Apple कंपनीने त्यांचं नवीन फ्लॅगशिप मॉडेल iPhone 17 सादर केल आहे, हे ऐकणाऱ्यांना आणि नियमित वापरकर्त्यांना खूप अपेक्षित होत. चला तर मग पाहूया या फोनमध्ये काय सुधारणा आहे आणि भारतामध्ये त्याची उपलब्धता व किंमत किती आहे.

* घोषणा आणि उपलब्धता
iPhone 17 येणार आहे याची सांगता 9 सप्टेंबर 2025 या दिवशी करण्यात आली.
याची पूर्व मागणी ही 12 सप्टेंबरपासून सुरु झाली आणि भारतात 19 सप्टेंबर 2025 या दिवशी विक्रीला सुरुवात झाली.
* तंत्रज्ञान आणि वैशिष्ट्ये
1. प्रदर्शन आणि डिझाईन
iPhone 17 ची स्क्रीन ही 6.3 इंच Super Retina XDR OLED, Pro-Motion म्हणजे 120Hz रिफ्रेश रेट.
यामध्ये Alway-On मोड आहे. ही नवीन series बाहेरच्या प्रकाशात वापरायला अनुकूल आहे. त्याचा ब्राईटनेस (peaks-3000 nits) एवढा आहे.
यामध्ये Ceramic Shield 2 अशी सुधारित स्क्रीन काच वापरल्यामुळे ती अधिक सुरक्षित आहे.
2. प्रोसेसर आणि कामगिरी
यामध्ये A19 चिप वापरली आहे त्यामुळे सुधारित कामगिरी उत्तरदायिपणा आणि बॅटरी बचत शक्य होते.
RAM वाढण्याची शक्यता असू शकते.
3.कॅमेरा
मागचा कॅमेरा हा 48MP Fusion जो टेलिफोटो लेन्स म्हणून काम करतो त्याचबरोबर यामध्ये एक Ultra-Wide कॅमेरा देखील आहे.
समोरचा कॅमेरा हा 18MP आहे. Dual-Capture सुविधा असल्यामुळे आपल्याला दोनीही कॅमेऱ्याचा वापर एकत्र करता येतो.
4.बॅटरी आणि चार्जिंग
मागच्या series च्या तुलनेत बॅटरीचे आयुष्य थोडे वाढले आहे
विशेष चार्जेर वापरल्यास चार्जिंग करण्याची क्षमता जास्त असेल.
5. इतर वैशिष्ट्य
धूळ व पाण्यापासून सुरक्षित
नवीन नेटवर्किंग चिप
जास्त स्टोरेज क्षमता
6. किंमत व भारतातील उपलब्धता
19 सप्टेंबर 2025 पासून भारतामध्ये iPhone 17 उपलब्ध झाला आहे
त्याची किंमत ही ही थोडी जास्त असू शकते, कारण बेस मॉडेलमध्ये 256गब स्टोरेज कॅपॅसिटी आहे.
काय बदललंय?
पूर्वी जी सुविधा फक्त Pro मॉडेल मध्ये असायची ती या non- pro मॉडेल मध्ये आहे.
जास्त स्टोरेज आणि कॅमेरा मध्ये सुद्धा मोठा बदल आहे
डिझाईनमध्ये छोटेसे बदल
त्यामुळे iPhone 17 हा एक चांगला पर्याय आहे. हा पण आपल्याला त्याची किंमत जास्त वाटत असली तरी त्याचे फिचर्स भविष्यातील उपयुक्तता आणि त्याची गुणवत्ता आपण नजरअंदाज करू शकत नाही.
