Mountain – सह्याद्रीच्या पर्वतरांगांची भली मोठी साथ ही महाराष्ट्राला लाभलेली आहे. याच पर्वत रांगांमधून जाणारे घाट रस्ते निसर्ग,इतिहास आणि पर्यटन यांचा एक प्रकारे सुंदर असा संगमच आहे. एका बाजूला उंच डोंगर, दऱ्या, धबधबे, जंगल तर दुसऱ्या बाजूला राज्यातील दुसऱ्या शहरांना आणि गावांना जोडण्याच काम हे घाटरस्ते करत असतात.
पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण या भागामध्ये प्रवास करणे सोपे झाले ते याच घाटरस्त्यांमुळे. अनेक घाट (Mountain) हे ऐतिहासिक दृष्ट्या तर काही घाट हे खास पर्यटणासाठी प्रसिद्ध आहेत. अशाच सुंदर घाटांची माहिती आपण पाहणार आहोत.
महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध घाट:
ताम्हिणी घाट, माळशेज घाट, आंबोली घाट, नाणेघाट, वरंधा घाट, बोर घाट आणि थळ घाट हे महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय घाट आहेत. हे घाट निसर्गसौंदर्य, ट्रेकिंग, इतिहास आणि पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत.
- महाराष्ट्रातील प्रसिद्ध घाट – Mountain
- 1. थळ घाट (मुंबई-नाशिक):
- 2.बोर घाट (पुणे-मुंबई):
- 3. माळशेज घाट (ठाणे-अहमदनगर):
- 4. दिवे घाट (पुणे-बारामती):
- 5. कन्नड घाट (धुळे -संभाजीनगर ):
- 6. कात्रज घाट (पुणे-सातारा):
- 7. पसरणी घाट (वाई-महाबळेश्वर ):
- 8. शिरघाट (नाशिक – जव्हार ):
- 9. भीमाशंकर घाट :
- 10. वरंधा घाट (महाड -पुणे ):
- 11. करोडी घाट (महाड -खेड ):
- 12. ध्यानापुरी घाट (नाशिक -पुणे ):
- 13. नाणेघाट (कल्याण -जुन्नर ):
- 14. ताम्हिणी घाट (पुणे -माणगाव ):
- 15. करूळ घाट (कोल्हापूर – राजापूर ):
- 16. कुंभार्ली घाट (कराड – चिपळूण ):
- 17. आंबोली घाट:
- 18. अणुस्कुरा घाट (कोल्हापूर -रत्नागिरी ):
- 19.आंबा घाट (कोल्हापूर ):
- 20. कुडाळ घाट (सिंधुदुर्ग ):
- घाटांना भेट देताना घ्यावयाची काळजी
- महाराष्ट्रातील प्रसिद्ध घाट – झटपट माहिती
- तुम्हालाही पडणारे प्रश्न FAQ:
- निष्कर्ष:

महाराष्ट्रातील प्रसिद्ध घाट – Mountain
घाट रस्ते (Mountain ) हे फक्त फिरण्यासाठी किंवा निसर्गाचा आनंद घेण्यासाठी नाहीत. घाटस्त्यांमुळे वाहतूक सुरळीत होते, ग्रामीण भाग शहरांशी जोडले जातात, शेती उत्पादन शहरी भागात पोहचण्यास मदत होते, ऐतिहासिक स्थळे, किल्ले यांच्यापाशी पोहचण्यासाठी घाट आपल्याला मदत करतात.
1. थळ घाट (मुंबई-नाशिक):
महाराष्ट्रातील सर्वात महत्वाच्या घाटांपैकी एक म्हणजे थळ घाट. हा घाट (Mountain) मुंबई आणि नाशिक या दोन शहरांना जोडतो. व्यापार वाहतुकीसाठी हा घाट अत्यंत महत्वाचा आहे. पावसाळ्यात पर्यटक येथे हिरवळ आणि धबधबे पाहण्यासाठी गर्दी करतात.
2.बोर घाट (पुणे-मुंबई):
ब्रिटिश काळात व्यापारासाठी बांधलेल्या या घाटाचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. हा घाट (Mountain) मुंबई आणि पुणे या दोन शहरांना जोडण्याचं काम करतो. लोणावळा, खंडाळा, भुशी धरण, टायगर पॉईंट यासारख्या पर्यटन स्थळांना आपण या घाटरस्त्यावरून जाताना भेट देऊ शकतो. पावसाळ्यात धुक्याने भरलेला हा घाटरस्ता अतिशय सुंदर दिसतो.
3. माळशेज घाट (ठाणे-अहमदनगर):
निसर्गप्रेमिंसाठी स्वर्ग म्हणजे माळशेज घाट (Mountain). येथील उंच धबधबे, डोंगर, कधी तरी आढळणारे फ्लेमिंगो पक्षी पाहण्यासाठी पावसाळ्यात पर्यटक येथे गर्दी करतात.
4. दिवे घाट (पुणे-बारामती):
हा एक पालखी महामार्ग आहे.आषाढी वारिमध्ये या घाटातून जाणाऱ्या पालख्यांच दृश्य अतिशय मोहक असत. पावसाळ्यामध्ये पुण्याजवळील लोकप्रिय ठिकाण म्हणजे दिवे घाट.
5. कन्नड घाट (धुळे -संभाजीनगर ):
या घाटाच वैशिष्ट्य म्हणजे अवघड अशी वळणे, डोंगराळ भाग त्याचबरोबर वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा मार्ग म्हणून हा घाट (Mountain) प्रसिद्ध आहे.
6. कात्रज घाट (पुणे-सातारा):
कात्रज घाट म्हणजे साताऱ्याहून येणाऱ्या लोकांसाठी असणार पुण्याचं प्रवेशद्वार. जुना घाट मार्ग खूप धोकादायक होता परंतू आता नवीन बोगदा आणि रस्ता तयार झाल्याने प्रवास सोपा झाला आहे.
7. पसरणी घाट (वाई-महाबळेश्वर ):
हा घाट पर्यटकांसाठी एक प्रकारचे आकर्षण. या घाटातून प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळते ती स्ट्रॉबेरीची शेती, धुक्याने भरलेले रस्ते, थंड हवामान. महाबळेश्वर, पाचगणी अशी पर्यटन स्थळ या भागात भेट देण्यास प्रसिद्ध आहेत.
8. शिरघाट (नाशिक – जव्हार ):
आदिवासी भागांना जोडणारा हा मार्ग दाट जंगल, शांत व निसर्गरम्य परिसर यासाठी प्रसिद्ध आहे.
9. भीमाशंकर घाट :
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणून भीमाशंकरची ओळख आहे. धार्मिक स्थळ असण्याबरोबरच हे घाट ठिकाण ट्रेकिंगसाठी तसेच भटकंतीसाठी देखील तितकेच महत्वाचे आहे.
10. वरंधा घाट (महाड -पुणे ):
हा घाट रायगड आणि पुणे यांना जोडणारा असून फोटोग्राफिसाठी प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात खोल दऱ्या, धबधबे, कमी वाहतूक असल्यामुळे निसर्गप्रेमीना आनंद देऊन जातात.
11. करोडी घाट (महाड -खेड ):
कोकण भागाशी संपर्क वाढवण्यासाठी हा घाट महत्वाचा मानला जातो. डोंगर,दऱ्या आणि शांत वातावरणासाठी हा घाट प्रसिद्ध आहे.
12. ध्यानापुरी घाट (नाशिक -पुणे ):
कमी वाहतूक आणि निसर्गरम्य परिसर लाभलेला हा घाट नाशिक – पुणे मार्गावरील ग्रामीण भागांना जोडतो.
13. नाणेघाट (कल्याण -जुन्नर ):
हा एक ऐतिहासिक घाट असून सातवाहन काळात व्यापारासाठी या घाटाचा वापर केला जात असे. प्राचीन गुहा, शिलालेख, ट्रेकिंग यासाठी हा घाट प्रसिद्ध आहे.
14. ताम्हिणी घाट (पुणे -माणगाव ):
महाराष्ट्रातील सर्वात सुंदर घाट म्हणजे ताम्हिणी घाट. असंख्य धबधबे,घनदाट जंगल, पावसाळी पर्यटन यासाठी हा घाट खूप प्रसिद्ध आहे.

15. करूळ घाट (कोल्हापूर – राजापूर ):
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा हा घाट वळणदार रस्ते आणि समुद्रकिनाऱ्याकडे जाणारा मार्ग म्हणून प्रसिद्ध आहे.
16. कुंभार्ली घाट (कराड – चिपळूण ):
कुंभार्ली घाट हा सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणारा दुवा आहे. या घाटाच्या पूर्वेकड प्रसिद्ध असं कोयना धरण आहे.
17. आंबोली घाट:
सर्वांना माहीत असलेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाट प्रचंड पाऊस, धबधबे,दाट जंगल आणि जैवविविधता यासाठी ओळखला जातो. हा घाट म्हणजे महाराष्ट्रातील एक हिल स्टेशन आहे.
18. अणुस्कुरा घाट (कोल्हापूर -रत्नागिरी ):
हा घाट कोल्हापुरातील शाहूवाडी तालुका आणि रत्नागिरीतील राजापूर तालुक्याला जोडणारा एक निसर्गरम्य घाटमार्ग आहे.
19.आंबा घाट (कोल्हापूर ):
कोल्हापूर जिल्ह्यातील हा प्रसिद्ध घाट तिथले धुक्याने वेढलेले डोंगर पाहण्यासाठी प्रसिद्ध आहे. तिथेच असणारा गगनबावडा हा परिसर पाहणे निसर्गप्रेमीना नक्कीच आवडेल.
20. कुडाळ घाट (सिंधुदुर्ग ):
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ घाट म्हणजे शांत रस्ता आणि कोकणातील हिरवळ पाहण्याच सुख.
आपण हे काही प्रमुख घाट पाहिले आहेत. याव्यतिरिक्त आणखी बरेचसे घाट आपल्या महाराष्ट्राला लाभलेले आहेत. महाराष्ट्र सरकार अशा अनेक घाटांचे भविष्याच्या दृष्टीने आधुनिकीकरण करत आहे. त्यामध्ये बोगदे, रस्त्याची रुंदी वाढवणे, सुरक्षित भिंती यांचा समावेश होतो.
नाणेघाट, माळशेज घाट, ताम्हिणी घाट, आंबोली घाट हे ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहेत तर काही घाट परिसरांना सांस्कृतिक महत्व प्राप्त झालेलं आहे.
घाटांना भेट देताना घ्यावयाची काळजी
घाट प्रवासात सुरक्षिततेसाठी काही टिप्स
- पावसाळ्यात वाहन हळू चालवा.
- धुक्यात हेडलाईटचा योग्य वापर करा.
- धबधब्याजवळ सेल्फी काढताना काळजी घ्या.
- घसरड्या ठिकाणी जाणे टाळा.
- हवामानाचा अंदाज पाहूनच प्रवास करा.
- ट्रेकिंग करताना योग्य शूज वापरा.
महाराष्ट्रातील प्रसिद्ध घाट – झटपट माहिती
- सर्वात लोकप्रिय घाट: ताम्हिणी घाट
- ऐतिहासिक घाट: नाणेघाट
- ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध: माळशेज घाट
- हिल स्टेशन घाट: आंबोली घाट
- फोटोग्राफीसाठी प्रसिद्ध: वरंधा घाट
तुम्हालाही पडणारे प्रश्न FAQ:
1. महाराष्ट्रातील सर्वात सुंदर घाट कोणता आहे?
ताम्हिणी घाट, माळशेज घाट, आंबोली घाट आणि वरंधा घाट हे महाराष्ट्रातील सर्वात सुंदर घाट मानले जातात.
2. पावसाळ्यात फिरण्यासाठी कोणता घाट सर्वोत्तम आहे?
ताम्हिणी घाट, माळशेज घाट, आंबोली घाट आणि बोर घाट हे पावसाळ्यात विशेष आकर्षक दिसतात.
3. ट्रेकिंगसाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध घाट कोणते?
नाणेघाट, माळशेज घाट, भीमाशंकर घाट आणि ताम्हिणी घाट ट्रेकिंगसाठी लोकप्रिय आहेत.
4. महाराष्ट्रातील सर्वात ऐतिहासिक घाट कोणता आहे?
नाणेघाट हा सातवाहन काळातील ऐतिहासिक घाट असून व्यापारासाठी वापरला जात असे.
5. पुण्याजवळील प्रसिद्ध घाट कोणते आहेत?
दिवे घाट, कात्रज घाट, ताम्हिणी घाट, भोर घाट आणि पसरणी घाट हे पुण्याजवळील लोकप्रिय घाट आहेत.
6. आंबोली घाट कोणत्या जिल्ह्यात आहे?
आंबोली घाट हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात असून महाराष्ट्रातील प्रसिद्ध हिल स्टेशन म्हणून ओळखला जातो.
7. महाराष्ट्रातील घाट पर्यटनासाठी सर्वोत्तम वेळ कोणती?
जून ते सप्टेंबर हा पावसाळ्याचा काळ घाटांचे सौंदर्य अनुभवण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो.
8. महाराष्ट्रातील घाटांचे महत्त्व काय आहे?
घाट राज्यातील शहरे आणि गावे जोडतात, पर्यटनाला चालना देतात आणि वाहतुकीसाठी महत्त्वाची भूमिका बजावतात.
निष्कर्ष:
महाराष्ट्र राज्याच्या सौंदर्याचा आणि विकासाचा अविभाज्य भाग म्हणजे हे घाट. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे घाट म्हणजे इतिहास, निसर्ग, संस्कृती यांचं अनोख दर्शन आहे. काही घाट धार्मिक ठिकाणासाठी तर काही घाट हे पर्यावरणासाठी प्रसिद्ध आहेत.
पावसाळ्यामध्ये या घाटांचे सौंदर्य अधिक खुलून येते. धबधबे, दऱ्या, डोंगर हे प्रवास करताना आपल्याला मंत्रमुग्ध करतात.
“जर तुम्हाला सह्याद्रीचं खरं सौंदर्य अनुभवायचं असेल, तर महाराष्ट्रातील या घाटांना आयुष्यात एकदा तरी नक्की भेट द्या.”
तुमचा आवडता घाट कोणता आणि का? तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा.
महाराष्ट्रातील पर्यटन, किल्ले, घाट आणि ऐतिहासिक स्थळांबद्दल अशीच माहिती मिळवण्यासाठी RealInfoWorld.in ला नियमित भेट द्या.








