वेळ म्हणजेच आयुष्य – त्याच वेळेच व्यवस्थापन करायला शिकवणारी सात पुस्तकं.

आजच्या धावत्या जगात वेळ ही सर्वात किमती संपत्ती आहे. आपल्याकडे म्हणतात पैसा परत मिळू शकतो, पण गेलेला वेळ परत कधीच मिळू शकत नाही. त्यामुळेच आपल्याला वेळेचा योग्य उपयोग कसा करायचा हे शिकवणारी सात पुस्तकं वाचन गरजेचं आहे. खाली दिलेली पुस्तकं ही तुमच्या वेळेच व्यवस्थापन, उत्पादकता आणि जीवनशैली सुधारायला खरच मदत करू शकतात.

1. “Eat That Frog”- Brian Tracy. 

या पुस्तकाचा मुख्य संदेश हाच आहे की आपल्याला जे काम सर्वात अवघड आणि महत्वाचं वाटत ते काम पहिल्यांदा पूर्ण करा.

             आपण काय करतो नेहमी सोप्या कामांना प्राधान्य देतो आणि जी कामे आपल्याला कठीण वाटतात ति कामे पुढे ढकलतो. परंतु दिवसाची सुरुवात ही कठीण कामाने केली, तर उरलेली कामे ही सोपी वाटतात. हे एक असं पुस्तक आहे जे टाळाटाळीवर मत करून, वेळेचा योग्य वापर कसा करायचा ते शिकवते.

2.” The 7 Habbits of Highly Effective People – Stephen R. Covey.”

आपल्या प्रभावी जीवनशैलीसाठी कोणत्या सवयी महत्वाच्या आहेत हा या पुस्तकाचा मुख्य उद्देश आहे.

       यातील सवयी जबाबदारी, विजन, प्राधान्यक्रम, सहकार्य, सातत्य आणि स्वतःचा विकास शिकवतात. वेळ आणि जीवन व्यवस्थापनासाठी हे पुस्तक अतिशय मार्गदर्शक आहे.

3. “Deep Work – Cal Newport.”

या पुस्तकाचा मुख्य संदेश आपल्या मनाचं विचलन टाळून, एकाग्रतेने काम कस करायच हा आहे.

         सोशल मिडिया, मोबाईल आपला वेळ वाया घालवतात. Deep Work म्हणजे एक ठराविक वेळ, कोणताही व्यत्यय येऊ न देता एकाच कामावर लक्ष केंद्रित करायच. यातूनच कमी वेळेत जास्त दर्जेदार काम करून प्रगती करण्याचा मार्ग आपल्याला मिळतो.

4.”Atomic Habbits – James Clear.”

छोट्या छोट्या सवयीमधून मोठा बदल कसा करायचा हे या पुस्तकातून अनुभवायला मिळते.

            आपल्या जीवनात आपण दररोज फक्त 1% प्रगती केली, तरी वर्षभरात आपल्याला प्रचंड बदल दिसतो. त्यासाठी चांगल्या सवयीची साखळी निर्माण करणं आणि वाईट सवयी तोडणं यावर लक्ष केंद्रित केल पाहिजे.

5. “The 80/20 Principle – Richard Koch.”

वीस टक्के प्रयत्नातून ऐशी टक्के परिणाम कसा मिळवायचा हे यातून शिकायला मिळते.

     आपल्या जीवनात काही मोजक्या कामाचा परिणाम दिसतो उरलेला वेळ हा असाच वाया जातो. हे पुस्तकं शिकवत की महत्वाच्या वीस टक्के कामावर तुम्ही लक्ष दिल तर तुमचा वेळ आणि ऊर्जा दोन्ही वाचू शकतात.

6. “Getting Things Done (GTD) – David Allen.”

कामाचं व्यवस्थापन करण्याची सोपी पद्धत शिकण्यासाठी या पुस्तकाचा उपयोग आपल्याला होऊ शकतो.

   कामं डोक्यात साठवून ठेवण्यापेक्षा ति लिहून ठेवावी त्यामुळे मानसिक ताण कमी होऊन आपला वेळ वाचतो.

7. ” Essentialism: The Disciplined Pursuit of Less – Greg McKeown.”

अनावश्यक गोष्टींना ‘नाही’ म्हणायला शिका हा या पुस्तकाचा खरा उद्देश आहे. प्रत्येक गोष्टींना हो म्हणणं म्हणजे वेळ वाया घालवण. या पुस्तकातून आपल्याला खरच महत्वाच्या असणाऱ्या गोष्टींवरच लक्ष केंद्रित करायला शिकल पाहिजे हेच शिकायला मिळते.

“वेळ वाचवणं म्हणजे आयुष्य वाढवणं “ ही पुस्तके वाचा आणि तुमच्या आयुष्यातील प्रत्येक मिनिटांचं सोन करा!.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

0

Subtotal