Virtual Currency World – खिशात नाणी नाहीत, हातात नोटा नाहीत, तरीही व्यवहार मात्र पूर्ण होतात – कारण हे आभासी चलनाचे जग आहे. जिथे पैसा आता कागदी किंवा नाण्यांच्या स्वरूपात नसून ‘डिजिटल ‘ रूपात अस्तित्वात आहे.
पूर्वीच्या काळी व्यवहार हे रोख रकमेतून केले जायचे किंवा मग बँकेचा वापर करून व्यवहार होत असत. परंतु आजच्या डिजिटल युगात पैशाचा व्यवहार करण्याचे स्वरूप हे झपाट्याने बदलत आहे. आता इंटरनेटचा वापर करून “अभासी चलन ” म्हणजेच “virtual currency ” द्वारे आर्थिक व्यवहार वेगाने केले जात आहेत. अशा व्यवहारामध्ये कोणत्याही नोटा किंवा नाणी यांची गरज भासत नाही.

Virtual Currency World:
आभासी चलन म्हणजे काय?
एक क्लिक, एक QR कोड किंवा एक क्रिप्टो ट्रांजैक्शन आणि व्यवहार पूर्ण!यालाच म्हणतात आभासी चलनाच जग जिथं पैसा डोळ्यांना दिसत नाही, परंतु त्याचा प्रवाह मात्र सतत सुरु असतो.
Virtual Currency म्हणजे असे चलन जे फक्त इलेक्ट्रॉनिक स्वरूपात अस्तित्वात असते. याला कोणतेच भौतिक रूप नसते कारण ते बँक खाते, मोबाईल वॉलेट किंवा ब्लॉकचेनवर नोंदवलेले असते. UPI व्यवहार,क्रिप्टोकरन्सी (बिटकॉइन इ.), डिजिटल वॉलेट (Google pay, Paytm,Phone pay).
Virtual Currency हे ब्लॉकचेन या तंत्रज्ञानावर आधारित आहे. यामध्ये जो व्यवहार होतो त्याची नोंद ही सुरक्षित आणि पारदर्शक पद्धतीने केली जाते. त्यामुळे यात काही अफरातफर करणे निव्वळ अश्यक्य आहे.
आभासी चलन कसे कार्य करते?
Virtual Currency इंटरनेट आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या मदतीने कार्य करते. जेव्हा एखादी व्यक्ती Bitcoin किंवा इतर डिजिटल चलनाद्वारे व्यवहार करते, तेव्हा तो व्यवहार एका सुरक्षित डिजिटल नेटवर्कवर पाठवला जातो. या नेटवर्कमध्ये जगभरातील अनेक संगणक व्यवहाराची पडताळणी करतात. व्यवहार योग्य असल्याचे निश्चित झाल्यानंतर तो “ब्लॉक” मध्ये नोंदवला जातो आणि हा ब्लॉक आधीच्या व्यवहारांच्या साखळीशी जोडला जातो, ज्याला “ब्लॉकचेन” म्हटले जाते. त्यामुळे व्यवहारांची माहिती सुरक्षित, पारदर्शक आणि कायमस्वरूपी जतन केली जाते.
आभासी चलनासाठी वापरकर्त्यांकडे डिजिटल वॉलेट असते, ज्यामध्ये त्यांचे चलन सुरक्षित ठेवले जाते. कोणत्याही बँकेशिवाय किंवा मध्यस्थाशिवाय थेट व्यक्ती ते व्यक्ती व्यवहार होऊ शकतात, त्यामुळे व्यवहार जलद आणि कमी खर्चात पूर्ण होतात.
आभासी चलनाचे प्रकार कोणते?
1. क्रिप्टोकरन्सी (cryptocurrency)
अभासी चलनामध्ये सर्वात जास्त वापरली जाणारी श्रेणी म्हणजे क्रिप्टोकरन्सी. हे चलन कोणत्याही बँकेच्या किंवा सरकारच्या थेट नियंत्रणाखाली नसते. क्रिप्टोकरन्सी “ब्लॉकचेन ” (व्यवहारांची डिजिटल साखळी )तंत्रज्ञानावर आधारित असते.
उदाहरणे :
1. Bitcoin – 2009 साली सुरु झालेले पहिले digital चलन. याला “digital gold ” असेही म्हटले जाते.
2. Ethereum – स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट आणि ऍप साठीचा प्रसिद्ध प्लॅटफॉर्म.
3. Dogecoin – मजेशीर पद्धतीने सुरु झालेलं पण प्रसिद्ध असं डिजिटल चलन.
4. Litecoin – फास्ट व्यवहारांसाठी ओळखली जाणारी क्रिप्टोकरन्सी.
2. सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CBDL):
काही देशांमध्ये अधिकृत चालणाचे डिजिटल रुप तयार केले जात आहे.आपल्या देशातही Reserve bank of India ने “डिजिटल रुपया “सुरु करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.
3. गेमिंग आणि ऑनलाईन टोकन :
ऑनलाईन गेम आणि ऍप्समध्ये वापरले जाणारे कॉइन हे देखील अभासी चलनाचाच एक भाग आहे.
आभासी चलनाचे फायदे:
1. जगात आपण कोणालाही काही सेकंदात पैसे पाठवू शकतो.
2. प्रत्यक्ष व्यक्तीं-व्यक्तिमध्ये व्यवहार होतो त्यामुळेच बँकेची गरज भासत नाही.
3. फसवणूकीची शक्यता कमी असते.
4. बिटकॉईन सारख्या गुंतवणूकीमुळे काही लोकांनी मोठ्या प्रमाणावर नफा कमवला आहे.
आभासी चलनाचे तोटे :
1.अनेक देशांमध्ये याबद्दल स्पष्ट कायदे नाहीत.
2. एका दिवसातही चलनाची किंमत मोठ्या प्रमाणावर कमी जास्त होते.
3. डिजिटल असल्यामुळे हॅकिंगचा धोका असतो.
4. सर्वसामान्य लोकांना याची नीट माहिती नसल्यामुळे फसवणूकीचा धोका वाढतो.
भारतातील अभासी चलनाची स्थिती:
अनेक तरुण गुंतवणूकदार हे Virtual Currency डिजिटल मालमत्तेकडे वळत आहेत त्यामुळे भारतामध्येही क्रिप्टोकरन्सी बाबत उत्सुकता वाढताना दिसून येत आहे. तरीपण, सरकार आणि Reserve Bank of India यांनी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला नागरिकांना दिला आहे कारण काही वेळा योग्य माहितीच्या अभावी तुमच्यासोबत धोका होऊ शकतो. भारत सरकार डिजिटल रुपयावर भर देत असून भविष्यात डिजिटल अर्थव्यवस्था अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे.
भविष्यामध्ये येणाऱ्या संधी :
या चालनामुळे भविष्यामध्ये बँकिंग, ऑनलाईन शॉपिंग, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आर्थिक व्यवहार अधिक वेगवान होऊ शकतात. अनेक तज्ञ् लोकांच्या मते पुढील दशकात डिजिटल चलनाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.
आपल्या भारत देशामध्ये Virtual Currency हे कायदेशीर मान्यतेच्या सीमारेषेवर आहे. कारण भारतीय रिझर्व बँकेने डिजिटल रुपया आणण्याची घोषणा केली आहे, जो सरकारी नियंत्रणाखाली असेल. आणि हा केवळ पैशांचा नाही तर विश्वासाचा क्रांतिकारक बदल आहे.
निष्कर्ष :
यावरूनच लक्षात येते कि, जगातील सर्वात मोठे परिवर्तन किंवा बदल म्हणजेच आधुनिक तंत्रज्ञानाने बनविलेले Virtual Currency होय. यामुळे संपूर्ण जगातील व्यवहार हे अधिक जलद, सुरक्षित आणि जागतिक स्तरावर सोपे झालेले आहेत. मात्र, गुंतवणूक करताना योग्य माहिती, सावधगिरी आणि सुरक्षितता अतिशय महत्वाची आहे. येणाऱ्या काळामध्ये डिजिटल अर्थव्यवस्थेचा विस्तार वेगाने वाढत जाईल आणि त्यामुळे अभासी चालणाचे महत्व मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे.







