हजारो शतकांपूर्वी बुडालेले जहाज शोधण्याचे काम सुरू, 50 हजार कोटींचा खजिना सापडण्याची शक्यता! Merchant royal ship 1691.

Merchant royal – समुद्र हा अथांग आहे आणि याच अथांग समुद्रामध्ये अनेक रहस्य लपलेली आहेत.हजारो वर्षांपूर्वी बुडालेली जहाजे आणि त्यामध्ये असणारा खजिना यासाठी समुद्र संशोधक आणि ट्रेजर हंटर नेहमी काम करतात. असच एक ऐतिहासिक जहाज पुन्हा चर्चेत आलं आहे.

Merchant royal

Merchant royal:

हजारो शतकांपूर्वी बुडालेले जहाज

The Merchant royal 1691:

Merchant royal हे जहाज एक व्यापरी जहाज होते. 380 वर्षांपूर्वी बुडालेल्या या जहाजमध्ये अनेक प्रकारच्या मौल्यवान वस्तू होत्या.आजच्या किमतीनुसार सुमारे 50 हजार कोटी पेक्षा जास्त किंमत या जहाजमध्ये असणाऱ्या खजिन्याची असू शकते. हे जहाज 1641 या साली डार्टमाऊथच्या वाटेवर होते. त्या काळात हे जहाज स्पेन आणि मेक्सिकोमधून मोठ्या प्रमाणात सोने-चांदी आणि इतर मौल्यवान वस्तू घेऊन प्रवास करत होते.

हे जहाज इंग्लंडकडे परतत असताना खराब हवामानमुळे आणि काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे पाण्यात शिरू लागले आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे cornwall UK या ठिकाणी समुद्राच्या खोल तळाशी हे जहाज कायमचे गायब झाले. त्यासोबतच करोडोचा खजिनाही समुद्रात हरवला.


जहाज बुडण्याशी संबंधित बातम्या आणि चित्रपट तुम्ही पाहिले आणि ऐकले असतील. पण बुडालेल्या जहाजात कोट्यवधी रुपयांचा खजिना शोधण्याच्या उपक्रमाबद्दल कदाचित पहिल्यांदाच आपल्याला कळणार आहे. १७व्या शतकातील इंग्रजी जहाज शोधण्याचे प्रयत्न सुरू असल्याची बातमी आहे.

आजच्या आधुनिक काळामध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नाही. त्यामुळेच गेल्या काही  वर्षात deep sea exploration technology चा वापर करून समुद्राच्या तळाशी लपलेली जहाजे शोधणे सोपे झाले आहे. अशाच काही कंपन्यानी दावा केला आहे कि, या जहाजाचे लोकेशन शोधणे शक्य आहे.त्यानुसारच काही Metalic signal मिळाल्यामुळे historical map आणि records मुळे या जहाजाचा शोध पुन्हा सुरु करण्यात आला आहे.

Metro.co.uk नुसार, इंग्रजी जहाजाचे नाव ‘Merchant royal ‘ होते. जहाजाच्या आत इतक्या गोष्टी असल्याचं सांगण्यात आलं की त्याला ‘एल डोराडो ऑफ द सीज’ असंही म्हटलं जातं. हे जहाज 1641 मध्ये कॉर्नवॉलच्या किनाऱ्यावर बुडाले. यात अब्जावधी पौंड किमतीचे सोने आणि चांदी असल्याचा अंदाज आहे.


अहवालानुसार, यूके कंपनी मल्टीबीम सर्व्हिसेस हरवलेल्या भंगारासाठी ओळखली जाते. हे Merchant royal जहाज शोधण्यासाठी ही कंपनी 200 चौरस मैल परिसरात शोध घेईल. या शोधात पाण्याखालील Merchant royal जहाज आणि सोनार तंत्रज्ञान यांसारखे तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. हा एक ऐतिहासिक शोध असेल, असे या कंपनीचे नेते निगेल हॉज यांचे म्हणणे आहे. तसेच या शोधात काही सापडल्यास तो खजिना हेरिटेज आर्टिफॅक्ट म्हणून गणला जाईल.

असे सांगितले जात आहे की जेव्हा हे जहाज बुडाले तेव्हा त्यात इतके सोने होते की आजचे मूल्य ‘4 अब्ज पौंड’ पर्यंत असू शकते. रुपयात व्यक्त केले तर 52 हजार 215 कोटी रुपये! या जहाजाचे अवशेष बुडल्यानंतर कधीही सापडले नाही. आता ब्रिटनच्या एका कंपनीला विश्वास आहे की ते या जहाजाचे अवशेष नवीन तंत्रज्ञानाने शोधू शकतात.

जर हा खजिना सापडला तर आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठ्या खजिन्यापैकी एक मोठा खजिना ठरवू शकतो. हा खजिना archaeological discovery म्हणून महत्वाचा मानला जाईल. या खजिन्यामुळे अनेक देशांमध्ये मालकी हक्कावरून अनेक वाद  निर्माण होऊ शकतात. अशा शोधामुळे 17 व्या शतकातील समुद्री व्यापार, जहाजबांधणी आणि युरोपियन व्यापार इतिहासाबद्दल नवीन माहिती मिळू शकते. कारण अशा खजिन्यांवर सरकार, शोधमोहीम करणाऱ्या कंपन्या आणि historical authorities असे सर्वजण दावा करू शकतात.

मात्र हे शोधकार्य अजिबात सोपे नाही. समुद्राच्या खोल तळाशी visibility खूप कमी असते. प्रचंड पाण्याचा दाब, समुद्रातील वेगवान प्रवाह आणि शेकडो वर्षांपासून साचलेला गाळ यामुळे जहाज शोधणे अत्यंत कठीण बनते. काही वेळा समुद्रतळावरील नैसर्गिक खडक आणि metallic objects मुळे sonar systems गोंधळात पडतात. त्यामुळे संशोधकांना अचूक location शोधण्यासाठी अनेक वर्षे मेहनत घ्यावी लागू शकते.

अशा ऐतिहासिक गोष्टींविषयी लोकांना नेहमीच आकर्षण राहते. कारण अशा गोष्टींमध्ये रहस्य, इतिहास, अफाट संपत्ती यांचा समावेश असतो. अशा कल्पनाचा लोकांना रोमांचित करतात.  “समुद्राच्या तळाशी अजून काय दडले असेल?” हा प्रश्न अनेकांना आकर्षित करतो. समुद्रातील हरवलेल्या खजिन्यांचे आकर्षण हे केवळ पैशांमुळे नाही, तर त्या मागे दडलेल्या इतिहास, गूढता आणि साहसामुळे आहे. प्रत्येक बुडालेल्या जहाजामध्ये भूतकाळातील एखादी अनोखी कथा दडलेली असते आणि कदाचित म्हणूनच समुद्रातील रहस्ये लोकांना आजही तितकीच मोहून टाकतात.

समुद्रात हरवलेली जहाजे ही केवळ खजिन्याच्या कथा नसून इतिहास, रहस्य आणि साहस यांचे जिवंत प्रतीक आहेत. शेकडो वर्षांपूर्वी समुद्राच्या खोल तळाशी हरवलेले सोने, चांदी आणि मौल्यवान संपत्ती आजही जगभरातील संशोधक आणि treasure hunters यांना आकर्षित करत आहेत. आधुनिक technology मुळे आता अशा जहाजांचा शोध घेणे पूर्वीपेक्षा शक्य वाटत असले, तरी समुद्रातील गूढ रहस्ये उलगडणे अजूनही अत्यंत कठीण आणि धोकादायक काम आहे.

Merchant royal सारख्या जहाजांबद्दल लोकांची उत्सुकता केवळ अब्जावधींच्या खजिन्यामुळे नाही, तर त्या मागे दडलेल्या इतिहासामुळेही आहे. प्रत्येक shipwreck भूतकाळातील एखाद्या मोठ्या घटनेची आठवण करून देतो. जर हा खजिना भविष्यात सापडला, तर तो आर्थिकदृष्ट्या तर महत्त्वाचा ठरेलच, पण इतिहास आणि पुरातत्त्वशास्त्रासाठीही एक मोठी discovery ठरू शकतो.

समुद्राच्या अथांग खोल्यांमध्ये अजून किती रहस्ये दडलेली आहेत हे कोणालाही माहित नाही. कदाचित भविष्यात आणखी अनेक हरवलेली जहाजे आणि खजिने सापडतील. पण तोपर्यंत Merchant royal ची कथा जगातील सर्वात रोमांचक आणि रहस्यमय treasure stories पैकी एक म्हणून कायम लोकांना आकर्षित करत राहील.

  • Related Posts

    बुद्धिबळाचा मोहक इतिहास – प्राचीन चतुरंग ते आधुनिक बुद्धिबळ. History of chess.

    History of chess – आपल्या बुद्धिमतेचा कस लावणारा आणि संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध असणारा खेळ म्हणजे बुद्धिबळ. एका विशिष्ट प्रकारची रणनीती, स्वतःवर असणारा संयम, बुद्धीची एकाग्रता आणि तल्लभ अशी विचारशक्ती या…

    विविधतेने नटलेल्या भारताबद्दलची 8 मनोरंजक तथ्य – त्यामध्ये महाराष्ट्रातील एक ! Interesting facts in India.

    Interesting facts in India – आपला भारत देश हा संपूर्ण जगातील सर्वात प्राचीन, सांस्कृतिक आणि विविधतेने नटलेला देश आहे. भारतात असणाऱ्या हिमालयाच्या उंच पर्वतरांगांपासून ते समुद्रकिनाऱ्यांपर्यंत, वाळवंटापासून ते हिरव्यागर जंगलानपर्यंत,…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    भारतामध्ये झपाट्याने वाढणारे व्यवसाय – भविष्यातील मोठी संधी. New buisness startup ideas in India.

    भारतामध्ये झपाट्याने वाढणारे व्यवसाय – भविष्यातील मोठी संधी. New buisness startup ideas in India.

    अष्टविनायक दर्शन शास्त्रशुद्ध पद्धतीने कसे करावे? Ashtvinayak Darshn.

    अष्टविनायक दर्शन शास्त्रशुद्ध पद्धतीने कसे करावे? Ashtvinayak Darshn.

    बुद्धिबळाचा मोहक इतिहास – प्राचीन चतुरंग ते आधुनिक बुद्धिबळ. History of chess.

    बुद्धिबळाचा मोहक इतिहास – प्राचीन चतुरंग ते आधुनिक बुद्धिबळ. History of chess.

    विविधतेने नटलेल्या भारताबद्दलची 8 मनोरंजक तथ्य – त्यामध्ये महाराष्ट्रातील एक ! Interesting facts in India.

    विविधतेने नटलेल्या भारताबद्दलची 8 मनोरंजक तथ्य – त्यामध्ये महाराष्ट्रातील एक ! Interesting facts in India.

    इथे आपण थ्रीलसाठी जातो, जीव गमावण्यासाठी नाही! Adventure activities in India.

    इथे आपण थ्रीलसाठी जातो, जीव गमावण्यासाठी नाही! Adventure activities in India.

    AI तुमची नोकरी घेणार नाही, पण AI शिकलेली व्यक्ती नक्कीच पुढे जाईल.. 10 प्रमुख AI स्टार्टअप्स. AI startups in india.

    AI तुमची नोकरी घेणार नाही, पण AI शिकलेली व्यक्ती नक्कीच पुढे जाईल.. 10 प्रमुख AI स्टार्टअप्स. AI startups in india.