वयानुसार स्नायुंची ताकद कमी होते, पण निरोगी जीवनशैलीने ती परत सुद्धा मिळवता येते! Muscle power grading.

 Muscle power वाढत्या वयानुसार आपल्या शरीरात अनेक बदल होतात जसे की, त्वचेवर सुरकुत्या येणे, चयापचय (metabolism) मंदावणे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्नायुंची ताकद कमी होणे. ही एक नैसर्गिक प्रक्रिया जरी असली तरी ती आपण थोड्याफार प्रमाणात बदलू शकतो.

 त्यासाठी आपण योग्य जीवनशैली, सकस आहार आणि पूरक असा व्यायाम यांच्या मदतीने आपण स्नायूची ताकद परत मिळवू शकतो आणि आपल्या जीवनात सक्रिय राहू शकतो.

Muscle power

Muscle power कमी होण्यामागची कारणे : 

जसजस वय वाढत तसतस आपल्या शरीरातील स्नायूचे प्रमाण हळूहळू कमी होत. याच क्रियेला Sarcopenia म्हणतात.

1. शरीरातील हार्मोन्समध्ये होणारे बदल.

2. स्नायूच्या पेशिंची वाढ किंवा नवीन पेशी निर्माण होण्याची गती मंदावणे.

3. शरीराची हालचाल कमी होणे.

4. प्रथिनांचे सेवन अपुरे राहणे.

 या कारणांनी शरीरातील स्नायूचे प्रमाण(muscle mass) कमी होऊ लागते.

स्नायू कमकुवत होण्याची नेमकी लक्षणे काय आहेत:

1. सतत थकल्यासारखे वाटत राहते.

2.जड वजन उचलता येत नाही.

3.चालण्याचा वेग मंदावतो.

4.चालताना वारंवार पडतो.

अशी लक्षणें दिसूनही दुर्लक्ष केले गेले तर काही गंभीर समस्या उद्भवतात.

स्नायू मजबुतीसाठी चांगला आहार घेणे:

1. दूध, दही, पनीर, डाळी, कडधान्य, अंडी, मासे अशे pra प्रथिनयुक्त पदार्थ पुरेशा प्रमाणत रोजच्या जेवणात घेणे स्नायूच्या वाढीसाठी आवश्यक असते.

2. ज्या आहारातून आपल्याला vitamin D, calcium आणि Vitamin B12 मिळते असा आहार घेणे.

3.For Muscle power पाणी सुद्धा तितकेच महत्वाचे आहे जर शरीरात पाण्याची कमतरता असेल तर स्नायूमध्ये थकवा त्याचबरोबर आकडी येण्याची सुद्धा शक्यता असते.

स्नायूच्या ताकदीसाठी व्यायाम हा एक प्रभावी मार्ग आहे:

1.स्कॅट्स, पुश-अप असे व्यायाम हे स्नायूना मजबूत करतात.

2.दररोज चालणे, सायकलिंग करणे, पोहणे असे व्यायाम केल्यास आपली सहनशक्ती वाढते.

3.शरीराची लवचिकता वाढविण्यासाठी थोडंसं स्ट्रेचिंग आणि योगासणे करणे देखील फायदेशीर ठरते.

पुरेशी झोप घेणे निरोगी जीवनासाठी प्रभावी आहे:

झोप ही आपल्या शरीराच्या पुनर्बांधणीसाठी म्हणत्वाची असते. पुरेशी झोप घेतल्याने शरीरातील ऊर्जेची पातळी वाढते. आपले हार्मोन्स संतुलित राहतात. त्यासाठी दररोज 7-8 तास झोप घेणे महत्वाचे आहे.

स्नायूच्या ताकदीसाठी (Muscle power ) मानसिकरित्या सक्षम असणे देखील महत्वाचे आहे:

सतत चिंता, ताण याचा आपल्या शरीरावर गंभीर परिणाम होतो म्हणूनच रोज थोडंसं मेडिटेशन, प्राणायाम आणि पॉसिटीव्ह विचार करणं गरजेचं आहे.

सक्रिय जीवनशैलीचे महत्व:

Use it or lose it हा नियम लक्षात घेऊन आपण जीवन जगल पाहिजे यासाठी लिफ्टचा वापर न करता जिन्याने चालत जाणे, बाहेर जवळच जायचे असेल तर गाडीचा वापर न करता चालत जाणे असे बदल महत्वाचे ठरतात.

स्नायूची ताकद टिकून राहावी म्हणून कोणत्या सवयी टाळाव्यात:

खूप वेळ एका जागेवर बसून राहणे, सिगारेट ओढणे, दारू पिणे, बाहेरचे अन्नपदार्थ जास्ती प्रमाणात खाणे अशा सवयी टाळव्यात कारण त्या स्नायूना कमजोर बनवतात.

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा:

जर तुमचं वजन झपातट्याने कमी होत असेल किंवा सतत शारीरिक वेदना जाणवत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचं राहील.

असं म्हणतात वय फक्त एक नंबर आहे, स्नायूची ताकद वयोमानानुसार कमी होते खरी, पण ती पुन्हा वाढवता येते हेही तितकेच खरे आहे.

स्नायूची ताकद कमी होणं हे जरी नैसर्गिक असलं तरी योग्य आहार, नियमित केलेला व्यायाम पुरेशी झोप, सकारात्मक जीवनशैली यांच्या मदतीने आपण कोणत्याही वयात हेल्दी राहू शकतो.

Related Posts

बाळंतपणानंतर भारतीय मातांचे वजन का वाढते? ही तुमची चूक नाही! | कारणे, उपाय आणि योग्य आहार

बाळंतपणानंतर वजन वाढणे-हार्मोन्स, झोपेचा अभाव, ताण, आहार आणि हालचालींची कमतरता यामुळे वजन वाढण्याची कारणे जाणून घ्या. तसेच वजन कमी करण्यासाठी सोपे देशी उपाय आणि आहार टिप्स मराठीत. महत्त्वाची सूचना: हा…

मेंदूची स्मरणशक्ती वाढवणारे 11 सुपरफूड्स | Brain Foods for Memory in Marathi

Brain Foods for Memory – मेंदूची कार्यक्षमता, स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढवण्यासाठी कोणते 11 पदार्थ खावेत? जाणून घ्या त्यांच्या फायद्यांसह संपूर्ण माहिती मराठीत. टीप: हा लेख केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने लिहिला…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

High Income Digital Skills in Marathi: घरबसल्या कमाईसाठी 9 सर्वाधिक मागणीची डिजिटल कौशल्ये

High Income Digital Skills in Marathi: घरबसल्या कमाईसाठी 9 सर्वाधिक मागणीची डिजिटल कौशल्ये

पैशाच्या मागे धावू नका, पैसा तुमच्याकडे आकर्षित करा! – पैसा आकर्षित करण्याचे नियम

पैशाच्या मागे धावू नका, पैसा तुमच्याकडे आकर्षित करा! – पैसा आकर्षित करण्याचे नियम

महाराष्ट्र भारताला काय देतो? अर्थव्यवस्था, शेती, उद्योग, संस्कृती आणि विकासातील महाराष्ट्राचे अतुलनीय योगदान

महाराष्ट्र भारताला काय देतो? अर्थव्यवस्था, शेती, उद्योग, संस्कृती आणि विकासातील महाराष्ट्राचे अतुलनीय योगदान

महाराष्ट्र पोलीस दलातील पदांचा क्रम: कॉन्स्टेबलपासून DGP पर्यंत संपूर्ण माहिती

महाराष्ट्र पोलीस दलातील पदांचा क्रम: कॉन्स्टेबलपासून DGP पर्यंत संपूर्ण माहिती

ऑनलाइन कमाईसाठी वेबसाइट्स – डिजिटल प्रॉडक्ट, ई-बुक, ऑनलाइन कोर्स आणि सेवांमधून पैसे कसे कमवायचे?

ऑनलाइन कमाईसाठी वेबसाइट्स – डिजिटल प्रॉडक्ट, ई-बुक, ऑनलाइन कोर्स आणि सेवांमधून पैसे कसे कमवायचे?

महाराष्ट्रातील रिअल इस्टेट क्षेत्र गुंतवणुकीचे ट्रेंड : गुंतवणूकदारांसाठी संधी, जोखीम आणि महत्त्वाच्या टिप्स

महाराष्ट्रातील रिअल इस्टेट क्षेत्र गुंतवणुकीचे ट्रेंड : गुंतवणूकदारांसाठी संधी, जोखीम आणि महत्त्वाच्या टिप्स