Electricity bill-महिन्याअंती जेव्हा विजेच बिल घरी येत तेव्हा ते पाहून अनेक जणांच्या चेहऱ्यावर काळजी दिसते. “इतकं बिल कस आलं?” हा प्रश्न सगळे विचारतात. पण जर एक सोपी युक्ती वापरून आपण आपल Electricity bill कमी करू शकतो असं सांगितलं तर? चला तर मग पाहूया ती सोपी युक्ती काय आहे ते.

1. घरातील उपकरणे पूर्णपणे बंद करा.
Reduce Electricity bill-Simple Technique.
टीव्ही, चार्जेर, कपडे धुण्याचं मशीन,लॅपटॉप आशा ज्या काही विजेवर चालणाऱ्या वस्तू आहेत त्या आपण बंद केल्या तरी स्टॅंडबाय मोड मध्ये वीज वापरत राहतात. त्यामुळे रोज रात्री झोपण्यापूर्वी किंवा बाहेर कामासाठी जाण्या अगोदर ती मुख्य स्विचमधून पूर्णपने बंद करा. असे केल्याने आपण दर महिन्याला 5-10% वीज वाचवू शकतो.
जेव्हा दिवस असतो त्यावेळी गरज नसल्यास लाईट लावण्याचे टाळावे. खिडक्या, दरवाजे उघडे ठेवावे त्याचबरोबर हलक्या रंगाचे पडदे वापरावे. असे केल्याने वीज बचत तर होतेच परंतु आपले घर देखील प्रसन्न राहते.
3. फ्रिज आणि एसी यांचे तापमान योग्य ठेवणे.
फ्रिज खूप थंड ठेवल्याने किंवा एसीचे तापमान खूप कमी ठेवल्याने मोठ्या प्रमाणात विजेचा वापर वाढतो. त्यामुळे आपण योग्य तापमान ठेवल्यास वीज बिल सहजपने कमी करू शकतो.
4. एलईडी बल्बचा वापर करणे.
एलईडी बल्बचा चा प्रकाश जास्त असतो आणि त्याचबरोबर हे बल्ब 75% कमी वीज वापरतात.
5. उपकरणाची निवड :
आपल्या घरामध्ये आपण जेव्हा एखादी नवीन गोष्ट खरेदी करतो तेव्हा त्यावेळी असलेले BEE स्टार रेटिंग नक्की चेक करा. 5- स्टार रेटिंग्स असलेली उपकरणे ही जास्त कार्यक्षम असतात आणि कमी वीज खर्च करतात.
वीज बचत करणे म्हणजे फक्त पैसे वाचवणे एवढेच नाही तर पर्यावरणाचे रक्षण करणे देखील आहे. त्यामुळे आपण आपल्यामध्ये केलेल्या एका छोट्या बदलामुळे मोठा फरक दिसून येतो.








