“सत्तर वळणांची रोमांचक सफर – कोल्ली हिल्स. “Kolli Hills tourist place.

Kolli Hills – तुम्हाला माहित आहे का निसर्गाच एक गुपित….

तामिळनाडूच्या नामक्कल जिल्ह्यामध्ये वसलेलं “कोल्ली हिल्स “ हे ठिकाण निसर्गप्रेमी आणि साहसी प्रवाश्यांसाठी एक स्वर्ग आहे. हे हिल्स हिरव्यागर दऱ्या, 70 वळणे असलेला रोमांचक घाट, धबधबे, मंदिरे आणि तेथील स्थानिक आदिवासी संस्कृती यामुळे हे ठिकाण ओळखले जाते. Kolli Hills ला “Mountain of Death” असेही म्हटले जाते. प्राचीन कथांनुसार या भागात अनेक रहस्यमय गोष्टींच्या कथा सांगितल्या जातात. मात्र आज हे ठिकाण निसर्गप्रेमी, बाइक रायडर्स आणि साहसी प्रवाशांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे.

Kolli Hills

कोल्ली हिल्सची वैशिष्ट्य:

1. या हिल्सवरती 70 हेअरपीन बेंड्स म्हणजेच वळण आहेत आणि हे प्रत्येक वळण एक रोमांचक अनुभव देऊन जाते.

2. इथे 300 फूट उंचीवरून कोसळणारा अगया धबधबा /अरपाळी धबधबा आहे. हा धबधबा म्हणजे पर्यटकांसाठी निसर्गसौदर्यांची मोठी मेजवानीच आहे.

3. या ठिकाणी सिल्वर-ओक, चहा- कॉपी, मसाला, औषधी वनस्पती मोठ्या प्रमाणात पिकवल्या जातात.

4. पर्वतदेवतेला समर्पित असलेलं कोल्लीपवई हे प्राचीन धार्मिक मंदिर महत्वाचं केंद्र मानलं जात.

5.इथे गेल्यावर आपल्याला तेथील स्थानिक आदिवासी संस्कृती, पारंपरिक नृत्य, संगीत आणि खास अश्या खाद्यपादार्थांचा अनुभव घ्यायला मिळतो.

6. हे हिल्स जवळपास 4267 फूट. (1300m)उंचीवर असून इथे सलग 70 हार्पिन वळण आहेत. या कारणामुळे हे हिल्स “माउंटन ऑफ डेथ” या नावाने देखील ओळखली जातात.

कोल्ली हिल्सला भेट देण्याचा योग्य काळ:

1. या ठिकाणी भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च हा काळ प्रवासासाठी एकदम उत्तम आहे. या काळामध्ये वातावरण हे थंडगार आणि एकदम सुखद असं असल्याने आपल्याला ट्रेकिंग आणि निसर्गदर्शनाचा पुरेपूर आनंद घेता येतो.

2. जुलै ते सप्टेंबर मध्ये पावसामुळे तिथले धबधबे उफाळून येतात. या काळात तिथे लाव्हरी असं निसर्गसौदंर्य पाहायला मिळत.

3. एप्रिल ते जून या कालावधीमध्ये उन्हाळा असल्यामुळे प्रवास करणं थोडं अवघड होऊ शकत.

तस तर वर्षभर आपण भेट देऊ शकतो परंतु, जानेवारी महिन्यात या ठिकाणी कडाक्याच्या थंडीमुळे येथील ठिकाणे ही अल्प प्रमाणात बंद असू शकतात.

कोल्ली हिल्स म्हणजे बाईक रायडर्स साठी स्वर्गच:

येथील वाळणांच्या रस्त्यावर फारशी गर्दी नसल्यामुळे इथे घेतलेला राईडचा अनुभव हा आनंददायी ठरतो. डोंगराच्या शांततेतून बाईक चालवताना मिळणार स्वातंत्र्य आणि ती भावना अनेक रायडर्स साठी खूप खास असते. म्हणूनच या ठिकाणाला बाईक रायडर्स साठीचा स्वर्ग असं म्हटलं जात.

स्थानिक संस्कृती आणि स्थानिक खाद्यपदार्थ:

Kolli Hills हे ठिकाण निसर्गासाठी तर प्रसिद्ध आहेच परंतु  तेथील स्थानिक संस्कृती आणि खाद्यपदार्थ देखील तितकेच प्रसिद्ध आहेत. त्यांच्या जीवनशैलीतून तिथल्या पारंपारिक तामिळ संस्कृतीची झलक दिसून येते. इडली, डोसा, सांबर, रसम, लिंबू भात, नारळापासून बनणारे पदार्थ हे पदार्थ सगळीकडे भेटतात परंतु स्थानिक चव किंवा एक प्रकारची ओरिजनल चव ही काही वेगळीच असते. त्याची तुलना कशाशिच होऊ शकत नाही.

येथील नैसर्गिक मध आणि herbal product पण खूप लोकप्रिय आहेत. अनेक पर्यटक तिथला नैसर्गिक मध, औषधी वनस्पती आणि मसाले हे घेऊनच जातात.

ट्रेकिंग चा अनुभव:

धाडसी लोकांसाठी इथला ट्रेकिंगचा अनुभव हा अत्यंत रोमांचक ठरतो. Kolli hills चा प्रत्येक रस्ता हा निसर्गाच्या सौंदर्याने नटलेला आहे. ट्रेकिंग करताना पक्षांचे मधुर आवाज, थंड वातावरण आणि शांतता यापासून एक वेगळीच ऊर्जा आपल्याला मिळते.

Agaya Gangai Waterfall हा तिथला प्रसिद्ध ट्रेकिंग पॉईंट आहे. इथे पोहचण्यासाठी शेकडो पायऱ्या आहेत. इथे जंगल ट्रेकिंग, camping आणि nature walk सारख्या activities उपलब्ध आहेत.

फोटोग्राफीसाठी हे ठिकाण एखाद्या स्वर्गपेक्षाही कमी नाही. त्यामुळे इथे येऊन गेलेला पर्यटक हा अनुभव आयुष्भरसाठी जपून ठेवतो.

Kolli Hills मधून मिळणारी शिकवण:

या डोंगरातील सत्तर वळणं आपल्याला जीवनाचीही आठवण करून देतात. जीवनाचा प्रवास सरळ नसतो; त्यातही अनेक वळणं, चढ-उतार आणि आव्हानं असतात.

पण प्रत्येक कठीण वळणानंतर सुंदर दृश्य दिसतं — अगदी जीवनासारखंच.

Kolli Hills म्हणजेच निसर्ग, अध्यात्म आणि साहस यांच सुंदर मिश्रण. शहरी जीवनापासून दूर, स्वतःला ओळखण्यासाठी आणि निसर्गाशी आपल नातं जपण्यासाठी हे एक योग्य असं ठिकाण आहे. त्यामुळे आयुष्यात एकदा तरी या ठिकाणाला अवश्य भेट द्या.

निष्कर्ष:

Kolli Hills हे निसर्ग, रोमांच आणि शांततेचा अप्रतिम संगम असलेले ठिकाण आहे. सत्तर वळणांचा थरारक प्रवास, धुक्याने भरलेले डोंगर, सुंदर धबधबे आणि घनदाट जंगलं यामुळे येथे येणारा प्रत्येक प्रवासी एक वेगळाच अनुभव घेऊन परततो. बाइक रायडिंग, ट्रेकिंग, कॅम्पिंग आणि निसर्ग निरीक्षण यांसारख्या साहसी गोष्टींमुळे Kolli Hills हे साहसप्रेमींसाठी स्वर्ग मानले जाते. त्याचबरोबर येथील साधी स्थानिक संस्कृती, शांत वातावरण आणि नैसर्गिक सौंदर्य मनाला खऱ्या अर्थाने विश्रांती देते. जीवनातील धावपळ आणि तणावापासून दूर जाऊन निसर्गाच्या जवळ काही क्षण घालवायचे असतील, तर Kolli Hills हे निश्चितच एक परिपूर्ण पर्यटनस्थळ आहे.

Related Posts

महाराष्ट्र भारताला काय देतो? अर्थव्यवस्था, शेती, उद्योग, संस्कृती आणि विकासातील महाराष्ट्राचे अतुलनीय योगदान

महाराष्ट्र भारताला काय देतो? महाराष्ट्र भारताला अर्थव्यवस्था, शेती, उद्योग, संस्कृती, पर्यटन, वारसा, खाद्यसंस्कृती, पायाभूत सुविधा आणि महान विचारवंतांच्या माध्यमातून कसे समृद्ध करतो हे सविस्तर जाणून घ्या. महाराष्ट्र भारताला काय देतो?…

महाराष्ट्रातील ट्रेकिंगसाठी सर्वोत्तम ९ किल्ले | इतिहास, निसर्ग आणि रोमांचाचा अनुभव!

महाराष्ट्रातील ट्रेकिंगसाठी सर्वोत्तम ९ किल्ले: महाराष्ट्रातील ट्रेकिंगसाठी सर्वोत्तम ९ किल्ल्यांची माहिती जाणून घ्या. इतिहास, ट्रेकची कठीणता, लागणारा वेळ, निसर्गरम्य दृश्ये आणि भेट देण्याचा योग्य काळ एका ठिकाणी. महाराष्ट्रात ३५० पेक्षा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

High Income Digital Skills in Marathi: घरबसल्या कमाईसाठी 9 सर्वाधिक मागणीची डिजिटल कौशल्ये

High Income Digital Skills in Marathi: घरबसल्या कमाईसाठी 9 सर्वाधिक मागणीची डिजिटल कौशल्ये

पैशाच्या मागे धावू नका, पैसा तुमच्याकडे आकर्षित करा! – पैसा आकर्षित करण्याचे नियम

पैशाच्या मागे धावू नका, पैसा तुमच्याकडे आकर्षित करा! – पैसा आकर्षित करण्याचे नियम

महाराष्ट्र भारताला काय देतो? अर्थव्यवस्था, शेती, उद्योग, संस्कृती आणि विकासातील महाराष्ट्राचे अतुलनीय योगदान

महाराष्ट्र भारताला काय देतो? अर्थव्यवस्था, शेती, उद्योग, संस्कृती आणि विकासातील महाराष्ट्राचे अतुलनीय योगदान

महाराष्ट्र पोलीस दलातील पदांचा क्रम: कॉन्स्टेबलपासून DGP पर्यंत संपूर्ण माहिती

महाराष्ट्र पोलीस दलातील पदांचा क्रम: कॉन्स्टेबलपासून DGP पर्यंत संपूर्ण माहिती

ऑनलाइन कमाईसाठी वेबसाइट्स – डिजिटल प्रॉडक्ट, ई-बुक, ऑनलाइन कोर्स आणि सेवांमधून पैसे कसे कमवायचे?

ऑनलाइन कमाईसाठी वेबसाइट्स – डिजिटल प्रॉडक्ट, ई-बुक, ऑनलाइन कोर्स आणि सेवांमधून पैसे कसे कमवायचे?

महाराष्ट्रातील रिअल इस्टेट क्षेत्र गुंतवणुकीचे ट्रेंड : गुंतवणूकदारांसाठी संधी, जोखीम आणि महत्त्वाच्या टिप्स

महाराष्ट्रातील रिअल इस्टेट क्षेत्र गुंतवणुकीचे ट्रेंड : गुंतवणूकदारांसाठी संधी, जोखीम आणि महत्त्वाच्या टिप्स