सिडनी (ऑस्ट्रेलियातील) 102 वर्षे जुने जहाज तरंगते जंगल बनले आहे! 102 years old floating forest in sydney australia.

Floating forest in sydney australia-आधुनिकतेचा झगमगाट आणि निसर्गाची शांत, गूढ शक्ती—या दोन्हींचा संगम जिथे अनुभवायला मिळतो, ते शहर म्हणजे सिडनी. उंच इमारती, प्रसिद्ध पर्यटनस्थळे आणि समुद्रकिनाऱ्यांनी सजलेले हे शहर जगभरातील पर्यटकांना आकर्षित करते. पण या चमकदार शहराच्या कुशीत एक असे अनोखे दृश्य दडलेले आहे, जे पाहिल्यावर निसर्गाच्या अद्भुत शक्तीची जाणीव होते. एकेकाळी मानवनिर्मित उद्योगाचा भाग असलेले जहाज आज हिरव्यागार झाडांनी व्यापले जाऊन “तरंगते जंगल” बनले आहे—ही गोष्ट जितकी अनोखी आहे, तितकेच प्रेरणादायी आहे.  

Floating forest in sydney australia – हे शहर संपूर्ण जगात  त्याच्या आधुनिक जीवनशैलीसाठी, समुद्रकिनाऱ्यांसाठी आणि पर्यटनस्थळांसाठी प्रसिद्ध आहे. पण या शहरात एक अशी विलक्षण गोष्ट आहे जी निसर्ग आणि इतिहास यांचा संगम दाखवते. ती गोष्ट म्हणजे 102 वर्षे जुने असणारे जहाज, ज्याची ओळख  “तरंगते जंगल” अशी आहे. या जहाजाचे नाव  SS Ayrfield होते जे आता हिरव्यागार झाडांनी व्यापलेले आहे आणि पाहणाऱ्यांना एकदम थक्क करून टाकते.

floating forest in sydney australia

Floating forest in sydney australia in detail:

1.SS Ayrfield ची ओळख काय आहे:

SS Ayrfield हे जहाजाची बांधणी ही  1911 साली करण्यात आली. या जहाजचा उपयोग कोळसा वाहून नेण्यासाठी केला जात असे. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात या जहाजाने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. काही काळाने हे जहाज जुने झाले आणि साधारणतः 1972 साली हे जहाज वापरातून काढून टाकण्यात आले.

हे जहाज नंतर होमबुश बे येथे ठेवण्यात  आले, होमबुश बे हे एक असे ठिकाण आहे जिथे एक प्रकारे अनेक जुन्या जहाजांचे “ग्रेव्हयार्ड” तयार झाले होते.Floating forest in sydney australia.

2.SS Ayrfield हे जहाज तरंगते जंगल कसे बनले?

ज्यावेळी SS Ayrfield हे जहाज अनेक वर्षे पाण्यात कोणतेही कार्य नं करण्याच्या अवस्थेत राहिले, तेव्हा निसर्गाने त्यावर आपले काम करण्यास सुरू केले. जहाजाच्या लोखंडी बांधणीवर हळूहळू माती साचली आणि पक्ष्यांनी आणलेल्या बियांमुळे त्यावर झाडे उगवू लागली.

मॅन्ग्रोव्ह प्रजातीच्या झाडांनी या जहाजावर आपली मुळे घट्ट रोवली. याचाच परिणाम काही वर्षांतच हे जहाज पूर्णपणे हिरव्या झाडांनी झाकले गेले आणि “फ्लोटिंग फॉरेस्ट” म्हणजेच तरंगते जंगल बनले.Floating forest in sydney australia.

3.हे जहाज एकप्रकारे निसर्ग आणि मानवनिर्मित वस्तूंचा संगम आहे:

हे दृश्य म्हणजे निसर्ग आणि मानवनिर्मित वस्तूंचा एक प्रकारे संगमच आहे. एकेकाळी जगाच्या औद्योगिक वापरासाठी तयार केलेले जहाज आज जैवविविधतेचे छोटे केंद्र बनले आहे.या ठिकाणी पक्षी, कीटक आणि इतर लहान प्राण्यांसाठी एक नवीन राहण्याचे ठिकाण तयार  झाले आहे.Floating forest in sydney australia.

यावरूनच आपल्याला एक महत्त्वाचा संदेश मिळतो तो म्हणजे निसर्गाला जर थोडा वेळ आणि एक संधी दिली, तर तो कोणत्याही निर्जीव वस्तू सजीव करू शकतो.

4.SS Ayrfield एक प्रकारे पर्यटन आणि आकर्षण सुद्धा:

सध्या  SS Ayrfield हे सिडनी मधील एक अनोख्या  पर्यटनाचे आकर्षण केंद्र बनले आहे. पर्यटक येथे येऊन या “तरंगत्या जंगलाचे” फोटो काढतात आणि त्याच्या सौंदर्याचा आनंद घेतात.

होम बुश बे परिसरात फिरताना या जहाजाचे दर्शन घेतल्यावर अनेकांना आश्चर्य वाटते याच्या नैसर्गिक सौंदर्याबद्दल. हे ठिकाण विशेषकरून  फोटोग्राफर्स आणि निसर्गप्रेमींसाठी एक प्रकारे स्वर्गासारखेच  आहे.

5.यातून मिळणारा पर्यावरणीय संदेश:

या जहाजाची कहाणी आपल्याला पर्यावरणाबद्दल एक महत्त्वाचा संदेश देते, तो म्हणजे मानवनिर्मित कचरा किंवा टाकून दिलेल्या वस्तूंमध्येही निसर्ग जीवन निर्माण करू शकतो. पण याचा अर्थ असा नाही की आपण प्रदूषण वाढवावे.

उलट, हे उदाहरण आपल्याला सांगते की जर आपण पर्यावरणाची काळजी घेतली, तर निसर्ग आपल्याला सुंदर आणि अनोखे चमत्कार दाखवू शकतो.Floating forest in sydney australia .

6.SS Ayrfield जहाजाची सोशल मीडियावर लोकप्रियता:

गेल्या काही वर्षांत SS Ayrfield हे जहाज सोशल मीडियावर खूपच  व्हायरल झाले आहे. इंस्टाग्राम, फेसबुक आणि ट्रॅव्हल ब्लॉग्सवर या जहाजाचे फोटो मोठ्या प्रमाणात शेअर केले जातात. त्यामुळेच या जहाजची माहिती मोठ्या प्रमाणात लोकांना मिळतेय.

जगभरात काही अशी ठिकाणी आहेत जिथे निसर्गाने मानवनिर्मित वस्तूंना पुन्हा आपल्या कवेत घेतले आहे. परंतु SS Ayrfield सारखे उदाहरण खूपच दुर्मिळ आहे.

हे जहाज आपल्याला दाखवते की निसर्गाची शक्ती किती अफाट आहे.लोक याला “Nature reclaiming man-made structures” चे एक उत्तम उदाहरण मानतात.

यावरून हे लक्षात येते की, SS Ayrfield हे केवळ एक जुने जहाज नाही, तर ते निसर्गाच्या जडघडणीची  आणि सहनशक्तीची जिवंत कहाणी आहे. सिडनी मध्ये असलेले हे “तरंगते जंगल” आपल्याला शिकवते की बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि त्या बदलातूनही सौंदर्य निर्माण होऊ शकते.

हे अद्भुत दृश्य पाहून प्रत्येकाच्या मनात एकच विचार येतो—या पृथ्वीवर निसर्गच सर्वात मोठा कलाकार आहे! 

Related Posts

हिवाळ्यातील त्वचेचे आव्हान-हिवाळ्यात त्वचेची काळजी घेण्याची आवश्यक दिनचर्या काय आहे? Winter skincare routine.

Winter skincare routine – थंड आणि कोरडी हवा, कमी आर्द्रता आणि हीटिंग सिस्टम त्वचेसाठी आव्हानात्मक असू शकतात. या ऋतूमध्ये, त्वचेला कोरडेपणा, खाज सुटणे आणि लालसरपणा सहज जाणवू शकतो. त्वचेचा नैसर्गिक…

Planetary Position आणि Success: यशासाठी ग्रह आणि मनाचा समतोल.

Planetary position – यश हे केवळ नशिबावर अवलंबून असते का? की ग्रहांची स्थिती आणि आपल्या मनाची तयारी यांचा त्यात तितकाच वाटा असतो? अनेकांच्या मते ग्रह आपल्या आयुष्यात संधी निर्माण करतात,…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

High Income Digital Skills in Marathi: घरबसल्या कमाईसाठी 9 सर्वाधिक मागणीची डिजिटल कौशल्ये

High Income Digital Skills in Marathi: घरबसल्या कमाईसाठी 9 सर्वाधिक मागणीची डिजिटल कौशल्ये

पैशाच्या मागे धावू नका, पैसा तुमच्याकडे आकर्षित करा! – पैसा आकर्षित करण्याचे नियम

पैशाच्या मागे धावू नका, पैसा तुमच्याकडे आकर्षित करा! – पैसा आकर्षित करण्याचे नियम

महाराष्ट्र भारताला काय देतो? अर्थव्यवस्था, शेती, उद्योग, संस्कृती आणि विकासातील महाराष्ट्राचे अतुलनीय योगदान

महाराष्ट्र भारताला काय देतो? अर्थव्यवस्था, शेती, उद्योग, संस्कृती आणि विकासातील महाराष्ट्राचे अतुलनीय योगदान

महाराष्ट्र पोलीस दलातील पदांचा क्रम: कॉन्स्टेबलपासून DGP पर्यंत संपूर्ण माहिती

महाराष्ट्र पोलीस दलातील पदांचा क्रम: कॉन्स्टेबलपासून DGP पर्यंत संपूर्ण माहिती

ऑनलाइन कमाईसाठी वेबसाइट्स – डिजिटल प्रॉडक्ट, ई-बुक, ऑनलाइन कोर्स आणि सेवांमधून पैसे कसे कमवायचे?

ऑनलाइन कमाईसाठी वेबसाइट्स – डिजिटल प्रॉडक्ट, ई-बुक, ऑनलाइन कोर्स आणि सेवांमधून पैसे कसे कमवायचे?

महाराष्ट्रातील रिअल इस्टेट क्षेत्र गुंतवणुकीचे ट्रेंड : गुंतवणूकदारांसाठी संधी, जोखीम आणि महत्त्वाच्या टिप्स

महाराष्ट्रातील रिअल इस्टेट क्षेत्र गुंतवणुकीचे ट्रेंड : गुंतवणूकदारांसाठी संधी, जोखीम आणि महत्त्वाच्या टिप्स