Active Mode “तुमचा दिवस संपतो, पण समाधान मिळत नाही?
कामं पूर्ण होतात, पण आनंद मिळत नाही?
कदाचित तुम्ही आयुष्य जगत नसून फक्त Routine पूर्ण करत आहात.”
कधी तुम्हाला असं वाटतं का की दिवस जात आहेत, कामं होत आहेत, जबाबदाऱ्या पूर्ण होत आहेत; पण तरीही जीवनात काहीतरी हरवल्यासारखं वाटतं?
सकाळी उठणे, कामावर जाणे, मोबाईल स्क्रोल करणे, घरी येणे आणि झोपणे… पुन्हा दुसऱ्या दिवशी तेच.
यालाच म्हणतात Auto Pilot Mode.
या मोडमध्ये आपण जीवन जगत असतो, पण खरं तर आयुष्य अनुभवत नसतो.
जर तुम्हाला अधिक आनंदी, शांत आणि अर्थपूर्ण जीवन जगायचं असेल, तर Auto Pilot Mode मधून बाहेर पडून Active Mode मध्ये जाणं गरजेचं आहे.

Active Mode-अर्थपूर्ण जीवन कसे जगावे
Auto Pilot Trap काय असतो ते ओळखा
Auto Pilot Mode म्हणजे काय?
Auto Pilot Mode म्हणजे रोज तीच दिनचर्या, तेच विचार आणि तीच प्रतिक्रिया. जेव्हा मेंदूला नवीन अनुभव मिळत नाहीत, तेव्हा तो ऊर्जा वाचवण्यासाठी जुन्या सवयींवर अवलंबून राहतो.
त्याचाच परिणाम म्हणजे
- सर्जनशीलता कमी होणे .
- नवीन कल्पना न सुचणे.
- जीवन कंटाळवाणं वाटू लागणे.
- निर्णयक्षमता कमी होणे.
Active Mode का महत्त्वाचा आहे?
Active Mode मध्ये आपण जाणीवपूर्वक जगतो. दररोज नवीन अनुभव घेतो, प्रश्न विचारतो, नवीन गोष्टी शिकतो, स्वतःमध्ये बदल घडवतो.
आज रात्री 5 मिनिटे काढून तुमच्या दिवसातील सर्व कामांची यादी करा आणि त्यापैकी किती गोष्टी सवयीने केल्या ते पहा. मग यावरून तुम्हीच ठरवा तुम्ही सध्या कोणत्या ट्रॅप मोड मध्ये जगत आहात.
Active Mode मध्ये जाण्यासाठी 8 प्रभावी नियम
1.सुरुवात छोट्या बदलांनी करा
अनेक लोक आयुष्य बदलण्यासाठी मोठ्या बदलांची वाट पाहतात. पण निसर्गाचा एक साधा नियम आहे जीवनात मोठे बदल हे छोट्या सवयींमधूनच निर्माण होतात. याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.
याच छोट्या बदलांसाठी आजपासून नवीन रस्त्याने ऑफिसला जा, नवीन पुस्तक वाचा, नवीन कौशल्य शिका आणि महत्वाचं म्हणजे मोबाईल पाहण्याऐवजी 10 मिनिटे चालायला जा.
कारण जोपर्यंत तुम्ही नवीन कृती करत नाही, तोपर्यंत नवीन विचार निर्माण होणार नाहीत.
2. एका वेळी एकच काम करा
आजच्या काळातील सर्वात मोठा भ्रम म्हणजे Multitasking. आपल्याला वाटतं की आपण एकाच वेळी अनेक कामं करून वेळ वाचवत आहोत.
पण प्रत्यक्षात मात्र आपला जास्त वेळ जातो, वेळेबरोबरच जास्त मानसिक थकवा येतो याचाच परिणाम आपल्या चुका वाढतात.
Focus Mode – एका वेळी एकच काम करा कारण एकाग्रता वाढली की कार्यक्षमता दुप्पट होते.
3. जीवनाची गती थोडी कमी करा
आजकाल प्रत्येकजण कुठेतरी पोहोचण्याच्या घाईत आहे.पण अनेकदा धावताना आपण का धावत आहोत हेच विसरतो. जीवनाला थोडा “Slow Motion” द्या. त्यासाठी दररोज 10 मिनिटे शांत बसा, स्वतःशी संवाद साधा आणि झालेल्या दिवसाचा आढावा घ्या.
जेव्हा गती कमी होते तेव्हाच जीवनातील खरे प्रश्न आणि त्यांची उत्तरे दिसू लागतात.
4. गुंता सोडवण्याची कला शिका
धाग्याचा गुंता असो किंवा आयुष्याचा…घाई केल्याने गुंता वाढतो. शांत मनाने पाहिल्यास मार्ग सापडतो आणि धाग्याचा गुंता देखील सुटतो.
जेव्हा एखादी समस्या येते तेव्हा लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी थोडंसं थांबा त्या समस्येच निरीक्षण करा आणि परिस्थिती समजून घ्या. कारण शांतता ही अनेक समस्यांची उत्तरे घेऊन येते.
5. कोणत्याही परिस्थितीची दुसरी बाजू समजून घ्या
उदाहरण घ्यायचं झालं तर आपल्याला कधीकधी समोरच्या व्यक्तीची कथा माहीत नसते. तोच व्यक्ती आपल्यावर रागावतो किंवा चिडतो पण तो असा का करतो कारण कदाचित त्याचा दिवस खराब गेला असेल किंवा तो मानसिक तणावात असेल किंवा तो एखाद्या संघर्षातून जात असेल. म्हणून प्रत्येक गोष्टीला वैयक्तिकरित्या घेऊ नका आणि स्वतःही चिडू नका.
त्यासाठी अशी जेव्हा परिस्थिती तुमच्या समोर येईल तेव्हा स्वतःला Reset करा 15 मिनिटांचा Power Nap घ्या, थोडं चालून या एखादा खोल श्वास घ्या.
कधीकधी समस्या बदलण्यापेक्षा मनाची अवस्था बदलणं जास्त प्रभावी असतं.
6. आर्थिक स्वातंत्र्याची सुरुवात करा
बहुतेक लोक वेळेच्या बदल्यात पैसा कमावतात. पण आर्थिक स्वातंत्र्य तेव्हा मिळते जेव्हा पैसा तुमच्यासाठी काम करू लागतो.
पैशाला कामाला लावायचं असेल तर सुरुवात करायला हवी गुंतवणूक करून. SIP, Mutual Funds, PPF,Index Funds, Dividend स्टॉक्स या ठिकाणी गुंतवणूक करून तुम्ही तुमचा पैसा कामाला लावू शकता.
त्यासाठीच अर्थशास्त्राचा एक साधा नियम समजून घ्या :
“जर तुम्ही पैशाला कामाला लावलं नाही, तर तुम्हाला आयुष्यभर पैशासाठी काम करावं लागेल.”
“कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. गुंतवणुकीत जोखीम असू शकते.”
7. Daily Reset Framework म्हणजे काय?
दररोज रात्री स्वतःला हे 5 प्रश्न विचारा:
आज मी काय नवीन शिकलो?
आज मी कोणती चांगली कृती केली?
आज मला कशाबद्दल कृतज्ञता वाटते?
आज मी कुठे चूक केली?
उद्या मी एक टक्का चांगला कसा होऊ शकतो?
हे छोटे प्रश्न तुमचं आयुष्य हळूहळू Active Mode मध्ये घेऊन जातात आणि तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होते.
8. Digital Detox चा सराव करा
Digital Detox याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.
आजकाल मोबाईल, सोशल मीडिया आणि सततच्या Notifications मुळे आपण वर्तमान क्षण जगणं विसरतो.
काय कराल?
- झोपण्याच्या 30 मिनिटे आधी मोबाईल बंद करा.
- सकाळी उठल्यावर पहिले 30 मिनिटे सोशल मीडिया टाळा.
- आठवड्यातून एक दिवस Social Media Break घ्या.

फायदे:
- मानसिक शांतता
- एकाग्रता वाढते
- ताण कमी होतो
- वर्तमान क्षणाचा आनंद घेता येतो
Auto Pilot Mode मधून Active Mode मध्ये कसे जावे?
Auto Pilot Mode मधून Active Mode मध्ये जाण्यासाठी नवीन सवयी अंगीकारा, एका वेळी एकच काम करा, जीवनाची गती कमी करा, Digital Detox करा, Self-Reflection चा सराव करा आणि जाणीवपूर्वक निर्णय घ्या. या छोट्या सवयींमुळे जीवन अधिक आनंदी, शांत आणि अर्थपूर्ण बनते.
तुम्हालाही पडणारे प्रश्न ( FAQ )
1. Auto Pilot Mode म्हणजे काय?
जाणीवपूर्वक न जगता सवयीप्रमाणे जीवन जगणे म्हणजे Auto Pilot Mode.
2. Active Mode मध्ये कसे जावे?
नवीन अनुभव, नवीन सवयी आणि जाणीवपूर्वक निर्णय घेऊन Active Mode मध्ये जाता येते.
3.Multitasking चांगले की Focus?
बहुतेक वेळा Focus Mode अधिक परिणामकारक ठरतो.
4.जीवनातील ताण कमी करण्याचा सोपा मार्ग कोणता?
जीवनाची गती कमी करणे, ध्यान आणि Self-Reflection यांचा सराव करणे.
5.आर्थिक स्वातंत्र्याची सुरुवात कशी करावी?
नियमित बचत, SIP आणि दीर्घकालीन गुंतवणुकीपासून सुरुवात करा.
6. Active Mode मध्ये जाण्यास किती वेळ लागतो?
नवीन सवयी सातत्याने पाळल्यास काही आठवड्यांत सकारात्मक बदल जाणवू लागतात.
7. Self-Reflection म्हणजे काय?
स्वतःच्या विचारांचे, कृतींचे आणि भावनांचे निरीक्षण करून त्यातून शिकण्याची प्रक्रिया म्हणजे Self-Reflection.
8. Digital Detox का महत्त्वाचा आहे?
मोबाईल आणि सोशल मीडियापासून काही काळ दूर राहिल्याने मानसिक शांतता, एकाग्रता आणि उत्पादकता वाढते.
आनंदाचा शोध आणि जाणीवपूर्वक जीवन यांचा संबंध समजून घेण्यासाठी “जितका आनंदाच्या मागे धावाल…” हा लेख वाचू शकता.
निष्कर्ष:
जीवन बदलण्यासाठी मोठ्या क्रांतीची किंवा बदलाची गरज नसते. त्यासाठी…
एक नवीन विचार…
एक नवीन सवय…
एक शांत क्षण…
इतकंच पुरेसं असतं.
Auto Pilot Mode मध्ये दिवस जातात. Active Mode मध्ये आयुष्य घडतं. आजपासून स्वतःला एकच प्रश्न विचारा:
“मी फक्त जगतोय की खरंच आयुष्य अनुभवतोय?”
लक्षात ठेवा, आयुष्य बदलण्यासाठी एका दिवसात सर्व काही बदलण्याची गरज नसते. दररोजचा एक छोटा जाणीवपूर्वक बदल तुम्हाला Auto Pilot Mode मधून Active Mode कडे घेऊन जाऊ शकतो.
Auto Pilot Mode मध्ये दिवस जातात, पण Active Mode मध्ये आयुष्य घडतं.
आजपासून Active Mode मध्ये जगण्याचा तुमचा पहिला छोटा बदल कोणता असेल?
खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. हा लेख तुमच्या मित्र-परिवारासोबत शेअर करा आणि त्यांनाही अधिक जाणीवपूर्वक जीवन जगण्यासाठी प्रेरित करा.







