महाराष्ट्रातील ग्रामीण भागात लग्न उशिरा होण्याची अनेक मुख्य कारणे आहेत. Maharshtra rural marriage issues.

Maharshtra rural marriage issues – पूर्वीच्या काळी ग्रामीण भागामध्ये लग्न खूप लवकर केळी जात असत आणि हे खूपच सामान्य मानलं जात असे. परंतु आता बदलत्या जीवनशैलीमुळे ग्रामीण भागातील तरुण-तरुणीचे वय हळूहळू वाढलेली दिसत आहेत. कारण आता ग्रामीण भागातही शिक्षण, करिअर आणि आर्थिक स्थिरतेला महत्व दिल जात आहे. याच बदलामुळे आता लग्न ही फक्त परंपरा राहिली नसून आयुष्याचा एक अतिशय महत्वाचा भाग बनलं आहे. त्यामुळे या बाबतीत विचारपूर्वक निर्णय घेतले जाऊ लागले आहेत.

Maharshtra rural marriage issues

Maharshtra rural marriage issues:

1.शिक्षणाचे वाढलेले महत्व :

ग्रामीण भागात शिक्षणाचे महत्व वाढले आहे त्यामुळे ग्रामीण भागातील तरुण पिढी उच्च शिक्षण घेण्यासाठी आग्रही झालेले आहेत. जोपर्यंत उच्च शिक्षण पूर्ण होत नाही तोपर्यंत अनेकजण लग्नाचा विचार करत नाहीत.खासकरून मुलींमध्ये शिक्षणाबद्दल जागरूकता वाढल्यामुळे लग्नाचे वयही वाढताना दिसत आहे.Maharshtra rural marriage issues.

2.ग्रामीण भागातील मर्यादित रोजगार :

ग्रामीण भागात आवश्यक गरजा भागविण्यासाठी रोजगाराच्या संधी या अतिशय कमी आहेत. याच कारणामुळे तरुण पिढी नोकरीसाठी शहराकडे येते. शहरात आल्यानंतर तिथल्या जीवनशैलिनुसार जोपर्यंत एक आर्थिक स्थिरता मिळत नाही तोपर्यंत तरुणाई लग्नाचा विचार करत नाही आणि त्याच्या जोडीला कौटुंबिक जबाबदारीही असतेच.Maharshtra rural marriage issues.

3. शेतीवर असणारी आर्थिक संकटे:

ग्रामीण भागातील अनेक कुटुंबे ही शेतीवर अवलंबून असतात. अचानक येणारे नैसर्गिक संकट कमी उत्पन्न आणि शेतीच्या कामासाठी घेतलेलं कर्ज यामुळे आर्थिक अडचणी तयार होतात.या कारणामुळे लग्न करण्यासाठी लागणारा आवश्यक खर्च उचलणे कठीण होऊन लग्न पुढे ढकलले जाऊ शकते.Maharshtra rural marriage issues.

4.बदलती सामाजिक मानसिकता :

पूर्वी समाज काय म्हणेल याचा विचार करून लग्न लवकर केळी जात असत परंतु आता ती विचारसरणी राहिलेली नाही. आजकाल स्वतःचे करिअर, स्वप्न याला विशेष महत्व दिले जाते. लग्न हा आयुष्यातला महत्वाचा  निर्णय असल्यामुळे अनुरूप असा जोडीदार मिळेपर्यंत वाट बगण्याची मानसिकता तरुण पिढीने तर बनवली आहे परंतु त्यांचे पालक सुद्धा या गोष्टीचा विचार करू लागले आहेत.Maharshtra rural marriage issues.

5. रोजगाराच्या संधीमुळे होणारे स्थलांतर :

तरुण पिढी शिक्षणासाठी शहराकडे येते, काही वेळा त्या शहरातूनही नोकरी निमित्त दुसऱ्या शहरात, राज्यात किंवा परदेशातही जावे लागते. करिअरसाठी कराव्या लागणाऱ्या या धावपळीमुळेसुद्धा काही वेळा कुटुंबापासून दूर राहावे तर लागतेच आणि लग्नासाठी योग्य वेळ मिळत नाही. त्यामुळे विवाह करण्याचा निर्णय घेण्यास उशीर होतो.Maharshtra rural marriage issues.

6.हुंडा प्रथा व सामाजिक खर्च:

हुंडा प्रथा बंद झाली असली तरी काही ठिकाणी ग्रामीण भागात वस्तूच्या किंवा सोन्याच्या स्वरूपात या गोष्टींची मागणी केळी जाते. काही ग्रामीण भागामध्ये सामाजिक दबावामुळे सुद्धा लग्न मोठे करणे, अनावश्यक असा खूप खर्च करणे या गोष्टी सुरु असतात. यामुळे त्या कुटुंबावर सामाजिक ताण वाढतो मग अशा विचारसरणीचे लोक आर्थिक नियोजन होत नाही तोपर्यत लग्नकार्य पुढे ढकलतात.

7.योग्य जोडीदार न  मिळणे :

आजच्या काळात शिक्षण, नोकरी, स्वभाव, कुटुंबातील मोठ्यांच्या अपेक्षा यामुळे सुद्धा योग्य तो जोडीदार मिळणे कठीण झाले आहे. तरुण पिढी समजूतदारपने निर्णय घेऊ लागली आहे. याचाच  परिणाम लग्न उशिरा होण्याचे प्रमाण वाढले आहे.Maharshtra rural marriage issues.

8. ग्रामीण भागात मुलांची लग्न उशिरा होण्याची मुख्य कारणे:

महाराष्ट्रातील ग्रामीण भागामध्ये अनेक मुलांची लग्ने पूर्वीच्या तुलनेत उशिरा होताना दिसत आहेत. बदलती सामाजिक परिस्थिती, आर्थिक समस्या, शिक्षण आणि रोजगाराच्या संधी यांमुळे विवाहाचे वय वाढत आहे. आजच्या काळात केवळ वय पूर्ण झाले म्हणून लग्न करण्यापेक्षा स्थिर भविष्य आणि आर्थिक सुरक्षिततेला अधिक महत्त्व दिले जात आहे. आज अनेक मुली शिक्षित आणि नोकरी करणाऱ्या मुलांना प्राधान्य देतात. चांगली नोकरी, स्वतःचे घर आणि आर्थिक स्थैर्य या अपेक्षा वाढल्यामुळे योग्य जोडीदार शोधण्यासाठी अधिक वेळ लागतो.Maharshtra rural marriage issues.

9.मोबाईल आणि सोशल मीडियाचा प्रभाव:

इंटरनेट आणि सोशल मीडियामुळे ग्रामीण भागातील तरुणांच्या विचारसरणीत मोठा बदल झाला आहे. आज तरुण पिढी जगभरातील जीवनशैली, करिअर संधी आणि आधुनिक विचार पाहत आहेत.यामुळे त्यांची अपेक्षा आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. अनेकजण आधी स्वतःचे जीवन स्थिर करण्यावर भर देतात आणि नंतर विवाहाचा विचार करतात.Maharshtra rural marriage issues.

यावरूनच लक्षात येते की Maharshtra rural marriage issues उशिरा होण्यामागे शिक्षण, आर्थिक परिस्थिती, बदलती जीवनशैली, सामाजिक विचारसरणी अशा अनेक गोष्टीं जबाबदार आहेत. आजच्या काळात लग्नाकडे एक प्रथा म्हणून पहिले जात नाही तर एक जबाबदारी म्हणून पहिले जाते. बदलत्या काळानुसार ग्रामीण समाजातील लोकही आधुनिक विचारसरनीची झाली असून त्यांच्या वागण्यात, बोलण्यात, राहण्यात एक प्रकारे त्यांच्या आयुष्यातच आधुनिकता आलेली आहे. याचाच परिणाम म्हणून लग्न करण्याची वयोमर्यादा सुद्धा वाढलेली दिसून येत आहेत.

Related Posts

बुद्धिबळाचा मोहक इतिहास – प्राचीन चतुरंग ते आधुनिक बुद्धिबळ. History of chess.

History of chess – आपल्या बुद्धिमतेचा कस लावणारा आणि संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध असणारा खेळ म्हणजे बुद्धिबळ. एका विशिष्ट प्रकारची रणनीती, स्वतःवर असणारा संयम, बुद्धीची एकाग्रता आणि तल्लभ अशी विचारशक्ती या…

विविधतेने नटलेल्या भारताबद्दलची 8 मनोरंजक तथ्य – त्यामध्ये महाराष्ट्रातील एक ! Interesting facts in India.

Interesting facts in India – आपला भारत देश हा संपूर्ण जगातील सर्वात प्राचीन, सांस्कृतिक आणि विविधतेने नटलेला देश आहे. भारतात असणाऱ्या हिमालयाच्या उंच पर्वतरांगांपासून ते समुद्रकिनाऱ्यांपर्यंत, वाळवंटापासून ते हिरव्यागर जंगलानपर्यंत,…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

भारतामध्ये झपाट्याने वाढणारे व्यवसाय – भविष्यातील मोठी संधी. New buisness startup ideas in India.

भारतामध्ये झपाट्याने वाढणारे व्यवसाय – भविष्यातील मोठी संधी. New buisness startup ideas in India.

अष्टविनायक दर्शन शास्त्रशुद्ध पद्धतीने कसे करावे? Ashtvinayak Darshn.

अष्टविनायक दर्शन शास्त्रशुद्ध पद्धतीने कसे करावे? Ashtvinayak Darshn.

बुद्धिबळाचा मोहक इतिहास – प्राचीन चतुरंग ते आधुनिक बुद्धिबळ. History of chess.

बुद्धिबळाचा मोहक इतिहास – प्राचीन चतुरंग ते आधुनिक बुद्धिबळ. History of chess.

विविधतेने नटलेल्या भारताबद्दलची 8 मनोरंजक तथ्य – त्यामध्ये महाराष्ट्रातील एक ! Interesting facts in India.

विविधतेने नटलेल्या भारताबद्दलची 8 मनोरंजक तथ्य – त्यामध्ये महाराष्ट्रातील एक ! Interesting facts in India.

इथे आपण थ्रीलसाठी जातो, जीव गमावण्यासाठी नाही! Adventure activities in India.

इथे आपण थ्रीलसाठी जातो, जीव गमावण्यासाठी नाही! Adventure activities in India.

AI तुमची नोकरी घेणार नाही, पण AI शिकलेली व्यक्ती नक्कीच पुढे जाईल.. 10 प्रमुख AI स्टार्टअप्स. AI startups in india.

AI तुमची नोकरी घेणार नाही, पण AI शिकलेली व्यक्ती नक्कीच पुढे जाईल.. 10 प्रमुख AI स्टार्टअप्स. AI startups in india.