकेशन, बजेट, कायदेशीर कागदपत्रे आणि भविष्यातील मागणी तपासणे महत्त्वाचे आहे.

6. पुणे मेट्रोचा मालमत्तेच्या किमतींवर परिणाम होतो का?

मेट्रोमुळे काही भागांमध्ये कनेक्टिव्हिटी आणि प्रवासाची सोय सुधारू शकते. त्यामुळे त्या परिसरातील मालमत्तेची मागणी वाढण्याची शक्यता असते. मात्र मेट्रोमुळे किंमत निश्चितपणे वाढेल असे मानून गुंतवणूक करू नये; इतर स्थानिक घटकांचाही अभ्यास करावा.

निष्कर्ष

पुणे रिअल इस्टेट मार्केट हे विविध बजेट आणि गरजांसाठी अनेक पर्याय उपलब्ध करून देते. कल्याणी नगर, विमान नगर, बाणेर आणि औंध यांसारख्या प्रीमियम भागांपासून ते वाघोली, रावेत, ताथवडे आणि देहू रोडसारख्या तुलनेने परवडणाऱ्या भागांपर्यंत खरेदीदारांना वेगवेगळे पर्याय मिळतात.

मात्र फक्त कमी किंवा जास्त प्रति चौ. फूट दर पाहून मालमत्ता खरेदी करणे योग्य नाही. तुमचे बजेट, कामाचे ठिकाण, कनेक्टिव्हिटी, परिसरातील सुविधा, RERA नोंदणी, बिल्डरची विश्वासार्हता आणि भविष्यातील विकास यांचा एकत्रित विचार करणे आवश्यक आहे.

गुंतवणुकीच्या दृष्टीने खराडी, हिंजवडी, वाघोली, ताथवडे, रावेत आणि बालेवाडी यांसारख्या भागांचा अभ्यास करता येतो; मात्र भविष्यातील परतावा निश्चित नसतो. त्यामुळे कोणतीही मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी स्थानिक बाजारभाव आणि कायदेशीर कागदपत्रांची स्वतंत्र पडताळणी करणे महत्त्वाचे आहे.

योग्य परिसर + योग्य किंमत + योग्य कागदपत्रे + दीर्घकालीन नियोजन = अधिक विचारपूर्वक रिअल इस्टेट निर्णय.

टीप: या लेखातील प्रति चौ. फूट दर अंदाजे आहेत. प्रकल्प, इमारत, अचूक लोकेशन, सुविधा आणि बाजारातील बदलांनुसार वास्तविक दर वेगळे असू शकतात.

Related Posts

महाराष्ट्रात Property Registration कसे करावे? घर, फ्लॅट आणि जमीन Registration ची संपूर्ण प्रक्रिया

Property Registration म्हणजे काय, घर किंवा फ्लॅट Registration साठी कोणती कागदपत्रे लागतात, Sale Deed म्हणजे काय, Stamp Duty आणि Registration Fee मध्ये काय फरक आहे, Sub-Registrar Office मध्ये Registration प्रक्रिया…

7/12 उतारा (सातबारा): ऑनलाइन कसा पाहायचा, प्रत्येक नोंद कशी वाचायची आणि जमीन खरेदीपूर्वी काय तपासायचे?

7/12 उतारा म्हणजे काय? सातबारा उतारा ऑनलाइन कसा काढायचा, त्यातील प्रत्येक माहिती कशी समजून घ्यायची, जमीन खरेदीपूर्वी कोणत्या गोष्टी तपासायच्या आणि Property Card, फेरफार नोंद याविषयी संपूर्ण माहिती जाणून घ्या.…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

मोबाईलची Storage Full का होते? फोनची जागा मोकळी करण्याचे 10 सुरक्षित उपाय

मोबाईलची Storage Full का होते? फोनची जागा मोकळी करण्याचे 10 सुरक्षित उपाय

Emergency Fund म्हणजे काय? पगार कितीही असो, किती पैसे बाजूला ठेवावेत?

Emergency Fund म्हणजे काय? पगार कितीही असो, किती पैसे बाजूला ठेवावेत?

महाराष्ट्रात Property Registration कसे करावे? घर, फ्लॅट आणि जमीन Registration ची संपूर्ण प्रक्रिया

महाराष्ट्रात Property Registration कसे करावे? घर, फ्लॅट आणि जमीन Registration ची संपूर्ण प्रक्रिया

केळीच्या प्रमुख जाती कोणत्या? लाल केळी, ब्लू जावा आणि इतर प्रकारांची संपूर्ण माहिती

केळीच्या प्रमुख जाती कोणत्या? लाल केळी, ब्लू जावा आणि इतर प्रकारांची संपूर्ण माहिती

Export Business कसा सुरू करावा? भारतातून माल परदेशात विकण्याची Step-by-Step माहिती

Export Business कसा सुरू करावा? भारतातून माल परदेशात विकण्याची Step-by-Step माहिती

महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे – कोणते विद्यापीठ कोणत्या भागासाठी? संपूर्ण माहिती

महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे – कोणते विद्यापीठ कोणत्या भागासाठी? संपूर्ण माहिती