पाच दरवाज्यांच्या पलीकडचे जग : जिथे इतिहास,भय  आणि आशा  एकत्र येतात. Mysterious doors in the world.

Mysterious doors in the world – इतिहासाची जिवंत साक्ष असणारी जगभरातील अनेक ठिकाणे ही लोकांसाठी एक आकर्षणाचा भाग आहेत. त्यातील काही ठिकाणे ही त्यांच्या रहस्य, संघर्ष आणि भावनिक कथेसाठी ओळखली जातात. या जगात असे अनेक रहस्यमय बंद दरवाजे देखील आहेत त्यातील काही दरवाजे हे प्राचीन खजिन्यांशी जोडलेले आहेत, काही दरवाजे हे भूतांटकीच्या कथेमुळे प्रसिद्ध झालेले आहेत, तर काही दरवाजे हे मानवजातीच्या भविष्याचे रक्षण करण्यासाठी तयार केले गेले आहेत. इतिहास, श्रद्धा, आणि रहस्य यांच्या सांगमातून तयार झालेल्या जागा आजही अनेक प्रश्न निर्माण करतात. “पाच दरवाज्यांच्या पलीकडचे जग” हे खरच रहस्यमय आहे. कारण या दरवाज्यांमागे इतिहास, भीती आणि आश्चर्य लपलेले आहे.

Mysterious doors in the world

Mysterious doors in the world:

1.पद्मनाभस्वामी मंदिराचा गुप्त दरवाजा : भारत 

      हे मंदिर केरळमधील तिरुवनंतपूरम या ठिकाणी आहे.या ठिकाणाचे रहस्य म्हणजे या मंदिरात सहा गुप्त दरवाजे आहेत, त्याच सहा दरवाज्यापैकी ‘व्हॉल्ट बी ‘ हा दरवाजा अजूनही उघडला नाही. यामागची कथा सांगते की तो दरवाजा नागदेवतांनी सुरक्षित केला आहे. खूप सारे वैज्ञानिक प्रयत्न करूनही तो दरवाजा उघडला गेला नाही. त्यामागे अशी कथित म्हण आहे की जर हा दरवाजा उघडला तर जगावर मोठं संकट येण्याची शक्यता आहे. असही म्हटलं जात की भारतातील सर्वात मोठा खजिना याच ठिकाणी लपवलेला असू शकतो. स्थानिक लोकांच्या श्रद्धेनुसार हा दरवाजा उघडणे अशुभ मानले जाते. हा दरवाजा एका विशिष्ट धार्मिक विधिनेच उघडला जाऊ शकतो असा लोकांचा विश्वास आहे.Mysterious doors in the world.

2.ओक आयलंड मनी पिट – कॅनडा

      हे ठिकाण कॅनडामध्ये नोव्हा स्कोशिया येथे आहे. या ठिकाणाचे रहस्य म्हणजे 1795 मध्ये या ठिकाणी काही लोकांना एक खड्डा आढळून आला, ज्या खड्यात प्रत्येक थरात काहीतरी वेगळं मिळत होत. खूप शतकांपासून विश्वास मानला जातो की इथे खजिना किंवा नाईट्स टेम्पलरचे दस्तऐवज दडले आहेत. परंतु आजपर्यंत या दरवाजाच्या मागे कोणालाही काहीच सापडले नाही. अनेक मोहीम राबवूनही इथे काहीच सापडले नाही. महत्वाची बाब म्हणजे खोदकाम चालू केले की या खड्ड्यात पाणी भरले जाते त्यामुळे संशोधन अजूनच कठीण होते. या जागेशी अनेक अपघात आणि मृत्यू जोडले गेले आहेत त्यामुळे, हे आयलंड इतिहासाबरोबरच अनेक रहस्यांचे मिश्रण आहे.Mysterious doors in the world.

3. पोग्वेलिया द्विपाचा प्रवेशद्वार – इटली 

      हे ठिकाण इटलीमध्ये व्हेनिसजवळ आहे. हे एक बेट असून जगातील सर्वात जास्त भूताटकीचे ठिकाण मानले जाते. 1700 मध्ये इथे प्लेगग्रस्त  लोकांना जिवंत पुरले जात असे. काही काळानंतर या ठिकाणी मानसिक रुग्णांसाठी रुग्णालय सुरु करण्यात आले. या बेटावर जाण्यासाठी सरकारने बंदी घातली आहे. त्यामुळे हा दरवाजा भूतकाळाचा प्रवेशद्वार म्हणून परिचित राहिले आहे. आजही या ठिकाणाहून विचित्र आवाज, सावल्या आणि अनैसर्गिक घटना अनुभवायला मिळतात असा दावा लोकांचा आहे. त्यामुळे य बेटावर प्रवेश करणे म्हणजे भीतीदायक अनुभवाला आव्हाहन देण्यासारखेच आहे.Mysterious doors in the world.

4. स्वालबार्ड ग्लोबल सीड वॉल्ट – नॉर्वे 

    हे ठिकाण नॉर्वे येथील लॉंगइअरबेन, आर्किटक  सर्कल येथे आहे. यां ठिकाणी मानवजातीच भविष्य सुरक्षित ठेवणार बीज भांडार आहे, जो हा जगातील सुरक्षित दरवाजा उघडल्यावर दिसतो. इथे जगातील सर्व प्रकारची धान्य, फळ आणि वनस्पतीची बियाणं ठेवलेली आहेत. हा दरवाजा म्हणजेच जगाचा पुनर्जन्म सुरु होण्याचा मार्ग आहे. जर भविष्यात युद्ध, हवामान आणि नैसर्गिक बदल या मुळे शेती नष्ट झाली तर या बियाणांच्या मदतीने पुन्हा शेती नव्याने सुरुवात करता येईल. बर्फच्या पर्वतांमध्ये बांधलेले हे वॉल्ट जगातील सुरक्षित ठिकानांपैकी एक मानले जाते.Mysterious doors in the world.

इंडोनेशिया मधील बाली या ठिकाणी हे मंदिर असून त्याला ” एलिफंट केव्ह ” असेही म्हटले जाते. या मंदिराचा दरवाजा अत्यंत भीतीदायक दिसतो कारण त्याच्यावर मोठमोठे राक्षसी चेहरे कोरलेले आहेत. परंतु,असे मानले जाते की हे मंदिर वाईट शक्तींना दूर ठेवण्यासाठी बांधले गेले आहे. या गुहेमध्ये प्राचीन धार्मिक मूर्ती आणि ध्यान करण्यासाठी जागा आहेत. इतिहासकरकांच्या मते हे ठिकाण अध्यात्मिक साधणेसाठी वापरले जात असे.Mysterious doors in the world.

यावरूनच लक्षात येते की अशा जागा मानवी कल्पनाशक्तीला चालना देतात. काही लोक याकडे धार्मिक दृष्टिकोनातून पाहतात तर काही लोक वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहतात. पद्मनाभस्वामी मंदिराचा गुप्त दरवाजा, ओक आयलंड मनी पिट, पोग्वेलिया बेट, स्वालबार्ड ग्लोबल सीड वॉल्ट आणि बालीतील गुप्त मंदिर हे दरवाजे फक्त पर्यटनस्थळे नसून इतिहास, श्रद्धा, भय यांची जिवंत उदाहरणे आहेत. या ठिकाणातील रहस्य अजूनही उलगडलेली नाहीत. भविष्यामध्ये संशोधणामुळे काही गोष्टी समोर येतीलही परंतु तोपर्यंत हे रहस्यमय दरवाजे लोकांच्या कल्पनाशक्तीला प्रेरणा देत राहतील.Mysterious doors in the world.

     

Related Posts

हिवाळ्यातील त्वचेचे आव्हान-हिवाळ्यात त्वचेची काळजी घेण्याची आवश्यक दिनचर्या काय आहे? Winter skincare routine.

Winter skincare routine – थंड आणि कोरडी हवा, कमी आर्द्रता आणि हीटिंग सिस्टम त्वचेसाठी आव्हानात्मक असू शकतात. या ऋतूमध्ये, त्वचेला कोरडेपणा, खाज सुटणे आणि लालसरपणा सहज जाणवू शकतो. त्वचेचा नैसर्गिक…

Planetary Position आणि Success: यशासाठी ग्रह आणि मनाचा समतोल.

Planetary position – यश हे केवळ नशिबावर अवलंबून असते का? की ग्रहांची स्थिती आणि आपल्या मनाची तयारी यांचा त्यात तितकाच वाटा असतो? अनेकांच्या मते ग्रह आपल्या आयुष्यात संधी निर्माण करतात,…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

High Income Digital Skills in Marathi: घरबसल्या कमाईसाठी 9 सर्वाधिक मागणीची डिजिटल कौशल्ये

High Income Digital Skills in Marathi: घरबसल्या कमाईसाठी 9 सर्वाधिक मागणीची डिजिटल कौशल्ये

पैशाच्या मागे धावू नका, पैसा तुमच्याकडे आकर्षित करा! – पैसा आकर्षित करण्याचे नियम

पैशाच्या मागे धावू नका, पैसा तुमच्याकडे आकर्षित करा! – पैसा आकर्षित करण्याचे नियम

महाराष्ट्र भारताला काय देतो? अर्थव्यवस्था, शेती, उद्योग, संस्कृती आणि विकासातील महाराष्ट्राचे अतुलनीय योगदान

महाराष्ट्र भारताला काय देतो? अर्थव्यवस्था, शेती, उद्योग, संस्कृती आणि विकासातील महाराष्ट्राचे अतुलनीय योगदान

महाराष्ट्र पोलीस दलातील पदांचा क्रम: कॉन्स्टेबलपासून DGP पर्यंत संपूर्ण माहिती

महाराष्ट्र पोलीस दलातील पदांचा क्रम: कॉन्स्टेबलपासून DGP पर्यंत संपूर्ण माहिती

ऑनलाइन कमाईसाठी वेबसाइट्स – डिजिटल प्रॉडक्ट, ई-बुक, ऑनलाइन कोर्स आणि सेवांमधून पैसे कसे कमवायचे?

ऑनलाइन कमाईसाठी वेबसाइट्स – डिजिटल प्रॉडक्ट, ई-बुक, ऑनलाइन कोर्स आणि सेवांमधून पैसे कसे कमवायचे?

महाराष्ट्रातील रिअल इस्टेट क्षेत्र गुंतवणुकीचे ट्रेंड : गुंतवणूकदारांसाठी संधी, जोखीम आणि महत्त्वाच्या टिप्स

महाराष्ट्रातील रिअल इस्टेट क्षेत्र गुंतवणुकीचे ट्रेंड : गुंतवणूकदारांसाठी संधी, जोखीम आणि महत्त्वाच्या टिप्स