
फटाके हा दिवाळीतील सगळ्यात जास्त मागणी असणार जिनस आहे. गल्लीतल्या दुकानापासून ते मोठ्या दुकानापर्यंत हा व्यवसाय चालतो. योग्य परवाना, सुरक्षितता आणि योग्य पुरवठादार मिळाल्यास या व्यवसायात मोठा नफा मिळतो.
व्यवसायाची ओळख:
दिवाळीच्या सणात किंवा कोणताही उत्सहाचा दिवस असो फटाके हे नेहमीच फोडले जातात. हेच फटाके फोडण्याइतकेच याच्या विक्री व्यवसायातही तेवढाच आनंद आहे. फटाके विक्री व्यवसाय हा कायदेशीर परवानगी घेऊन आपण सुरु करू शकतो. हा व्यवसाय हंगामी असला तरी दिवाळी, लग्नसमारंभ आणि बाकी आनंदाच्या क्षणी प्रचंड नफा मिळवून देतो.
कायदेशीर प्रक्रिया :
फटाके हे ज्वलनशील पदार्थांमध्ये मोडतात, त्यामुळे सरकारकडून काही गोष्टींसाठी परवानगी महत्वाची असते. त्यासाठी –
1) जिल्हाधिकारी कार्यालयातून Explosives License (फॉर्म 20 ) घेणे.
2) तो व्यवसाय चालवण्यासाठी नगरपालिका किंवा ग्रामपंचायतिकडून परवानगी घेणे.
3) दुकान नोंदणीसाठी Shop Act License काढणे.
महत्वाचं म्हणजे आपल दुकान हे शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, पेट्रोल पंप यांपासून किमान 100 मीटर अंतरावर असावे.
नियम व जबाबदारी :
1) दुकानात धूम्रपान अजिबात करू नये.
2) दिवसभरातच विक्री करण्याचा प्रयत्न करावा.
3) दुकानातील इलेक्ट्रिक वायरिंग ही चांगल्या प्रकारची वापरा.
4) अग्निशमन यंत्र आणि पाणी जवळ ठेवा.
ग्रीन फटाके :
आजकाल प्रदूषणरहित सणांची संकल्पना अमलात आणली जाते. त्यामुळे प्रदूषण कमी करण्यासाठी ग्रीन फटाके वापरले जातात. ग्रीन फटाके हे कायम वापरल्या जाणाऱ्या फटाक्यांच्या तुलनेत कमी प्रदूषण करतात त्यामुळे सरकारही अशा फटाक्यांना प्रोत्साहन देते.
व्यवसाय यशस्वी होण्यासाठी काही टिप्स :
* ब्रँडेड आणि कमी प्रमाणात फटाके ठेवा.
* खरेदी करणार्यांना ‘ ग्रीन फटाके ‘ वापरण्यासाठी प्रोत्साहित करा.
* जास्तीत जास्त सोशल मीडियावर प्रचार करा.
* सण येण्याअगोदरच पुरवठा साठवून ठेवा.
* family pack, kids pack, wedding pack आकर्षक ऑफर साठी तयार ठेवा.
थोडी कल्पकता, कायदेशीर तयारी आणि सुरक्षितता बाळगली तर हा व्यवसाय फटाक्यानसारखाच प्रकाशमान आणि नफयाचा ठरू शकतो.
