Why school bus colour is yellow? – आपण दररोज बघतो शाळांच्या बसेस ह्या पिवळ्या रंगांच्याच असतात.रस्त्याने कुठेही पिवळ्या रंगाची गाडी किंवा बस दिसली की आपल्याला लगेच लक्षात येते की ही शाळेचीच बस आहे. पिवळा रंग फक्त आकर्षक दिसतो म्हणून शाळेच्या बसेससाठी निवडला नाही तर त्यामगे विदयार्थ्यांच्या सुरक्षिततेबरोबर काही वैज्ञानिक आणि व्यवहारिक कारणे आहेत. शाळेच्या बसेसच्या बाबतीत रंगाची निवड ही सौंदर्यापेक्षा सुरक्षेला केंद्रस्थानी ठेवून करण्यात आली आहे.

Why school bus colour is yellow?
परंतु तुम्ही कधी विचार केलाय का की हाच रंग का? परंतु यामागे एक महत्वाचे कारणही आहे, तर चला पाहूया ते कारण काय आहे.Why school bus colour is yellow?
लक्ष वेधून घेणारा रंग:
Why school bus colour is yellow?
पिवळा रंग हा आकर्षित आहे. जास्त करून ‘क्रोम – येलो ‘हा शेड शाळेच्या बसेससाठी वापरला जातो. तो सकाळी धुक्यात,पावसात आणि तिन्ही सांजेला बाकीच्या रंगापेक्षा अधिक उठून दिसतो. मनुष्याचे डोळे हे बाकीच्या रंगांपेक्षा पिवळा रंग पटकन ओळखतात. कोणत्याही रस्त्यावर जर वाहतूक कोंडी किंवा गर्दी झाली असेल तर शाळेची बस पटकन ओळखता यावी,यासाठी हा रंग उपयोगी ठरतो.
सुरक्षितता:
आजच्या काळात विद्यार्त्यांची सुरक्षितता खूप महत्वाची आहे. पिवळ्या रंगाची बस म्हटली की ती शाळेचीच आहे हे सहजपणे ओळखले जाते. त्याचाच परिणाम असा होतो की बाकीचे वाहnचालक आपला वेग कमी करतात किंवा सुरक्षित अंतर ठेवतात. पिवळी बस पटकन दिसल्यामुळे अपघातांची शक्यता कमी होते. अमेरिकेत दररोज 2.5 कोटी विद्यार्थी शाळेच्या बसने प्रवास करतात. शाळेची बस हा सर्वात सुरक्षित वाहतुकीच्या प्रकारांपैकी एक मानला जातो.
वैज्ञानिक कारण :
Why school bus colour is yellow?
प्रत्येक रंगाची एक विशिष्ट तरंगलांबी (Wavelength) असते. पिवळ्या रंगाची wavelenghth अशी असते की ती मानवी डोळ्यांना अधिक स्पष्ट दिसते हा वैज्ञानिकांचा दृष्टिकोन आहे. दुसऱ्या गाड्या चालवणारा वाहचालक शाळेच्या बसकडे न पाहता सुद्धा ओळखू शकतो किंवा त्याला जाणीव होते की आपल्या आजूबाजूला शाळेची बस आहे कारण माणसाच्या peripheral vision मुळे म्हणजेच बाजूच्या दृष्टीमुळे पिवळा रंग सहज ओळखता येतो. हीच गोष्ट अपघात टाळण्यासाठी महत्त्वाची ठरते.
मानसशास्त्रीय कारणं:
Why school bus colour is yellow?
पिवळा रंग हा आनंद, उत्साह, सकारात्मकता आणि एक प्रकारची ऊर्जा दर्शवतो. लहान मुलांसाठी हा रंग आकर्षक आणि आनंद देणारा असतो. त्यामुळे शाळेमध्ये जाण्यासाठी त्यांच्या मनामध्ये एक प्रकारचे आकर्षण तयार होते, असं मानसशास्त्र सांगत.
नियम :
Why school bus colour is yellow?
शाळेच्या बसेसला बसवर “School Bus” स्पष्ट लिहिलेलं असावं, चालकाची विशेष पडताळणी झालेली असावी, आपत्कालीन दरवाजा, बसमध्ये फर्स्ट एड बॉक्स, अग्निशमक यंत्र, सिसिटीव्ही, जिपीएस ट्रॅकिंग अशा सुविधा असणे बंधनकारक आहे. हे नियम पाळणे वाहनचालकांसोबत शाळेचेही कर्तव्य आहे. पालकांनी देखील अशा नियमांच पालन केले जात आहे का यावरती लक्ष दिले पाहिजे.
परंपरा:
Why school bus colour is yellow?
पूर्वी विद्यार्थ्यांना शाळेत नेण्यासाठी साध्या गाड्या किंवा घोडागाड्यांचा वापर केला जात असे. असा इतिहास सांगतो की शाळेच्या बसेसना पिवळा रंग देण्याची परंपरा ही 1939 साली अमेरिकेमध्ये सुरु पहिल्यांदाच करण्यात आली. या रंगाला “National School Bus Chrome” असं नाव देण्यात आलं. त्यानंतर हा रंग जगभर प्रसिद्ध झाला. 1939 साली अमेरिकेतील Columbia University येथे शिक्षण आणि वाहतूक तज्ज्ञांची एक मोठी परिषद आयोजित करण्यात आली. त्यामध्ये असा निर्णय घेण्यात आला की शाळेच्या वाहतूकसाठी जी काही वाहने वापरली जातील त्यांचा रंग हा पिवळा असावा. त्यानंतरच हा रंग सर्वात उपयोगी आणि सोपा मार्ग म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वीकारला गेला.
स्पष्टपणा:
Why school bus colour is yellow?
पिवळ्या रंगावर काळ्या रंगाची अक्षरे ही अतिशय स्पष्ट दिसतात. या कारणामुळेच बसवर लिहलेला ‘School Bus ‘ हा शब्द दुरूनही वाचला जातो. परिणामी लोक समजून जातात की आपल्याला पुढे जे वाहन आहे ते शाळेच्या मुलांचं आहे.
सामाजिक प्रभाव:
Why school bus colour is yellow?
पिवळ्या शाळेच्या बसेस समाजात एक वेगळी ओळख निर्माण करतात. रस्त्यावर पिवळी बस दिसली की, लोक वेग कमी करतात, वाहनचालक अधिक सावध होतात, मुलांच्या सुरक्षिततेची जाणीव होते.
परिणाम:
Why school bus colour is yellow?
हा रंग आनंद, चेतना, उत्साह व सकारात्मकतेचा प्रतीक मानला जातो. लहान मुलांना हा रंग आकर्षित करतो. त्यामुळं या रंगाच्या बसकडे बघून त्यांना जी भीती वाटते ती नाहीशी होऊन आपलेपणाची एक भावना निर्माण होते.
निष्कर्ष:
यावरून हे लक्षात येते की शाळेच्या बसेसचा रंग पिवळा असण्यामागे वैज्ञानिक, सुरक्षितता आणि मानसिक विचार आहे. त्यामुळेच तो इतक्या वर्षांपासुन टिकून आहे. आज पिवळी शाळेची बस ही फक्त विद्यार्थ्यांना शाळेत नेणारी गाडी नाही, तर ती सुरक्षिततेचं, विश्वासाचं आणि जबाबदारीचं प्रतीक बनली आहे. रस्त्यावरून धावणारी प्रत्येक पिवळी बस समाजाला एक महत्त्वाचा संदेश देते — “इथे मुलांची सुरक्षा सर्वात महत्त्वाची आहे.”









