जगातील सर्वात उंच रेल्वे आर्च ब्रिज म्हणून चेनाब रेल्वे पूल ओळखला जातो. हा पूल निर्माण करण्यामागे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे, त्या म्हणजे डॉ. G. माधवी लता.भारतीय रेल्वेची प्रगती आणि तांत्रिक कौशल्य जगाला अनेकदा अचंबित करत आलं आहे. त्याचच सर्वात मोठं उदाहरण म्हणजे जम्मू – काश्मीरच्या चेनाब नदीवर उभारलेला जगातील सर्वात उंच रेल्वे आर्च ब्रिज. हा पूल म्हणजे एक अभियांत्रिकी चमत्कार नसून तो आपल्या देशाच्या आत्मनिर्भरतेचा आणि सामर्थ्याच प्रतीक आहे.

चेनाब रेल्वे पुलाची थोडक्यात माहिती:
हा पूल रेसी-कटरा-बनिहाल रेल्वे मार्ग, जम्मू-काश्मीर येथे आहे.याची उंची ही 359 मीटर एवढी असून (एफिल टॉवरपेक्षा उंच) त्याची लांबी 1315 मीटर आहे. हा पूल म्हणजे उत्तम प्रकारचं स्टील आणि प्रगत अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा संगम आहे. विशेष म्हणजे हा पूल वारा, भूकंप आणि दहशतवादी हल्यांसारख्या आव्हानांना तोंड देण्यासाठी खास प्रकारे तयार केला आहे.
डॉ. G. माधवी लता – स्थापत्य अभियंता:
या प्रचंड उंच आणि भव्य अशा प्रकल्पामध्ये महत्वाची भूमिका निभावणाऱ्या व्यक्तींमध्ये डॉ. G. माधवी लता यांच नाव हे अग्रक्रमाने घेतलं जात. त्यांनी या प्रकल्पामध्ये भारतीय रेल्वेच्या वरिष्ठ अभियंता म्हणून काम केल.
कठीण भौगोलिक परिस्थिती, हवामान आणि सुरक्षेच्या धोक्यामध्येही त्यांनी आपल्या टीमबरोबर हा प्रकल्प यशस्वीरित्या पुढे नेला. त्यांच्यामध्ये असलेल्या तांत्रिक दृष्टिकोनामुळे, नेतृत्वगुणांमुळे आणि चिकाटीमुळे हा पूल वास्तविकरित्या साकारला गेला. अभियांत्रिकी क्षेत्रात आणि त्यामध्येही स्थापत्य विभागात महिलांचा सहभाग हा कमी मानला जातो, पण डॉ. माधवी लता यांनी हे दाखवून दिल की कठीण प्रकल्पामध्ये महिलाही आग्रही भूमिका बजावू शकतात.
अभियांत्रिकी आणि प्रेरणेचा संगम:
हा पूल हे केवळ एका रेल्वे पुलाच बांधकाम नाही तर, भारताच्या आत्मनिर्भरतेचा आणि महिलांच्या सशक्तिकरणाचा महत्वाचा भाग आहे. डॉ. माधवी लता यांच्यासारख्या अभियंता महिलांमुळेच आज लाखो तरुणीना अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करण्याची प्रेरणा मिळत आहे.
चेनाब रेल्वे पूल प्रकल्पाचे महत्व:
हा पूल म्हणजे जम्मू-काश्मीरला भारताच्या इतर भागाशी संपूर्ण रेल्वेन जोडणार एक महत्वाचं पाऊल ठरलं. त्यामुळेच प्रवासाचा कालावधी कमी झाला. त्याचबरोबर पर्यटन, व्यापार आणि आर्थिक विकासाला मोठी चालना मिळाली. महत्वाचं म्हणजे आपल्या देशातील अभियांत्रिकी आणि तांत्रिक सामर्थ्याच संपूर्ण जगाला दर्शन झालं.
ऐतिहासिक माहिती:
या प्रकल्पाची घोषणा 2004 साली करण्यात आली. 2008 साली काम सुरु झालं, पण काही तांत्रिक कारणांमुळे अडथळे येऊ लागले. नंतर 2017 साली या प्रकल्पाच्या मुख्य कामकाजाला गती मिळाली. 2021 साली हा आर्च पूर्णपणे जोडला गेला आणि 2023 ला याचे बांधकाम पूर्ण होऊन ट्रायल रन सुरु करण्यात आले.
चेनाब रेल्वे पूल हा केवळ एक पूल नाही, तर आपल्या देश्याच्या प्रगत तंत्रज्ञानाचा, अभियांत्रिकी कौशल्याचा आणि चिकाटीच प्रतीक आहे. हा पूल भविष्यामध्ये जम्मू-काश्मीरच्या विकासासाठी एक महत्वाचा टप्पा ठरणार आहे.
