डिजिटल डिटॉक्स का महत्वाचे आहे? स्क्रीन पासून दूर राहिल्याने तुमचे मानसिक आरोग्य कसे सुधारेल? Digital ditox.

Digital ditox – आजच्या जगात तंत्रज्ञान खूप महत्वाचे आहे,परंतु तेच तंत्रज्ञान आपल्या हातात आहे, पण जर तेच आपल्या मनावर राज्य करू लागले तर कुठेतरी थांबणे सुद्धा तितकेच गरजेचे आहे.

आजकालच्या धावपळीच्या जगात म्हणा किंवा आधुनिक/डिजिटल जगात म्हणा मोबाईल, सोशल मीडिया, लॅपटॉप, इंटरनेट या सगळ्याच गोष्टी आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य असा घटक बनल्या आहेत. दैनंदिन कार्य, शिक्षण, मनोरंजन आणि संवाद या सगळ्याच गोष्टी सुरळीत व्हाव्यात म्हणून आपण स्क्रीनसमोर वेळ घालवत असतो. परंतु सततच्या डिजिटल गोष्टीच्या वापरामुळे मानसिक ताण, चिंता, झोपेच्या समस्या, एकाग्रता कमी होणे आणि भावनिक व मानसिक थकवा अशा बऱ्याच समस्या वाढताना दिसत आहेत. मग अशा परिस्थितीत “Digital ditox ” सारख्या संकल्पना खूपच महत्वाच्या वाटतात.

Digital ditox

Digital ditox program:

डिजिटल डिटॉक्स म्हणजे नेमकं काय?

Digital ditox म्हणजे ठराविक काळासाठी संपूर्णपणे स्क्रिनपासून, सोशल मिडीयपासून आणि तांत्रिक उपकरणापासून दूर राहणे. यामुळे आपल्या मनाला शांती मिळते, शरीराबरोबरच मनावरचा ताण देखील कमी होतो. स्क्रीनपासून दिवसातील काही वेळ दूर राहिल्यामुळे आपल्या मेंदूला एक प्रकारची विश्रांती मिळते, झोपेची गुणवत्ताही सुधारते त्याचाच मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होताना आपल्यालाच दिसून येतो. आजच्या धावपळीच्या काळामध्ये मानसिक संतुलन व्यवस्थित ठेवण्यासाठी Digital ditox सारखी संकल्पना एक प्रकारची काळाची गरज बनली आहे.

डिजिटल डिटॉक्स का महत्वाचे आहे?

आजकाल आपण अशा जगात वावरतो जिथे स्क्रिन ही आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक झाली आहे. कामासाठी लॅपटॉप, एकमेकांना संपर्कासाठी मोबाईल आणि मनोरंजनासाठी टीव्ही किंवा सोशल मीडिया. या सगळ्या गोष्टींनी आपले आयुष्य सोप्पे नक्कीच केले आहे, परंतु त्याबरोबरच आपले मन थकवण्याचे कामही सुरु केले आहे. म्हणूनच Digital ditox गरजेचे झाले आहे.

डिजिटल डिटॉक्स मुळे आपल्या आरोग्यावर होणारे फायदे:

1. मन शांत आणि एकाग्र होते:

सततचे येणारे नोटिफिकेशन्स आणि सोशल मीडियाच्या गोंधळापासून शांती मिळते. यामुळेच आपले विचार अधिक स्पष्ट होतात त्याचबरोबर निर्णयक्षमता देखील वाढते.

2. ताणतणाव कमी होतो:

Digital ditox मुळे आपण वास्तवात जगायला शिकतो. दुसऱ्यांच्या परफेक्ट आयुष्याची तुलना  करण्याची सवय हळूहळू कमी होऊन जाते.

3. झोपेची गुणवत्ता सुधारते:

मोबाईल स्क्रिनपासून दूर राहिल्याने आपली झोप ही अधिक शांत होते. त्याचबरोबर आपल्या हार्मोन्समध्ये सुधारणा होते.

4. नात्यांमध्ये सुधारणा:

मेसेजद्वारे होणारे संभाषण कमी करून आपण जेव्हा समोरासमोर भेटतो, बोलतो तेव्हा आपल्यातील भावनिक नातं हे घट्ट होत. थोडा वेळ निसर्गात, स्वतःच्या विचारात घालवल्याने आपल्यातील आत्मविश्वास वाढतो.

डिजीटल डिटॉक्स सुरु करण्यासाठी उपाय:

  • सतत येणारे नोटिफिकेशन बंद करा त्यामुळे आपला मेंदू विचलित होणार नाही.
  • दिवसभरात “नो स्क्रीन टाइम” ठरवा त्याचबरोबर उठल्यानंतर आणि झोपण्यापूर्वी कमीत कमी 30 मिनिटे तरी स्क्रीन पासून दूर रहा.
  • वाचन, योगा, चालणे, एखाद्या निसर्गाशी निगडित गोष्टीत रमणे, तुमचे जे काही छंद असतील ते जोपासा इ. असे केल्याने आपला मेंदू फ्रेश राहतो.
  • एकमेकांशी संवाद आणि हसणे यामुळे मानसिक तणाव दूर होतो त्यासाठी आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवा.

लहान मुलांमध्ये डिजीटल डिटॉक्स चे महत्व :

मुलांमध्ये स्क्रीनचा अतिवापर हा त्यांच्या मानसिक आणि शारीरिक विकासवर परिणाम करू शकतो. हा परिणाम होऊ नये यासाठी मुलांचा स्क्रीनटाईम कमी करणे किंवा त्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. यासाठी मुलांना मैदानी खेळ खेळण्यासाठी उत्सुक करणे, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तक वाचन करणे आणि सगळ्यात गरजेचे म्हणजे पालक आणि मुलांमध्ये हवा असणारा प्रत्यक्ष संवाद यामुळे मुलांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत नक्की होते.

कामकाज आणि डिजिटल संतुलन:

Work From Home आणि ऑनलाइन शिक्षणामुळे स्क्रीन टाइम वाढला आहे. त्यामुळे काम आणि वैयक्तिक जीवन यामध्ये संतुलन राखणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. नियमित ब्रेक घेणे आणि स्क्रीनपासून थोडा वेळ दूर राहणे मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

निष्कर्ष:

मोबाईल,लॅपटॉप यांसारखी डिजिटल साधने आपल्या जीवनामध्ये उपयोगी असली तरी ती आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी तेवढीच धोकादायक ठरु शकतात.Digital ditox सारख्या गोष्टी आपल्या मनाला शांतता देतात,आपला ताण कमी करतात,आपली झोप सुधरवतात आणि करायला आयुष्यातला वास्तविक आनंद देतात.स्क्रीनपासून दूर राहून स्वतः साठी,कुटुंबासाठी आणि आपल्या मानसिक आरोग्यासाठी वेळ देणे ही आजच्या काळाची गरज आहे.योग्य प्रकारे डिजिटल गोष्टीनविषयी संतुलन राखल्यास आपले आयुष्य अधिक निरोगी आणि सकारात्मक बनते.

तंत्रज्ञान आपल्यासाठी बनले आहे आपण त्यासाठी बनलो नाही, त्यामुळेच त्याचे गुलाम होऊ नका. Digital ditox ही एक छोटीशीच पण परिणामकारक कृती आहे, तिच  कृती आत्मसात करणे अत्यंत गरजेचे आहे.

Related Posts

भारतामध्ये झपाट्याने वाढणारे व्यवसाय – भविष्यातील मोठी संधी. New buisness startup ideas in India.

New buisness startup ideas in India – जगात सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक अर्थव्यवस्था ही भारताची आहे. डिजिटल क्षेत्रातील क्रांती, इंटरनेटचा वाढता वापर, बदलती जीवनशैली, स्टार्टअप संस्कृती आणि सरकारच्या…

AI तुमची नोकरी घेणार नाही, पण AI शिकलेली व्यक्ती नक्कीच पुढे जाईल.. 10 प्रमुख AI स्टार्टअप्स. AI startups in india.

AI startups in india-जगभरात सतत काही ना काही तंत्रज्ञान हे विकसित होत असत आणि त्याच विकसनशिलतेनुसार आजच्या digital युगात AI (artificial intelligence) हे सर्वात वेगाने वाढणारे तंत्रज्ञान विकसित झालेले आहे.…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

भारतामध्ये झपाट्याने वाढणारे व्यवसाय – भविष्यातील मोठी संधी. New buisness startup ideas in India.

भारतामध्ये झपाट्याने वाढणारे व्यवसाय – भविष्यातील मोठी संधी. New buisness startup ideas in India.

अष्टविनायक दर्शन शास्त्रशुद्ध पद्धतीने कसे करावे? Ashtvinayak Darshn.

अष्टविनायक दर्शन शास्त्रशुद्ध पद्धतीने कसे करावे? Ashtvinayak Darshn.

बुद्धिबळाचा मोहक इतिहास – प्राचीन चतुरंग ते आधुनिक बुद्धिबळ. History of chess.

बुद्धिबळाचा मोहक इतिहास – प्राचीन चतुरंग ते आधुनिक बुद्धिबळ. History of chess.

विविधतेने नटलेल्या भारताबद्दलची 8 मनोरंजक तथ्य – त्यामध्ये महाराष्ट्रातील एक ! Interesting facts in India.

विविधतेने नटलेल्या भारताबद्दलची 8 मनोरंजक तथ्य – त्यामध्ये महाराष्ट्रातील एक ! Interesting facts in India.

इथे आपण थ्रीलसाठी जातो, जीव गमावण्यासाठी नाही! Adventure activities in India.

इथे आपण थ्रीलसाठी जातो, जीव गमावण्यासाठी नाही! Adventure activities in India.

AI तुमची नोकरी घेणार नाही, पण AI शिकलेली व्यक्ती नक्कीच पुढे जाईल.. 10 प्रमुख AI स्टार्टअप्स. AI startups in india.

AI तुमची नोकरी घेणार नाही, पण AI शिकलेली व्यक्ती नक्कीच पुढे जाईल.. 10 प्रमुख AI स्टार्टअप्स. AI startups in india.