शांततेची शक्ती (The Power of Silence) नेमकी काय असते?

असं म्हणतात की शब्द जखमा करतात परंतु शांतता ही उपचारासारखी असते.

शांतता म्हणजेच मनाचा आरसा, ज्यात आपल्याला आपले खरे रूप समजते.

शांत राहणे म्हणजे आवाज न करता राहणे असं नाही तर आपल मन शांत करणे आणि जेव्हा मन शांत असत तेव्हाच आपल्याला आपले विचार हे स्पष्टपणे जाणवतात. आपल्या विचारांचा स्पष्टपणाच आपल्याला योग्य तो निर्णय घेण्यास मदत करतो.

डोंगर फक्त उंच दिसतच नाहीत, तर त्यांची उंची आपल्याला बरंच काही शिकवून जाते.

अथांग समुद्र, उंची डोंगर, किंवा जंगलातील शांतता ही सगळी निसर्गाचीच किमया आहे. त्याचा आपण सखोल असा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला जाणवते की खरी शक्ती ही आवाजात नसून स्थिरतेत आहे.

खूप वेळा शांत राहणे हेच काही गोष्टींवर सर्वात मोठे उत्तर असते.

वाद घालून जिंकण्यापेक्षा कधी कधी शांत राहणे सुद्धा महत्वाचे ठरवू शकते. कारण शब्दांनी जे आपण साध्य करू शकत नाही ते शांततेने घेऊन साध्य होऊ शकते. कारण शांतता ही एखाद्याचा अहंकार मोडू शकते आणि विचार करायलाही भागही पाडू शकते.

अंतरमनाची ऊर्जा 

आराधना, ध्यान किंवा काही वेळा शांत बसून राहणे हे सर्व आपल्याला मनाची ताकद वाढवतात. आणि ज्या लोकांना ही शांतता जोपसता येते असे लोक कितीही मोठी संकटे आली तरीही त्याला तोंड देऊ शकतात किंवा स्थिर राहतात.

शांतता म्हणजेच खरे धैर्य

बोलणे खूप सोपे असते परंतु शांत राहणे ही एक खरी कसोटी आहे. कारण खरी शक्ती ही त्याच व्यक्तीकडे असते जो संयमाने, योग्य वेळी आणि योग्य कृतीला प्रतिसाद देतो.

त्यामुळेच शांत राहणे ही कमजोरी नसून खरी ताकद आहे. ती आपल्या मनाला स्थिर करून विचारांना स्पष्टता देते आणि नात्यांना घट्ट बनवते. त्यामुळेच तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात गोंगाट आहे असं वाटत असेल तर थोडा वेळा स्वतःसाठी शांततेत घालवा. असे केल्यामुळे तुम्हाला तुमच्यातील खरे सामर्थ्य सापडेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

0

Subtotal