Muscle Power Grading म्हणजे काय? वयानुसार स्नायूंची ताकद कमी होण्याची कारणे आणि उपाय

Muscle Power Grading म्हणजे काय? वयानुसार स्नायूंची ताकद कमी होण्याची कारणे, लक्षणे, MRC Scale, योग्य आहार, व्यायाम आणि प्रभावी उपाय जाणून घ्या.

वयानुसार स्नायूंची ताकद कमी होणे ही नैसर्गिक प्रक्रिया असली तरी प्रत्येक व्यक्तीमध्ये त्याची तीव्रता वेगळी असते. डॉक्टर किंवा फिजिओथेरपिस्ट स्नायूंची ताकद मोजण्यासाठी Muscle Power Grading (MRC Scale) वापरतात. यामुळे स्नायू किती सक्षम आहेत आणि उपचारांची गरज किती आहे हे समजण्यास मदत होते.

वाढत्या वयानुसार आपल्या शरीरात अनेक बदल होतात जसे की, त्वचेवर सुरकुत्या येणे, चयापचय (metabolism) मंदावणे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्नायुंची ताकद कमी होणे. ही एक नैसर्गिक प्रक्रिया जरी असली तरी ती आपण थोड्याफार प्रमाणात बदलू शकतो.

स्नायू मजबूत ठेवण्यासाठी नियमित व्यायामाबरोबरच संतुलित आहारही तितकाच महत्त्वाचा आहे. प्रथिने आणि कॅल्शियमयुक्त पदार्थांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आमचा दह्याचे आरोग्यासाठी 10 फायदे हा लेख नक्की वाचा.

 त्यासाठी आपण योग्य जीवनशैली, सकस आहार आणि पूरक असा व्यायाम यांच्या मदतीने आपण स्नायूची ताकद परत मिळवू शकतो आणि आपल्या जीवनात सक्रिय राहू शकतो.

Muscle Power Grading

Muscle Power Grading म्हणजे काय?

Muscle Power Grading म्हणजे स्नायू किती ताकदीने कार्य करतात हे मोजण्याची एक वैद्यकीय पद्धत आहे. डॉक्टर किंवा फिजिओथेरपिस्ट हाताने प्रतिकार (Resistance) देऊन स्नायूंची ताकद तपासतात. यासाठी सर्वाधिक वापरली जाणारी पद्धत म्हणजे Medical Research Council (MRC) Scale.

कोणाला Muscle Power Grading करण्याची गरज असते?

  • स्ट्रोक झालेल्या रुग्णांना
  • मज्जातंतू (Nerve) संबंधित आजार असणाऱ्यांना
  • स्पायनल कॉर्ड इजा झालेल्या व्यक्तींना
  • दीर्घकाळ बेडरेस्ट असलेल्या रुग्णांना
  • वृद्ध व्यक्तींना
  • मोठ्या शस्त्रक्रियेनंतर
  • फिजिओथेरपी सुरू करण्यापूर्वी व नंतर

Muscle power कमी होण्यामागची कारणे : 

जसजस वय वाढत तसतस आपल्या शरीरातील स्नायूचे प्रमाण हळूहळू कमी होत. याच क्रियेला Sarcopenia म्हणतात.

1. शरीरातील हार्मोन्समध्ये होणारे बदल.

2. स्नायूच्या पेशिंची वाढ किंवा नवीन पेशी निर्माण होण्याची गती मंदावणे.

3. शरीराची हालचाल कमी होणे.

4. प्रथिनांचे सेवन अपुरे राहणे.

 या कारणांनी शरीरातील स्नायूचे प्रमाण(muscle mass) कमी होऊ लागते.

स्नायू कमकुवत होण्याची नेमकी लक्षणे काय आहेत:

1. सतत थकल्यासारखे वाटत राहते.

2.जड वजन उचलता येत नाही.

3.चालण्याचा वेग मंदावतो.

4.चालताना वारंवार पडतो.

अशी लक्षणें दिसूनही दुर्लक्ष केले गेले तर काही गंभीर समस्या उद्भवतात.

स्नायू मजबुतीसाठी चांगला आहार घेणे:

1. दूध, दही, पनीर, डाळी, कडधान्य, अंडी, मासे अशे pra प्रथिनयुक्त पदार्थ पुरेशा प्रमाणत रोजच्या जेवणात घेणे स्नायूच्या वाढीसाठी आवश्यक असते.

2. ज्या आहारातून आपल्याला vitamin D, calcium आणि Vitamin B12 मिळते असा आहार घेणे.

3.For Muscle power पाणी सुद्धा तितकेच महत्वाचे आहे जर शरीरात पाण्याची कमतरता असेल तर स्नायूमध्ये थकवा त्याचबरोबर आकडी येण्याची सुद्धा शक्यता असते.

स्नायूच्या ताकदीसाठी व्यायाम हा एक प्रभावी मार्ग आहे:

1.स्कॅट्स, पुश-अप असे व्यायाम हे स्नायूना मजबूत करतात.

2.दररोज चालणे, सायकलिंग करणे, पोहणे असे व्यायाम केल्यास आपली सहनशक्ती वाढते.

3.शरीराची लवचिकता वाढविण्यासाठी थोडंसं स्ट्रेचिंग आणि योगासणे करणे देखील फायदेशीर ठरते.

पुरेशी झोप घेणे निरोगी जीवनासाठी प्रभावी आहे:

झोप ही आपल्या शरीराच्या पुनर्बांधणीसाठी म्हणत्वाची असते. पुरेशी झोप घेतल्याने शरीरातील ऊर्जेची पातळी वाढते. आपले हार्मोन्स संतुलित राहतात. त्यासाठी दररोज 7-8 तास झोप घेणे महत्वाचे आहे.

स्नायूच्या ताकदीसाठी (Muscle power ) मानसिकरित्या सक्षम असणे देखील महत्वाचे आहे:

सतत चिंता, ताण याचा आपल्या शरीरावर गंभीर परिणाम होतो म्हणूनच रोज थोडंसं मेडिटेशन, प्राणायाम आणि पॉसिटीव्ह विचार करणं गरजेचं आहे.

सक्रिय जीवनशैलीचे महत्व:

Use it or lose it हा नियम लक्षात घेऊन आपण जीवन जगल पाहिजे यासाठी लिफ्टचा वापर न करता जिन्याने चालत जाणे, बाहेर जवळच जायचे असेल तर गाडीचा वापर न करता चालत जाणे असे बदल महत्वाचे ठरतात.

दिवसभर एका जागी बसण्यापेक्षा अधूनमधून उठून चालणे आणि छोटा ब्रेक घेणे स्नायूंसाठी फायदेशीर ठरते. याविषयी अधिक माहिती छोटा ब्रेक घेण्याचे फायदे या लेखात वाचा.

स्नायूची ताकद टिकून राहावी म्हणून कोणत्या सवयी टाळाव्यात:

खूप वेळ एका जागेवर बसून राहणे, सिगारेट ओढणे, दारू पिणे, बाहेरचे अन्नपदार्थ जास्ती प्रमाणात खाणे अशा सवयी टाळव्यात कारण त्या स्नायूना कमजोर बनवतात.

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा:

जर तुमचं वजन झपातट्याने कमी होत असेल किंवा सतत शारीरिक वेदना जाणवत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचं राहील.

समजसत्य
वयानुसार स्नायू वाढत नाहीत.योग्य व्यायाम आणि आहाराने कोणत्याही वयात स्नायूंची ताकद सुधारू शकते.
फक्त जिममध्येच स्नायू मजबूत होतात.घरच्या घरी Resistance Band, Squats आणि Walking देखील प्रभावी आहेत.
फक्त प्रथिने खाल्ल्याने स्नायू वाढतात.व्यायाम, झोप आणि संतुलित आहार यांचा एकत्रित परिणाम महत्त्वाचा असतो.
वृद्धांनी वजन उचलू नये.तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हलका Strength Training सुरक्षित आणि फायदेशीर ठरू शकतो.

निरोगी शरीरासोबत मानसिक आणि आर्थिक आरोग्यही तितकेच महत्त्वाचे आहे. स्वतःच्या विकासासाठी आमचा High Income Digital Skills in Marathi हा लेख देखील वाचा.

निष्कर्ष

वय वाढणे थांबवता येत नाही, पण स्नायू कमकुवत होण्याचा वेग नक्कीच कमी करता येतो. योग्य आहार, नियमित स्ट्रेंथ ट्रेनिंग, पुरेशी झोप, ताण नियंत्रण आणि सक्रिय जीवनशैली यांच्या मदतीने कोणत्याही वयात स्नायू मजबूत ठेवता येतात. जर स्नायूंची ताकद झपाट्याने कमी होत असेल किंवा वारंवार पडणे, हात-पायात अशक्तपणा जाणवत असेल, तर त्वरित डॉक्टर किंवा फिजिओथेरपिस्टचा सल्ला घ्या.

Related Posts

पावसाळ्यातील रानभाज्या: पावसाळ्यातील 10 पौष्टिक रानभाज्या | फायदे, पोषक घटक, पारंपरिक रेसिपी आणि आरोग्यदायी उपयोग

पावसाळ्यातील रानभाज्या: पावसाळ्यात मिळणाऱ्या भारंगी, टाकळा, कुरडू, घोळ, आघाडा, तेरडा, फोडशी, भुईकोवळा, चाकवत आणि शेवळा या 10 पौष्टिक रानभाज्यांची संपूर्ण माहिती, फायदे, पोषक घटक, रेसिपी आणि काळजी जाणून घ्या. पावसाळ्यातील…

लिंबूवर्गीय फळांचे 12 आरोग्यदायी फायदे | व्हिटॅमिन C, रोगप्रतिकारक शक्ती आणि हृदयाचे संरक्षण

लिंबूवर्गीय फळांचे फायदे: लिंबू, संत्रे, मोसंबी आणि इतर लिंबूवर्गीय फळांचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या. व्हिटॅमिन C, रोगप्रतिकारक शक्ती, त्वचा, पचन आणि हृदयासाठी उपयुक्त माहिती मराठीत. आपण आजारी पडल्यानंतरच फळे खाण्याची…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

मोबाईलची Storage Full का होते? फोनची जागा मोकळी करण्याचे 10 सुरक्षित उपाय

मोबाईलची Storage Full का होते? फोनची जागा मोकळी करण्याचे 10 सुरक्षित उपाय

Emergency Fund म्हणजे काय? पगार कितीही असो, किती पैसे बाजूला ठेवावेत?

Emergency Fund म्हणजे काय? पगार कितीही असो, किती पैसे बाजूला ठेवावेत?

महाराष्ट्रात Property Registration कसे करावे? घर, फ्लॅट आणि जमीन Registration ची संपूर्ण प्रक्रिया

महाराष्ट्रात Property Registration कसे करावे? घर, फ्लॅट आणि जमीन Registration ची संपूर्ण प्रक्रिया

केळीच्या प्रमुख जाती कोणत्या? लाल केळी, ब्लू जावा आणि इतर प्रकारांची संपूर्ण माहिती

केळीच्या प्रमुख जाती कोणत्या? लाल केळी, ब्लू जावा आणि इतर प्रकारांची संपूर्ण माहिती

Export Business कसा सुरू करावा? भारतातून माल परदेशात विकण्याची Step-by-Step माहिती

Export Business कसा सुरू करावा? भारतातून माल परदेशात विकण्याची Step-by-Step माहिती

महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे – कोणते विद्यापीठ कोणत्या भागासाठी? संपूर्ण माहिती

महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे – कोणते विद्यापीठ कोणत्या भागासाठी? संपूर्ण माहिती