टाटा नेक्सॉन टॉप व्हेरिएंट: तुमचं बजेट तयार आहे का? जाणून घ्या डाउन पेमेंट खुलासा.

टाटा मोटर्स ही भारतातील एक लोकप्रिय कार उत्पादक कंपनी आहे. देशातील बरेच लोक टाटाची कार खरेदी करण्यास प्राधान्य देतात. ही कंपनी वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये अनेक कार देते. आज आपण टाटाच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या, टाटा नेक्सॉनबद्दल थोडी माहिती पाहणार आहोत. गेल्या दोन महिन्यांपासून टाटा नेक्सॉन ही सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. सप्टेंबरमध्ये टाटा नेक्सॉनच्या एकूण २२,५७३ कार खरेदी झाल्या. ऑक्टोबरमध्ये टाटा नेक्सॉनला एकूण २२,०८३ ग्राहक मिळाले. परिणामी असे दिसून येते की,लोक टाटा नेक्सॉन खरेदी करण्यास खूप उत्सुक आहेत.

जर तुम्ही टाटा नेक्सॉन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आज आपण  टाटा नेक्सॉनचा  टॉप व्हेरिएंट खरेदी करण्यासाठी  किती डाउन पेमेंट कराव लागेल ते जाणून घेऊया.

टाटा नेक्सॉनच्या टॉप व्हेरिएंटची किंमत:

टाटा नेक्सॉनची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ₹७.३१ लाख आहे. टाटा नेक्सॉनच्या टॉप व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत ₹१४.१५ लाख आहे. जर तुम्ही दिल्लीमध्ये टाटा नेक्सॉनचा टॉप व्हेरिएंट खरेदी करत असाल, तर तुम्हाला नोंदणीसाठी ₹१.८८ लाख आणि विम्यासाठी अंदाजे ₹६६,००० द्यावे लागतात. इतर शुल्कांसह, टाटा नेक्सॉनसाठी तुम्हाला ऑन-रोड ₹१६.८५ लाख खर्च येईल.

टाटा नेक्सॉन च्या टॉप व्हेरिएंट साठी डाउन पेमेंट:

टाटा नेक्सॉन EMI वर खरेदी करण्यासाठी, तुम्हाला कमीतकमी ५ लाखांचे डाउन पेमेंट करावे लागेल, त्यानंतर तुम्हाला राहिलेली रक्कम बँकेकडून घ्यावी लागेल. ५ लाखांचे डाउन पेमेंट केल्यानंतर, तुम्हाला बँकेकडून एकूण ११.८५ लाखांचे कर्ज घ्यावे लागेल.

टाटा नेक्सॉन च्या टॉप व्हेरिएंटसाठी महिन्याचा EMI:

जर तुम्ही टाटा नेक्सॉनसाठी बँकेकडून ₹११.८५ लाखांचे कर्ज घेतले असेल आणि हे कर्ज तुम्हाला ८ वर्षांच्या कालावधीसाठी ९% व्याजदराने उपलब्ध असेल, तर तुम्हाला दरमहा १७,३६० EMI म्हणून द्यावे लागतील. संपूर्ण ८ वर्षांसाठी १७,३६० EMI म्हणून भरल्याने, तुम्हाला बँकेला एकूण १६.६६ द्यावे लागतील. म्हणजेच ४.८१ लाख ही तुमची व्याजाची रक्कम असेल.

तर आशा प्रकारे जर तुम्हाला टाटा नेक्सॉनच टॉप व्हेरिएंट खरेदी करायच असेल तर तुम्ही वरील दिलेल्या बेसिक माहितीच्या आधारे खरेदी करू शकता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

0

Subtotal