Icecream Banana जगभरात अनेक प्रकारची केळी आढळतात, पण “ब्लू जावा” केळी हा प्रकार विशेष आकर्षण ठरतो. याला “Icecream Banana” असेही म्हटले जाते, कारण याची चव व्हॅनिला आईस्क्रीमसारखी गोड आणि क्रीमी लागते. या केळीच्या सालीवर हलका निळसर रंग दिसतो, त्यामुळे त्याला “ब्लू जावा” हे नाव मिळाले आहे.
ब्लू जावा केळी म्हणजेच Icecream Banana म्हणून ओळख असणारी केळी.ही केळी साधारणपने आपल्या रोजच्या खाण्यात येणाऱ्या केळीपेक्षा थोडीशी वेगळी असून तिच्यामध्ये जी काही वैशिष्ट्य आहेत त्यामुळे ती लोकप्रिय आहे.

Blue Java Icecream Banana:
वैशिष्ट्य:
1) अनोखी चव: या केळीची सर्वात मोठी ओळख ही तिची चव आहे, कारण ही केळी खाताना तुम्हाला व्हॅनीला आईस्क्रिम किंवा कस्टर्ड पावडर सारखी चव येते. यामुळेच या केळीला ‘Icecream Banana‘ असे म्हटले जाते.
2) रंग: ही केळी जेव्हा कच्ची असते तेव्हा तिचा रंग हा निळा किंवा निळसर-हिरवा असा दिसतो. पिकल्या नंतर ही केळी पिवळ्या रंगाची होते.
3)मूळ ठिकाण: ही केळी जास्त करून दक्षिण पूर्व-आशिया आणि हवाई मध्ये आढळते. तसेच थंड हवामानातही वाढू शकते परंतु जास्त थंड वातावरण कधी कधी हानिकारक ठरू शकते
4)पोषणमूल्य: बाकीच्या केळी प्रमाणेच या केळीमधेही आपल्याला पोटॅशियम, फायबर आणि जीवनसत्व मिळते. ही केळी पाचणसंस्थेसाठी चांगली असून आपल्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करते.
5)वनस्पतीची वैशिष्ट्य: या केळीची उंची ही साधारणपने 12 ते 20 फूट एवढी असते. तिची पाने ही मोठी, हिरवी, लांब आणि वाऱ्याने सहज फाटतील अशी असतात. लागवड केल्यापासून 15 ते 24 महिन्यात फळ येते. एका झाडाला साधारनपणे 60 ते 90 केळीचा घड लागू शकतो.

आरोग्यविषयक फायदे:
1) पचणसंस्थेस उत्तम: या केळीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे ही केळी पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत करते व त्याचबरोबर बद्धकोष्टता टाळण्यासाठी उपयोगी पडते.
2)ऊर्जेचा चांगला स्तोत्र: इतर केळीप्रमाणेच ही नैसर्गिकरित्या (carbohydrates) ने परिपूर्ण असते जी आपल्या शरीराला पटकन ऊर्जा पुरवते. खेळाडू व व्यायाम करणाऱ्या लोकांसाठी हा एक चांगला पर्याय आहे.
3)हृदयासाठी उपयुक्त: या केळीत पोटॅशियम चे प्रमाण भरपूर असल्यामुळे रक्तदाब (blood presure) नियंत्रित ठेवण्यासाठी मदत होते.
4)व्हिटॅमिन व खनिजे: यामध्ये व्हिटॅमिन बी 6 (Vitamin b6), व्हिटॅमिन सी (vitamin c), मॅग्नेशियम (Magnesium), मॅगनीज (manganese) सारखी खनिजे असतात. व्हिटॅमिन बी 6 (Vitamin b6) हे चयापचय (metabolism )आणि रोगप्रतिकारशक्ती साठी महत्वाचे आहे.
वापर आणि पाककला:
ही केळी ताजी खाण्यासाठी अतिशय स्वादिष्ट आहे. त्याचबरोबर मिल्कशेक, केक, पॅनकेक, स्मुदि व आईस्क्रिम मध्ये नैसर्गिक फ्लेवर सारखी वापरली जाते. पिकलेली ब्लु जावा केळी थंड करून खाताना ती आईस्क्रिम सारखी लागते.

लागवड करताना येणाऱ्या अडचणी:
ब्लू जावा केळीला उष्ण आणि दमट हवामान आवश्यक असते. या केळीच्या लागवडीसाठी जास्त थंडी हानिकारक ठरू शकते. जास्त पाणी झाल्यास ही केळी कुजण्याची शक्यता असते. या केळीच्या फळांची काढणी वेळेत करावी लागते तसे न झाल्यास ही केळी जास्त पिकून मऊ पडते.
ब्लू जावा केळी अजून सर्वसामान्य ग्राहकांमध्ये फार परिचित नाही. त्यामुळे सुरुवातीला बाजारपेठ तयार करणे शेतकऱ्यांसाठी आव्हानात्मक ठरू शकते.
भारतातील लागवडीची स्थिती:
भारतात ही जात अजून फार प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळे चांगल्या गुणवत्तेची रोपे सहज मिळत नाहीत. त्यामुळे लागवडीचा खर्च वाढू शकतो. महाराष्ट्रातील काही प्रगतशील शेतकऱ्यांनी ब्लू जावा केळीची प्रयोगात्मक लागवड सुरू केली आहे. विशेषतः सोलापूर भागात काही शेतकऱ्यांनी व्यावसायिक पातळीवर यशस्वी उत्पादन घेतल्याची माहिती समोर आली आहे.
सध्या भारतात टिशु कल्चर पद्धतीने ब्लु जावा केळीची लागवड सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू सारख्या उष्ण व दमट राज्यात ही लागवड करणे शक्य आहे. हळूहळू या “Icecream Banana” ची मागणी व लोकप्रियता वाढत चालली आहे.
भारतातील केळी संशोधन संस्था आणि कृषी विद्यापीठे नवीन केळी जातींवर संशोधन करत आहेत. आधुनिक टिश्यू कल्चर तंत्रामुळे भविष्यात ब्लू जावा केळीची लागवड अधिक वाढण्याची शक्यता आहे.
ब्लु जावा केळीची किंमत:
या केळीची किंमत ही सामान्य केळीच्या तुलनेत जास्त असते. भारतात ही केळी सहज उपलब्ध नाही होत, त्यामुळे ती विशेष फळाच्या दुकानातून घ्यावी लागते. साधारनपणे या केळीची ऑनलाईन किंमत ही 150 ते 300 प्रति आहे. ही केळी जिथे पिकते तिथे तिची किंमत कमी असू शकते. जर भारतात मोठ्या प्रमाणावर लागवड वाढली तर ब्लू जावा केळीची किंमत कमी होण्याची शक्यता आहे. पण सध्या ही “प्रीमियम फळ” श्रेणीत मोडते.
निष्कर्ष:
त्यामुळे ब्लु जावा केळी ही एक विदेशी किंवा आकर्षक फळ नसून, ती आरोग्यदायी,चवीष्ट व पोषणमूल्यांनी भरलेली आहे. आपल्या अंगणात आपण जर याची थोडीशी लागवड केली तर ही झाडें सौंदर्य वाढवण्याबरोबरच तिची फळे खाताना आईस्क्रिमसारखा (Icecream Banana)गोड आनंद देतात.
एकूणच, ब्लू जावा केळी हे चव, आरोग्य आणि व्यावसायिक संधी यांचे सुंदर मिश्रण असून भविष्यात भारतीय शेतीसाठी एक आकर्षक पर्याय ठरू शकते.








