Bombay Blood Group म्हणजे काय? हा रक्तगट इतका दुर्मिळ का आहे, त्याची वैशिष्ट्ये, रक्तदानाचे महत्त्व, काळजी आणि संपूर्ण माहिती मराठीत जाणून घ्या.
रक्तगट आपल्या शरीरातील एक महत्वाची ओळख आहे.रक्तगट ही केवळ वैद्यकीय ओळख नसून अनेक वेळा ती जीवन-मरणाचा प्रश्न ठरू शकते.
रक्तगट म्हणजे काय? (What is a Blood Group?)
रक्तगट म्हणजे लाल रक्तपेशींच्या (Red Blood Cells) पृष्ठभागावर असलेल्या विशिष्ट अँटिजेन्स (Antigens) आणि रक्तातील प्रतिपिंडे (Antibodies) यांच्या आधारे केलेले वर्गीकरण होय.
- रक्तगट म्हणजे काय? (What is a Blood Group?)
- रक्तगट हे प्रामुख्याने दोन प्रणालीवर अवलंबून असतात-
- बॉम्बे रक्तगट म्हणजे काय?
- हा रक्तगट किती दुर्मिळ आहे?
- Bombay Blood Group कसा ओळखला जातो?
- बॉम्बे रक्तगटाची वैशिष्ट्ये
- बॉम्बे रक्तगटाची अडचण काय?
- हा रक्तगट कसा तयार होतो?
- रक्तदानाचे महत्त्व:
- या रक्तगटाशी संबंधित व्यक्तींची यादी उपलब्ध आहे का?
- रक्तदान करणाऱ्या दात्याच्या आरोग्यासाठी होणारे फायदे :
- बॉम्बे रक्तगट असलेल्या व्यक्तींनी कोणती काळजी घ्यावी?
- भारतात बॉम्बे रक्तगटाचे महत्त्व
- बॉम्बे रक्तगटाविषयी काही रोचक तथ्ये
- निष्कर्ष

रक्तगट हे प्रामुख्याने दोन प्रणालीवर अवलंबून असतात-
1. ABO प्रणाली.
2. Rh फॅक्टर (positive /Negative )
> ABO प्रणाली मध्ये A , B, AB, O हे चार प्रकार येतात.
> Rh फॅक्टर मध्ये Rh positive (+) आणि Rh Negative (-)हे दोन प्रकार असतात.
> या दोन प्रणालिंमुळे एकूण 8 रक्तगट तयार होतात – A+, A-, B+, B-,AB+,AB-,O+,O-.
A, B, AB आणि O हे सर्वसामान्य रक्तगट आपण ऐकलेले असतात. पण तुम्हाला माहित आहे का की या सर्वांपेक्षा वेगळा, अत्यंत दुर्मिळ असा ‘बॉम्बे रक्तगट’ (Bombay Blood Group) अस्तित्वात आहे? भारतात शोध लागलेला हा रक्तगट आजही वैद्यकीय जगात एक मोठे आश्चर्य मानले जाते.
बॉम्बे रक्तगट म्हणजे काय?
What is Bombay Blood Group?
१९५२ साली मुंबई इथे पहिल्यांदाच या रक्तगटाचा शोध लागला, त्यावेळी मुंबईला बोम्बे असे म्हटलेलं जायचे म्हणून याला बॉम्बे रक्तगट असे नाव देण्यात आले आहे. वैद्यकीय भाषेत याला Oh (ओ एच) रक्तगट असेही म्हणतात.या रक्तगटात A, B किंवा O असे कोणतेही अँटिजेन नसतात. विशेष म्हणजे, O रक्तगटापेक्षाही हा वेगळा असतो, त्यामुळे O रक्तगटाचे रक्तही बॉम्बे रक्तगटाच्या रुग्णाला देता येत नाही.
Bombay Blood Group असलेल्या व्यक्तींमध्ये H Antigen देखील नसतो. सामान्य O रक्तगटामध्ये H Antigen असतो, त्यामुळे O रक्तगटाचे रक्तसुद्धा Bombay Blood Group असलेल्या व्यक्तीला देता येत नाही. हीच या रक्तगटाची सर्वात मोठी वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे.
हा रक्तगट किती दुर्मिळ आहे?
How rare is this bombay blood group?
जगभरात अंदाजे १ कोटी लोकांपैकी १ व्यक्तीमध्ये हा रक्तगट आढळतो. भारतात तो तुलनेने अधिक प्रमाणात दिसून येतो आणि साधारण १०,००० ते २,५०,००० व्यक्तींमागे १ व्यक्तीमध्ये आढळल्याची नोंद विविध अभ्यासांमध्ये करण्यात आली आहे.
Bombay Blood Group कसा ओळखला जातो?
सामान्य Blood Group Test मध्ये Bombay Blood Group अनेकदा O Blood Group असल्याचा भास होऊ शकतो. त्यामुळे विशेष H Antigen Test किंवा Advanced Blood Typing करूनच त्याची निश्चित ओळख पटवली जाते.
बॉम्बे रक्तगटाची वैशिष्ट्ये
- अत्यंत दुर्मिळ रक्तगट
- Oh Blood Group म्हणून ओळख
- H Antigen नसतो
- फक्त Bombay Blood Group कडूनच रक्त घेऊ शकतो
- विशेष रक्त तपासणी आवश्यक
- आपत्कालीन परिस्थितीत रक्त मिळवणे कठीण
बॉम्बे रक्तगटाची अडचण काय?
बॉम्बे रक्तगट असलेल्या व्यक्तीला फक्त बॉम्बे रक्तगटाचेच रक्त चालते इतर कोणताही रक्तगट दिल्यास त्याचे परिणाम हे गंभीर होऊ शकतात. तपासणीत तो O blood group सारखा दिसतो,तरी प्रत्यक्षात तो पूर्णपणे वेगळा असतो आणि फक्त Bombay Blood Group कडूनच रक्त घेऊ शकतो अशा रक्तगटाच्या व्यक्तीसाठी अपघात किंवा शस्त्रक्रियेच्या वेळी रक्त मिळवणे मोठे आव्हान ठरते.म्हणूनच या रक्तगटाच्या व्यक्तींनी नेहमी ब्लड ग्रुप कार्ड जवळ ठेवणे अत्यंत आवश्यक असते.
हा रक्तगट कसा तयार होतो?
हा रक्तगट जनुकीय (Genetic) कारणांमुळे तयार होतो.आई-वडिल दोघांकडूनही दुर्मिळ जनुक मिळाल्यासच हा रक्तगट तयार होतो. त्यामुळे एकाच कुटुंबातही तो फारच क्वचित आढळून येतो. दोघांकडेही hh gene असणे आवश्यक असते त्यामुळे म्हणूनच हा रक्तगट दुर्मिळ आणि अत्यंत खास मानला जातो.
रक्तदानाचे महत्त्व:
रक्तदान म्हणजे एखाद्या व्यक्तीने स्वतःचे रक्त देऊन दुसऱ्याचा जीव वाचवणे. हे एक सामाजिक कर्तव्य नसून माणुसकीची खरी सेवा आहे.ऍक्सिडेंट, शस्त्रक्रिया, डिलिव्हरी अशा परिस्तिथीत अनेक रुग्णांना रक्ताची गरज असते. अशावेळी तुम्ही donate केलेलं ब्लड एखाद्याचा जीव वाचवू शकते.रक्ताचा साठा असणं ही एक गरज आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये याच साठ्याचा उपयोग होऊ शकतो.काही लोकांचं रक्तगट हा खूपच दुर्मिळ असतो, जसे की bombay blood group. अशा लोकांसाठी रक्तदान म्हणजे एक प्रकारचे जीवदानच ठरत.बॉम्बे रक्तगट असलेली व्यक्ती रक्तदान करत असेल, तर ते रक्त अनेकांचे प्राण वाचवू शकते. म्हणूनच: या रक्तगटाच्या लोकांनी रक्तदानासाठी पुढे येणे गरजेचे आहे.विशेषत: रक्तपेढ्यांमध्ये नोंदणी करून आपत्कालीन परिस्थितीत संपर्कात राहावे.
या रक्तगटाशी संबंधित व्यक्तींची यादी उपलब्ध आहे का?
Bombay Blood Group असलेल्या व्यक्तींची सार्वजनिक यादी उपलब्ध नाही. ही माहिती वैद्यकीय गोपनीयतेखाली ठेवली जाते. या रक्तगटाचे प्रमुख कारण म्हणजे तो अत्यंत दुर्मिळ असून व्यक्तींची माहिती बर्याच वेळा गोपनीय ठेवली जाते किंवा वैद्यकीय रजिस्टरमध्ये नोंदवली जाते, परंतु ती सार्वजनिकपणे जाहीर होत नाही.
रक्तदान करणाऱ्या दात्याच्या आरोग्यासाठी होणारे फायदे :
- रक्तदान केल्याने शरीरात नवीन रक्त पेशी तयार होतात.
- आपल्या शरीरातील लोह ( iron ) संतुलित राहते.
- काही संशोधनांमध्ये नियमित रक्तदानामुळे शरीरातील अतिरिक्त Iron कमी होण्यास मदत होऊ शकते, परंतु हृदयविकाराचा धोका कमी होतो याबाबत अद्याप निश्चित निष्कर्ष उपलब्ध नाहीत.
- याबरोबरच आपण कोणाच्यातरी जीवनासाठी उपयोगी पडलो याची जाणीव खूप मोठी असते आणि हीच जाणीव आपल्याला एक मानसिक समाधान देऊन जाते.
बॉम्बे रक्तगट हा केवळ दुर्मिळ नाही, तर जीवनासाठी अत्यंत संवेदनशील असा रक्तगट आहे. याबद्दल जनजागृती होणे गरजेचे आहे. योग्य माहिती, वेळेवर रक्तदान आणि सजगता यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात.
Bombay Blood Group असलेली व्यक्ती इतर सामान्य रक्तगटांना रक्त देऊ शकत नाही. मात्र Bombay Blood Group असलेल्या दुसऱ्या व्यक्तीला जीवनदान देऊ शकते. त्यामुळे अशा दात्यांची नोंदणी अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
बॉम्बे रक्तगट असलेल्या व्यक्तींनी कोणती काळजी घ्यावी?
- नेहमी Blood Group Card जवळ ठेवा.
- मोबाईल Medical ID मध्ये Blood Group सेव्ह करा.
- जवळच्या Blood Bank मध्ये नोंदणी करा.
- कुटुंबातील सदस्यांनीही Blood Group तपासून घ्यावा.
- Emergency Contact तयार ठेवा.
- नियमित आरोग्य तपासणी करा.
भारतात बॉम्बे रक्तगटाचे महत्त्व
- भारतातच प्रथम शोध लागला.
- काही राज्यांमध्ये प्रमाण तुलनेने जास्त.
- Rare Blood Donor Registry ची गरज.
- Blood Banks मध्ये स्वतंत्र नोंदणी केली जाते.
बॉम्बे रक्तगटाविषयी काही रोचक तथ्ये
✔ या रक्तगटाचा शोध १९५२ मध्ये मुंबईमध्ये लागला.
✔ याला Oh Blood Group असेही म्हणतात.
✔ O Blood Group असूनही त्याचे रक्त वापरता येत नाही.
✔ जगातील सर्वात दुर्मिळ रक्तगटांपैकी हा एक आहे.
✔ Emergency मध्ये रक्त शोधण्यासाठी अनेकदा संपूर्ण देशभर संपर्क साधावा लागतो.
✔ काही देशांमध्ये Rare Blood Donor Registry तयार करण्यात आली आहे.
निष्कर्ष
Bombay Blood Group हा जगातील सर्वात दुर्मिळ आणि अत्यंत संवेदनशील रक्तगटांपैकी एक आहे. या रक्तगटाबाबत योग्य माहिती, वेळेवर निदान, रक्तपेढ्यांमध्ये नोंदणी आणि नियमित रक्तदान यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचू शकतात. रक्तदान ही केवळ सामाजिक जबाबदारी नसून माणुसकीची सर्वोच्च सेवा आहे. विशेषतः दुर्मिळ रक्तगट असलेल्या व्यक्तींनी आपली माहिती अद्ययावत ठेवून गरजूंना मदत करण्यासाठी सदैव तयार राहणे आवश्यक आहे.







