फटाके विक्री व्यवसाय : उज्वल भविष्याचा प्रकाशमान मार्ग. Firecracker buisness.

Firecracker buisness – सण म्हटलं की जल्लोष हा आलाच. आजकाल तर कोणत्याही स्वरूपाचा उत्सव, सण किंवा कार्य असूद्यात तो अधिक भव्य आणि आकर्षक कसा करता येईल याकडे सर्वांचे लक्ष असते. या भव्यतेसाठी आणि आकर्षणासाठी फटाके तर लागणारच. त्यामुळे फटाक्यांचा  व्यवसाय पूर्वीसारखा फक्त दिवाळीपुरता मर्यादित न राहता मोठ्या नफ्याची संधी बनणारा व्यवसाय बनला आहे.

योग्य नियोजन, सुरक्षिततेची काळजी आणि ग्राहकांना काय आवडत याकडे योग्य प्रकारे लक्ष देऊन हा व्यवसाय केल्यास मोठ्या प्रमाणात नफा मिळू शकतो. या व्यवसायसाठी (Firecracker buisness) लागणारी गुंतवणूक देखील खूपच जास्त असते अशातला भाग नाही, कमी गुंतवणूकितही या व्यवसायला आपण सुरुवात करू शकतो. नवीन प्रकारचे कमी प्रदूषण करणारे आणि इको-फ्रेंडली असे फटाके बाजारात आल्यामुळे या व्यवसायला आधुनिकतीची जिढी मिळाली आहे. हा व्यवसाय (Firecracker buisness) असा आहे की भविष्यातही त्याची मागणी कायम राहण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर असणार आहे. 

Firecracker buisness

Steps to starting Firecracker buisness:

फटाके हा दिवाळीतील सगळ्यात जास्त मागणी असणार जिनस आहे. गल्लीतल्या दुकानापासून ते मोठ्या दुकानापर्यंत हा व्यवसाय चालतो. योग्य परवाना, सुरक्षितता आणि योग्य पुरवठादार मिळाल्यास या व्यवसायात मोठा नफा मिळतो.

व्यवसायाची ओळख:

Firecracker buisness identity -दिवाळीच्या सणात किंवा कोणताही उत्सहाचा दिवस असो फटाके हे नेहमीच फोडले जातात. हेच फटाके फोडण्याइतकेच याच्या विक्री व्यवसायातही तेवढाच आनंद आहे. फटाके विक्री व्यवसाय हा कायदेशीर परवानगी घेऊन आपण सुरु करू शकतो. हा व्यवसाय हंगामी असला तरी दिवाळी, लग्नसमारंभ आणि बाकी आनंदाच्या क्षणी प्रचंड नफा मिळवून देतो.

केवळ भांडवल आहे म्हणून तुम्ही हा व्यवसाय (Firecracker buisness) सुरु करु शकत नाही, त्यासाठी असणारे कायदे, नियम देखील महत्वाचे आहेत. योग्य कागदपत्रे आणि परवानगी घेल्यामुळे तुमचा व्यवसाय सुरक्षित आणि कायद्याचे पालन करून योग्य पद्धतीने चालवता येतो.
फटाके हे ज्वलनशील पदार्थांमध्ये मोडतात, त्यामुळे सरकारकडून काही गोष्टींसाठी परवानगी महत्वाची असते. त्यासाठी –

1)व्यवसायची नोंद करणे हे सर्वात महत्वाचे असते.

2) जिल्हाधिकारी कार्यालयातून Explosives License (फॉर्म 20 ) घेणे. 

3) तो व्यवसाय चालवण्यासाठी नगरपालिका किंवा ग्रामपंचायतिकडून परवानगी घेणे.

4) दुकान नोंदणीसाठी Shop Act License काढणे.

5) भारतात या व्यवसायासाठी PESO (petroleum and Explosive Safety Organization) चे नियम पाळणे महत्वाचे आहे.

6) या व्यवसायाची आर्थिक उलाढाल सरकारी मर्यादेपेक्षा जास्त असेल तर GST नोंदणी करावी.

महत्वाचं म्हणजे आपल दुकान हे शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, पेट्रोल पंप यांपासून किमान 100 मीटर अंतरावर असावे.

नियम व जबाबदारी :

या व्यवसायात (Firecracker buisness) नका कमविणे जेवढे महत्वाचे असते त्याही पेक्षा नियम पाळणे देखील तितकेच महत्वा चे असते. फटाके हा ज्वलनशील पदार्थ आहे त्यामुळे या Firecracker buisness व्यवसायच्या संबंधित जे काही कायदेशीर नियम पाळणे त्याचबरोबर पर्यावरणाची काळजी घेणे महत्वाचे आहे. सर्व काही नियम आणि देशाचा जबाबदार नागरिक म्हणून योग्य ते पालन केल्यास अपघात टाळता येतात आणि ग्राहकांचा आपल्यावरती असणारा विश्वासदेखील वाढतो.

1) दुकानात धूम्रपान अजिबात करू नये.

2) दिवसभरातच विक्री करण्याचा प्रयत्न करावा.

3) दुकानातील इलेक्ट्रिक वायरिंग ही चांगल्या प्रकारची वापरा.

4) अग्निशमन यंत्र आणि पाणी जवळ ठेवा.

ग्रीन फटाके :

सण-उत्सवांमध्ये फटाक्यांना विशेष महत्त्व असले तरी पारंपरिक फटाक्यांमुळे धूर, आवाज आणि वायूप्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढते. यावर उपाय म्हणून “ग्रीन फटाके” ही संकल्पना पुढे आली आहे.आजकाल प्रदूषणरहित सणांची संकल्पना अमलात आणली जाते. त्यामुळे प्रदूषण कमी करण्यासाठी ग्रीन फटाके वापरले जातात. ग्रीन फटाके हे कायम वापरल्या जाणाऱ्या फटाक्यांच्या तुलनेत कमी प्रदूषण करतात त्यामुळे सरकारही अशा फटाक्यांना प्रोत्साहन देते.

ग्रीन फटाक्यांमध्ये सल्फर आणि इतर घातक रसायनांचे प्रमाण कमी असते. त्यामुळे हवेमधील प्रदूषण कमी होते आणि श्वसनाच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता घटते. विशेषतः लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि दमा किंवा हृदयविकार असलेल्या लोकांसाठी हे फटाके अधिक सुरक्षित मानले जातात.

आजकाल ग्राहकांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता वाढत असल्यामुळे ग्रीन फटाक्यांची मागणी झपाट्याने वाढत आहे. अनेक सरकारे आणि पर्यावरण संस्था देखील अशा फटाक्यांना प्रोत्साहन देत आहेत. त्यामुळे फटाके विक्री व्यवसाय करणाऱ्यांसाठी ग्रीन फटाके विकणे ही भविष्यातील फायदेशीर संधी ठरू शकते.

पर्यावरणाचे संरक्षण करत आनंद साजरा करण्यासाठी ग्रीन फटाके हा उत्तम पर्याय मानला जातो. “कमी प्रदूषण, अधिक आनंद” हीच ग्रीन फटाक्यांची खरी ओळख आहे.

 व्यवसाय यशस्वी होण्यासाठी काही टिप्स :

 ब्रँडेड आणि कमी प्रमाणात फटाके ठेवा. 

खरेदी करणार्यांना ‘ ग्रीन फटाके ‘ वापरण्यासाठी प्रोत्साहित करा. 

जास्तीत जास्त सोशल मीडियावर प्रचार करा. 

सण येण्याअगोदरच पुरवठा साठवून ठेवा. 

Family pack, kids pack, wedding pack आकर्षक ऑफर साठी तयार ठेवा.

थोडी कल्पकता, कायदेशीर तयारी आणि सुरक्षितता बाळगली तर हा व्यवसाय फटाक्यानसारखाच प्रकाशमान आणि नफयाचा ठरू शकतो.

आजच्या काळात ग्राहक पर्यावरणपूरक आणि सुरक्षित पर्यायांना अधिक पसंती देत आहेत. त्यामुळे ग्रीन फटाके आणि दर्जेदार उत्पादनांची विक्री करणारे व्यावसायिक भविष्यात अधिक यशस्वी होऊ शकतात. योग्य मार्केटिंग, प्रामाणिक व्यवहार आणि उत्तम सेवा यांच्या जोरावर फटाके विक्री व्यवसाय आर्थिक प्रगतीसह समाजामध्ये विश्वास आणि प्रतिष्ठा निर्माण करणारा प्रकाशमान मार्ग ठरू शकतो.


  • Related Posts

    भारतामध्ये झपाट्याने वाढणारे व्यवसाय – भविष्यातील मोठी संधी. New buisness startup ideas in India.

    New buisness startup ideas in India – जगात सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक अर्थव्यवस्था ही भारताची आहे. डिजिटल क्षेत्रातील क्रांती, इंटरनेटचा वाढता वापर, बदलती जीवनशैली, स्टार्टअप संस्कृती आणि सरकारच्या…

    AI मुळे हजारो लोकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागत आहे? काय आहे खरं सत्य..AI (Artificial Intelligence) job impact.

    AI (Artificial Intelligence) – मागच्या काही दिवसांमध्ये AI मुळे हजारो लोकांच्या नोकऱ्या जात आहेत असं दिसून आलं आहे. पण हे खरं आहे का? आणि असेल तर यामागची कारण काय असावीत…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    भारतामध्ये झपाट्याने वाढणारे व्यवसाय – भविष्यातील मोठी संधी. New buisness startup ideas in India.

    भारतामध्ये झपाट्याने वाढणारे व्यवसाय – भविष्यातील मोठी संधी. New buisness startup ideas in India.

    अष्टविनायक दर्शन शास्त्रशुद्ध पद्धतीने कसे करावे? Ashtvinayak Darshn.

    अष्टविनायक दर्शन शास्त्रशुद्ध पद्धतीने कसे करावे? Ashtvinayak Darshn.

    बुद्धिबळाचा मोहक इतिहास – प्राचीन चतुरंग ते आधुनिक बुद्धिबळ. History of chess.

    बुद्धिबळाचा मोहक इतिहास – प्राचीन चतुरंग ते आधुनिक बुद्धिबळ. History of chess.

    विविधतेने नटलेल्या भारताबद्दलची 8 मनोरंजक तथ्य – त्यामध्ये महाराष्ट्रातील एक ! Interesting facts in India.

    विविधतेने नटलेल्या भारताबद्दलची 8 मनोरंजक तथ्य – त्यामध्ये महाराष्ट्रातील एक ! Interesting facts in India.

    इथे आपण थ्रीलसाठी जातो, जीव गमावण्यासाठी नाही! Adventure activities in India.

    इथे आपण थ्रीलसाठी जातो, जीव गमावण्यासाठी नाही! Adventure activities in India.

    AI तुमची नोकरी घेणार नाही, पण AI शिकलेली व्यक्ती नक्कीच पुढे जाईल.. 10 प्रमुख AI स्टार्टअप्स. AI startups in india.

    AI तुमची नोकरी घेणार नाही, पण AI शिकलेली व्यक्ती नक्कीच पुढे जाईल.. 10 प्रमुख AI स्टार्टअप्स. AI startups in india.