आपल्या शरीराचे छोटे छोटे संदेश समजून घेऊन, आपण चांगल्या आणि दीर्घकालीन आरोग्याचा मार्ग शोधू शकतो.

थकवा,वेदना, तहान, भूक, झोप, अस्वस्थता हे सगळं आपल शरीर आपल्याला सांगत असत. पण विचार करा आपण कधी ऐकतो का आपल्या शरीराच? आपण दुर्लक्ष करतो आणि हाच पहिला पढाव जिथून सुरुवात होते वेगवेगळ्या आजारांची, तणावांची आणि मानसिक थकव्याची.
जर आपल्याला सतत थकवा येत असेल तर आपल्याला अधिक जास्त झोपेची गरज असते. चिडचिड होत असेल तर आपल्या स्वतःसाठी शांत वेळ हवी असते. अपचन होत असेल तर आपला आहार योग्य आहे का ते पहावे. डोकेदुखी असेल तर शरीरात पाण्याची कमतरता किंवा स्क्रिन टाइम जास्त असल्यामुळे देखील डोकेदुखी होऊ शकते.
आपण जर या गोष्टींकडे जातीने लक्ष दिल तर जास्त आजारपण वाढण्यापूर्वीच त्यावर उपाय केले जाऊ शकतात. मानसिक आणि शारीरिक संतुलन राखले जाऊ शकते. स्वतःला आपण अधिक ओळखू लागतो त्यामुळेच दीर्घाकालीन आरोग्य टिकवले जाऊ शकतो.
स्वतःसाठी दररोज काही मिनिट वेळ काढून लक्ष द्या. शरीर काय सांगतय हे जाणून घ्या. कधी विश्रांती घ्या, कधी व्यायाम करा, कधी फक्त निवांत श्वास घ्या. असे केल्याने आपले शरीर हे आपला मित्र बनते व तेच आपल्याला आपल्या आरोग्याची दिशा दाखवते.


