आंब्याच्या झाडांवरील प्रामुख्याने पडणारे रोग कोणते आणि त्यावरील उपाय काय आहेत…Mango diseases and their management.

Mango diseases and their management – आंबा हा भारतातील अत्यंत महत्त्वाचा आणि लोकप्रिय फळांपैकी  एक आहे. परंतु या फळझाडाची योग्य काळजी न घेतली गेली नाही तर वेगवेगळ्या  रोगांमुळे आंब्याच्या उत्पादनात घट येऊ शकते. 

आज आपण आपल्या ब्लॉगमध्ये आंब्याच्या झाडांवर पडणारे प्रमुख रोग कोणते आहेत , त्यांची लक्षणे काय असतात , कोणत्या कारणामुळे हा रोग पडतो आणि त्या रोगावरील  प्रभावी उपाय काय आहेत हे जाणून घेऊयात.

mango diseases and their management

Mango diseases and their management

1.अन्थ्रॅक्नोज (Anthracnose):

हा आंब्याच्या झाडावर पडणारा एक गंभीर बुरशी रोग आहे तो प्रामुख्याने Colletotrichum gloeosporioides या बुरशीमुळे होतो. या रोगाची लक्षणे म्हणजे पानांवर काळे किंवा तपकिरी डाग दिसतात, आंब्याच्या मोहरावर याचा परिणाम होऊन तो  सुकतो आणि फळांवरही काळे ठिपके पडतात, याचा कारणांमुळे आंब्याची वाढ थांबते व झाडाला लागलेले आंबे गळू शकतात. पावसाळी वातावरणात  हा रोग वेगाने पसरतो. Mango diseases and their management या रोगाच्या  नियंत्रणासाठी संक्रमित पाने व फांद्या छाटून टाकणे आवश्यक आहे.यावर उपाय हा  1% बोर्डो मिश्रण, Mancozeb किंवा Carbendazim यांसारख्या बुरशीनाशकांची योग्य वेळी फवारणी केल्यास या रोगाचा प्रादुर्भाव कमी करता येतो.

2.पावडरी मिल्ड्यू (Powdery Mildew):

हा आंब्यावरील एक सामान्य पण नुकसानकारक बुरशीजन्य रोग असून तो Oidium mangiferae या बुरशीमुळे होतो. या रोगामध्ये पानांवर, फुलांवर आणि कोंबांवर पांढऱ्या पावडरसारखा थर दिसतो, ज्यामुळे प्रकाशसंश्लेषण कमी होते, मोहराची वाढ थांबते  त्यामुळे फळ वाढही कमी होते. कोरडे व थंड हवामान म्हणजेच हिवाळा हा ऋतू या रोगाच्या वाढीस पोषक ठरतो. या रोगाच्या योग्य नियंत्रणासाठी सल्फरयुक्त बुरशीनाशकांची फवारणी करावी किंवा Hexaconazole 1 मि.ली. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. वेळेवर उपाय केल्यास हा रोग सहज नियंत्रित करता येतो. Mango diseases and their management

3.ब्लॅक स्पॉट (Black Spot):

हा आंब्यावरील एक बुरशीजन्य रोग असून तो प्रामुख्याने Guignardia mangiferae या बुरशीमुळे होतो. या रोगामध्ये फळांवर लहान काळे डाग दिसू लागतात आणि हळूहळू ते वाढत जाऊन फळांची गुणवत्ता कमी होते, तसेच बाजारातील अशा फळांचा भाव हा कमी होतो. आर्द्र वातावरण या रोगाच्या प्रसाराला पोषक ठरते. Mango diseases and their management आंब्याची फळबाग नेहमी स्वच्छ ठेववावी , रोग पडलेली फळे व पाने काढून टाकावी  आणि Copper oxychloride सारख्या बुरशीनाशकांची योग्य वेळी फवारणी करावी. 

4.स्टेम एंड रॉट (Stem End Rot) 

हा आंब्यावरील एक गंभीर बुरशीजन्य रोग असून तो प्रामुख्याने Diplodia natalensis या बुरशीमुळे होतो. या रोगामध्ये फळाच्या देठाजवळ (stem end) काळसर सडल्यासारखे डाग दिसू लागतात  आणि हळूहळू हे डाग संपूर्ण फळावर पसरतात, त्यामुळे फळ पिकण्यापूर्वी खराब होते. विशेषतः आंबा झाडावरून काढल्यानंतर जेव्हा तो साठवला जातो हा रोग अधिक वाढतो. या रोगाच्या नियंत्रणासाठी फळे काढल्यानंतर Carbendazim द्रावणात सुमारे 5 मिनिटे बुडवणे उपयुक्त ठरते, तसेच स्वच्छ आणि योग्य साठवणूक व्यवस्था ठेवणे आवश्यक आहे. वेळेवर उपाय केल्यास या रोगामुळे होणारे नुकसान कमी करता येते.

5.डाय बॅक (Die Back) 

हा आंब्यावरील एक गंभीर बुरशीजन्य रोग असून तो Lasiodiplodia theobromae या बुरशीमुळे होतो. या रोगामध्ये फांद्यांच्या टोकांपासून सुकणे सुरू होते आणि हळूहळू सुकत ते झाडाच्या बुडापर्यंत पसरत जाते, ज्यामुळे पाने गळतात आणि झाडाची वाढ खुंटते. या रोगावर वेळेवर नियंत्रण न मिळवल्यास संपूर्ण फांदी मरू शकते. या रोगाच्या नियंत्रणासाठी संक्रमित  फांद्या निरोगी भागापर्यंत छाटणे  आवश्यक आहे, तसेच छाटलेल्या भागावर Bordeaux पेस्ट लावावी आणि Bordeaux मिश्रण किंवा Copper oxychloride यांसारख्या बुरशीनाशकांची फवारणी करावी. योग्य काळजी घेतल्यास या रोगाचा प्रादुर्भाव प्रभावीपणे कमी करता येतो. 

Mango diseases and their management-आंब्यावरील अन्थ्रॅक्नोज, पावडरी मिल्ड्यू, ब्लॅक स्पॉट, स्टेम एंड रॉट आणि डाय बॅक हे रोग झाडापासून मिळणाऱ्या  उत्पादन आणि फळाच्या गुणवत्तेला मोठा धोका निर्माण करतात. मात्र, वेळेवर रोगांची ओळख करून योग्य उपाययोजना केल्यास या सर्व रोगांवर प्रभावी नियंत्रण मिळवता येते. बागेची स्वच्छता राखणे, रोगग्रस्त भाग त्वरित काढून टाकणे, योग्य अंतरावर झाडाची लागवड करणे आणि शिफारस केलेल्या बुरशीनाशकांची फवारणी करणे हे यशस्वी व्यवस्थापनाचे मुख्य घटक आहेत. शास्त्रीय पद्धतींचा अवलंब आणि नियमित निरीक्षण यामुळे आंब्याचे झाड निरोगी राहते व भरघोस, दर्जेदार उत्पादन मिळते.

म्हणूनच आंब्याच्या झाडांवरील प्रमुख रोग ओळखणे आणि त्यावर वेळेवर योग्य उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे. योग्य काळजी, नियमित निरीक्षण आणि प्रतिबंधात्मक उपाय केल्यास या रोगांवर प्रभावी नियंत्रण मिळवता येते आणि निरोगी, भरघोस उत्पादन घेणे शक्य होते. Mango diseases and their management.

स्वच्छता, योग्य व्यवस्थापन आणि वेळेवर फवारणी केल्यास आंब्याच्या झाडांना रोगांपासून सहज वाचवता येते आणि उत्पादनही वाढते.

Related Posts

अलिबागचा पांढरा कांदा – कोकणातील एक अनमोल शेती वारसा. Alibag white onion.

भारतातील शेतीमध्ये कांद्याला एक महत्त्वाचे स्थान आहे. विशेषतः महाराष्ट्रातील अलिबाग परिसरातील पांढरा कांदा ( Alibag white onion) देश-विदेशात प्रसिद्ध आहे. या कांद्याच्या वैशिष्ट्यांमुळे त्याला ‘जीआय टॅग’ (Geographical Indication Tag) मिळाला…

योग्य मातीची निवड – रोपांच्या आरोग्याचा पाया. Types of soil for tree plantation.

Types of soil – कोणतेही नवीन रोप लावताना ते रोप निरोगी आणि चांगल्या प्रकारे कसे वाढेल याची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे असते. ही काळजी घेताना त्या रोपासाठी लागणारी माती निवडणे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

भारतामध्ये झपाट्याने वाढणारे व्यवसाय – भविष्यातील मोठी संधी. New buisness startup ideas in India.

भारतामध्ये झपाट्याने वाढणारे व्यवसाय – भविष्यातील मोठी संधी. New buisness startup ideas in India.

अष्टविनायक दर्शन शास्त्रशुद्ध पद्धतीने कसे करावे? Ashtvinayak Darshn.

अष्टविनायक दर्शन शास्त्रशुद्ध पद्धतीने कसे करावे? Ashtvinayak Darshn.

बुद्धिबळाचा मोहक इतिहास – प्राचीन चतुरंग ते आधुनिक बुद्धिबळ. History of chess.

बुद्धिबळाचा मोहक इतिहास – प्राचीन चतुरंग ते आधुनिक बुद्धिबळ. History of chess.

विविधतेने नटलेल्या भारताबद्दलची 8 मनोरंजक तथ्य – त्यामध्ये महाराष्ट्रातील एक ! Interesting facts in India.

विविधतेने नटलेल्या भारताबद्दलची 8 मनोरंजक तथ्य – त्यामध्ये महाराष्ट्रातील एक ! Interesting facts in India.

इथे आपण थ्रीलसाठी जातो, जीव गमावण्यासाठी नाही! Adventure activities in India.

इथे आपण थ्रीलसाठी जातो, जीव गमावण्यासाठी नाही! Adventure activities in India.

AI तुमची नोकरी घेणार नाही, पण AI शिकलेली व्यक्ती नक्कीच पुढे जाईल.. 10 प्रमुख AI स्टार्टअप्स. AI startups in india.

AI तुमची नोकरी घेणार नाही, पण AI शिकलेली व्यक्ती नक्कीच पुढे जाईल.. 10 प्रमुख AI स्टार्टअप्स. AI startups in india.