Manikyam cow-निसर्गाच्या विविधतेमध्ये प्रत्येक प्राणी हा आपली एक वेगळी कहाणी सांगतो. त्यामुळेच काही प्रजाती ह्या त्यांच्या अकारामुळे, तर काही प्रजाती त्यांच्या वैशिष्ट्यामुळे जगभर प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यापैकीच एक उदाहरण म्हणजेच “मनीचयमान” (manikyam) जगातील सर्वात लहान गाय जी भारताच्या अभिमानाचा एक भाग आहे.
असे म्हणतात की ही गाय फक्त आकाराने लहान नसून, तिच्यामागे संवर्धन, संस्कृती आणि निसर्गसंपदेची खूप मोठी गोष्ट दडलेली आहे.

Manikyam cow:
मनीचयमान गाय (Manikyam cow) म्हणजे काय?
आकाराने अतिशय लहान असणारी ही गाय आपल्याला केरळ राज्यात आढळून येते. या गायीचे नाव हे तिथल्या भाषेवरून ठेवण्यात आले आहे. आकाराने अतिशय लहान असल्यामुळे ही गायजगभर प्रसिद्ध झाली. या गायीचे वजन देखील खूप कमी असून तीच शरीर हे सामान्य गायीच्या तुलनेत खूप हलक आहे.
मनीचयमान गाय (Manikyam cow) आली कुठून?
मनीचयमान गाय ही केरळ राज्यातील अथोली गावात आढळते. 2015 साली गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये या गायीचे नाव नोंदवले गेले त्याच महत्वाचं कारण म्हणजे तिची ऊंची ती फक्त 61.5 सेंटीमीटर ( दोन फुटांपेक्षा कमी) आहे. ही गाय व्हेचकुरिशी (vechur) जातीची आहे, जी भारतामध्ये सर्वात लहान आणि दुर्मिळ मानली जाते.
वैशिष्ट्य :
1. फक्त दोन फूट उंची आणि वजन 30-40 किलो
2. स्वभावाने शांत, ममत्व असणारी आणि अत्यंत जिज्ञासू.
3. या गायिमध्ये दूध देण्याचे प्रमाण जरी कमी असले तरी तिच्या दूधामध्ये फॅट आणि औषधी गुणधर्म असतात.
4. ही गाय कमी अन्नावरही टिकून राहते आणि उष्णतेतही सहज जगते.
संवर्धन :
आज जागतिक स्तरावर स्थानिक जातींचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे. जास्त दूध देणाऱ्या विदेशी गायिनमुळे स्थानिक जातींचे महत्व कमी होत चालले आहे. त्यामुळेच मनीचयमानसारख्या गायी केवळ आर्थिक नव्हे, तर जैवविविधतेच्या दृष्टिकोनातूनही महत्वाच्या आहेत.
जतन :
या गाईंचे जतन केल्याने हवामानाशी जुळणाऱ्या प्रजाती टिकून राहतील. तसेच देशी जनावरांच्या औषधी आणि पोषक गुणधर्माचे संरक्षण होईल. भविष्यातील शेती आणि पशुपालणासाठी स्थिर जणूकसंपत्ती (genetic diversity)उपलब्ध होते.
निसर्गाचा आदर करणं म्हणजेच आपल्या भविष्याच रक्षण करणं. मनीचयमानसारख्या दुर्मिळ प्रजाती आपल्याला आठवण करून देतात की ” लहान असणं म्हणजे काही कमी नाही.” निसर्गाच प्रत्येक रूप अनोख आहे आणि त्याच जतन करणं हीच खरी प्रगती आहे.
Manikyam cow जगातील सर्वात लहान गाय म्हणून प्रसिद्ध आहे :
एवढी लहान आकाराची गाय बघून सर्वांनाच खूप आश्चर्य वाटत होते. या गायिविषयी अनेक बातम्या आणि विडिओ व्हायरल झाले त्यामुळे ही गाय लाखो लोकांच्या पाहण्यात आली. प्राण्यांसाठी असणाऱ्या डॉकटर्सने जेव्हा या गायीची तपासणी केली तेव्हा लक्षात आले की ही गाय नैसर्गिकरीत्याच लहान आहे. त्यामुळे मनीचयमान गाय ही आंतरराष्ट्रीय चर्चेचा विषय ठरली.
मनीचयमान गायीची (Manikyam cow) काळजी घेण्याची पद्धत :
या गायीची काळजी घेताना विशेष लक्ष दिले जाते. योग्य आहार, हिरवा चारा तिच्या आरोग्यासाठी महत्वाचा मानला जातो. त्याचबरोबर नियमित आरोग्य तपासणी देखील केली जाते. आकाराने लहान असल्यामुळे तिला इतर मोठ्या गाईनपासून सुरक्षित ठेवले जाते.
Manikyam cow-गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव :
या रेकॉर्डमध्ये जगातील वेगवेगळ्या विक्रमांच्या नोंदी केल्या जातात. या गायीची उंची पाहता तिचे नाव 2015 साली गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदवले गेले .तिची उंची आणि वजन पाहून अनेक तज्ञ् लोकही आश्चर्यचकित होत आहेत. अनेक लोकांनी या गाईला “द वर्ल्ड स्मॉलेस्ट काऊ” असे देखील म्हटलेलं आहे.
Manikyam cow-आकाराने लहान असणे यामागची कारणे:
काही प्राण्यांमध्ये नैसर्गिकरित्या अनुवंशिक बदल होतात आणि याच बदलामुळे त्यांची वाढ कमी राहते.परंतु काही वेळा वातावरण, दिला जाणारा आहार आणि केल जाणार पालनपोषण याचाही प्रभाव वाढीवर परिणाम करतो.
या गाईचा पशुपालन क्षेत्रावर परिणाम:
या गाईच्या प्रसिद्धीनंतर लोकांच्या मनात अशा प्रजातीविषयी उत्सुकता वाढली. अशा गायीना कमी जागा लागते व देखभाल करणे देखील सोपे असू शकते म्हणून काही लोकांनी अशा लहान गायीचे पालन करण्याची इच्छा व्यक्त केली.
या गायीचे सोशल मीडियामुळे बदललेले जग:
पूर्वीच्या काळी एखाद्या गोष्टीची प्रसिद्धी होण्यासाठी खूप वेळ लागत असे, परंतु आता काही मिनिटातच माहिती जगभर पसरली जाते.मनीचयमान हे याचे एक उत्तम उदाहरण आहे कारण, एका छोट्या गावातील ही गाय काही दिवसातच जागतिक चर्चेचा विषय बनली. अनेक लोक केरळमध्ये तिला पाहण्यासाठी येऊ लागले. अनेक पर्यटकांसाठी ती आकर्षणाचं एक केंद्र बनली
“मनीचयमान गाय ” ही निसर्गातील एक अद्भुत चमत्कार आहे. तिच्या छोट्या अकारामुळे ती प्रसिद्धीस आली.या पृथ्वीवरील प्रत्येक जीव हा विशेष आहे हे यावरून लक्षात येते. प्रत्येक जीवाचा आदर करणे ही आपली जबाबदारी आहे.







