प्रत्येक वळणावर स्वर्ग अनुभवण्याचं ठिकाण-आपलं कोकण. Maharashtra Tourism Places.

Maharashtra Tourism Places-असं म्हणतात कोकण म्हणजे स्वर्ग! समुद्राच्या लाटांचा आवाज, हिरव्यागार सह्याद्रीच्या कुशीतली गावं, नारळ-सुपारीच्या बागा आणि इतिहासाची साक्ष देणारे गडकिल्ले — हे सर्व एका ठिकाणी अनुभवायचे असेल तर कोकण तुमची वाट पाहत आहे.

महाराष्ट्राला मोठा असा समुद्रकिनारा लाभलेला आहे आणि याच समुद्रकिनारी वसलेला कोकणपट्टा म्हणजे निसर्गाचा एक खजिनाच. एका बाजूला अथांग असा अरबी समुद्र आणि दुसऱ्या बाजूला हिरव्यागार सह्याद्रीच्या पर्वतरांगा, मधे नारळ सुपारीच्या बागा, शांत समुद्रकिनारे आणि इतिहासाची साक्ष देणारे गडकिल्ले असं स्वर्गीय सौंदर्य कोकणाला लाभलेलं आहे.

रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असे तीन जिल्हे कोकणात येतात. कोकणातील भाषा, खाद्यसंस्कृती, समुद्रकिनारे आणि धार्मिक स्थळे जगभर प्रसिद्ध आहेत.

यामुळेच कोकणाला “महाराष्ट्राचा स्वर्ग ” असेही म्हटले आहे.

Table Of Contents
  1. Maharashtra Tourism Places: Kokan Tourism.
Maharashtra Tourism Places

Maharashtra Tourism Places: Kokan Tourism.

चला तर मग ओळख करून घेऊया महाराष्ट्राचा स्वर्ग असणाऱ्या कोकणाची.

अलिबाग (रायगड):

मुंबई आणि पुण्याजवळ असलेले हे ठिकाण ‘महाराष्ट्राचा गोवा’ म्हणून ओळखले जाते. येथे सुंदर किनारे आणि ऐतिहासिक मुरुड-जंजिरा किल्ला आहे.

दिवेआगर:

रायगड जिल्ह्यातील सुंदर असा समुद्रकिनारा म्हणजेच दिवेआगर. सुवर्णगणेश मंदिर, हरिहरेश्वर मंदिर, दिवेआगर बीच ही येथील पाहण्यासारखी ठिकाणे आहेत.

बागमांडला आणि हरिहरेश्वर :

बागमांडला हे अतिशय छोटं पण निसर्गाने परिपूर्ण असं छोटंसं गाव आहे. या गावातून हरिहरेश्वरला बोटीने जाण्याचा अनुभव खूपच छान असतो. हरिहरेश्वर मंदिराला “दक्षिण काशी” असेही म्हणतात.

हिम्मतगड:

रत्नागिरी जिल्ह्यातील बाणकोट येथे हा ऐतिहासिक जलदुर्ग आहे. मराठा आरमारप्रमुख कन्होजी आंग्रे यांनी हा किल्ला जिंकून याला हिम्मतगड असे नाव दिले.

कड्यावरचा गणपती:

पेशवेकालीन आणि जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेला कड्यावरचा गणपती हा दापोलीजवळ आंजर्ले या ठिकाणी आहे. या मंदिरातील मूर्ती ही उजव्या सोंडेची असून अत्यंत दुर्मिळ मानली जाते.

श्रीवर्धन :

श्रीवर्धन स्वच्छ आणि शांत समुद्रकिनाऱ्याबरोबरच पेशव्यांचे जन्मस्थान म्हणून देखील ओळखले जाते. येथील खास आकर्षण म्हणजे पेशवा स्मारक, श्रीवर्धन बीच आणि स्थानिक कोकणी बाजार. या ठिकाणच कोकणी जेवण इथे येणाऱ्या पर्यटकांना खूप आवडते.

हर्णे बीच आणि सुवर्णदुर्ग किल्ला:

हर्णे हे एक गाव असून ते मासेमारीसाठी प्रसिद्ध आहे. इथे पहाटे भरणारा मच्छी बाजार पाहण्याचा अनुभव हा वेगळाच असतो. समुद्रात वसलेला सुवर्णदुर्ग हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचा महत्वाचा भाग होता.

दापोली: 

दापोली म्हणजेच मिनी महाबळेश्वर. इथे समुद्रकिनाऱ्याबरोबरच थंड हवामान असे दोन्हीही अनुभव आपल्याला मिळतात. मुरुड बीच, कार्डे बीच, डॉल्फिन पॉईंट, अंजनवेल ही येथील पाहण्यासारखी ठिकाणे आहेत. डॉल्फिन सफारी म्हणजे दापोलीच मुख्य आकर्षण.

वेळणेश्वर मंदिर आणि गुहागर बीच:

रत्नागिरी जिल्ह्यातील वेळणेश्वर मंदिर हे भगवान शंकराचे पाचशे वर्षे जुने मंदिर आहे. 

गुहागर बीच हा पांढऱ्या वाळूसाठी आणि शांत वातावरणासाठी ओळखला जातो. सर्वात मोठा आणि स्वच्छ समुद्रकीनारा म्हणून या बीचची ओळख आहे .Maharashtra Tourism Places.

जयगड आणि तवसाळ:

जयगड हा समुद्रकिनाऱ्यावर असलेला भव्य किल्ला आहे. जयगडावरून आपण समुद्राचा एक चांगला आणि अविस्मरणीय अनुभव घेऊ शकतो.

तवसाळ येथे समुद्रात बोटीने फिरण्यासाठी फेरीबोट असतात. या बोटीने आपण समुद्रात फिरून आनंद घेऊ शकतो.

गणपतीपुळे :

गणपतीपुळे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळ असून इथे गणेशाची स्वयंभू मुर्ती आहे. येथील वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी खूप प्रसिद्ध आहेत. संध्याकाळचा सूर्यास्त इथून पाहणे म्हणजे अविस्मरणीय.

आरे-वारे घाट:

आरे-वारे घाट म्हणजे एका बाजूने समुद्र आणि दुसऱ्या बाजूने डोंगर हा प्रवास म्हणजे निव्वळ सुख. समुद्रकिनारा, हिरव्यागार डोंगररांगा, वळणावळणाचे घाटरस्ते आणि शांत वातावरण यामुळे आरे-वारे पर्यटकांच्या मनात खास स्थान निर्माण करते. कोकणातील नैसर्गिक सौंदर्य जवळून अनुभवायचे असेल, तर आरे-वारे हे एक परफेक्ट ठिकाण आहे.

रत्नदुर्ग आणि भाटये बीच:

रत्नागिरी शहरातील रत्नदूर्ग किल्ला ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचा आहे. तिथे असणारा भाटये बीच शांत व स्वच्छ असण्याबरोबरचा सूर्यास्त पाहण्यासाठी देखील प्रसिद्ध आहे.

पावस हे स्वामी स्वरूपानंद यांच्या आश्रमासाठी प्रसिद्ध आहे. इथे आल्यावर एक वेगळ्याच प्रकारची अध्यात्मिक शांतता मनाला मिळते.

कणकदुर्ग आणि परशुराम मंदिर:

कणकदुर्ग आणि परशुराम मंदिर ही कोकण पट्यातील अत्यंत प्रसिद्ध अशी ऐतिहासिक ठिकाणे आहेत.

देवगड :

देवगडचा हापूस आंबा जगभर प्रसिद्ध आहे. देवगडाची ओळख आंब्याचे गाव अशीही आहे. येथील देवगड किल्ला, सुंदर बीच आणि आंब्याच्या बागा प्रसिद्ध आहेत.

कुणकेश्वर मंदिर :

Maharashtra Tourism Places.

हे सुंदर असं शिवमंदिर समुद्रकिनाऱ्यावर वसलेले आहे. या ठिकाणाहून सूर्योदय आणि समुद्राच्या लाटा पाहण्याचा अनुभव खूप छान असतो.

मालवण आणि सिंधुदुर्ग:

कोकणातील सगळ्यात लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक म्हणजे मालवण. या ठिकाणी आपण स्कुबा डायविंग,स्नॉर्कलिंग, सिंधुदुर्ग किल्ला, तारकर्ली बीच अशा सुंदर ठिकानांचा अनुभव घेऊ शकतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला सिंधुदुर्ग किल्ला इतिहासप्रेमीसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. Maharashtra Tourism Places.


तारकर्ली बीच:


पारदर्शक समुद्राचे पाणी आणि वॉटर स्पोर्ट्ससाठी प्रसिद्ध असलेला तारकर्ली बीच महाराष्ट्रातील सर्वात सुंदर समुद्रकिनाऱ्यांपैकी एक मानला जातो.

सरदेसाई वाडा:

रत्नागिरी जिल्यातील संगमेश्वर येथील सरदेसाई वाडा हा मराठा सम्राज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यातील शेवटचे स्वतंत्र वास्तव आणि दुर्दैवी घटनेचे ठिकाण म्हणून ओळखला जातो.

कोकण प्रवासासाठी महत्त्वाच्या टिप्स

  • पावसाळ्यात प्रवास करताना रेनकोट आणि अतिरिक्त कपडे सोबत ठेवा.
  • समुद्रात उतरताना स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा.
  • हापूस आंब्याचा हंगाम एप्रिल ते जून असतो.
  • वीकेंडला पर्यटनस्थळांवर गर्दी असू शकते, त्यामुळे आगाऊ बुकिंग करा.
  • स्थानिक कोकणी खाद्यपदार्थ चाखायला विसरू नका.

कोकणातील खाद्यसंस्कृती:

फिशथाळी, सोलकढी, तांदळाची भाकरी, उकडीचे मोदक, हापूस आंबा,रानमेवा, काजू, कोकम, सुकी मच्छि असे अनेक पदार्थांचा स्वाद आपण कोकणात गेल्यावर घेऊ शकतो. Maharashtra Tourism Places.

कोकणातील प्रसिद्ध वॉटर स्पोर्ट्स

  • स्कुबा डायविंग
  • स्नॉर्कलिंग
  • डॉल्फिन सफारी
  • जेट स्की
  • बनाना राईड
  • पॅरासेलिंग
  • बोटिंग

कोकणातील प्रसिद्ध खरेदी

  • देवगड हापूस आंबा
  • कोकम सरबत
  • काजू
  • आंबापोळी
  • फणसाचे पदार्थ
  • मालवणी मसाला
  • कोकणी हस्तकला

FAQ

1. कोकणाला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणती?

ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा कालावधी पर्यटनासाठी सर्वात योग्य मानला जातो.

2. कोकणातील सर्वात प्रसिद्ध समुद्रकिनारे कोणते?

गणपतीपुळे, तारकर्ली, दिवेआगर, गुहागर, श्रीवर्धन आणि भाटये हे समुद्रकिनारे प्रसिद्ध आहेत.

3. कोकणात स्कुबा डायविंग कुठे करता येते?

मालवण आणि तारकर्ली येथे स्कुबा डायविंग आणि स्नॉर्कलिंगची सुविधा उपलब्ध आहे.

4. कोकणातील प्रसिद्ध खाद्यपदार्थ कोणते?

फिश थाळी, सोलकढी, उकडीचे मोदक, तांदळाची भाकरी, हापूस आंबा आणि कोकम सरबत हे प्रसिद्ध पदार्थ आहेत.

5. कोकण ट्रिपसाठी किती दिवसांचा वेळ ठेवावा?

रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांचा अनुभव घ्यायचा असेल तर किमान 5 ते 7 दिवसांचा वेळ ठेवावा.

6. कोकणातील प्रसिद्ध किल्ले कोणते?

सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, जयगड, रत्नदुर्ग आणि मुरुड-जंजिरा हे प्रसिद्ध किल्ले आहेत.

निष्कर्ष:

कोकण म्हणजे फक्त पर्यटनस्थळांचा समूह नाही, तर निसर्ग, इतिहास, अध्यात्म आणि खाद्यसंस्कृती यांचा अनोखा संगम आहे. शांत समुद्रकिनारे, भव्य गडकिल्ले, प्राचीन मंदिरे, हिरव्यागार डोंगररांगा आणि स्वादिष्ट मालवणी खाद्यपदार्थ यामुळे कोकण प्रत्येक पर्यटकाच्या मनात कायमचे स्थान निर्माण करतो.

जर तुम्ही गर्दीपासून दूर जाऊन निसर्गाच्या सान्निध्यात काही निवांत क्षण घालवू इच्छित असाल, तर कोकण तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. एकदा तरी कोकण ट्रिप करून महाराष्ट्राच्या या स्वर्गीय सौंदर्याचा अनुभव नक्की घ्या.

तुम्ही कोकणातील कोणत्या पर्यटनस्थळाला भेट दिली आहे? तुमचा अनुभव आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा लेख आवडला असेल तर मित्र-परिवारासोबत शेअर करा आणि महाराष्ट्रातील अशाच सरकारी योजना, शिक्षण आणि करिअरविषयक माहिती ,पर्यटनस्थळांविषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्या Realinfoworld.in वेबसाईटला भेट देत रहा.

Related Posts

महाराष्ट्रातील 11 अनोखी गावे: पुस्तकांचे गाव, मधाचे गाव, डिजिटल गाव आणि इतर वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणे

महाराष्ट्रातील अनोखी गावे जाणून घ्या. भिलार पुस्तकांचे गाव, मांघर मधाचे गाव, हरिसाल WiFi गाव, हिवरे बाजार, वेळास, कोर्लई आणि इतर प्रेरणादायी गावांची संपूर्ण माहिती. महाराष्ट्रातील पर्यटन म्हटले की किल्ले, समुद्रकिनारे,…

भारतातील 8 अनोखी गावे: कासव संवर्धनापासून शिट्टीच्या संवादापर्यंत

भारतातील अनोखी गावे जाणून घ्या. वेळास, काँगथोंग, खोनोमा, कुंबळंगी, अगुंबे आणि इतर गावांची संस्कृती, निसर्ग, पर्यटन आणि खास वैशिष्ट्ये. भारतातील काही गावांची ओळख त्यांच्या पर्यटनस्थळांपेक्षा वेगळी आहे. कुठे समुद्री कासवांच्या…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

मोबाईलची Storage Full का होते? फोनची जागा मोकळी करण्याचे 10 सुरक्षित उपाय

मोबाईलची Storage Full का होते? फोनची जागा मोकळी करण्याचे 10 सुरक्षित उपाय

Emergency Fund म्हणजे काय? पगार कितीही असो, किती पैसे बाजूला ठेवावेत?

Emergency Fund म्हणजे काय? पगार कितीही असो, किती पैसे बाजूला ठेवावेत?

महाराष्ट्रात Property Registration कसे करावे? घर, फ्लॅट आणि जमीन Registration ची संपूर्ण प्रक्रिया

महाराष्ट्रात Property Registration कसे करावे? घर, फ्लॅट आणि जमीन Registration ची संपूर्ण प्रक्रिया

केळीच्या प्रमुख जाती कोणत्या? लाल केळी, ब्लू जावा आणि इतर प्रकारांची संपूर्ण माहिती

केळीच्या प्रमुख जाती कोणत्या? लाल केळी, ब्लू जावा आणि इतर प्रकारांची संपूर्ण माहिती

Export Business कसा सुरू करावा? भारतातून माल परदेशात विकण्याची Step-by-Step माहिती

Export Business कसा सुरू करावा? भारतातून माल परदेशात विकण्याची Step-by-Step माहिती

महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे – कोणते विद्यापीठ कोणत्या भागासाठी? संपूर्ण माहिती

महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे – कोणते विद्यापीठ कोणत्या भागासाठी? संपूर्ण माहिती