मोहरी तेल : परंपरा आणि विज्ञान यांचा संगम.

मोहरीच तेल हे फक्त चवीसाठीच नाही तर आरोग्यासाठीही उपयोगी मानलं जात. वर्षानुवर्षे आयुर्वेदाबरोबरच घरगुती उपचारांमध्येही मोहरीच्या तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. चला तर मग जाणून घेऊया या तेलाचे फायदे, उपयोग, किंमत आणि वैज्ञानिक दृष्टीकोन काय आहे तो..

मोहरीच्या तेलाचे फायदे:

1. या तेलामध्ये ओमेगा -3 फॅटी ऍसिड आणि ओमेगा -6 असतात, ज्यामुळे आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. 

2. हे तेल आपण आपल्या शरीराच्या मसाजसाठीही वापरू शकतो. या तेलाने मसाज केल्याने आपल्या शरीरातील रक्ताभीसरण क्रिया सुधारते, त्वचा मऊ होते आणि निरोगीही राहते.

3. आपल्या केसांना हलका मसाज केल्याने केस गळायचे कमी होतात आणि त्याचबरोबर मजबूतही होतात.

4. मोहरीच तेल कोमट करून छातीवर मालिश केल्याने श्वसणाच्या समस्या कमी होतात व सर्दी खोकल्यापासूनही आपल्याला अराम मिळतो.

5. यामध्ये Anti-Bacterial आणि Anti-Fungle असे जंतूनाशक गुणधर्म आहेत.

आरोग्याचे फायदे:

1. पचनक्रियेमध्ये सुधारणा होते.

2. सांधेदुखी व स्नायूदुखी असल्यास मसाज केल्याने आराम मिळतो.

3. रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

4. रक्तदाब संतुलित राहण्यास मदत होते.

5. शरीरातील चरबी कमी करण्यास मदत होते.

मोहरीच्या तेलाचा उपयोग:

1. स्वयंपाकघरात लोणच्यामध्ये, भाजीसाठी, करीसाठी या तेलाचा उपयोग होतो.

2. मोहरीच्या तेलाने मालिश केल्याने हिवाळ्यामध्ये आपले शरीर गरम राहते.

3. आपण कानदुखी , डोकेदुखी आणि सर्दीसाठी या तेलाचा वापर करू शकतो.

4. उत्तम केस आणि त्वचेच्या देखभालीसाठी या तेलाचा वापर आपण करू शकतो.

मोहरी तेलाची किंमत:

साधारणपणे 120 ते 200 रुपये प्रति लिटर ही या तेलाची किंमत असते किंवा आपण कोणत्या ठराविक ब्रँडच तेल खरेदी करतोय यावर या तेलाची किंमत ठरलेली असते.

ऑरगॅनिक म्हणजेच कोणतीही प्रक्रीया न केलेलं तेल हे थोडं महाग असू शकत (200 ते 300रु प्रति लिटर)

वैज्ञानिक दृष्टीकोन:

1. काही संशोधनानुसार मोहरीच्या तेलामध्ये मोनो-अनसॅच्युरेटेड फॅट (MUFA) जे की आपल्या हृदयासाठी चांगले असतात.

2. यातील अँटी-ऑक्सिडंट आपल्या शरीराला फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण देतात.

3. अलिल आयसोथायोसायानेट (AITC) मुळे याचा वापर आपण आपल्या शरीरात एक प्रकारे जंतूनाशक आणि दाहशामक म्हणूनही करू शकतो.

परंतु या तेलाचा जास्त प्रमाणात वापर किंवा सेवन केल्यावर आपल्या हृदयावर विपरीत परिणाम होऊ शकतो त्यामुळे या तेलाचा संतुलित वापर करणे आवश्यक आहे.

यावरून आपल्या लक्षात आले असेल की या तेलाचा वापर आपण आरोग्य, त्वचा, केस, आणि घरगुती उपचारासाठी करू शकतो. योग्य प्रमाणात व संतुलित वापर केल्यास हे तेल खऱ्या अर्थाने आरोग्याचा खजिना ठरते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

0

Subtotal