ते क्षण जगा फोटो नंतर शेअर करा – प्रवासातील खरी शिकवण. Live the moment.

Live the moment – प्रवास हा आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर असा क्षण आहे. प्रवास म्हणजे केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे एवढंच नव्हे, तर प्रवास म्हणजे आपल्याला आयुष्यभर लक्षात राहतील असे क्षण गोळा करणे. निसर्गातील ओलावा, समुद्राच्या लाटा, डोंगरातील थंडावा आणि शहरी रस्त्यावरील गजबज हे सगळं आपण जेव्हा अनुभवतो, तेव्हाच आपण खरा प्रवास जगतो.

परंतु आजच्या काळात प्रवासाशी जोडलेली एक वेगळीच सवय निर्माण झाली आहे, प्रत्येक क्षण लगेच मोबाईलमध्ये  कॅप्चर करणं आणि सोशल मीडियावर पोस्ट करणं. यामुळे अनेकदा काय होत आपण तो वेळ म्हणा किंवा तो क्षण जगायचा अनुभवायचा विसरूनच जातो.

Live the moment

Live the moment-The true lesson of travel.

प्रवास म्हणजे फोटो काढणे??

जेव्हा लोक सोशल मीडियाचा वापर जास्त करत नसत तेव्हाचा प्रवास हा एक प्रकारे मनाला शांतता देणारा अनुभव असायचा. नवीन ठिकाणे आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पूर्वी लोक प्रवास करत असत. त्यांना प्रत्येक क्षण कॅमेरात टीपण्याची घाई नसायची कारण तिथल्या आठवणी या मनात साठवल्या जायच्या. आताची परिस्थिती खूप वेगळी आहे. लोक सतत मोबाईल मध्ये व्यस्त असतात. कुठे थांबायचे, काय खायचे, कुठे फोटो चांगले येतील याकडेच सर्व लक्ष दिले जाते. त्यामुळे प्रत्यक्ष अनुभवापेक्षा “कसे दिसू” हे अधिक महत्वाचे वाटू लागले आहे.

तस पहायला गेलं तर फोटोसुद्धा महत्वाचे आहेत कारण ते आठवणी जपतात. पण त्यापेक्षाही महत्वाचे आहे त्या क्षणात पूर्णपणे स्वतःला झोकून देणं “Live The Moment“. डोंगरावर गेल्यावर तिथं फक्त उभ राहून फोटो काढणं नाही, तर त्या डोंगरावर वाहणाऱ्या वाऱ्याचा स्पर्श अनुभवन यात एक वेगळंच सुख आहे. समुद्रकिनारी बसून स्टेटस लावणं महत्वाचं नाही तर समुद्राच्या लाटांचा आवाज मनात साठवणं हा एक रोमांचक वातावरण निर्माण करण्याचा मार्ग आहे.

सोशल मीडियाचा प्रवासावरील प्रभाव: 

सोशल मीडियाच्या प्रभावामुळे प्रवासाचे रुपच बदलले आहे. अनेक लोक ठिकाण निवडताना तिथे पाहायला काय आहे याच्याऐवजी तिथे फोटो कसे येतील? हा विचार करतात.

सोशल मीडिया आठवणी शेअर करण्यासाठी आहे. परंतु तो जर प्रत्यक्ष अनुभवावर नियंत्रण ठेवतो तेव्हा खरा आनंद हरवून जातो. सोशल मिडियावर लगेच पोस्ट करण्यामागे अजून एक धोका लपलेला असतो तो म्हणजे तुम्ही सध्या कुठे आहात याची माहिती मिळते. त्याचबरोबर अनोळखी लोक तुमच्या हालचालीचा मागोवा घेऊ शकतात. त्यामुळे प्रवास करताना ते क्षण जगा Live the moment आणि परत आल्यावर फोटो पोस्ट करण्यास प्राधान्य द्या.

प्रवासातील वर्तमान क्षणाचे महत्व :

तुम्ही एखाद्या ठिकाणावर सूर्योदय पाहत असताना आभाळामध्ये  होणारे बदल जस की रंगछटा, एक प्रकारची शांतता, थंड हवा हे अनुभवन्याऐवजी व्हिडीओ शूट करत असाल तर, सूर्योदय पाहण्याचा अनुभव अपूर्णच राहतो.

Live the moment मुळे मन शांत राहते, तणाव कमी होतो, निसर्गाशी जवळीक वाढते त्याचबरोबर आठवणी अधिक सुंदर बनतात.

प्रत्येक आठवण कॅमेरात टिपने गरजेचे आहे का?

आपल्या कुटुंबासोबत घेतलेला चहा, मित्र-मैत्रिणींसोबत केलेली मस्ती, समुद्रावरती घालवलेली संध्याकाळ, मंदिरातील शांत अनुभव असे क्षण फोटोमध्ये दिसतात पण त्याच्यामागील भावना त्या कॅमेरात कैद होत नाहीत. कारण काही अनुभव Live the moment हे फोटोपेक्षा महत्वाचे असतात.

प्रवासातून मिळणारी शिकवण:

आपण शहरात राहत असेल पण  कधीतरी आपण आपल्या गावी जातो तेव्हा आपल्याला दिसून येते की कमी प्रमाणातील जीवनावश्यक वस्तूमध्ये देखील अशी निसर्गाच्या सानिध्यात राहणारी लोक खुश असतात.

 वेळेत न पोहचणे, हवामान बदलणे, वाहतूक कोंडी अशा अडचणी प्रवासात येतात. अशा अनेक अडचणीना सामोर गेल्यामुळे आपल्यातील संयम आणि आहे ती परिस्थिती स्वीकारण्याची क्षमता वाढते.

फिरायला गेल्यानंतर वेगवेगळ्या संस्कृती असणारे , भाषा बोलणारे अनेक लोक भेटतात. अशा नवीन लोकांना भेटल्यामुळे आपले विचार बदलतात.

प्रवास हा आपल्याला त्या क्षणांचा आनंद घ्यायला शिकवतो. त्याचबरोबर लोकांशी बोलायला,संस्कृती जाणून घ्यायला, आयुष्यभर टिकणाऱ्या आठवणी गोळा करायला सुद्धा प्रवासच शिकवतो.

डिजिटल डिटॉक्स- प्रवासाची गरज:

डिजिटल डिटॉक्स साठी प्रवास हा सुद्धा एक पर्याय आहे. सतत स्क्रीनसमोर असल्यामुळे शरीराबरोबर मनही थकत. प्रवसात स्क्रीनशी मोबाईल व्यतिरिक्त जास्त असा स्क्रीनशी संबंध येत नाही. Live the moment आपले मानसिक आरोग्यही सुधारते.

फोटो काढूच नका असं नाही!

आठवणी जपण्यासाठी तुम्ही ठराविक फोटो काढा पण त्याचबरोबर ते क्षण सुद्धा तितकेच आनंदाने जगा. काही क्षण हे फक्त स्वतःसाठी असावेत सगळंच सोशल मीडियासाठी नसावं.

“Live The Moment” खरी संपत्ती:

सोशल मीडियापेक्षा मनःशांती महत्वाची त्यासाठी सूर्योदय पहा, समुद्राच्या लाटांचा आवाज ऐका, शांततेचा अनुभव घ्या, कुटुंबासोबत वेळ घालवा.

यावरूनच असं लक्षात येत की हा केवळ प्रवासाचा नाही तर, आयुष्याचा धडा आहे. फोटो नेहमीच काढा, पण ते लगेच पोस्ट करण्याऐवजी अगोदर त्या क्षणाचं सौंदर्य अनुभवा. कारण आठवणींची खरी जादू ही लाईक्स आणि कमेंटमध्ये नाही, तर आपल्या मनाने अनुभवलेल्या क्षणात आहे.

Related Posts

Women After 30 Marathi | प्रत्येक स्त्रीने जाणून घ्याव्यात अशा 10 गोष्टी.  

Women After 30 Marathi – वयाच्या 20 व्या वर्षी आपण स्वतःला शोधत असतो. करिअर, नातेसंबंध, शिक्षण, स्वप्ने आणि समाजाच्या अपेक्षा यामध्ये आपण सतत धावत असतो. पण 30 वर्षानंतरचे आयुष्य हे…

“जितके आनंदाच्या मागे धावाल, तितके रिकामेपण वाढत जाईल !” खरा आनंद कसा मिळवावा?

खरा आनंद कसा मिळवावा? आजच्या जगात प्रत्येकजण आनंद शोधत आहे. सोशल मीडिया उघडला की आनंदी चेहरे दिसतात, यशाच्या कथा दिसतात, प्रवासाचे फोटो दिसतात आणि परिपूर्ण आयुष्य जगणारे लोक दिसतात. हे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

Women After 30 Marathi | प्रत्येक स्त्रीने जाणून घ्याव्यात अशा 10 गोष्टी.  

Women After 30 Marathi | प्रत्येक स्त्रीने जाणून घ्याव्यात अशा 10 गोष्टी.  

ज्वारी की बाजरी: आरोग्यासाठी कोणते धान्य अधिक फायदेशीर?

ज्वारी की बाजरी: आरोग्यासाठी कोणते धान्य अधिक फायदेशीर?

NEET परीक्षा म्हणजे काय? पात्रता, अभ्यासक्रम व परीक्षा पद्धत जाणून घ्या.

NEET परीक्षा म्हणजे काय? पात्रता, अभ्यासक्रम व परीक्षा पद्धत जाणून घ्या.

SSC vs CBSE Board: कोणता बोर्ड निवडावा? विद्यार्थी आणि पालकांसाठी संपूर्ण मार्गदर्शक.

SSC vs CBSE Board: कोणता बोर्ड निवडावा? विद्यार्थी आणि पालकांसाठी संपूर्ण मार्गदर्शक.

“फ्रँचायझी म्हणजे उद्योजकता की फक्त दुसऱ्याचा व्यवसाय चालवणे?”फ्रँचायझी म्हणजे काय?

“फ्रँचायझी म्हणजे उद्योजकता की फक्त दुसऱ्याचा व्यवसाय चालवणे?”फ्रँचायझी म्हणजे काय?

2026 मधील विद्यार्थ्यांसाठी Top AI Tools: नोट्स, प्रेझेंटेशन, कोडिंग आणि अभ्यासासाठी मोफत साधने.

2026 मधील विद्यार्थ्यांसाठी Top AI Tools: नोट्स, प्रेझेंटेशन, कोडिंग आणि अभ्यासासाठी मोफत साधने.