Hunza व्हॅलितील महिला – निसर्गाशी जुळलेलं खरं सौंदर्य 

आपण बोलत आहोत अशा महिलांनविषयी ज्या त्त्यांच्या नैसर्गिक सुंदरतेबरोबरच त्यांच्या शालिन स्वभाव व निरोगी आयुष्य यासाठी प्रसिद्ध आहेत.

नैसर्गिक शालीनतेच प्रतीक :

एक असा प्रांत जो पाकिस्तान मध्ये गिलगीट – बाल्टीस्तान येथे Hunza व्हॅली म्हणून ओळखला जातो. ही व्हॅली फक्त निसर्गरम्य सौदंर्यासाठी नाही तर तेथील महिलांच्या सौंदर्यासाठी देखील जगभर प्रसिद्ध आहे. या खोऱ्यातील महिलांची जीवनशैली, निरोगी आयुष्य, शालीनता व संस्कारी वृत्ती ही सगळ्यांनाच आकर्षित करते. 

नैसर्गिक सौंदर्य व साधेपणा:

येथील महिलांचा नैसर्गिक साधेपणा असलेली चमक, ताजेपणा आणी त्यांचा पारंपरिक पोशाख त्यांना आकर्षक बनवतो. खरं तर त्यांचं सौंदर्य हे फक्त बाह्यरूपापुरतंच मर्यादित नसून त्यांच्या साधेपणात,स्वाभाविक स्मितात व कष्टाळू वृत्तीत दिसून येत. साधे पोशाख, रंगबिरंगी दुपट्टे आणि पारंपरिक दागिने हे त्यांच्या सौंदर्याला वेगळाच मोहकपणा देतात.

दीर्घायुष्याचे रहस्य:

असे मानले जाते की येथील महिलांचे आयुष्य हे सरासरी 90 ते 100 वर्षांपेक्षा जास्त आहे. याचेच रहस्य म्हणजे त्यांच्या आहारात वापरल्या जाणाऱ्या ताज्या भाज्या, फळे व नैसर्गिक धाण्य हे होय. त्याचबरोबर पिण्यासाठी स्वच्छ पाण्याचा पुरवठा, मेहनती जीवनशैली आणि निसर्गाशी असलेले जवळचे नाते हे ही त्यांच्या दीर्घायुष्यासाठी महत्वाचे ठरते.

आत्मनिर्भरपणा आणि मेहनत:

या खोऱ्यातील महिला शेती, हस्तकला, घरगुती कामे आणि त्याचबरोबर मुलांच्या शिक्षणात देखील महत्वाची भूमिका निभावतात. त्यांच्यामध्ये असणारा आत्मविश्वास व संयम समाजाच्या आणि  स्वतःच्याही प्रगतीसाठी प्रेरणादायी ठरतो.

शालीनतेचा खरा अर्थ:

या महिलांची शालिनता ही केवळ त्यांच्या राहणीमाणात नसून त्यांच्या वर्तनात, विचारांमध्ये आणि निसर्गाशी असलेल्या नात्यामध्ये लपलेली आहे. त्यांनी आधुनिकतेचा पण स्वीकार केला आहे परंतु आपली संस्कृतीही घट्ट जोडून ठेवली आहे.

यावरूनच लक्षात येते की निरोगी आणि संतुलित आहार घेणं किती महत्वाचं आहे. साधेपणात दडलेले सौंदर्य देखील आपल्याला ओळखता आलं पाहिजे. त्याचबरोबर संस्कृती आणि आधुनिकता यांची सांगड ही आपल्याला घालता आली पाहिजे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

0

Subtotal