पुणे रिअल इस्टेट मार्केट मध्ये नवा इतिहास:२६0 कोटी रुपयांचा विक्रमी ऑफिस भाडे करार!Pune Real Estate.

Pune Real Estate. पुण्यामधील सर्वात मोठ्या रेंटल डीलबद्दल  माहिती जाणून घ्या. ऑफिस लीज, IT हब आणि रिअल इस्टेट मार्केटवर याचा नक्की परिणाम काय?

Pune Real Estate.

ही डील नेमकी काय आहे?

Pune Real Estate – What exactly is this deal?

Pune Rental Deal. ही डील एका साध्या फ्लॅट भाड्याची डील नसून एका मोठ्या कॉर्पोरेट ऑफिसची लीज डील आहे. जागतिक वित्तीय सेवा क्षेत्रातील प्रमुख कंपनी यू बी एस ग्रुपने पुण्यातील एअरपोर्ट रोड येरवडा येथे  व्यावसायिक परिसरात एक संपूर्ण बिल्डिंग टॉवर भाडेतत्वावर घेतला आहे. कंपनीने व्यवस्थापित कार्यालयीन सुविधेसाठी ही जागा भाडेतत्वावर घेतली आहे.

अशा मोठ्या डीलसाठी पुणेच का निवडले?

Why did choose Pune for such a big deal?

Pune real estate आज मोठ्या कंपन्यासाठी निश्चितच आकर्षणाचे ठिकाण बनलेले आहे. पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात IT कंपन्या आलेल्या आहेत तसेच अजून काही कंपन्या येण्यासाठी उत्सुक आहेत, याच कंपन्यासाठी  मुंबईपेक्षा कमी खर्चात मोठी जागा पुण्यामध्ये उपलब्ध होऊ शकते.  त्यामुळेच पुण्याच्या 200 ते 300 किलोमीटर आजूबाजूला जेवढी शहर आहेत त्याच शहरातून पुण्यामध्ये येणाऱ्या लोकांचं मनुष्यबळ ही बरच मोठ आहे. त्यामध्ये (engineers, IT professionals ) अशा व्यक्तींचा समावेश आहे. पुण्याची कनेक्टिव्हिटी उत्कृष्ट आहे. गुंतवणूकदारासाठी पुणे हे एक प्रकारे ‘हॉटस्पॉट’ बनले आहे. ‘Pune Real Estate .

या डिलची वैशिष्ट्य काय आहेत?

What are the features of this deal?

ही जागा एअरपोर्ट रोड टेक पार्क वन इथे आहे. या जागेच क्षेत्रफळ अंदाजे सुमारे 165290 चौरस फूट इतकं आहे. या ठिकाणी एकाचवेळी 1520लोक काम करू शकतात.या ठिकाणी चांगल्या दर्जाच्या सुविधा (Parking, Security, Smart System) उपलब्ध असणार आहेत. या करारानुसार कंपनीला बॅनर लावण्याचे हक्कही आहेत, त्यामुळे येथील लहान बाजारपेठेत त्यांच्या ब्रँडची ओळखही होईल.

या डीलचा Pune Real Estate Market वरती होणारा परिणाम काय असेल?

What will be the impact of this deal on the Pune Real Estate market?

या कराराचा त्याच बाजूला असणाऱ्या निवासी (Residential) बाजारपेठेवर थेट परिणाम होऊ शकतो. यामध्ये रेंटल होम्स (भाड्याची घरं) तसेच out rights होम्स याची मागणी वाढली तसेच घराच्या भाड्याच्या आणि विकतच्या घराच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते त्याचबरोबर प्रीमियम फ्लॅट्सची मागणीही वाढू शकते.

कमर्शिअल मार्केटनुसार ऑफिस स्पेसची किंमत वाढेल त्याचबरोबर नवीन प्रोजेक्टला प्रतिसादही मिळेल.गुंतवणूकदारांसाठी पुणे बनेल “हाय रिटर्न “मार्केट आणि दीर्घाकालीन गुंतवणूकसाठी योग्य असं ठिकाण.भविष्यात को वर्किंग स्पेस वाढलेले दिसतील.मोठ्या MNC कंपन्या पुण्यामध्ये विस्तार करतील.

₹260 कोटींची ही डील फक्त व्यवहार म्हणून पाहता येणार नाही तर, ही डील पुण्याच्या वाढत्या आर्थिक ताकदीचे प्रतीक ठरत आहे.ही डील शहराच्या वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेचे स्पष्ट संकेत देत आहे.IT सेक्टरमुळे वाढणारी मागणी आणि पायाभूत सुविधा यामुळे पुणे हे भारतातील टॉप Real Estate डेस्टिनेशन बनत आहे.तसेच हि डील साधारणतः जानेवारी 2026 पासून चालू झाली असून 5+4 अग्रीमेंट फॉरमॅट नुसार झाली असावी. तसेच Pune real estate डीलचे भाडे वार्षिक आहे की पंचवार्षिक आहे ते अजून समजू शकलेले नाही.

या करारामध्ये 7 टक्के अंदाजे वार्षिक वाढीचा समावेश असून तो 9 वर्षांच्या कालावधीसाठी आहे. या अटींनुसार, या कालावधीतील एकूण भाड्याचा खर्च 260 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंवा आसपास होतो.
मासिक भाड्यासोबतच, यूबीएसने 6 महिन्यांच्या भाड्याएवढी सुरक्षा रक्कम जमा केली आहे, जी अंदाजे 24 कोटी रुपयेच्या आसपास आहे. या करारानुसार, यूबीएसला इमारतीवर बाह्य फलक लावण्याचे हक्कही मिळाले आहेत, ज्यामुळे एअरपोर्ट रोड पुणे आणि रिअल इस्टेट सूक्ष्म बाजारपेठेत त्यांच्या ब्रँडची ओळख अधिक मजबूत होईल.

खराडी,नगर रोड, विमाननगर, येरवडा आणि एअरपोर्ट रोड या ठिकाणी पुण्यातील प्रमुख ऑफिस स्पेस म्हणून आपले वेगळे स्थान निर्माण करत आहे. विमानतळाजवळील कंमर्सिल कोररिडर प्रस्थापित आयटी आणि बिझनेस पार्क्स, तसेच मध्य पुणे (छत्रपती शिवाजीनगर आणि कर्वे रोड )आणि खराडी व्यापारी पट्ट्याशी सुधारत असलेली रोड आणि मेट्रो कनेक्टिव्हिटी यांमुळे या परिसरात अनेक कंपन्या आपल्या नव्या शाखा सुरु करत आहेत. यात आता मल्टिनेशनल आणि इंटरनॅशनल कंपन्यांची देखील भरपूर भर पडत आहे.

या आधीच्या इतर शहरातील मोठ्या रेंटल डील्स पाहूया.
ऍमेझॉन कंपनी नें बंगलूर मध्ये सर्वात मोठी डील प्रेस्टिज ग्रुप बंगलोर कडून झाली होती जी की भारतातील सर्वात मोठी रेंटल डील होती अशी शक्यता वर्तवण्यात येतो आहे. तसेच हैद्राबाद, नोयडा, दिल्ली या ठिकाणी देखील अश्याच प्रकारच्या मोठ्या रेंटल डील ची माहिती आहे.

Related Posts

पर्यटन हा मानवी संस्कृती आणि आर्थिक क्रियाकलापांचा एक आवश्यक भाग आहे, जाणून घेऊया त्याचे महत्व.Tourism.

Tourism.वैयक्तिक आत्मनिर्भरतेसाठी असो किंवा सामाजिक आणि आर्थिक प्रगतीला चालना देण्यासाठी असो, पर्यटन एक अपरिहार्य भूमिका बजावते. पर्यटनाचे महत्त्वाचे पाच पैलू येथे आहेत 1.सांस्कृतिक देवाणघेवाण: Tourism with Culture. पर्यटन विविध समाजांमधील…

व्हिला आणि बंगला, घर खरेदी करताना कोणत्या प्रकारचे करावे? Type Of House.

Type Of House-जेव्हा घर बांधण्याचा किंवा घेण्याचा  आपला निर्णय झालेला असतो, तेव्हा ते घर कोणत्या प्रकारचं असावा हा विचार आपल्या मनात नेहमी डोकावतो. अनेकदा घर निवडण हे आपल्या बजेट आणि…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

पर्यटन काळात रिसॉर्ट मालकांनी कोणत्या पद्धतीने तयार राहावे? Tourist season business tips for resort owners.

पर्यटन काळात रिसॉर्ट मालकांनी कोणत्या पद्धतीने तयार राहावे? Tourist season business tips for resort owners.

अलिबागचा पांढरा कांदा – कोकणातील एक अनमोल शेती वारसा. Alibag white onion.

अलिबागचा पांढरा कांदा – कोकणातील एक अनमोल शेती वारसा. Alibag white onion.

पुणे रिअल इस्टेट मार्केट मध्ये नवा इतिहास:२६0 कोटी रुपयांचा विक्रमी ऑफिस भाडे करार!Pune Real Estate.

पुणे रिअल इस्टेट मार्केट मध्ये नवा इतिहास:२६0 कोटी रुपयांचा विक्रमी ऑफिस भाडे करार!Pune Real Estate.

ज्वारीचे महत्व,ज्वारी पासून बनणारे पदार्थ, आणि ज्वारीचे फायदे.Jwar Bhakri.

ज्वारीचे महत्व,ज्वारी पासून बनणारे पदार्थ, आणि ज्वारीचे फायदे.Jwar Bhakri.

कर्करोगासारख्या आजारावर उपयुक्त ते चमकदार त्वचेसाठी प्रभावी असं फळ…..Papaya Benefits In Marathi.

कर्करोगासारख्या आजारावर उपयुक्त ते चमकदार त्वचेसाठी प्रभावी असं फळ…..Papaya Benefits In Marathi.

केळी किंवा केळी मिल्कशेक: तुमच्या पोटासाठी आणि पचनासाठी काय चांगले आहे?Banana.

केळी किंवा केळी मिल्कशेक: तुमच्या पोटासाठी आणि पचनासाठी काय चांगले आहे?Banana.
0

Subtotal