वेळ म्हणजेच आयुष्य – त्याच वेळेच व्यवस्थापन करायला शिकवणारी सात पुस्तकं. Time management book.

Time management book-आजच्या धावत्या जगात वेळ ही सर्वात किमती संपत्ती आहे. आपल्याकडे म्हणतात पैसा परत मिळू शकतो, पण गेलेला वेळ परत कधीच मिळू शकत नाही. त्यामुळेच आपल्याला वेळेचा योग्य उपयोग कसा करायचा हे शिकवणारी सात पुस्तकं वाचन गरजेचं आहे. खाली दिलेली पुस्तकं ही तुमच्या वेळेच व्यवस्थापन, उत्पादकता आणि जीवनशैली सुधारायला खरच मदत करू शकतात.

Time management book

Time management book:

या पुस्तकाचा मुख्य संदेश हाच आहे की आपल्याला जे काम सर्वात अवघड आणि महत्वाचं वाटत ते काम पहिल्यांदा पूर्ण करा. जर तुम्हाला काम पुढे ढकलण्याची सवय असेल, तर हे पुस्तक तुम्हाला action घ्यायला प्रेरित करतं आणि वेळेचा योग्य वापर कसा करायचा हे शिकवतं.

आपण काय करतो नेहमी सोप्या कामांना प्राधान्य देतो आणि जी कामे आपल्याला कठीण वाटतात ति कामे पुढे ढकलतो. परंतु दिवसाची सुरुवात ही कठीण कामाने केली, तर उरलेली कामे ही सोपी वाटतात. हे एक असं पुस्तक आहे जे टाळाटाळीवर मत करून, वेळेचा योग्य वापर कसा करायचा ते शिकवते.

आपल्या प्रभावी जीवनशैलीसाठी कोणत्या सवयी महत्वाच्या आहेत हा या पुस्तकाचा मुख्य उद्देश आहे.

यातील सवयी जबाबदारी, विजन, प्राधान्यक्रम, सहकार्य, सातत्य आणि स्वतःचा विकास शिकवतात. वेळ आणि जीवन व्यवस्थापनासाठी हे पुस्तक अतिशय मार्गदर्शक आहे.हे पुस्तक तुमची विचारसरणी बदलतं आणि वेळ, नातेसंबंध व उद्दिष्ट यांचं योग्य व्यवस्थापन कसं करायचं हे शिकवतं.

या पुस्तकाचा मुख्य संदेश आपल्या मनाचं विचलन टाळून, एकाग्रतेने काम कस करायच हा आहे. हे पुस्तक एकाग्रतेने (focus) काम करण्याची शक्ती आणि त्याचं महत्त्व स्पष्ट करतं. आजच्या distraction भरलेल्या जगात “Deep Work” म्हणजे कोणत्याही व्यत्ययाशिवाय खोलवर लक्ष देऊन काम करणं, ज्यामुळे कमी वेळेत उच्च दर्जाचं काम करता येतं.

सोशल मिडिया, मोबाईल आपला वेळ वाया घालवतात. Deep Work म्हणजे एक ठराविक वेळ, कोणताही व्यत्यय येऊ न देता एकाच कामावर लक्ष केंद्रित करायच. यातूनच कमी वेळेत जास्त दर्जेदार काम करून प्रगती करण्याचा मार्ग आपल्याला मिळतो. जर तुम्हाला सतत लक्ष विचलित होत असेल आणि कामात फोकस वाढवायचा असेल, तर हे Time management book तुम्हाला “quality work in less time” कसं करायचं हे शिकवतं.

छोट्या छोट्या सवयीमधून मोठा बदल कसा करायचा हे या पुस्तकातून अनुभवायला मिळते.

आपल्या जीवनात आपण दररोज फक्त 1% प्रगती केली, तरी वर्षभरात आपल्याला प्रचंड बदल दिसतो. त्यासाठी चांगल्या सवयीची साखळी निर्माण करणं आणि वाईट सवयी तोडणं यावर लक्ष केंद्रित केल पाहिजे. जर तुम्हाला तुमच्या दैनंदिन सवयी सुधारून वेळेचा योग्य उपयोग करायचा असेल, तर हे पुस्तक practical आणि सोप्या पद्धतीने मार्गदर्शन करतं. वेळेचं व्यवस्थापन सुधारण्यासाठी सवयींची ताकद किती महत्त्वाची आहे, हे या पुस्तकातून स्पष्ट होते.Time management book.

हे पुस्तक Pareto Principle वर आधारित आहे, ज्यामध्ये सांगितलं जातं की आपल्या 80% परिणाम हे फक्त 20% प्रयत्नांमधून मिळतात. योग्य गोष्टींवर लक्ष केंद्रित केल्यास कमी वेळेत जास्त परिणाम मिळवता येतात.वीस टक्के प्रयत्नातून ऐशी टक्के परिणाम कसा मिळवायचा हे यातून शिकायला मिळते.

आपल्या जीवनात काही मोजक्या कामाचा परिणाम दिसतो उरलेला वेळ हा असाच वाया जातो. हे पुस्तकं शिकवत की महत्वाच्या वीस टक्के कामावर तुम्ही लक्ष दिल तर तुमचा वेळ आणि ऊर्जा दोन्ही वाचू शकतात. जर तुम्हाला “busy” न राहता “effective” व्हायचं असेल, तर हे पुस्तक तुम्हाला कमी वेळेत जास्त यश कसं मिळवायचं हे शिकवतं. Time management book.

कामाचं व्यवस्थापन करण्याची सोपी पद्धत शिकण्यासाठी या पुस्तकाचा उपयोग आपल्याला होऊ शकतो. कामं डोक्यात साठवून ठेवण्यापेक्षा ति लिहून ठेवावी त्यामुळे मानसिक ताण कमी होऊन आपला वेळ वाचतो. जर तुम्हाला खूप कामं, deadlines आणि ताण यामुळे गोंधळ होत असेल, तर हे पुस्तक तुम्हाला organized आणि stress-free पद्धतीने काम पूर्ण करायला शिकवतं.Time management book with organization.

अनावश्यक गोष्टींना ‘नाही’ म्हणायला शिका हा या पुस्तकाचा खरा उद्देश आहे. प्रत्येक गोष्टींना हो म्हणणं म्हणजे वेळ वाया घालवण. या पुस्तकातून आपल्याला खरच महत्वाच्या असणाऱ्या गोष्टींवरच लक्ष केंद्रित करायला शिकल पाहिजे हेच शिकायला मिळते.

जर तुम्हाला सतत busy असूनही progress दिसत नसेल, तर हे पुस्तक तुम्हाला “less but better” ही mindset देतं आणि वेळेचा खरा उपयोग कसा करायचा हे शिकवतं. Time management book with disciplined mindset.

“वेळ वाचवणं म्हणजे आयुष्य वाढवणं “ ही पुस्तके वाचा आणि तुमच्या आयुष्यातील प्रत्येक मिनिटांचं सोन करा!.

पुस्तकं आपल्याला दिशा देतात, पण खरा बदल तेव्हाच घडतो जेव्हा आपण त्या सवयी आपल्या रोजच्या आयुष्यात लागू करतो. योग्य वेळ नियोजन केल्यास ताण कमी होतो, कामाची गुणवत्ता वाढते आणि जीवन अधिक संतुलित व यशस्वी बनते. Time management book मार्ग दाखवतात, पण यश मिळवण्यासाठी त्या सवयी आपल्या दिनचर्येत उतरवणं हेच खरं महत्त्वाचं आहे.


Related Posts

विविधतेने नटलेल्या भारताबद्दलची 8 मनोरंजक तथ्य – त्यामध्ये महाराष्ट्रातील एक ! Interesting facts in India.

Interesting facts in India – आपला भारत देश हा संपूर्ण जगातील सर्वात प्राचीन, सांस्कृतिक आणि विविधतेने नटलेला देश आहे. भारतात असणाऱ्या हिमालयाच्या उंच पर्वतरांगांपासून ते समुद्रकिनाऱ्यांपर्यंत, वाळवंटापासून ते हिरव्यागर जंगलानपर्यंत,…

उन्हाळ्यात त्वचा चमकदार ठेवण्यासाठी २० प्रभावी आणि सोपे उपाय.Summer skincare routine.

Summer skincare routine-उन्हाळा आला की त्वचेच्या समस्या वाढायला सुरुवात होते. कडक ऊन, घाम, धूळ आणि प्रदूषण यामुळे त्वचा कोरडी, तेलकट, निस्तेज किंवा टॅन झालेली दिसू लागते. विशेषतः महिलांसाठी त्वचेची योग्य…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

भारतामध्ये झपाट्याने वाढणारे व्यवसाय – भविष्यातील मोठी संधी. New buisness startup ideas in India.

भारतामध्ये झपाट्याने वाढणारे व्यवसाय – भविष्यातील मोठी संधी. New buisness startup ideas in India.

अष्टविनायक दर्शन शास्त्रशुद्ध पद्धतीने कसे करावे? Ashtvinayak Darshn.

अष्टविनायक दर्शन शास्त्रशुद्ध पद्धतीने कसे करावे? Ashtvinayak Darshn.

बुद्धिबळाचा मोहक इतिहास – प्राचीन चतुरंग ते आधुनिक बुद्धिबळ. History of chess.

बुद्धिबळाचा मोहक इतिहास – प्राचीन चतुरंग ते आधुनिक बुद्धिबळ. History of chess.

विविधतेने नटलेल्या भारताबद्दलची 8 मनोरंजक तथ्य – त्यामध्ये महाराष्ट्रातील एक ! Interesting facts in India.

विविधतेने नटलेल्या भारताबद्दलची 8 मनोरंजक तथ्य – त्यामध्ये महाराष्ट्रातील एक ! Interesting facts in India.

इथे आपण थ्रीलसाठी जातो, जीव गमावण्यासाठी नाही! Adventure activities in India.

इथे आपण थ्रीलसाठी जातो, जीव गमावण्यासाठी नाही! Adventure activities in India.

AI तुमची नोकरी घेणार नाही, पण AI शिकलेली व्यक्ती नक्कीच पुढे जाईल.. 10 प्रमुख AI स्टार्टअप्स. AI startups in india.

AI तुमची नोकरी घेणार नाही, पण AI शिकलेली व्यक्ती नक्कीच पुढे जाईल.. 10 प्रमुख AI स्टार्टअप्स. AI startups in india.