“सत्तर वळणांची रोमांचक सफर – कोल्ली हिल्स “

तुम्हाला माहित आहे का निसर्गाचा एक गुपित….

तामिळनाडूच्या नामक्कल जिल्ह्यामध्ये वसलेलं “कोल्ली हिल्स “ हे ठिकाण निसर्गप्रेमी आणि साहसी प्रवाश्यांसाठी एक स्वर्ग आहे. हे हिल्स हिरव्यागर दऱ्या, 70 वळणे असलेला रोमांचक घाट, धबधबे, मंदिरे आणि तेथील स्थानिक आदिवासी संस्कृती यामुळे हे ठिकाण ओळखले जाते.

कोल्ली हिल्सची वैशिष्ट्य:

1. या हिल्सवरती 70 हेअरपीन बेंड्स म्हणजेच वळण आहेत आणि हे प्रत्येक वळण एक रोमांचक अनुभव देऊन जाते.

2. इथे 300 फूट उंचीवरून कोसळणारा अगया धबधबा /अरपाळी धबधबा आहे. हा धबधबा म्हणजे पर्यटकांसाठी निसर्गसौदर्यांची मोठी मेजवानीच आहे.

3. या ठिकाणी सिल्वर-ओक, चहा- कॉपी, मसाला, औषधी वनस्पती मोठ्या प्रमाणात पिकवल्या जातात.

4. पर्वतदेवतेला समर्पित असलेलं कोल्लीपवई हे प्राचीन धार्मिक मंदिर महत्वाचं केंद्र मानलं जात.

5.इथे गेल्यावर आपल्याला तेथील स्थानिक आदिवासी संस्कृती, पारंपरिक नृत्य, संगीत आणि खास अश्या खाद्यपादार्थांचा अनुभव घ्यायला मिळतो.

6. हे हिल्स जवळपास 4267 फूट. (1300m)उंचीवर असून इथे सलग 70 हार्पिन वळण आहेत. या कारणामुळे हे हिल्स “माउंटन ऑफ डेथ” या नावाने देखील ओळखली जातात.

कोल्ली हिल्सला भेट देण्याचा योग्य काळ:

1. या ठिकाणी भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च हा काळ प्रवासासाठी एकदम उत्तम आहे. या काळामध्ये वातावरण हे थंडगार आणि एकदम सुखद असं असल्याने आपल्याला ट्रेकिंग आणि निसर्गदर्शनाचा पुरेपूर आनंद घेता येतो.

2. जुलै ते सप्टेंबर मध्ये पावसामुळे तिथले धबधबे उफाळून येतात. या काळात तिथे लाव्हरी असं निसर्गसौदंर्य पाहायला मिळत.

3. एप्रिल ते जून या कालावधीमध्ये उन्हाळा असल्यामुळे प्रवास करणं थोडं अवघड होऊ शकत.

तस तर वर्षभर आपण भेट देऊ शकतो परंतु, जानेवारी महिन्यात या ठिकाणी कडाक्याच्या थंडीमुळे येथील ठिकाणे ही अल्प प्रमाणात बंद असू शकतात.

कोल्ली हिल्स म्हणजेच निसर्ग, अध्यात्म आणि साहस यांच सुंदर मिश्रण. शहरी जीवनापासून दूर, स्वतःला ओळखण्यासाठी आणि निसर्गाशी आपल नातं जपण्यासाठी हे एक योग्य असं ठिकाण आहे. त्यामुळे आयुष्यात एकदा तरी या ठिकाणाला अवश्य भेट द्या.

Related Posts

अष्टविनायक दर्शन शास्त्रशुद्ध पद्धतीने कसे करावे? Ashtvinayak Darshn.

Ashtvinayak Darshn – महाराष्ट्राला अनेक ऐतिहासिक वास्तुंचा वारसा लाभलेला आहे. यामध्येच महाराष्ट्राची ओळख असलेले अष्टविनायक हे गणपतीच्या आठ स्वयंभू आणि जागृत मंदिराचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येने लोक अष्टविनायक…

विविधतेने नटलेल्या भारताबद्दलची 8 मनोरंजक तथ्य – त्यामध्ये महाराष्ट्रातील एक ! Interesting facts in India.

Interesting facts in India – आपला भारत देश हा संपूर्ण जगातील सर्वात प्राचीन, सांस्कृतिक आणि विविधतेने नटलेला देश आहे. भारतात असणाऱ्या हिमालयाच्या उंच पर्वतरांगांपासून ते समुद्रकिनाऱ्यांपर्यंत, वाळवंटापासून ते हिरव्यागर जंगलानपर्यंत,…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

भारतामध्ये झपाट्याने वाढणारे व्यवसाय – भविष्यातील मोठी संधी. New buisness startup ideas in India.

भारतामध्ये झपाट्याने वाढणारे व्यवसाय – भविष्यातील मोठी संधी. New buisness startup ideas in India.

अष्टविनायक दर्शन शास्त्रशुद्ध पद्धतीने कसे करावे? Ashtvinayak Darshn.

अष्टविनायक दर्शन शास्त्रशुद्ध पद्धतीने कसे करावे? Ashtvinayak Darshn.

बुद्धिबळाचा मोहक इतिहास – प्राचीन चतुरंग ते आधुनिक बुद्धिबळ. History of chess.

बुद्धिबळाचा मोहक इतिहास – प्राचीन चतुरंग ते आधुनिक बुद्धिबळ. History of chess.

विविधतेने नटलेल्या भारताबद्दलची 8 मनोरंजक तथ्य – त्यामध्ये महाराष्ट्रातील एक ! Interesting facts in India.

विविधतेने नटलेल्या भारताबद्दलची 8 मनोरंजक तथ्य – त्यामध्ये महाराष्ट्रातील एक ! Interesting facts in India.

इथे आपण थ्रीलसाठी जातो, जीव गमावण्यासाठी नाही! Adventure activities in India.

इथे आपण थ्रीलसाठी जातो, जीव गमावण्यासाठी नाही! Adventure activities in India.

AI तुमची नोकरी घेणार नाही, पण AI शिकलेली व्यक्ती नक्कीच पुढे जाईल.. 10 प्रमुख AI स्टार्टअप्स. AI startups in india.

AI तुमची नोकरी घेणार नाही, पण AI शिकलेली व्यक्ती नक्कीच पुढे जाईल.. 10 प्रमुख AI स्टार्टअप्स. AI startups in india.