तुमच्या डोळ्यांचा रंग हा केवळ योगायोग नाही तर तुमच्या जणूकांनी लिहलेली एक कहाणी आहे.

तुम्ही कधी आरशात स्वतःला बघताना विचार केला आहे का – तुमच्या डोळ्यांचा रंग हाच का आहे? आपल्या डोळ्यांचा रंग हा केवळ एक योगायोग नसून तो आपल्या जनुकांच्या (genes) सुंदर संगतीचा परिणाम आहे.चला तर मग पाहूया या मागची कहाणी….

डोळ्यांचा रंग म्हणजे नेमक काय??

आपल्या डोळ्यांचा रंग ठरवला जातो तो आपल्या डोळ्यामध्ये असणाऱ्या आईरीस (Iris) नावाच्या भागामुळे. याच आयरीस मध्ये असणाऱ्या मेलानिन (Melanin) द्रव्याच्या प्रमाणावर आपल्या डोळ्यांचे रंग ठरतात. जर आपल्या डोळ्यात जास्त मेलानिन असेल तर आपले डोळे हे गडद असतात म्हणजेच काळे किंवा तपकिरी रंगाचे. आणि तेच मेलानिन कमी प्रमाणात असेल तर आपले डोळे हे हलक्या रंगाचे म्हणजेच निळे किंवा हिरवे असतात.

जनुकांमुळे डोळ्यांचा रंग कसा ठरवला जातो?

प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात आईकडून आणि वडिलांकडून आलेले गुणधर्म असतात. जनुक सुद्धा दोन प्रकारचे असतात – OCA2 जनुक आणि HERC2 जनुक. OCA2 जनुक हे मेलानिनचे प्रमाण नियंत्रणात ठेवते तर HERC2 जनुक हे OCA2 जनुकांवर नियंत्रण ठेवते आणि निळा किंवा तपकिरी  रंग ठरवते. या दोन जनुकांच्या संयोगामुळेच प्रत्येक व्यक्तीच्या डोळयांचा रंग वेगळा बनतो.

डोळ्यांच्या रंगामागील आश्चर्यकारक तथ्य:

शास्त्रज्ञांच्या मते ज्या लोकांचे डोळे निळे असतात ते सर्व लोक हे एकाच पूर्वजाशी जोडलेले असतात. काही लोकांच्या दोन्हीही डोळ्यांचा रंग हा वेगळा असतो त्या लोकांमध्ये हेटरोक्रोमिया (Heterocromia) नावाची स्थिती असते. वयोमानानुसार किंवा प्रकाशतील बदलामुळे डोळ्यांचा रंग हा किंचित हलका किंवा गडद होऊ शकतो.

यावरूनच आपल्या डोळ्याचा रंग हा काही फक्त सौंदर्याचा भाग नाही हे लक्षात येते. या रंगाच्या मागे आपल्या पूर्वज्यांच्या अस्तित्वाची ओळख दडलेली आहे. म्हणून जेव्हा केव्हा आपण आरशात पाहू तेव्हा हे लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्या डोळ्यात आपला संपूर्ण वंशवृक्ष दडलेला आहे.

Related Posts

बुद्धिबळाचा मोहक इतिहास – प्राचीन चतुरंग ते आधुनिक बुद्धिबळ. History of chess.

History of chess – आपल्या बुद्धिमतेचा कस लावणारा आणि संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध असणारा खेळ म्हणजे बुद्धिबळ. एका विशिष्ट प्रकारची रणनीती, स्वतःवर असणारा संयम, बुद्धीची एकाग्रता आणि तल्लभ अशी विचारशक्ती या…

विविधतेने नटलेल्या भारताबद्दलची 8 मनोरंजक तथ्य – त्यामध्ये महाराष्ट्रातील एक ! Interesting facts in India.

Interesting facts in India – आपला भारत देश हा संपूर्ण जगातील सर्वात प्राचीन, सांस्कृतिक आणि विविधतेने नटलेला देश आहे. भारतात असणाऱ्या हिमालयाच्या उंच पर्वतरांगांपासून ते समुद्रकिनाऱ्यांपर्यंत, वाळवंटापासून ते हिरव्यागर जंगलानपर्यंत,…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

भारतामध्ये झपाट्याने वाढणारे व्यवसाय – भविष्यातील मोठी संधी. New buisness startup ideas in India.

भारतामध्ये झपाट्याने वाढणारे व्यवसाय – भविष्यातील मोठी संधी. New buisness startup ideas in India.

अष्टविनायक दर्शन शास्त्रशुद्ध पद्धतीने कसे करावे? Ashtvinayak Darshn.

अष्टविनायक दर्शन शास्त्रशुद्ध पद्धतीने कसे करावे? Ashtvinayak Darshn.

बुद्धिबळाचा मोहक इतिहास – प्राचीन चतुरंग ते आधुनिक बुद्धिबळ. History of chess.

बुद्धिबळाचा मोहक इतिहास – प्राचीन चतुरंग ते आधुनिक बुद्धिबळ. History of chess.

विविधतेने नटलेल्या भारताबद्दलची 8 मनोरंजक तथ्य – त्यामध्ये महाराष्ट्रातील एक ! Interesting facts in India.

विविधतेने नटलेल्या भारताबद्दलची 8 मनोरंजक तथ्य – त्यामध्ये महाराष्ट्रातील एक ! Interesting facts in India.

इथे आपण थ्रीलसाठी जातो, जीव गमावण्यासाठी नाही! Adventure activities in India.

इथे आपण थ्रीलसाठी जातो, जीव गमावण्यासाठी नाही! Adventure activities in India.

AI तुमची नोकरी घेणार नाही, पण AI शिकलेली व्यक्ती नक्कीच पुढे जाईल.. 10 प्रमुख AI स्टार्टअप्स. AI startups in india.

AI तुमची नोकरी घेणार नाही, पण AI शिकलेली व्यक्ती नक्कीच पुढे जाईल.. 10 प्रमुख AI स्टार्टअप्स. AI startups in india.