ते क्षण जगा फोटो नंतर शेअर करा – प्रवासातील खरी शिकवण

प्रवास हा आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर असा क्षण आहे. प्रवास म्हणजे केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे एवढंच नव्हे, तर प्रवास म्हणजे आपल्याला आयुष्यभर लक्षात राहतील असे क्षण गोळा करणे. निसर्गातील ओलावा, समुद्राच्या लाटा, डोंगरातील थंडावा आणि शहरी रस्त्यावरील गजबज हे सगळं आपण जेव्हा अनुभवतो, तेव्हाच आपण खरा प्रवास जगतो.

परंतु आजच्या काळात प्रवासाशी जोडलेली एक वेगळीच सवय निर्माण झाली आहे, प्रत्येक क्षण लगेच मोबाईलमध्ये  कॅप्चर करणं आणि सोशल मीडियावर पोस्ट करणं. यामुळे अनेकदा काय होत आपण तो वेळ म्हणा किंवा तो क्षण जगायचा अनुभवायचा विसरूनच जातो.

तस पहायला गेलं तर फोटोसुद्धा महत्वाचे आहेत कारण ते आठवणी जपतात. पण त्यापेक्षाही महत्वाचे आहे त्या क्षणात पूर्णपणे स्वतःला झोकून देणं.डोंगरावर गेल्यावर तिथं फक्त उभ राहून फोटो काढणं नाही, तर त्या डोंगरावर वाहणाऱ्या वाऱ्याचा स्पर्श अनुभवन यात एक वेगळंच सुख आहे. समुद्रकिनारी बसून स्टेटस लावणं महत्वाचं नाही तर समुद्राच्या लाटांचा आवाज मनात साठवणं हा एक रोमांचक वातावरण निर्माण करण्याचा मार्ग आहे.

सोशल मिडियावर लगेच पोस्ट करण्यामागे अजून एक धोका लपलेला असतो तो म्हणजे तुम्ही सध्या कुठे आहात याची माहिती मिळते. त्याचबरोबर अनोळखी लोक तुमच्या हालचालीचा मागोवा घेऊ शकतात. त्यामुळे प्रवास करताना ते क्षण जगा आणि परत आल्यावर फोटो पोस्ट करण्यास प्राधान्य द्या.

प्रवास हा आपल्याला त्या क्षणांचा आनंद घ्यायला शिकवतो. त्याचबरोबर लोकांशी बोलायला,संस्कृती जाणून घ्यायला, आयुष्यभर टिकणाऱ्या आठवणी गोळा करायला सुद्धा प्रवासच शिकवतो.

यावरूनच असं लक्षात येत की हा केवळ प्रवासाचा नाही तर, आयुष्याचा धडा आहे. फोटो नेहमीच काढा, पण ते लगेच पोस्ट करण्याऐवजी अगोदर त्या क्षणाचं सौंदर्य अनुभवा. कारण आठवणींची खरी जादू ही लाईक्स आणि कमेंटमध्ये नाही, तर आपल्या मनाने अनुभवलेल्या क्षणात आहे.

Related Posts

विविधतेने नटलेल्या भारताबद्दलची 8 मनोरंजक तथ्य – त्यामध्ये महाराष्ट्रातील एक ! Interesting facts in India.

Interesting facts in India – आपला भारत देश हा संपूर्ण जगातील सर्वात प्राचीन, सांस्कृतिक आणि विविधतेने नटलेला देश आहे. भारतात असणाऱ्या हिमालयाच्या उंच पर्वतरांगांपासून ते समुद्रकिनाऱ्यांपर्यंत, वाळवंटापासून ते हिरव्यागर जंगलानपर्यंत,…

उन्हाळ्यात त्वचा चमकदार ठेवण्यासाठी २० प्रभावी आणि सोपे उपाय.Summer skincare routine.

Summer skincare routine-उन्हाळा आला की त्वचेच्या समस्या वाढायला सुरुवात होते. कडक ऊन, घाम, धूळ आणि प्रदूषण यामुळे त्वचा कोरडी, तेलकट, निस्तेज किंवा टॅन झालेली दिसू लागते. विशेषतः महिलांसाठी त्वचेची योग्य…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

भारतामध्ये झपाट्याने वाढणारे व्यवसाय – भविष्यातील मोठी संधी. New buisness startup ideas in India.

भारतामध्ये झपाट्याने वाढणारे व्यवसाय – भविष्यातील मोठी संधी. New buisness startup ideas in India.

अष्टविनायक दर्शन शास्त्रशुद्ध पद्धतीने कसे करावे? Ashtvinayak Darshn.

अष्टविनायक दर्शन शास्त्रशुद्ध पद्धतीने कसे करावे? Ashtvinayak Darshn.

बुद्धिबळाचा मोहक इतिहास – प्राचीन चतुरंग ते आधुनिक बुद्धिबळ. History of chess.

बुद्धिबळाचा मोहक इतिहास – प्राचीन चतुरंग ते आधुनिक बुद्धिबळ. History of chess.

विविधतेने नटलेल्या भारताबद्दलची 8 मनोरंजक तथ्य – त्यामध्ये महाराष्ट्रातील एक ! Interesting facts in India.

विविधतेने नटलेल्या भारताबद्दलची 8 मनोरंजक तथ्य – त्यामध्ये महाराष्ट्रातील एक ! Interesting facts in India.

इथे आपण थ्रीलसाठी जातो, जीव गमावण्यासाठी नाही! Adventure activities in India.

इथे आपण थ्रीलसाठी जातो, जीव गमावण्यासाठी नाही! Adventure activities in India.

AI तुमची नोकरी घेणार नाही, पण AI शिकलेली व्यक्ती नक्कीच पुढे जाईल.. 10 प्रमुख AI स्टार्टअप्स. AI startups in india.

AI तुमची नोकरी घेणार नाही, पण AI शिकलेली व्यक्ती नक्कीच पुढे जाईल.. 10 प्रमुख AI स्टार्टअप्स. AI startups in india.