Pune Real Estate: UBS Group च्या ₹260 कोटींच्या ऑफिस लीज डीलची संपूर्ण माहिती जाणून घ्या. या व्यवहाराचा पुण्याच्या रिअल इस्टेट, IT हब आणि रेंटल मार्केटवर काय परिणाम होईल ते वाचा.
पुणे हे भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या IT आणि व्यावसायिक शहरांपैकी एक आहे. आता जागतिक वित्तीय सेवा कंपनी UBS Group ने पुण्यातील एअरपोर्ट रोड परिसरात तब्बल ₹260 कोटींची ऑफिस लीज डील केल्याने पुण्याच्या कमर्शिअल रिअल इस्टेट मार्केटकडे संपूर्ण देशाचे लक्ष वेधले गेले आहे. या डीलचा ऑफिस स्पेस, घरभाडे, गुंतवणूक आणि IT क्षेत्रावर नेमका काय परिणाम होणार आहे, ते जाणून घेऊया.

ही डील नेमकी काय आहे?
Pune Real Estate – What exactly is this deal?
Pune Rental Deal. ही डील एका साध्या फ्लॅट भाड्याची डील नसून एका मोठ्या कॉर्पोरेट ऑफिसची लीज डील आहे. जागतिक वित्तीय सेवा क्षेत्रातील प्रमुख कंपनी यू बी एस ग्रुपने पुण्यातील एअरपोर्ट रोड येरवडा येथे व्यावसायिक परिसरात एक संपूर्ण बिल्डिंग टॉवर भाडेतत्वावर घेतला आहे. कंपनीने व्यवस्थापित कार्यालयीन सुविधेसाठी ही जागा भाडेतत्वावर घेतली आहे.
UBS Group म्हणजे काय?
UBS Group ही स्वित्झर्लंडमधील जगातील आघाडीच्या वित्तीय सेवा (Financial Services) कंपन्यांपैकी एक आहे. Wealth Management, Investment Banking आणि Asset Management क्षेत्रात कंपनीची जागतिक उपस्थिती असून अनेक देशांमध्ये तिची कार्यालये आहेत.
अशा मोठ्या डीलसाठी पुणेच का निवडले?
Why did choose Pune for such a big deal?
Pune real estate आज मोठ्या कंपन्यासाठी निश्चितच आकर्षणाचे ठिकाण बनलेले आहे. पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात IT कंपन्या आलेल्या आहेत तसेच अजून काही कंपन्या येण्यासाठी उत्सुक आहेत, याच कंपन्यासाठी मुंबईपेक्षा कमी खर्चात मोठी जागा पुण्यामध्ये उपलब्ध होऊ शकते. त्यामुळेच पुण्याच्या 200 ते 300 किलोमीटर आजूबाजूला जेवढी शहर आहेत त्याच शहरातून पुण्यामध्ये येणाऱ्या लोकांचं मनुष्यबळ ही बरच मोठ आहे. त्यामध्ये (engineers, IT professionals ) अशा व्यक्तींचा समावेश आहे. पुण्याची कनेक्टिव्हिटी उत्कृष्ट आहे. गुंतवणूकदारासाठी पुणे हे एक प्रकारे ‘हॉटस्पॉट’ बनले आहे. ‘Pune Real Estate .
₹260 कोटींच्या पुणे ऑफिस लीज डीलची मुख्य माहिती
What are the features of this deal?
ही जागा एअरपोर्ट रोड टेक पार्क वन इथे आहे. या जागेच क्षेत्रफळ अंदाजे सुमारे 165290 चौरस फूट इतकं आहे. या ठिकाणी एकाचवेळी 1520लोक काम करू शकतात.या ठिकाणी चांगल्या दर्जाच्या सुविधा (Parking, Security, Smart System) उपलब्ध असणार आहेत. या करारानुसार कंपनीला बॅनर लावण्याचे हक्कही आहेत, त्यामुळे येथील लहान बाजारपेठेत त्यांच्या ब्रँडची ओळखही होईल.
| मुद्दा | माहिती |
|---|---|
| कंपनी | UBS Group |
| ठिकाण | Airport Road, Yerawada, Pune |
| प्रकार | Commercial Office Lease |
| क्षेत्रफळ | 1,65,290 Sq.ft |
| आसन क्षमता | 1,520 कर्मचारी |
| करार कालावधी | 9 वर्षे |
| वार्षिक वाढ | 7% |
| सुरक्षा ठेव | अंदाजे ₹24 कोटी |
| एकूण व्यवहार | अंदाजे ₹260+ कोटी |
या डीलचा Pune Real Estate Market वरती होणारा परिणाम काय असेल?
What will be the impact of this deal on the Pune Real Estate market?
या कराराचा त्याच बाजूला असणाऱ्या निवासी (Residential) बाजारपेठेवर थेट परिणाम होऊ शकतो. यामध्ये रेंटल होम्स (भाड्याची घरं) तसेच out rights होम्स याची मागणी वाढली तसेच घराच्या भाड्याच्या आणि विकतच्या घराच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते त्याचबरोबर प्रीमियम फ्लॅट्सची मागणीही वाढू शकते.
कमर्शिअल मार्केटनुसार ऑफिस स्पेसची किंमत वाढेल त्याचबरोबर नवीन प्रोजेक्टला प्रतिसादही मिळेल.गुंतवणूकदारांसाठी पुणे बनेल “हाय रिटर्न “मार्केट आणि दीर्घाकालीन गुंतवणूकसाठी योग्य असं ठिकाण.भविष्यात को वर्किंग स्पेस वाढलेले दिसतील.मोठ्या MNC कंपन्या पुण्यामध्ये विस्तार करतील.
₹260 कोटींची ही डील फक्त व्यवहार म्हणून पाहता येणार नाही तर, ही डील पुण्याच्या वाढत्या आर्थिक ताकदीचे प्रतीक ठरत आहे.ही डील शहराच्या वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेचे स्पष्ट संकेत देत आहे.IT सेक्टरमुळे वाढणारी मागणी आणि पायाभूत सुविधा यामुळे पुणे हे भारतातील टॉप Real Estate डेस्टिनेशन बनत आहे.तसेच हि डील साधारणतः जानेवारी 2026 पासून चालू झाली असून 5+4 अग्रीमेंट फॉरमॅट नुसार झाली असावी. तसेच Pune real estate डीलचे भाडे वार्षिक आहे की पंचवार्षिक आहे ते अजून समजू शकलेले नाही.
या करारामध्ये 7 टक्के अंदाजे वार्षिक वाढीचा समावेश असून तो 9 वर्षांच्या कालावधीसाठी आहे. या अटींनुसार, या कालावधीतील एकूण भाड्याचा खर्च 260 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंवा आसपास होतो.
मासिक भाड्यासोबतच, यूबीएसने 6 महिन्यांच्या भाड्याएवढी सुरक्षा रक्कम जमा केली आहे, जी अंदाजे 24 कोटी रुपयेच्या आसपास आहे. या करारानुसार, यूबीएसला इमारतीवर बाह्य फलक लावण्याचे हक्कही मिळाले आहेत, ज्यामुळे एअरपोर्ट रोड पुणे आणि रिअल इस्टेट सूक्ष्म बाजारपेठेत त्यांच्या ब्रँडची ओळख अधिक मजबूत होईल.
खराडी,नगर रोड, विमाननगर, येरवडा आणि एअरपोर्ट रोड या ठिकाणी पुण्यातील प्रमुख ऑफिस स्पेस म्हणून आपले वेगळे स्थान निर्माण करत आहे. विमानतळाजवळील कंमर्सिल कोररिडर प्रस्थापित आयटी आणि बिझनेस पार्क्स, तसेच मध्य पुणे (छत्रपती शिवाजीनगर आणि कर्वे रोड )आणि खराडी व्यापारी पट्ट्याशी सुधारत असलेली रोड आणि मेट्रो कनेक्टिव्हिटी यांमुळे या परिसरात अनेक कंपन्या आपल्या नव्या शाखा सुरु करत आहेत. यात आता मल्टिनेशनल आणि इंटरनॅशनल कंपन्यांची देखील भरपूर भर पडत आहे.
भारतातील काही मोठ्या Commercial Office Lease Deals
या आधीच्या इतर शहरातील मोठ्या रेंटल डील्स पाहूया.
ऍमेझॉन कंपनी नें बंगलूर मध्ये सर्वात मोठी डील प्रेस्टिज ग्रुप बंगलोर कडून झाली होती जी की भारतातील सर्वात मोठी रेंटल डील होती अशी शक्यता वर्तवण्यात येतो आहे. तसेच हैद्राबाद, नोयडा, दिल्ली या ठिकाणी देखील अश्याच प्रकारच्या मोठ्या रेंटल डील ची माहिती आहे.
| शहर | कंपनी | अंदाजे डील |
| Bengaluru | Amazon | भारतातील सर्वात मोठ्या ऑफिस लीज व्यवहारांपैकी एक |
| Hyderabad | Google / Microsoft | मोठ्या IT कॅम्पस लीज |
| Noida | HCL / MNCs | लाखो चौरस फूट ऑफिस स्पेस |
| Pune | UBS Group | ₹260+ कोटींची दीर्घकालीन लीज |
निष्कर्ष
UBS Group ची ₹260 कोटींची ऑफिस लीज डील ही केवळ एक व्यावसायिक व्यवहार नसून पुण्याच्या वेगाने विकसित होत असलेल्या अर्थव्यवस्थेचे आणि वाढत्या जागतिक महत्त्वाचे प्रतीक आहे. IT, BFSI आणि Global Capability Centres (GCC) यांच्या विस्तारामुळे पुण्याची कमर्शिअल आणि निवासी रिअल इस्टेट बाजारपेठ आणखी मजबूत होण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदार, घरखरेदीदार आणि व्यावसायिक कंपन्यांसाठी पुणे पुढील काही वर्षांत भारतातील सर्वाधिक आकर्षक रिअल इस्टेट बाजारपेठांपैकी एक ठरू शकते.
पुण्यातील रिअल इस्टेट, IT सेक्टर आणि मोठ्या व्यावसायिक घडामोडींबाबत अशाच ताज्या आणि विश्वासार्ह अपडेट्ससाठी आमच्या वेबसाइटला नियमित भेट द्या.





